🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ४८
📿 कुण बांचे पाती, बिना
48.
कुण बांचे पाती, बिना प्रभु कुण बांचे पाती ।
कागद ले ऊधोजी आयो, कहा रह्या साथी ।
आवत जावत पांव घिस्या रे वाला अंखिया भई राती॥
कागद ले राधा वांचण बैठी, वाला भर आई छाती ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४८
📿 श्मशान ते भूमि प्रेत
48.
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥
भरतील पोटे श्वानाचिया परी । वस्ति दिली घरी यमदूता ॥धृपद॥
अपूज्य लिंग तेथे अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरा कंटकांची ॥२॥
तुका म्हणे नाही ठावी स्थिति मती । यमाची निश्चिंती कुळवाडी ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४८
📿 तुझीया भेटीला जीव मा
48.
तुझीया भेटीला जीव माझा तळमळी । केधवा वनमाळी येईल घरा ॥
येई गा बा हरि माझ्या प्राणनाथा । जीव जाईल आता करु काय ॥
माझिया देहीचा बैसकार केला । का रे नाही आला विठोबा माझा ॥
येई गा कृपानिधी बैस माझ्या घरि । तुज आता नाही उरी संसाराची ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ४८
📿 नेणती महिमा ब्रह्माद
48.
नेणती महिमा ब्रह्मादिक भद्र । आणि ते महेंद्र नाना स्थानी ॥१॥
ते रुप खेळत गौळी याच्या संगे । पुंडलिका मार्गे भीमातीरी ॥२॥
उत्पत्ति उलथा न चले तो मार्ग । दुजियाचा संगनाही ज्यासी ॥३॥
निवृत्ति प्रगट गुरु मंत्र फळद । गोपाळ विग्दद ब्रह्म सेवी ॥४॥
49.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वेद अच्युत सर्वकाळ ॥१॥
तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील रासी पातकांच्या ॥२॥
देव इच्छी रज चरणींची माती । धावत चालती मागे मागे ॥३॥
काय त्या उरले वेगळे आणिक । वैकुंठनायक जया कंठी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ४९
📿 चित्ती तुझे पाय डोळा
49.
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेचि एक तुम्हा मागतो मी दातारा । उचित ते करा भाव जाणोनी खरा ॥२॥
खुंटली जाणीव काही बोलणेची आता । कळो येईल तैसी करा बाळाची चिंता ॥३॥
तुका म्हणे आता नका देऊ अंतर । न कळे पुढे काय कैसा होईल विचार ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 प्रकरण नसलेले›
📿 अभंग क्र. ४९
📿 हा दीनवत्सल महाराज ।
49.
हा दीनवत्सल महाराज । जनासवे काय काज ॥1॥
तुझी नाही केली सेवा । दुःख वाटे माझ्या जिवा ॥2॥
रात्रंदिवस मजपाशी । दळू कांडू तू लागसी ॥3॥
जे जे दुःख झाले मला । ते ते सोसिले विठ्ठला ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४९
📿 एकादशीव्रत सोमवार न
49.
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥१॥
काय करू बहु वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ॥धृपद॥
हरीहरा नाही बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥२॥
तुका म्हणे नाही नारायणी प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणो ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४९
📿 तुझिये चरणी जाण स्थि
49.
तुझिये चरणी जाण स्थिरावले मन । आणिक मज ज्ञान न लगे काही ॥
मुक्तिदासी आहेता तुजपासी ॥ त्या नलगता आम्हासी पांडुरंगा ॥
वैकुठ कैलास न लगती आम्हास । आवडी बोधल्यास तुझे पायी ॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ५०
📿 पाप ताप दैन्य जाय उठ
50.
पाप ताप दैन्य जाय उठाउठी । झालिया भेटी हरिदासांची ॥१॥
ऐसे बळ नाही आणिकाचे अंगी । तपे तीर्थे जगी दाने व्रते ॥२॥
चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनी त्याचे माथा ॥३॥
भव तरावया उत्तम हे नाव । भिजो नेदी पाय हात काही ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ५०
📿 देखती ती दोन्ही पाडस
50.
देखती ती दोन्ही पाडसे त्या काळी । भिल्लापुढे आली लागवेगे ॥१॥
सांभाळोनि हात ऐकावी विनंती । धरी कृपा चित्ती आमुचिया ॥२॥
अतितालागोनि चिलिया वोपी देहे । तेणेचि तो लाहे परमधाम ॥३॥
मातापितरांसी न करावा घात । मारावे आमुते आधी आता ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ५०
📿 आहाकटा त्याचे करिती
50.
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशी दुराचार पुत्र झाला ॥१॥
गळेचि ना गर्भ नव्हेचि का वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥धृपद॥
परपीडे परद्वारी सावधान । सादरचि मन अभाग्याचे ॥२॥
न मळिता निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५०
📿 तुमचे तुम्हा जवळी अस
50.
तुमचे तुम्हा जवळी असता । वाया सिणालका सर्वथ हा ॥
हरि करुणानिधी मोठा । व्यापार टाका तुम्ही खोटा ॥
सांडा प्रकृती स्वभाव । तुम्हासारिखाची देव ॥
हरिस नाही बोल काही । वाया पडाल प्रवाही ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 भगवंत पालथा पडू लागला त्या वेळी नंदानी केलेला उत्साह›
📿 अभंग क्र. ५०
📿 भगवंत पाळथा पडू लागल
50.
भगवंत पाळथा पडू लागला त्या वेळी नंदानी केलेला उत्साह
पुण्यवंता दावी बाळलीला देव । पालथा केशव पड-तसे ॥१॥
नंदे उत्साहासी केले तेव्हा फार । दिधले अपार द्रव्य द्विजा ॥२॥
यशोदा घेतसे देवासे चुंबन । तुजला न्हाणीन तान्ह्या माझ्या ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ५०
📿 नसे तो ब्रह्मांडी नस
50.
नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठी । दुजियाची गोष्टी नाही तेथे ॥१॥
ते रुप सुंदर देवकी उदरी । वसुदेवा घरी कृष्ण माझा ॥२॥
ब्रह्मांड कडवा मनाचा वोणवा । साधिता राणिवा हारपती ॥३॥
निवृत्ति सुंदर कृष्णरुप सेवी । गयनी गोसावी उपदेशिले ॥४॥
51.
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारुनि ॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥२॥
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे । कांहींच सांकडे पडो नेदी ॥३॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य । घातलिया भय नरका जाणे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ५१
📿 हरणी सांगे कांही कर्
51.
हरणी सांगे कांही कर्मविपाकासी । ऐशा ऐशा दोषी ऐसे होती ॥१॥
ठकवूनिया आह्मी तुज जाऊ जरी । अंधतमाभितरी वास पावो ॥२॥
गुरु स्वामी द्रोही विश्वासघातकी । तयास तो नरकी वास सदा ॥३॥
परद्रोही परनिंदेसी रतला । तो होय कावळा जन्मोजन्मी ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ५१
📿 येई येई गरूडध्वजा ।
51.
येई येई गरूडध्वजा । विटे सहित करीन पूजा ॥१॥
धूप दीप पुष्पमाळा । तुज समर्पू गोपाळा ॥२॥
पुढे ठेवोनिया पान । वाढी कुटुंबी ते अन्न ॥३॥
तुम्हा योग्य नव्हे देवा । गोड करूनिया जेवा ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ५१
📿 संत मिराबाई पदावली :
51.
संत मिराबाई पदावली :- भाग २
कृष्णमंदिरमो नाचे तो ताल मृदंग रंग चटकी ।
पावमो घुंगरू झुमझुम वाजे । तो ताल राखो घुंगटकी॥१॥
नाथ तुम जान है सब घटका मिरा भक्ति करे पर घटकी॥धृ०॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५१
📿 थोर प्रभात हे झाली ।
51.
थोर प्रभात हे झाली । उठ गे कृष्णे तू माऊली ।
आम्हा प्रेमपान्हा घाली । अगा तू कृष्णा जननीये ॥
तू तर माऊली आमची । थोर सावली संतांची ।
विश्रांती तुझिया नामाची । अगा तू कृष्ण जननीये ॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ५१
📿 धांवुनीं तिजी गोपिका
51.
धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथे रहावया लाग उरला नाही ॥१॥ जात होते पाण्यां यमुने पहाटीं । अविचित येऊनिया पाठी थापटी ॥२॥ एका जनार्दनी आणियला त्रास । नको हे गोकुळ आम्ही जाऊ मथुरेस ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ५१
📿 खुंटले वेदांत हरपले
51.
खुंटले वेदांत हरपले सिध्दांत । बोलणे धादांत तेंही नाही ॥१॥
ते रुप पहाता नंदाघरी पूर्ण । यशोदा जीवन कृष्णबाळ ॥२॥
साधिता साधन न पविजे खूण । तो बाळरुपे कृष्ण नंदाघरी ॥३॥
निवृत्ति संपन्न सेवी गुरुकृपा । गयनीच्या द्विपा तारु गेले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ५२
📿 देखिले तुमचे चरण निव
52.
देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन । कासया त्याजन प्राण आपुला गे माये ॥१॥
असेन धणीवरी आपले माहेरी । मग तो श्रीहरी गीती गाईन गे माये ॥२॥
सकळही गोत माझे पंढरीस जाण । बापरखुमादेवीवरा श्री विठ्ठलाची आण ॥३॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ५२
📿 वाउगे घरदार वाउगा सं
52.
वाउगे घरदार वाउगा संसार । वाउगे शरीर नाशिवंत ॥१॥
एक नाम सार वाउगा पसार । नामचि निर्धार तरती जन ॥२॥
वाउग्या या गोष्टी वाउग्या कल्पना । वाउग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे ॥३॥
वाउग्या व्युत्पत्ती वाउम्या शब्द आटी । वाउग्या ज्ञान गोष्टी बोलून काई ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५२
📿 दिनांचा दयाळू पतितां
52.
दिनांचा दयाळू पतितांचा पावन । सर्वसुखनिधान पांडुरंग ॥
घडी घडी आठव करावा तयांचा । धोका कळीकाळाचा नाही त्यासी ॥
पांडव जयाने रक्षीले जो हरि । ते नेले विवरी काढूनिया ॥
प्रल्हादाचा पिता चिंतीत वोखटे । करितसे गोमटे वेगळाची ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 वनभोजन समयी शकाटसुर नाश›
📿 अभंग क्र. ५२
📿 मांडीवरी घेत यशोदा स
52.
मांडीवरी घेत यशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥१॥
तूंची माझ प्राण तू माझी माउली । तू माझी बहिणुली कान्हाबाई ॥२॥
गणगोत भाऊ तूंची माझा सखा । संसार लटिका तुजवीण ॥३॥
तूंचि माझा धनी तूंची माझे जीवन । चुंबीत वदन वेळोवेळा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ५२
📿 एकी पुढे एक सांगती ग
52.
एकी पुढे एक सांगती गार्हणीं । लिहितां पृथ्वीं न पुरेचि धूणी ॥१॥ म्हणे यशोदा कृष्णा काय हे कैसे । खोडी नको करु हरि बोलतसे ॥२॥ मज नेती गृहांत दहा पांच मिळती । नग्न होऊनियां मज पुढे नाचती ॥३॥ म्हणती रे पोरा तु दिससी साना । हृदयी धरुनी करी देती स्तना ॥४॥ ऐसे यांचे तुज सांगु म्हनतां माते । एका जनार्दनी नवल वाटे तुंते ॥५॥
53.
संतांनी सरता केलो तैशापरी । चंदनाने बोरी व्यापियेली ॥१॥
गुण दोष याति न विचारी काही । ठाव दिला पायी आपुलिया ॥२॥
तुका म्हणे आले समर्थांच्या मना । तरी होय राणा रंक त्याचा ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ५३
📿 कानी घालुनिया बोटे न
53.
कानी घालुनिया बोटे नाद जे पाहावे । न दिसता जाणावे नऊ दिवस ॥१॥
भोंवया पाहता न दिसे जाणा । आयुष्यासी गणना सात दिवस ॥२॥
डोळा घालुनिया बोटचक्र जे पाहवे । न दिसता जाणावे पाच दिवस ॥३॥
नासाग्रीचे अग्र न दिसे नयनी । तरी तेचि दिनी म्हणा रामकृष्ण ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ५३
📿 न करू आह्मी तैसे घेई
53.
न करू आह्मी तैसे घेई आता भाक । अंतरी नि:शंक झालो सर्व ॥१॥
तुह्मी आह्मा साक्षी असे सदाशीव । येथे दुजा भाव धरू नको ॥२॥
पिऊनिया पाणी न येऊ तुजपाशी । तरी घडे आह्मांसी सर्व पापे ॥३॥
जातीचा ब्राह्मण न करी ब्रम्हकर्म । तो जैसा अधम तैसे आह्मी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ५३
📿 पडिले दूरदेशी मज आठव
53.
पडिले दूरदेशी मज आठवे मानसी । नको नको हा वियोग कष्ठ होताती जिवासी ॥१॥
दिन तैसी रजनी झाली वो । माये अवस्था लाउनी गेला अझुनी का नये ॥२॥
गरुडावाहना गंभीरा येई गा दातारा बापरखुमादेवीवरा श्री विठ्ठला ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ५३
📿 सख्या पंढरीच्या राया
53.
सख्या पंढरीच्या राया । घडे दंडवत पाया ॥1॥
ऐसे करी अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥2॥
वेध माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥3॥
जावे ओंवाळुनी । जन्मोजन्मी ह्मणे जनी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ५३
📿 श्रवणाचे श्रवण घ्राण
53.
श्रवणाचे श्रवण घ्राणाचे जे घ्राण । रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥
वाचा जेणे उठी डोळा जेणे भेटी । इंद्रियांची राहाटी विल माझा ॥२॥
प्राण जेणे चळे मन तेणे वोळे । शून्याते वेगळे विठ्ठल माझा ॥३॥
आनंदी आनंद बोधा जेणे बोध । सकळा आत्मा शुध्द विट्ठल माझा ॥४॥