🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ८०
📿 निरालंब देव निराकार
80.
निरालंब देव निराकार शून्य । मनाचेही मौन हारपले ॥१॥
ते रूप साबडे शंखचक्रांकित । यशोदा ते गात कृष्णनाम ॥२॥
मौनपणे लाठे द्वैत हे न साहे । ते नंदाघरी आहे खेळेमेळे ॥३॥
निवृत्ति आकार ब्रह्म परिवार । गोकुळी साकारमूर्ति ब्रह्म ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ८१
📿 देखत होतो आधी मागे प
81.
देखत होतो आधी मागे पुढे सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ ।
तिमिर कोंदलेसे वाढे वाढता प्रबळ । भीत मी जालो देवा ।
काय जियाल्याचे फळ ॥१॥
आता मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ८१
📿 पूर्वी काय तप नेणे प
81.
पूर्वी काय तप नेणे पै हो केले । निधान जोडिले पंढरीचे ॥1॥
येऊनिया देव दळू लागे अंगे । रखुमाईचा संग दूर केला ॥2॥
तैसाचि पै संगे येऊनि बाहेरी । वेचोनिया भरी शेणी अंगे ॥3॥
ओझे झाले ह्मणूनि पाठी पितांबरी । घेऊनिया घरी आणितसे ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ८१
📿 हो का पुत्र पत्नी बं
81.
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥
कळो आले खट्याळसे । शिवो नये लिंपोदोषे ॥धृपद॥
फोडावे मडके । मेले लेखी घाये एके ॥२॥
तुका म्हणे त्यागे । विण चुकी जे ना भोगे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८१
📿 येई गा बापा हरि तू ब
81.
येई गा बापा हरि तू बा कृपानिधी । दिनालागी आधी सांभाळावे ॥
आले म्हणुनी कृपादृष्टी पाही । उचलूनि घेई ये कडी बापा ॥
तूचि आमची माता तूचि आमचा पिता । तुजविण सर्वथा नेणे काही ॥
बोधला म्हणे देवा मी तुझा दिन । माझा अभिमान आहे तुज ॥
82.
आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करु नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥२॥
हित ते करावे देवाचे चिंत्तन । करुनिया मन शुद्ध भावे ॥३॥
तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ८२
📿 सहज मी आंधळा गा निजन
82.
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथे । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथे ।
मी माजी हारपले ठायी जेथींचा तेथे । अदृश्य ते चि जाले कांही दृश्य जे होते ॥१॥
सुखी मी निजलो गा शून्य सारूनि तेथे । त्रिकूटशिखरी गा दान मिळे आइते ॥धृ॥
टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ८२
📿 एकटी तू गाणे गासी ।
82.
एकटी तू गाणे गासी । दुजा शब्द उमटे पाशी ॥1॥
कोण गे तुझ्या बरोबरी । गाणे गाती निरंतरी ॥2॥
पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥3॥
ऐशियाच्या घरी आले । जनी ह्मणे धन्य झाले ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ८२
📿 प्रकरण :- ॥ करूणा ॥
82.
प्रकरण :- ॥ करूणा ॥
अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी ।
आता न पड़े सांकडी । पडो कबाडी वाया दुःखाचिया ॥१॥
हाचि मानिला निर्धार । आता न करी वाउगा विचार ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८२
📿 राम हृदयी आठवावा । आ
82.
राम हृदयी आठवावा । आवडी प्रीतीने गावा ॥
तोडी अविद्या समुळ । सुख होईल प्रबळ ॥
पाहता संसार हाचि सार । याणे उतरु पैलपार ॥
नलगे करणे सायास । हाचि सोपा उपदेश ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ८२
📿 बनारसी तप करे । उलट
८२.
बनारसी तप करे । उलट तीरथ मरे अग्नी दहे काया कल्प किजे अस्मेद यज्ञ किजे । सोना गर्भ दान दिजे ।
राम नाम सर तो न पुजे । छोड छोडरे पाखंडी । मन कपट न कीजे ॥१॥
हरका नाम नित्य नित्य लीजे । गंगा जो गोदावरी जाईये कुंभ जी किनारे नाईये गोमती सहस्र ।
गौ दान दीजे कोटजो तीरथ करे तनजो हिमाले गाले । राम नाम सर तौ न पुजे ॥२॥
83.
निर्वाहापुरते अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१॥
कोठेंही चित्तासी नसावे बंधन । हृदयी नारायण सांठवावा ॥२॥
नये बोलो फार बैसोंजनामधी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ८३
📿 अगाध हे कीर्ति विठ्ठ
83.
अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगो ॥१॥
पुराणे भागली नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिका जेथे न कळेचि अंत । तेथे मी पतित काय वानू ॥३॥
चोखा म्हणे माझा नाही अधिकार । कैसा हा विचार होईल नेणो ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ८३
📿 जल भरन कैशी जाऊंरे ।
83.
जल भरन कैशी जाऊंरे । जशोदा जल भरन॥धृ०॥
वाटेने घाटे पाणी मागे मारग मै कैशी पाऊं॥ज० १॥
आलीकोर गंगा पलीकोर जमुना । बिचमे सरस्वतीमे नहावूं॥ज० २॥
ब्रिंदावनमे रास रच्चा है । नृत्य करत मन भावूं॥ज० ३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ८३
📿 जेणे घडे नारायणी अंत
83.
जेणे घडे नारायणी अंतराय । होत बाप माय वर्जावी ती ॥१॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती ती दुःखा पात्र शत्रु ॥धृपद॥
प्रल्हादे जनक बिभीषणे बंधु । राज्य माता निंदु भरते केली ॥२॥
तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८३
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ८३
📿 माय न होती बाप न होत
८३.
माय न होती बाप न होता । कर्म न होती काया । हम नही होते तुम नही होते । कवण कहासे आया ॥१॥
आम कोईना किसई केरा जैसे तरुवर पंख बसेरा । चंद्र न होता सुर न होता । पानी पवन मिलाया ॥२॥
शास्त्र न होता वेद न होता । कर्म कहासे आया । खेचर भूचर तुलसी माला । गुरूप्रसादी पाया । नामा परणवे परम तप्त है । सद्गुरू होई लखाया ॥३॥
84.
नम्र झाला भुता । तेणे कोंडिले अनंता ॥१॥
हेचि शुरत्वाचे अंग । हारि आणिला श्रीरंग ॥२॥
अवघा हा झाला पण । लवण सकळा कारण ॥३॥
तुका म्हणे पाणी । पातळपणे तळा खणी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ८४
📿 भगवंता तुजकारणे मेलो
84.
भगवंता तुजकारणे मेलो जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाही तयासी ।
न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणता न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । किर्ती हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥धृ॥
भुक्ती मुक्ती तू चि एक होसि सिद्धीचा दाता । ह्मणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
🙏 संत सोपानदेव काका›📚 संत सोपानदेव अभंग गाथा›📖 संत सोपानदेव गाथा हरिपाठ›📂 सोपान देवांविषयी अभंग›
📿 अभंग क्र. ८४
📿 सोपानदेव समाधी वर्णन
84.
सोपानदेव समाधी वर्णनाचे अभंग
संत नामदेवांनी ज्ञानदेव , सोपानदेव व अन्य संतांच्या कथा व चरित्र आपल्या अभंगातून सांगितले आहे
सोपानदेवांचे चरित्र ज्ञानेश्वरांच्या चारीत्राचाच एक भाग आहे . सोपानदेवांनी सासवडला समाधी घेतली त्या प्रसंगाचे वर्णन करणारे समाधी सोहळ्याचे अभंग संत नामदेव व इतर संतांनी लिहिले आहेत.
सोपान देवांविषयी अभंग
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ८४
📿 जनी बैसली न्हायाला ।
84.
जनी बैसली न्हायाला । पाणी नाही विसणाला ॥1॥
घागर घेउनी पाण्या गेली । मागे मागे धाव घाली ॥2॥
घागर घेऊनिया हाती । पाणी रांजणात ओती ॥3॥
ऐशा येरझारा केल्या । रांजण घागरी भरिल्या ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ८४
📿 अधिकार माझा निवेदन प
84.
अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसा ॥१॥
अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणी ॥२॥
कोणीही अंगिकार न करिती माझा । दूर हो जा अवघे म्हणती ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही घ्याल पदरी । तरीच मज हरी सुख होय ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ८४
📿 स्याम मोरी बांहड़ली
84.
स्याम मोरी बांहड़ली जी गहो ।
या भवसागर मंझधार मे थे ही निभावण हो॥
म्हाने औगण घणा रहै प्रभुजी थे ही सहो तो सहो ।
मिरा के प्रभु हरि अबिनासी लाज बिरद की बहो॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ८४
📿 जशोदा मैया मै नही दध
84.
जशोदा मैया मै नही दधी खायो॥धृ०॥
प्रात समये गौबनके पांछे । मधुबन मोहे पठायो॥१॥
सारे दिन बन्सी बन भटके । तोरे आगे आयो॥२॥
ले ले अपनी लकुटी कमलिया । बहुतही नाच नचायो॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ८४
📿 मान अपमान गोवे । अवघ
84.
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥
हेचि देवाचे दर्शन । सदा राहे समाधान ॥धृपद॥
शांतीची वसती । तेथे खुंटे काळगती ॥२॥
आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडे आहे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८४
📿 राम नांदतो सर्वाच्या
84.
राम नांदतो सर्वाच्या अंतरी । बाहेर मी तरी तोचि एक ॥
प्रकृतीच्या मुळे झाकुळला पाही । तेणे तुम्हा काई न दिसे ॥
दर्पणीचा मळ काढोनि टाकिले । तेणे दाखविले रुप तुझे ॥
देहीचा मळ काढोनि सांडी । राम तेथे मांडी जगदरुप ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 राधा विलास›
📿 अभंग क्र. ८४
📿 मंदिरा नेवोनि पलंगी
84.
मंदिरा नेवोनि पलंगी बैसविला । म्हणत हरीला तये-वेळी ॥१॥
ऐसिया समयी थोर तू अससी । तरी ह्लषिकेशी बरे होते ॥२॥
देखोनि तिचा भाव थोर झाला हरी । पाहूनि सुंदरी आन-दली ॥३॥
सुखशयनी राधा एकांती असता । अनया अवचिता आला तेथे ॥४॥
85.
ऐका गाए अवघे जन । शुद्ध मन ते हित ॥१॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावे ॥२॥
नाही कोणी सवे येता । संचिता या वेगळा ॥३॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रिये ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ८५
📿 भगवंता तुजकारणे मेलो
85.
भगवंता तुजकारणे मेलो जिताची कैसी । निष्काम बुध्दि ठेली चरण नाही तयेसी ।
न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणता न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥२॥
भुक्ति मुक्ति तूंचि एक होसी सिध्दीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
🙏 संत सोपानदेव काका›📚 संत सोपानदेव अभंग गाथा›📖 संत सोपानदेव गाथा हरिपाठ›📂 शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज कृत सोपानदेव वर्णन›
📿 अभंग क्र. ८५
📿 शांतीब्रह्म संत एकना
85.
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज कृत सोपानदेव वर्णन
नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥
संवत्सर ग्राम कर्हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥
जग तारावया हरिलीला केली । प्रसिध्द ती झाली सोपानदेवी ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ८५
📿 एके दिवशी न्हावयास ।
85.
एके दिवशी न्हावयास । पाणी नव्हते विसणास ॥1॥
देव धावोनिया आले । शीतळ उदक घे घे बोले ॥2॥
आपुल्या हाते विसणी । घाली जनीच्या डोयी पाणी ॥3॥
माझ्या डोईच्या केसांस । न्हाणे नव्हते फार दिवस ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ८५
📿 अवघे मंगळ तुमचे गुणन
85.
अवघे मंगळ तुमचे गुणनाम । माझा तो श्रम पाहता जाये ॥१॥
गोड है गोजिरे नाम तुमचे देवा । आठव हा द्यावा मजलागी ॥२॥
या परते मागणे दुजे नाही आता । पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥
चोखा म्हणे देवा होउनी उदार । ठेवा कृपाकर माथा माझ्या ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ८५
📿 थोडे आहे थोडे आहे ।
85.
थोडे आहे थोडे आहे । चित्त साह्य जालिया ॥१॥
हर्षामर्ष पाही अंगी । पांडुरंगी सरले ते ॥धृपद॥
अवघ्या साधनांचे सार । न लगे फार शोधावे ॥२॥
तुका म्हणे लटिके पाहे । सांडी देह अभिमान ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८५
📿 वरिले उपरि उभे राहुन
85.
वरिले उपरि उभे राहुन हरि । वेणु वाजवी नाना परि रे कान्हया ॥
पवयाचा नाद गोपिंकाचे कानी । तयामाजी धन्य रखमाई रे कान्हया ॥
भावार्थ मोठा तरीच वाटा । अर्धांगी शोभे रखमाई रे कान्हया ॥
सकळा मिळोनि प्रीतिया लाविती । रखुमाईचा पती रे कान्हया ॥
86.
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म । आणिक हे वर्म नाही दुजे ॥२॥
गति तेचि मुखी नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥३॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नरक तो उदास अनर्गळ ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ८६
📿 पंढरपुर पाटणी गा महा
86.
पंढरपुर पाटणी गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचे ते नाम ॥१॥
आंधळ्या जीवींचे तो गा जाणतो धर्म । म्हणोनि आलो गा देई माझे मज वर्म ॥२॥
असोनि हात पाय डोळा जाहालो मी आंधळा । मुखी नाम तुझे लागला वाचेसी चाळा ॥३॥
देऊनि दान माते नाम सांगे ये काळी । विठोबाचे दान आले ऐसी देईन आरोळी ॥४॥
🙏 संत सोपानदेव काका›📚 संत सोपानदेव अभंग गाथा›📖 संत सोपानदेव गाथा हरिपाठ›📂 सोपान देवांचा हरिपाठ›
📿 अभंग क्र. ८६
📿 सोपान देवांचा हरिपाठ
86.
सोपान देवांचा हरिपाठ
सोपान देवांचा हरिपाठ ६ अभंगांचा असून – ‘वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे’ हे पहिल्या अभंगाचे दुसरे चरण या हरिपाठाचे धृवपद आहे .
भजन करताना प्रत्येक अभंगा नंतर
वायाची भ्रमसी कारे गुणराशी ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ८६
📿 तुळशीचे बनी । जनी उक
86.
तुळशीचे बनी । जनी उकलीत वेणी ॥1॥
हाती घेऊनिया लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥2॥
माझे जनीला नाही कोणी । ह्मणुनी देव घाली पाणी ॥3॥
जनी सांगे सर्व लोका । न्हांऊ घाली माझा सखा ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ८६
📿 असेच करणे होते तुला
86.
असेच करणे होते तुला । तरी का जन्म दिला मला ॥१॥
जन्म देवोनी सांडिले । कांहो निष्ठुर मन केले ॥२॥
कोठे गेला माझे वेळी । केले कोणाचे सांभाळी ॥३॥
चोखा म्हणे देवा । नको मोकलू केशवा ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ८६
📿 या मोहन के रूप लुभान
86.
या मोहन के रूप लुभानी ।
सुंदर बदन कमलदल लोचन, बांकी चितवन मंद मुसकानी॥
जमना के नीरे तीरे धेनु चरावै, बंसी मे गावै मीठी बानी ।
तन मन धन गिरधर पर बारूं, चरणकंवल मिरा लपटानी॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ८६
📿 आता उघडी डोळे । जरी
86.
आता उघडी डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥धृपद॥
नांव चंद्रभागे तीरी । उभी पुंडलीकाचे द्वारी । कट धरूनिया करी । उभाउभी पालवी ॥२॥
तुका म्हणे फुकासाठी । पायी घातली या मिठी । होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८६
📿 वरिले माळी एक बहुधा
86.
वरिले माळी एक बहुधा व्याली । फळाचिया विण पाच मिळती सजाकी ॥
ते मुखविण दुध प्याली रे । पायाविण वापरली रे ।
ते दावियाविण बांधली रे । बोधला म्हणे गुरुखुणे ओळखिली ।
ते संतांचे वाडी कोंडिली रे ॥