🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९१२
📿 सुख पंढरिये आले । पु
2912.
सुख पंढरिये आले । पुंडलिके साठविले ॥१॥
घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरे माप । करा एक खेप । मग नलगे हिडणे ॥धृपद॥
विभव गुंडोनी पसारा । धाव घाला पंढरपुरा ॥२॥
आयुष्य वेच जव आहे । तोंची धावोनिया जाये ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९१२
📿 गत ते आयुष्य गत ते ध
2912.
गत ते आयुष्य गत ते धन । गत दृश्यमान पदार्थ तो ॥१॥
गत अंबर गत तो पवन । गत ते हवन गत होय ॥२॥
एका जनार्दनी अगत ते नाम । म्हणोनि विश्राम योगियांसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९१३
📿 जे जे दिसे ते ते नास
2913.
जे जे दिसे ते ते नासे । अवघे वोसे जायाचे ॥१॥
नाशिवंत सर्व काया । भेणे उपाया करा कांही ॥२॥
पदार्थ मात्र जात असे । कांही नसे आनु दुजे ॥३॥
एका जनार्दनी सर्व वाव । धरा भाव विठ्ठलीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९१४
📿 अद्वैती तो नाही माझे
2914.
अद्वैती तो नाही माझे समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥१॥
करुनी उचित देई हेची दान । आवडे कीर्तन नाम तुझे ॥धृपद॥
देव भक्त सुखाच सोहंळा । ठेउनी निराळा दावी मज ॥२॥
तुका म्हणे आहे तुझे हे । सकळ कोण्या एके काळे देई मज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९१४
📿 मी मी म्हणता वाया गे
2914.
मी मी म्हणता वाया गेले सर्व । पाहे तू अपूर्व नवल बापा ॥१॥
रावण नासला मीपणें गेला । रामे क्षय केला पुत्रापौत्रीं ॥२॥
मीपणे दुर्योधन बहुत गर्वीत । नासलें जीवित रणांगणी ॥३॥
ऐसे ते बहुत मीपणें नासलें । एका जनार्दनी भले मीपण रहित ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९१५
📿 हेचि माझे तप हेचि मा
2915.
हेचि माझे तप हेचि माझे दान । हेचि अनुष्ठान नाम तुझे ॥१॥
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत । सत्य हे सुकृत नाम तुझे ॥धृपद॥
हेचि माझा कर्म हाचि माझा धर्म । हाचि नित्यनेम नाम तुझे ॥२॥
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ । हेचि तपध्यान नाम तुझे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९१६
📿 कोणे साक्षीविण । केल
2916.
कोणे साक्षीविण । केले उद्धारा भजन ॥१॥
ऐसे सांगा जी दातारा । माझी भक्ति परंपरा ॥धृपद॥
कोणे नाही केली आळी । ब्रम्हज्ञानाहुनि वेगळी ॥२॥
कोणाचे तो कोड । नाही पुरविला लाड ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९१७
📿 सुखरूप चाली । हळूहळू
2917.
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥
बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥धृपद॥
जरी झाला श्रम । तरी पडो नये भ्रम ॥२॥
तुका म्हणे दासा । देव सरिसा सरिसा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९१७
📿 नाशिवंत देह नाशिवंत
2917.
नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत काया काया काज ॥१॥
यमाचा पाहुणा जाणार जाणार । काय उपचार करुनी वाया ॥२॥
छायेसी बैसला सवेंची तो गेला । वृक्ष रडूं लागला गेला म्हणोनी ॥३॥
पाथस्थ मार्गस्थ येऊनी राहिला । उदय होता निघाला आपुल्या मार्गे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९१८
📿 चुकली ते वाट । पुढे
2918.
चुकली ते वाट । पुढे सांपडवी नीट ॥१॥
म्हणउनी गर्भवास । नेणती ते हरीचे दास ॥धृपद॥
संचिताचा संग । काय जाणो पावे भंग ॥२॥
तुका म्हणे दृष्टी । उघडितो नव्हे कष्टी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९१८
📿 हे शरीर नाशिवंत साचे
2918.
हे शरीर नाशिवंत साचे । जायाचें हो जायाचें अंतकाळीं ॥१॥
काय याचे सुख मानिती हे जन । पडिलेसें जाण मायाचक्री ॥२॥
संसाराचा या करिती विचार । भुलले पामर अधोगती ॥३॥
एका जनादनीं वायाची भ्रमती । पुढे ती फजिती नेणवेची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९१९
📿 कइ तो दिवस देखेन डोळ
2919.
कइ तो दिवस देखेन डोळा । कल्याण मंगळामंगळाचे ॥१॥
आयुष्याच्या शेवटी पायासवे भेटी । काळवेळ तुटी झाल्या तरे ॥धृपद॥
सरो हे संचित पदरींचा गोवा । उताविळ देवा मन झाले ॥२॥
पाउलापाउली करिता विचार । अनंतविकार चित्ता अंगी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९२०
📿 कळो येते वर्म । तरी
2920.
कळो येते वर्म । तरी न पवतो श्रम ॥१॥
तुम्हा शिरी होता भार । आम्हा कैचा संसार ॥धृपद॥
होते अभयदान । तरी स्थिर होते मन ॥२॥
तुका म्हणे पाहे । ऐसी वाट उभा आहे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९२१
📿 असत्याचे मूळ नरदेह स
2921.
असत्याचे मूळ नरदेह साचे । वाया काय याचे कवतूक ॥१॥
हरिनाम सार सेवीं तू निर्धारे । आणीक पसार शीण वाया ॥२॥
एका जनार्दनी मृगजळ वोखटें । दिसे ते गोमटें तृषा न हारे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९२२
📿 जाणता जाणता का रे वे
2922.
जाणता जाणता का रे वेडा होसी । नाथिल्याच्या पिसी हांव भरी ॥१॥
दोन दिवसांचे उसणे व्यापारी । काय त्यांची थोरी मानितोसी ॥२॥
दिवसांची छाया पुर्व पश्चिमेसी । तैशी या देहाची स्थिती जाणा ॥३॥
एका जनार्दनी हरिकृपेंवीण । दावील ही खूण कोण बापा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९२३
📿 देहींच्या अवसाना । क
2923.
देहींच्या अवसाना । कोणी कामा नये कोण्हा ॥१॥
हे तो मिळाले अपार । अवघा मायेचा बाजार ॥२॥
तुजसाठीं शोक । कोण्ही न करतीच दुःख ॥३॥
रडती पडती । पुढे कैसे होईल म्हणती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९२४
📿 नका करु वाद विवाद पस
2924.
नका करु वाद विवाद पसारा । वाउगा मातेरा नरदेहीं ॥१॥
आयुष्याचे अंतीं कामा नये कोणी । नेती ढकलुनी एकलेंचि ॥२॥
स्वजन स्वगोत्र न ये कोणी कामा । सांडी त्यांचा प्रेमा परता होई ॥३॥
एका जनार्दनी मधाचिये मासी । तैसा सांपडसी यमफांशी कोण सोडी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९२५
📿 न पवीजे तया ठाया । आ
2925.
न पवीजे तया ठाया । आलो कायाक्लेशेसी ॥१॥
आता माझे आणी मना । नारायणा ओजेचे ॥धृपद॥
बहु रिणे पिडिलो फार । परिहार करावा ॥२॥
तुका म्हणे निर्बळशक्ति । काकुलती म्हुण येतो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९२५
📿 का रे भांबावसी नास्त
2925.
का रे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी का आटी करसी वाया ॥१॥
हे तो पोसणे आणिले उसणे । जयाचे तया देणे अनायासें ॥२॥
'घ्यावें त्याचे द्यावे' ऐशी आहे नीत । तू रे दुश्चित वाउगा मनी ॥३॥
न देता उरी देणे आहे केव्हा । वाउगा तो हेवा धरती पोटी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९२७
📿 कोण येथे रिता गेला ।
2927.
कोण येथे रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥
तातडी ते काय आता । ज्याची चिंता तयासी ॥धृपद॥
नावासाठी नेघे भार । न लगे फार वित्पत्ति ॥२॥
तुका म्हणे न लगे जावे । कोठे देवे सुचेना ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९२७
📿 काम क्रोध लोभ दंभ मद
2927.
काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्वैरी तत्पर हेचि येथे ॥१॥
क्षुधा तृष्णा मोद शोक जरा मरण । षडऊर्मी पूर्ण देही हेंची ॥२॥
आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरा गुण जाणा देहामाजीं ॥३॥
एका जनार्दनी त्यजोनि अठरा । तोचि संसारामाजीं शुद्ध ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९२८
📿 अस्थिमांसाचा हा कोथल
2928.
अस्थिमांसाचा हा कोथला । ऐसा देह अमंगळा ॥१॥
प्राणी म्हणती माझे माझे । खर जैसे वाहे वोझे ॥२॥
न कंटाळे कधी मन । जेवी भुलें सर्प जाण ॥३॥
एका जनार्दनी देवा । याचा विसर पाडावा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९२९
📿 मिळती सख्या माया बहि
2929.
मिळती सख्या माया बहिणी । हाती घेउनी तेजफणी ॥१॥
जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥
नासिल्या शरीरांतें । टाकिताती तया परते ॥३॥
पहा देही देव असता । नाही म्हणती सर्वथा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९३०
📿 आशाबद्ध आम्ही भाकितस
2930.
आशाबद्ध आम्ही भाकितसो कीव । तत्पर हा जीव कार्यापाशी ॥१॥
प्रतिउत्तराची पाहातसे वाट । करूनि बोभाट महाद्वारी ॥धृपद॥
आपुल्या उचिते करूनिया ठेवी । संबंध गोसावी तोडोनिया ॥२॥
तुका म्हणे एक झालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९३०
📿 देहींचे आयुष्य पूर्ण
2930.
देहींचे आयुष्य पूर्ण ते भरले । मग नाही उरले मागील कांही ॥१॥
देही देह आहे तोवरीं अहतां । निमाचिया तत्त्वता वाव सर्व ॥२॥
देही देहपण मी मी माझे म्हणे । मिथ्या सर्व जाणे देहांअंतीं ॥३॥
एका जनार्दनी मिथ्या देह आहे । रामनाम बा हे सबराभरीत ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९३१
📿 म्हणती नरदेह पावन ।
2931.
म्हणती नरदेह पावन । परी अत्यंत निंद्य जाण ॥१॥
योनिद्वारें ज्याचे जनन । सवेंचि मरण लागलेंसे ॥२॥
जंव जन्मलेंचि नाही । तंव ते मरण लागले पाही ॥३॥
गर्भाच्याही ठायी भेवो । मरण भावों न चुकेची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९३२
📿 नाही सरो येत कोरड्या
2932.
नाही सरो येत कोरड्या उत्तरी । जिव्हाळ्याची बरी ओल ठायी ॥१॥
आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साह्य असो ॥धृपद॥
निर्वाणी निवाड होतो आगीमुखे । तप्त लोह सुखे धरिता हाती ॥२॥
तुका म्हणे नेम न टळता बरे । खऱ्यासीचि खरे ऐसे नांव ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९३३
📿 आलो उल्लंघुनि दुःखाच
2933.
आलो उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायापाशी हित तुमच्या तरी ॥१॥
न देखेचि लासा दुःखी होते मन । कठिणे कठिण वाटतसे ॥धृपद॥
नव्हे सांडी परि वाटते निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥२॥
तुका म्हणे तुम्ही सदैव जी देवा । माझ्या हाचि जीवा एक ठाव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९३४
📿 मनुष्य देही व्हावे ब
2934.
मनुष्य देही व्हावे ब्रह्मज्ञान । घेतो पुढीलें आमंत्रण ॥१॥
पुढे जन्माचा विसार । घेतों अतिमानें तो पामर ॥२॥
चौर्यांयशीं लक्ष योनीप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥३॥
ऐसा मनुष्यदेह पावन । तो वेंची विषयाकारण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९३६
📿 नामाचा महिमा बोलिलो
2936.
नामाचा महिमा बोलिलो उत्कर्ष । अंगी काही रस न येचि तो ॥१॥
कैसे समाधान राहे पांडुरंगा । न लगेचि अंगा आणी काही ॥धृपद॥
लाभाचिये अंगी सोस कवतुके । फिक्याचे ते फिके वेवसाव ॥२॥
तुका म्हणे करा आपुला महिमा । नका जाऊ धर्मावरी माझ्या ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९३६
📿 उलट भावना पालट मनाची
2936.
उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक ॥१॥
होणार ते होय देहाचे पतन । तेथे कोणा कमीपण येते जाते ॥२॥
आणिले जयाचे ते देणेंचि आहे । सोस वाउगा वाहे काय फळ ॥३॥
एका जनार्दनी वाउगा पसारा । व्यर्थ हांवभर प्राणी जाहले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९३८
📿 वायांची आयुष्य जातसे
2938.
वायांची आयुष्य जातसे खरे । उपाय तो बरें हरी एक ॥१॥
अवघा वेळ अवघा काळ । नका पोकळ घालवुं ॥२॥
जे जे घडी जे जे वेळीं । करा कल्लोळीं हरिकथा ॥३॥
शरण एका जनार्दनी । भजा अनुदिनें संतासीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९३९
📿 आता पाविजेल घरा । या
2939.
आता पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥
पायावरी ठेवू माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥धृपद॥
येथून तेथवरी आता । नाही सत्ता आणिकाची ॥२॥
तुका म्हणे चक्रपाणी । शिरोमणी बळियांचा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९४०
📿 नरदेहीं आयुष्य गमावि
2940.
नरदेहीं आयुष्य गमाविले सारें । परी रामभजन खरें केले नाही ॥१॥
ऐसे जे अभागी पावती पतनी । तया सोडवणी कोण करी ॥२॥
एका जनार्दनी मानी हा विचार । राम चराचर जप करी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९४१
📿 मागे पुढे नाही । दुज
2941.
मागे पुढे नाही । दुजे यावेगळे काही ॥१॥
नाही उरले आणीक । केला झाडा सकळिक ॥धृपद॥
विश्वासावाचून । नावे दुजियाचे शून्य ॥२॥
तुका म्हणे काही । बोलायची उरी नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९४१
📿 हिताकरणें तुम्ही सां
2941.
हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांही तरी लाज धरा आता ॥१॥
अवचट नरदेह पावले निधान । कांही सोडवण करी बापा ॥२॥
पूर्व सुकृताचें फळ ते पदरी । म्हणोनि हा देह निर्धारी प्राप्त तुज ॥३॥
एका जनार्दनी वाया जातो काळ । कांही तरी गोपाळ आठव वेगे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९४२
📿 वैराग्याचा अंगी झाला
2942.
वैराग्याचा अंगी झालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥
का जी याचे करू नये समाधान । वियोगाने मन सिणतसे ॥धृपद॥
नयेचि यावया पंढरीचे मूळ । न देवेचि माळ कंठींची ही ॥२॥
तुका म्हणे झाले अप्रीतीचे जिणे । लाजिर हे वाणे सेवा करी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९४३
📿 आळिकरा कोठे साहाते क
2943.
आळिकरा कोठे साहाते कठिण । आपुला ते प्राण देऊ पाहे ॥१॥
सांभाळावे मायबापे कृपादृष्टी । पीडिता तो दृष्टी देखो नये ॥धृपद॥
अंतरलो मागे संवसारा हाती । पायापे सरती झालो नाही ॥२॥
तुका म्हणे तुम्ही विचारा जी देवा । ठेवाल ते ठेवा कोणी परी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९४४
📿 स्वप्नींचे हे धन हात
2944.
स्वप्नींचे हे धन हाती ना पदरी । प्रत्यक्ष का हरी होऊ नये ॥१॥
आजुनि का करा चाळवाचाळवी । सावकाशे द्यावी सत्य भेटी ॥धृपद॥
बोलोनिया फेडा जीवींची काजळी । पाहेन कोवळी चरणांबुजे ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनिया ठेवा पडदा आता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९४४
📿 न कळेची मूढा सुखाची
2944.
न कळेची मूढा सुखाची ती गोडी । पायी पडली बेडी प्रपंचाची ॥१॥
पान लागलिया गूळ न म्हणे गोड । तैसे ते मूढ विसरले नाम ॥२॥
शुद्ध वैराग्याचा मानिती कंटाळा । पाळिती अमंगळा प्रपंचासी ॥३॥
एका जनार्दनी नाही भाव खरा । तया त्या पामरा सांगुनी काय ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९४६
📿 प्रपंच आमिष गुंतशील
2946.
प्रपंच आमिष गुंतशील गळी । शेवटी तळमळी होइल रया ॥१॥
स्त्री पुत्र धन हे केवळ जाळें । गुंतशील बळे यांत रया ॥२॥
पुढील विचार धरी कांही सोय । संतसंग लाहें अरे मुढा ॥३॥
एका जनार्दनी सत्संगावांचुनीं । कोण निर्वाणीं तारील तुज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९४८
📿 निश्चिंतीने होतो करु
2948.
निश्चिंतीने होतो करुनिया सेवा । का जी मन देवा उद्वेगिले ॥१॥
अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥धृपद॥
कोण तुम्हाविण मनाचा चाळक । दुजे सांगा एक नारायणा ॥२॥
तुका म्हणे माझा मांडिला विनोद । करऊ नेणे छंद कराल काइ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९५२
📿 संसार पसर करिसी तळमळ
2952.
संसार पसर करिसी तळमळ । का रे घननीळ नाठवीसी ॥१॥
पुत्रदाराधन कवण हे कवणाचे । आहे तोंवरी माझे माझे म्हणती ॥२॥
लटिका प्रपंच सर्व नाशिवंत । एक हे शाश्वत हरिनाम ॥३॥
म्हणे जनार्दन एकनाथ घेईं । प्रमसुख पाही पावशील ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९५४
📿 नरदेहा येऊनि गमावी आ
2954.
नरदेहा येऊनि गमावी आयुष्य । धरीना विश्वास रामनामी ॥१॥
अंतकाळीं तया कोणी न ये कामा । वाउगाचि श्रमा पडतो डोहीं ॥२॥
माझे माझे म्हणोनिया कवटाळीती बाही । प्रपंचप्रवाहीं धांव घाली ॥३॥
एका जनार्दनी करिता कल्पना गेलासे पतना यमलोंकी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९५५
📿 असाल ते तुम्ही असा ।
2955.
असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडो ना ॥१॥
अनुसरलो एका चित्ते । हातोंहाते गींवसित ॥धृपद॥
गुणदोष काशासाठी । तुमचे पोटी वागवू ॥२॥
तुका म्हणे दुजे आता । कोठे चित्ता आतळो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९५६
📿 सोवळा होऊ तो वोंवळे
2956.
सोवळा होऊ तो वोंवळे जडले । सांडीमांडी बोलतोंडी बीजी ॥१॥
एकसरी केली कलेवरे साटी । आता नका तुटी पायासवे ॥धृपद॥
संकल्पी विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचे ॥२॥
तुका म्हणे हे तू ब्रम्हांड चाळिता । मी का करू चिंता पांडुरंगा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९५७
📿 आहे ऐसा आता आहे ठायी
2957.
आहे ऐसा आता आहे ठायी बरा । ठेविलो दातारा उचिते त्या ॥१॥
वचनाचा भार पडिलिया शिरी । झाले मग भारी उतरेना ॥धृपद॥
अबोल्याची सवे लावुनिया मना । फाको नेदी गुणा ऐसे करू ॥२॥
तुका म्हणे आम्हा गोंवळ्याचा संग । राखावे ते अंग जाणतसो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९५७
📿 भक्ति नाही नामी तो च
2957.
भक्ति नाही नामी तो चांडाळ पतीत । तोचि जाणावा कुश्चित नष्ट येथे ॥१॥
प्रपंचकर्दमी बुडोनियां ठेले । संताविण उगले फजीत होती ॥२॥
पुत्र मित्र कांता मानुनी भरंवसा । याचा मोह खासा जन्मवरी ॥३॥
एका जनार्दनी अंतीं आहे कोण । न कळे संताविण निश्चयेंसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९५८
📿 तू माझा कोंवसा । परी
2958.
तू माझा कोंवसा । परी न कळे या धसा ॥१॥
कूट खाती मागे पुढे । जाती निरयगावा पुढे ॥धृपद॥
मज म्हणती कवी । निषेधुनि पापी जेवी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । आता कोण लेखी जगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९५९
📿 वाउगाची पसारा । का र
2959.
वाउगाची पसारा । का रे वाढविला गव्हारा ॥१॥
म्हणसी माझे माझे । अंती कोण आहे तुझे ॥२॥
भुललासी वाया । गमाविसी व्यर्थ काया ॥३॥
कोण हे कोणाचे । एका जनार्दनी साचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९६०
📿 म्हणउनि शरण जावे । स
2960.
म्हणउनि शरण जावे । सर्वभावे देवासी ॥१॥
तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥धृपद॥
बहु आहे करुणावंत । अनंत हे नाम ज्या ॥२॥
तुका म्हणे साक्षी आले । तरी केले प्रगट ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९६०
📿 वाउगाचि शीण करिसी सर
2960.
वाउगाचि शीण करिसी सर्वथा । चुकसी परमार्था मूढा जाण ॥१॥
किती करिसी सोस माझे माझे म्हणोनि । शेवटी बंधनीं पडसी मूढा ॥२॥
अंतकाळीं कोणी नाही रे सांगाती । होईल फजिती तुझी तुला ॥३॥
एका जनार्दनी वाउगाचि धंदा । त्यजुनी गोविंदा सेवी बापा ॥४॥