शरणागता नुपेक्षी हरी
2263.
शरणागता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥
बिभीषणे नमस्कार केला । राज्यदह्र केला श्रीरामे ॥२॥
उपमन्या दुधाचा पै छंद । क्षीरसागर गोविंद त्या देतु ॥३॥
ध्रुव बैसविला अढळपदी । गणिका बैसली मोक्षपदीं ॥४॥
ऐसी कृपेची साउली । एका जनार्दनी माउली ॥५॥
