🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ६९
📿 तापत्रयी तापली गुरुत
69.
तापत्रयी तापली गुरुते गिवसिती । भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी ।
तंव ते नेणोनि उपदेशाची रीती । आना न उपदेशिती ठकले निश्र्चिती तैसे जाले ॥१॥
संत ते कोण संत ते कोण । हे जाणवि खुण केशवराज ॥२॥
कोण्ही एक प्राणी क्षुधेने पिडिले । म्हणोनि दोडे तोंडू गेले ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भेट›
📿 अभंग क्र. ६९
📿 तुझे पाय रुप डोळा ।
69.
तुझे पाय रुप डोळा । नाही देखिले गोपाळा ॥1॥
काय करु या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥2॥
जन्मा येऊनिया दुःख । नाही पाहिले श्रीमुख ॥3॥
लळे पुरविसी आमुचे । ह्मणे जनी ब्रिद साचे ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ६९
📿 वारी पंढरीची तोचि वा
69.
वारी पंढरीची तोचि वारकरी । दया क्षमा बरी वसे तेथे ॥१॥
तोचि माझा जीव प्राणाचाहि प्राण । जीव वोवाळीन तयावरी ॥२॥
आसनी शयनी पंढरीचे ध्यान । वाचे नारायण जप सदा ॥३॥
चोखा म्हणे तोचि माझा हे सांगाती । तयाचे संगती देव जोडे ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ६९
📿 माई म्हारी हरिजी न ब
69.
माई म्हारी हरिजी न बूझी बात ।
पिंड मांसू प्राण पापी निकस क्यू नही जात॥
पट न खोल्या मुखा न बोल्या, सांझ भई परभात ।
अबोलणा जु बीतण लागो, तो काहे की कुशलात॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ६९
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 विमलार्जुन उद्धार›
📿 अभंग क्र. ६९
📿 विमालार्जुनोद्धार
69.
विमालार्जुनोद्धार
कुबेराचे पुत्र मदोन्तत्त झाले । म्हणूनि शापिले नारदाने ॥१॥
व्हाल तुम्ही वृक्ष ऐकोनी सावध । झाला अपराध ऋषिराया ॥२॥
विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उश्याप वदत कृपाळुवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ६९
📿 गौळणी सांगती गार्हा
69.
गौळणी सांगती गार्हाणीं । रात्री आला चक्रपाणी । खाऊनी दही दूध तूप लोणी । फोडिली अवघी विरजणीं ॥१॥ हा गे बाई कोणासी आवरेना । यशोदा बाळ तुइझा कान्हा । कोठवर सांसुद धिंगाणा॥धृ०॥दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात । मुखाशी मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत धरु जाता सांपडेना ॥२॥ तिसरी आली धांउनी । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देउनी । गांठ बाई कोणा सुटेना ॥३॥ मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणी । जातो आम्ही गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेउनी । हे बाई आम्हांसी पहावेना ॥४॥
ऐशीं ऐकता गार्हाणीं । यशोदानयनीं आले पाणीं । कृष्ण खोड दे टाकुनी एका जनार्दनी चरणी । प्रेम तया आवरेना ॥५॥
70.
काय नव्हे केले । एक चिंतिता विठ्ठले ॥१॥
सर्व साधनांचे सार । भवसिंधु उतरी पार ॥२॥
योग याग तपे । केली तयाने अमुपे ॥३॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भेट›
📿 अभंग क्र. ७०
📿 वाट पाहते मी डोळा ।
70.
वाट पाहते मी डोळा । का गा न येसी विठ्ठला ॥1॥
तू वो माझी निज जननी । मज का टाकियेले वनी ॥2॥
धीर किती धरु आता । कव घाली पंढरिनाथा ॥3॥
मला आवड भेटीची । धनी घेईन पायांची ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ७०
📿 गेली वीरसरी । मग त्य
70.
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणिता ॥धृपद॥
भंगलिया चित्ता । न ये काशाने सांदिता ॥२॥
तुका म्हणे धीर । भंगलिया पाठी कीर ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७०
📿 भक्ताच्या धावया धावस
70.
भक्ताच्या धावया धावसि तु वेगी । विठोबा तुज मागे रखुमा देवी ॥
यादवांसहित कैसा तू धावसी । स्वामी हृषिकेशी पांडुरंगा ॥
बोधला म्हणे हरि ब्रिदे साच करी । भक्त भाव मुरारी साज तुज ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ७०
📿 बीहु बीहु तेरी सबल म
७०.
बीहु बीहु तेरी सबल माया । अगे इनी अनक भरमाया ॥१॥
मायाके अंतर ब्रम्हा न दीसई । ब्रम्हाके अंतर माया न दीसई ॥२॥
भणत नामदेव अये बीबी धाना । देहू घोडावर चढाई कान्हा ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भेट›
📿 अभंग क्र. ७१
📿 येग येग विठाबाई । मा
71.
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥1॥
भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥2॥
इतुक्यासहित त्वा बा यावे । माझे रंगणी नाचावे ॥3॥
माझा रंग तुझिया गुणी । ह्मणे नामयाची जनी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पंढरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ७१
📿 वैकुंठ पंढरी भिवरेचे
71.
वैकुंठ पंढरी भिवरेचे तिरी । प्रत्यक्ष श्रीहरि उभा तेथे ॥१॥
रूप है सांवळे गोड ते गोजिरे धणि न पुरे पाहता जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिवळा । वैजयंती माळा गळा शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसे सगुण हे ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७१
📿 भक्ति आनंद । मज करी
71.
भक्ति आनंद । मज करी गा नारायणा । हेचि माझ्या मना आवडी मोठी ॥
देवा आवडी मनाची । तुझिये भेटीची । आणिक कोणाची । नाही चाड ॥
जनक जननी । तु आमचा धणी । ठाव मज चरणी । देई बापा ॥
बोधला म्हणे मज । आणिक नाही काज । तुझीया चरणीचा रज । होईन बापा ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ७१
📿 दास अनंत मेरो निजरूप
७१.
दास अनंत मेरो निजरूप । दर्शन निमष तापत्रय मोचन परसन मुक्त क्रत ग्रहे कूप ॥१॥
मेरी बांधी भक्त झुडावे बोधे भक्त न छुटे मोहे । एक समय मोको ग्रहे बांधे तो फिर मुपे जबाब न होये ॥२॥
मै गुणबंद सकलकी जीवन मेरी जीवन मेरे दास । नामदेव जाके जी ऐसी तैसो ताको प्रेम प्रगास ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ७१
📿 विकट विकास विनट रूपस
71.
विकट विकास विनट रूपस । सर्व हृषिकेश दिसे आम्हा ॥१॥
ते रूप साजिरे नंदाचे गोजिरे । उन्मनिनिर्धारे भोगू आम्ही ॥२॥
विलास भक्तीचा उन्मेखनामाचा । लेशु त्या पापाचा नाही तेथे ॥३॥
निवृत्ति म्हणे ते सुखरूप कृष्ण । दिननिशी प्रश्न हरि हरि ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ७२
📿 कंठी कृष्णमणी । नाही
72.
कंठी कृष्णमणी । नाही अशुभ ते वाणी ॥१॥
हो का नर अथवा नारी । रांड तये नावे खरी ॥धृपद॥
नाही हाती दान । शूरपणाचे कांकण ॥२॥
वाळियेली संती । केली बोडोनि फजिती ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७२
📿 भक्ती भावा ठाव नाही
72.
भक्ती भावा ठाव नाही । कवित्व करी उभे घाई ॥
लोकाप्रती वाचितो पोथी पुराण । आपण भरले आडराने ॥
देखत देखत ठाकिती लोका । आपण घेती लोकाचा थुका ॥
हाती घेऊनी फिरवितो माळा । पन्नास घालुनी कापी गळा ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ७२
📿 बदो कीन हो माधो मोसो
७२.
बदो कीन हो माधो मोसो । ठाकूर ते जन जन ते ठाकूर खेल परो है तोसू ॥१॥
आपण देव देहुरा आपण आपलगावे पूजा । जलते तरंग तरंग ते है जल कहत सुननवो दुजा ॥२॥
आपे गावे आणे नाचे आपे बजावे तुरा । कहत नामदेव तू मेरो ठाकूर जन उरा तू पूरा ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , वासुदेव अभंग›
📿 अभंग क्र. ७३
📿 मी वासुदेव नामे फोडि
73.
मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो । देखिले पाय आता मागतो दान द्या हो ।
सांवळे रुप माझया मानसी नित्य राहो । पावन संतवृदे सादरे दृष्टि पहा हो ॥१॥
राम कृष्ण वासुदेवा । हरि राम कृष्ण वसुदेवा ॥२॥
सांडोनि सर्व चिंता संतपदी लक्ष लागो । मुक्त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ति जागो ।
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ७३
📿 तुम्हरे कारण सब छोड्
73.
तुम्हरे कारण सब छोड्या, अब मोहि क्यू तरसावौ हौ ।
बिरह-बिथा लागी उर अंतर, सो तुम आय बुझावौ हो॥
अब छोड़त नहि बड़ै प्रभुजी, हंसकर तुरत बुलावौ हौ ।
मिरा दासी जनम जनम की, अंग से अंग लगावौ हौ॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७३
📿 भावाचा भुकेला प्रीती
73.
भावाचा भुकेला प्रीतीचा येलाइतू । हेचि तुझी भक्ती आणिक न लगे काही ॥
ऐसा तु कृपाळू पाहे दीनालागी । भक्ती ज्याचे आंगी ते कृपा तुझी ॥
आता तु उदार दीन उध्दरावया । धने पंढरीराया कृपाळू वा ॥
बोधला म्हणे देवा धन्य तुझा महिमा । स्वामी पुरुषोत्तमा पांडुरंगा ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गोप नवस लीला›
📿 अभंग क्र. ७३
📿 गोपनवसलीला.
73.
गोपनवसलीला.
एक गोप तेव्हा स्रियेसी सांगत । सांठवी समस्त नवनीत ॥१॥
देवाचा नवस आहे पुरवणे । धरावे येथून अनसुट ॥२॥
सांगोनिया ऐसे राहिला तो स्वस्थ । मागे स्त्रीने कृत्य काय केले ॥३॥
74.
पंढरीसी जा रे आल्यांनो संसारा । दीनाचा सोयरा पांडूरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळु तांतडी उतावीळ ॥२॥
मागील परिहार पुढे नाही सीण । झालिया दर्शन एक वेळा ॥३॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती । बैसला तो चित्ती निवडेना ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भेट›
📿 अभंग क्र. ७४
📿 का गे निष्ठुर झालीस
74.
का गे निष्ठुर झालीसी । मुक्या बाळाते सांडिसी ॥1॥
तुज वाचोनिया माये । जीव माझा जावो पाहे ॥2॥
मी वत्स माझी माय । नये आता करु काय ॥3॥
प्राण धरियेला कंठी । जनी ह्मणे देंई भेटी ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ७४
📿 करुणा सुणो स्याम मेर
74.
करुणा सुणो स्याम मेरी, मै तो होय रही चेरी तेरी॥
दरसण कारण भई बावरी बिरह-बिथा तन घेरी ।
तेरे कारण जोगण हूंगी, दूंगी नग्र बिच फेरी॥
कुंज बन हेरी-हेरी॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७४
📿 भावाचा भोक्ता भक्तास
74.
भावाचा भोक्ता भक्तासी आंगिकार । आरे तु काज कैवारी अनाथाचा ॥
दिनाच्या धावया कैसा तु धावसी । काहि न पाहसी दोष आमचे ॥
आम्ही तव अपराधी । आहा अनंत कोटी । परि तु धुरजेठी आंगिकारिल ॥
बोधला म्हणे जन्मोजन्मी तुझा आखिला । हा देहे ठेविला तुझे पायी ॥