संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८३३
📿 याती मतिहीन रूपे लीन
833.
याती मतिहीन रूपे लीन दीन । आणीक अवगुण जाणोनिया ॥१॥
केला त्या विठ्ठले माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनिया ॥धृपद॥
जे काही करितो ते माझे स्वहित । आली हे प्रचित कळो चित्ता ॥२॥
जाले सुख जीवा आनंद अपार । परमानंदे भार घेतला माझा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८३५
📿 अवघे ते दैवाचे विठ्ठ
835.
अवघे ते दैवाचे विठ्ठल म्हणती वाचे| अवघे कुळ त्यांचे पुण्यवंत ॥१॥
अवघेचि संसारी जाणावे ते धन्य|ज्याचे प्रेम पूर्ण पांडुरंगी ॥२॥
अवघा विठ्ठल भोगिती दिनरातीं|वोळगे किंकरवृत्ति नामा त्याते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८३६
📿 उत्तम अधम येथे नाही
836.
उत्तम अधम येथे नाही काम । जपे तू श्रीराम सर्वकाळ ॥१॥ मंत्रतप कांही योगाची धारणा । न लगे नामस्मरणा वांचुनियां ॥२॥ योग याग तप वाउगा बोभाट । अष्टांग नेटपाट न लगें कांही ॥३॥ एका जनार्दनी गावें मुखी नाम । तेणे वारे काम क्रोध सर्व ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८३७
📿 आले फळ तेव्हा राहिले
837.
आले फळ तेव्हा राहिले पिकोन । जरी ते जतन होय देठी ॥१॥
नामेचि सिद्धी नामेचि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवता ॥धृपद॥
चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये काही ॥२॥
तुका म्हणे मध्ये पडती आघात । तेणे होय घात हाणी लाभ ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८३७
📿 म्हणता वाचे नाम वंदी
837.
म्हणता वाचे नाम वंदी तया यम |काळादिका सम वंदी तया ॥१॥
ऐसे नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ |उच्चारिता नीट वैकुंठ गाजे ॥२॥
तो हा नाममहिमा वाखाणित ब्रह्मा|न कळे तया उपमा आदि अंती ॥३॥
नामा म्हणे पाठे नामाचेनि वाटे|तरी प्रत्यक्ष प्रगटे विठ्ठल हरि॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८३७
📿 दानधर्म कोणान घडे सर
837.
दानधर्म कोणान घडे सर्वथा । राम नाम घेतं सर्व जोडें ॥१॥ कर्म धर्म कांही न होती सांग । रामनामे पांग फिटे त्याचा ॥२॥ वेदशास्त्रांव्युप्तत्ती पढतां श्रम पोटी । रामनामे कोटी जप घडे ॥३॥ आचार विचार न कळे साचार । एका जनार्दनी निर्धार राम जपा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८३८
📿 विरोधाचे मज न साहे व
838.
विरोधाचे मज न साहे वचन । बहु होते मन कासावीस ॥१॥
म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसता एकांती गोड वाटे ॥धृपद॥
देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥
तुका म्हणे देव अंतरे यामुळे । आशामोहोजाळे दुःख वाढे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८३८
📿 म्हणे दीनबंधू तुम्ही
838.
म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावे |संतांशी नमन नाम वाचे जपावे ॥१॥
नामाविण साधन नाही या कलियुगी|व्यर्थ श्रम होती पाहता मत्ते ॥२॥
मताभिमान करणे नि तुम्ही जाल आड वाटां|अभिमाने ठकविले नारदादि श्रेष्ठा ॥३॥
आलिया जन्मांस आता न करी आळस|नामदेवालागी सांगे जगन्निवास ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८३८
📿 ऐका नामाचे महिमान ।
838.
ऐका नामाचे महिमान । नामे पातकी पावन । तरले ते अधम जन । कलयुगामाझारी ॥१॥ धन्य धन्य राम पावन । सर्व साधनांचे साधन । मोक्ष नामचि पूर्ण । स्मरतांचि जोडे ॥२॥ न लगे आन विधि मुद्रा । न लगे तपांचा डोंगरां । कासया हिंडताती सैरा । नामजपा सादर ॥३॥ भोळ्या भाविकां हे वर्म । दृढ जपावे हो नाम । एका जनार्दनी धाम । पावे वैकुंठीचें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८३९
📿 तुजशी संबंध खोटा । प
839.
तुजशी संबंध खोटा । परता परता रे तू थोटा ॥१॥
देवा तुझे काय घ्यावे । आप आपणा ठकावे ॥धृपद॥
जेथे मुद्दल न ये हाता । व्याज मरावे लेखिता ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनी तुझा ठसा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८३९
📿 सकळ संतजन देखोनि नयन
839.
सकळ संतजन देखोनि नयनीं|टाळिया पिटोनि गाती नाम ॥१॥
म्हणती धन्य भक्त निधडा वैष्णव|ब्रह्मादिका माव न कळे याची ॥२॥
कैसा ऋणिया केला पंढरीनाथ|आहे सदोदित याचेजवळी ॥३॥
पूर्वी तो प्रल्हाद श्रवणी ऐकिला|किंवा हा देखिला संतामधी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८३९
📿 सुख बहु असे आम्हा ।
839.
सुख बहु असे आम्हा । तुझा गाता नाममहिमा । तेणे अंगी होतसे प्रेमा । नामी दृढता सदोदित ॥१॥ ते नाम सोपे जयराम । भवसिंधुतारक निष्काम । मुखें गाता उत्तमोत्तम । सुलभ आणि सोपारे ॥२॥ नाम नौका जगालागीं । नामे पावन होत कलियुगीं । एका जनार्दनी मुराला अंगी । पावन होय नाम घेता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८४०
📿 जग रामनाम म्हणे । तय
840.
जग रामनाम म्हणे । तया का न येती विमाने ॥१॥ नवल स्मरणाची ठेव । नामी नाही अनुभव ॥२॥ नष्ट गणिका राम म्हणे । तिसी वैकुंठींचे पेणे ॥३॥ एका जनार्दनी ध्यात । राम पाहे ध्याना आंत ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , स्वरूप स्थिती अभंग ८३५ ते ८४१›
📿 अभंग क्र. ८४१
📿 मन हे धाले मन हे च ध
841.
मन हे धाले मन हे च धाले पूर्ण विठ्ठलचि झाले ।
अंतरबाह्य रंगुनी गेले विठ्ठलची ॥१॥
विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप ।
धाला दीनाचा मायबाप विठ्ठलची ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८४१
📿 आम्ही जाणो तुझा भाव
841.
आम्ही जाणो तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥
फांकु नेदू चुकाविता । नेघो थोडे बहु देता ॥धृपद॥
बहुता दिसाचे लिगाड । आले होत होत जड ॥२॥
तुका म्हणे आता । नेघो सर्वस्व ही देता ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 संत महिमा›
📿 अभंग क्र. ८४१
📿 संतांचा महिमा कोण जा
841.
संतांचा महिमा कोण जाणे सीमा | सीणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१॥
संतांची हे कळा पाहता न कळे | खेळोनिया खेळ वेगळाची ॥२॥
संतांचिया पारा नेणे अवतारा | म्हणती याच्या पारा कोण जाणे॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य भेट जाली | कल्पना निमाली संतापायी जाणे ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , मदालसा अभंग ८४२ ते ८४७›
📿 अभंग क्र. ८४२
📿 उपदेश उपरती ज्ञान ध्
842.
उपदेश उपरती ज्ञान ध्यान एकनिष्ठ ।
विज्ञान ते आटले रे दृश्यादृश्य तेथे दृष्ट ।
आदिअंत हरपला सर्व ब्रह्म एक वाट ।
नित्य नेम चालता रे होय वैकुंठ प्रगट ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८४२
📿 ऋण वैर हत्या । हे तो
842.
ऋण वैर हत्या । हे तो न सुटे नेंदिता ॥१॥
हे का नेणा पांडुरंगा । तुम्ही सांगतसा जगा ॥धृपद॥
माझा संबंध तो किती । चुकवा लोकाची फजिती ॥२॥
तुका म्हणे याचि साठी । मज न घेता नये तुटी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 संत महिमा›
📿 अभंग क्र. ८४२
📿 कर्दळी फळ कर्पूर परि
842.
कर्दळी फळ कर्पूर परिमळे भिन्न | परि दोहींचे जन्म ते एकत्र जाण |
आत्मा की परमात्मा अभेद की भिन्न | चंद्र सोमकांत शून्य महाशून्य ॥१॥
सूर्य सूर्यकांतु प्रकाश एकु | साधुसंत आरति रावो ना रंकु ॥२॥
भ्रमरांच्या रुंजी मकरंद उधळती | असाध्य साधनी लागल्या ज्योती |
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८४२
📿 गाणे बाणे मुर्तीकडें
842.
गाणे बाणे मुर्तीकडें । राम अध ऊर्ध्व मागे पुढे ॥१॥ मुखी उच्चारिता नाम । जिव्हेंमाजीं वसे राम ॥२॥
श्रुति मृदंग टाळ घोळ । ते नाद राम सकळ ॥३॥ एका जनार्दनी नित्य गात । श्रोता वक्ता जनार्दन तेथे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८४३
📿 नाही मागितला । तुम्ह
843.
नाही मागितला । तुम्हा मान म्या विठ्ठला ॥१॥
जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हाती ॥धृपद॥
नाही केला पोट । पुढे घालूनि बोभाट ॥२॥
तुका म्हणे धरूनि हात । नाही नेले दिवाणात ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८४३
📿 देही असोनिया विदेही
843.
देही असोनिया विदेही प्रकार । रामनाम उच्चार ज्याचे मुखी ॥१॥
तोचि तरेल ऐसा नाही बोल । दरुशने तारील मूढ जना ॥२॥
देही तो विदेही समाधिस्थ सर्वदा । रामनाम मुखी सदा जया असे ॥३॥
एका जनार्दनी नित्य गात । श्रोता वक्ता जनार्दन तेथे ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , मदालसा अभंग ८४२ ते ८४७›
📿 अभंग क्र. ८४४
📿 उपदेश ब्रह्मज्ञान पु
844.
उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐक रे बीज ।
सांडी सांडी मायामोहो मुक्त विचरे रे सहज ।
आशा मनसा गुंफो नको सोहं धरी का रे नीज ।
अखंड गुरूचरणी मौन्य धरी का रे काज ॥१॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८४४
📿 शुचि अथवा अशुचि । पर
844.
शुचि अथवा अशुचि । परि श्रीरामनाम ज्याचे मुखी ॥१॥
तोचि त्रैलोकी पावन । तिन्ही देवांसि समान ॥२॥
त्यांचे होता दरुशन । घडे त्रिवेणीचे स्नान ॥३॥
एका जनार्दनी देही । सदासर्वदा तो विदेही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८४५
📿 अवचट मुखी म्हणता राम
845.
अवचट मुखी म्हणता राम । सर्व दुरितें होती भस्म ॥१॥
नामापुढे पाप रहे । ऐसा कोण वदताहे ॥२॥
घडता पातकांच्या राशी । तोही नेला वैकुंठासी ॥३॥
भाविकांशी वर्म सोपे । राम मुखें जपावे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८४६
📿 बुद्धीचा जनिता लक्ष्
846.
बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठविता चित्ती काय नव्हे ॥१॥
आणिका उपाया कोण वाटी मन । सुखाचे निधान पांडुरंग ॥धृपद॥
गीत गावो नाचो छंदे वावो टाळी । वैष्णवाचे मेळी सुखरूप ॥२॥
अनंत ब्रम्हांडे एके रोमावळी । आम्ही केला भोळी भावे उभा ॥३॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , मदालसा अभंग ८४२ ते ८४७›
📿 अभंग क्र. ८४७
📿 मदालसा म्हणे पुत्रा
847.
मदालसा म्हणे पुत्रा तू मुक्त होतासी ।
संसारमायामोहे का रे बद्ध जालासी ।
सिद्ध ते विचारी पा जेणे सुखीया होसी ॥१॥
चेई तू रे तानुलिया जाई श्रीगुरूशरण ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 संत महिमा›
📿 अभंग क्र. ८४७
📿 आला वैष्णवांचा मेळ |
847.
आला वैष्णवांचा मेळ | पळाला हो कळीकाळ ॥१॥
आले आले हरिदास | कळीकाळा वरी घाला कास ॥२॥
कल्मशा पडियेला धाक | तो हि देऊ न शके हाक ॥३॥
पैल नाम केशवाचा | सवे मेळू वैष्णवांचा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८४७
📿 देठीचें फळ देठी पिके
847.
देठीचें फळ देठी पिके । न तोडितां जो चवी चाखे ॥१॥
गोड साखरसें साखरसें । रामनाम रसे चवी आले ॥२॥
न तोडी न फोडी सगळेंची सेवी । ब्रह्मादिका तो वाकुल्या दावी ॥३॥
एका जनार्दनी घेतली गोडी । जीव गेला तरी चवी न सोडी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८४८
📿 जीवामाजी घालुनी जीव
848.
जीवामाजी घालुनी जीव । परिसी अर्थ तोगौरव ॥१॥
तै सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारे ॥२॥
व्यापक तो सर्वदेशी । भरुनी उरला सर्व साक्षी ॥३॥
राम व्यापकु सर्वदेशीं । ऐशीं कल्पना जयासी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 संत महिमा›
📿 अभंग क्र. ८४९
📿 यम सांगू गेला वैकुंठ
849.
यम सांगू गेला वैकुंठा | देवा सांभाळा जी आपुल्या मठा |आम्ही नवजाऊ तयाचिया वाटा | वैष्णव दूत नागवती ॥१॥
कुंभिपाक पडला ओस | दूता लागला त्रास |देवा कोपेल महेश | म्हणोनी सांगावया आलो ॥२॥
देवा तुम्ही एक वोखटे केले | गंगेसि मृत्युलोकासी पाठविले |तेणे थोर कार्य नाशिले | हा प्रसाद गौतमाचा ॥३॥
ऐसे वैष्णवदूती गांजिलो | तुजप्रति सांगावया आलो |देवे पाहिजे मना आणिलो | माझे साह्य करावे स्वामी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८५०
📿 एक करिती गुरु गुरु ।
850.
एक करिती गुरु गुरु । भोवता भारु शिष्यांचा ॥१॥
पुंस नाही पाय चारी । मनुष्य परी कुतरी ती ॥धृपद॥
परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविले ॥२॥
तुका म्हणे निर्भर चित्ती । अधोगती जावया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८५१
📿 एका पुरुषा दोघी नारी
851.
एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरी ॥१॥
पाप न लगे धुंडावे । लागेल तेणे तेथे जावे ॥धृपद॥
काही दुसरा विचार । न लगे करावाचि फार ॥२॥
असत्य जे वाणी । तेथे पापाचीच खाणी ॥३॥