🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. २
📿 ज्यो कोई वसुधा दान द
२.
ज्यो कोई वसुधा दान दे आवे । पूर्ण जज्ञ करे करावे ॥
तीरथ बरथ करे स्नान । नही नही हरीनाम समान ॥१॥
ज्यो कोई ज्यावे हीमालये गले । काशी करवत लेकर मरे ॥
द्सवे द्वारे काढे प्राण । नही नही हरिनाम समान ॥२॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. २
📿 प्राणिया उध्दार सर्व
2.
प्राणिया उध्दार सर्व हा श्रीधर । ब्रह्म हे साचार कृष्ण मूर्ती ॥१॥
ते रुपभीवरे पांडुरंग खरे । पुंडलिक निर्धारे उभे असे ॥२॥
युगे अठ्ठावीस उभा ऋषीकेश । पुंडलिक सौरस पुरवित ॥३॥
निवृत्तिचे गुज पांडुरंगा बीज । विश्वजन काज पुरे कोडे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 देवीच्या आरत्या›
📿 अभंग क्र. २
📿 आश्विनशुद्धपक्षी अंब
2.
आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासुन घटस्थापना ती करुनि हो ।
मुलमंत्रजप करुनी भोवतें रक्षक ठेउनि ।
हो ब्रह्मविष्णुरुद्र आईचे पुजन करिती हो ॥ १ ॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 नाचू कीर्तनाचे रंगी
3.
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावु जगी ॥१॥
सर्व सांडुनी माझाई । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
परेहून परते घर । तेथे राहू निरंतर ॥३॥
सर्वांचे जे अधिष्ठान । तेचि माझे रुप पूर्ण ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 आले देवाजीच्या मना ।
3.
आले देवाजीच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥१॥
हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरी पाणी ॥२॥
पांडवांचा साहाकारी । राज्यावरोनी गेले दुरी ॥३॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल ते सहज पाहा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 तुम्ही विश्वनाथ । दी
3.
तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडा । पाया पडिलो बराडी ॥२॥
काय उणे तुम्हापासि । मी तो अल्पाची संतोषी ॥३॥
तुका म्हणे देवा । काही भातुके पाठवा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ग्रंथ महात्म्य›📂 ज्ञानेश्वरी महात्म्य›
📿 अभंग क्र. ३
📿 कृपाळू उदार माझा ज्ञ
3.
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावे शरण जाता भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनी पाय वंदितसे ॥॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्रीकृष्ण जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 आकाशीची वाणी सांगे स
3.
आकाशीची वाणी सांगे सकळांसी । तळमळ मानसी करु नका ॥१॥
देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राम्हण गाई भक्त ॥२॥
उतरील भार मारील दैत्यासी । आनंद सर्वांसी करील तो ॥३॥
रोहिणी उदरी शेष बळिभद्र । यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 हनुमान जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 आरंभिला यज्ञ सन्तोष
3.
आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनी ॥२॥
पायस ते पात्र घेऊनिया करी । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
विलंब करिता विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. ३
📿 हाचि नेम आता न फिरे
3. हाचि नेम आता न फिरे माघारी 3
हाचि नेम आता न फिरे माघारी । बैसले शेजारी गोविंदाचे ॥१॥
घररिघी झाले पट्टराणी बळे । वरिले सांवळे परब्रम्ह ॥२॥
बळियाचा अंगसंग झाला आता । नाही भय चिंता तुका म्हणे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 एकादशी, द्वादशी, व क्षिरापतीचे अभंग›📂 एकादशी अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 एकादशीस अन्नपान । जे
3.
एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥
ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन ।
गाती ऐकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसी ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 एकादशी, द्वादशी, व क्षिरापतीचे अभंग›📂 क्षिरापती अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 पावला प्रसाद आता विठ
3.
पावला प्रसाद आता विठो निजावे । आपुलाले श्रम कळो येताती भावे ॥१॥
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा ॥२॥
तुम्हांसी जागवू आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हराया पीडा ॥३॥
तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन । नाही निवडिले आम्हा आपुलिया भिन्न ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 एकादशी, द्वादशी, व क्षिरापतीचे अभंग›📂 द्वादशी अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 माझा हा विठोबा येईल
3.
माझा हा विठोबा येईल गे जेव्हा । जेवीन मी तेव्हा गोणाबाई ॥१॥
जाऊनि राउळा तयासी तू पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागे क्रोध त्याचा साहे । लवकरी बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वरा घरी असेल बैसला । जाऊनि विठ्ठला पाहे तेथे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा›
📿 अभंग क्र. ३
📿 काय दिला ठेवा । आम्ह
3.
काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुम्ही कळलेती उदार । साटी परिसाची गार ॥२॥
जीव देता तरी । वचना नये येका सरी ॥३॥
गोमांसासमान । तुका म्हणे आम्हा धन ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 पुंडलिक स्तुती महात्म्य›
📿 अभंग क्र. ३
📿 धन्य पुंडलिका बहू बर
3.
धन्य पुंडलिका बहू बरे केले । निधान आणिले पंढरीये ॥१॥
न करी आळस आलिया संसारी । पाहे पा पंढरी भूवैकुंठ ॥२॥
न पविजे केल्या तपांचिया राशी । ते जनलोकासी दाखविले ॥३॥
सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 पूजेचे अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 कासयाने पूजा करू केश
3.
कासयाने पूजा करू केशीराजा । हाचि संदेह माझा फेडी आता ॥१॥
उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे । तेथे काय माझे वेचे देवा ॥२॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथे मी दुर्बळ काय करू ॥३॥
फळदाता तूंच तांबोल अक्षता । तेथे काय आता वाहो तुज ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 सुखसागरी वास झाला ।
3.
सुखसागरी वास झाला । उंच नीच काय त्याला ॥१॥
अहो आपण जैंसे व्हावे । देवे तैसेंचि करावे ॥२॥
ऐसा नटनाटय खेळ । स्थिर नाही एकवेळ ॥३॥
एकापासुनी अनेक झाले । त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 त्र्यंबकेश्वर महात्म्य›
📿 अभंग क्र. ३
📿 धन्य धन्य निवृत्तिदे
3.
धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥
शिव अवतार तूंचि धरून । केले त्रैलोक्य पावन ॥२॥
समाधि त्र्यंबक शिखरी । मागे शोभे ब्रह्मगिरी ॥३॥
निवृत्तिनाथांचे चरणी । शरण एका जनार्दनी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरपूर महात्म्य अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 ऐका पंढरीचे महिमान ।
3.
ऐका पंढरीचे महिमान । राउळे तितुके प्रमाण ।
तेथील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे ॥१॥
ऐसी पंढरी मनी ध्याती । त्यांसी तिही लोकी गति ।
ते आणिका तीर्था जाती । ती वंदिती तयांसी ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 पंढरपूर आषाढी-कार्तिक वारी महिमा›📂 आषाढी कार्तिकी वारी महिमा›
📿 अभंग क्र. ३
📿 आषाढी कार्तीकी विसरू
3.
आषाढी कार्तीकी विसरू नका मज । सांगते गुज पांडुरंग ॥१॥
पतित पावन मी तो आहे खरा । तुमचेनी बारा दिसतसे ॥२॥
तुम्ही जाता गावा हुरहूर माझे जीव । भेटल केधवा मजलागी ॥३॥
धावोनिया देव गळा घाली मिठी । स्फुंदस्फुंदूनी गोष्टी बोलतसे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 शुक्रवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 निर्गुण निराकार दादा
3.
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गांव । शंकुन सांगावया आले यमाई माझे नाव ।
तये नगरी वस्ती केली मी तरी आले एकभावे । ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊन ऐकावे ॥१॥
कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश । शकुन सांगावया मी आले कलियुगास ।
ब्रह्याविष्णु महेश पुसती शकुन आम्हांस । ऐसे निदान आम्ही सांगितले त्यास ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 सोमवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 तुम्ही विश्वनाथ । दी
3.
तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडा । पाया पडिलो बराडी ॥२॥
काय उणे तुम्हापासि । मी तो अल्पाची संतोषी ॥३॥
तुका म्हणे देवा । काही भातुके पाठवा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 रविवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 नव्हे तेचि कैसे झाले
3.
नव्हे तेचि कैसे झाले रे खेळिया । नाही तेचि दिसू लागले रे ।
अरूप होते ते रूपासी आले । जीव शिव नाम पावले रे ॥१॥
आपुलीच आवडी धरूनि खेळिया । आप आपणाते व्याले रे ।
जोपनाकारणे केली बायको । तिने एवढे वाढविले रे ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 गुरुवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ३
📿 ज्ञानियांचा राजा गुर
3.
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायीची वाहाण पायी बरी ॥२॥
ब्रम्हंदिक जेथे तुम्हा ओळंगणे । इतर तुळणे काय पुरे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 नामसंकीर्तन महात्म्य›
📿 अभंग क्र. ३
📿 नाम फुकट चोखट । नाम
3.
नाम फुकट चोखट । नाम घेता नये वीट ॥1॥
जड शिळा ज्या सागरी । आत्मारामे नामे तारी ॥2॥
पुत्रभावे स्मरण केले । तया वैकुंठासी नेले ॥3॥
नाममहिमा जनी जाणे । ध्याता विठ्ठलचि होणे ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७›
📿 अभंग क्र. ३
📿 सत्य ज्ञानानंत गगनाच
3.
सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण्य । नाही रूप वर्ण गुण तेथे ॥१॥
तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी । पाहता पाहणे दुरी सारोनिया ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती । ति ही मुर्ती उभी विटेवरी ॥३॥
अर्थ :
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ३
📿 अपनी गरज हो मिटी साव
3.
अपनी गरज हो मिटी सावरे हम देखी तुमरी प्रीत॥धृ०॥
आपन जाय दुवारका छाय ऐसे बेहद भये हो नचिंत॥ ठोर०॥१॥
ठार सलेव करित हो कुलभवर कीसि रीत॥२॥
बीन दरसन कलना परत हे आपनी कीसि प्रीत ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ३
📿 आजि वो हरि गावासि आल
3.
आजि वो हरि गावासि आले । गोपिका सहित आम्ही नयनी देखिले ॥1॥धृ॥
एकीकडे कौरव येकीकडे पांडव । मधे उभे यादवराव ॥2॥
दोही भागी गोपिका । करी घेऊनी टाळ ।
मध्ये उभे यादवराव । नृत्य करिती ॥3॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ›📖 रुक्मिणी स्वयंवर संपूर्ण प्रसंग›📂 प्रसंग तिसरा सुदेव श्रीकृष्णाकडे आले›
📿 अभंग क्र. ३
📿 रुक्मिणी स्वयंवर-प्र
3.
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग तिसरा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग तिसरा
श्रीवासुदेवाय नम: ॥ आपुले आर्तीचे अंजन । शुद्धसत्वाचे पत्र जाण । बुद्धिबोधे लेखन । वर्णाक्षरी अक्षर ॥१॥