स्नानालागी उठा म्हणे
2235.
स्नानालागी उठा म्हणे नारायण । आणविले उष्ण पाणी तेव्हा ॥१॥
सोळा सहस्र स्त्रिया उटणी लाविती । अक्षवाण आरती करिताती ॥२॥
करविले स्नान पतिबंर परिधान । अलंकार भूषणे दिल्ही त्यासी ॥३॥
स्वइच्छा भोजन वाढिले तयासी । नामाही पंक्तिसी बैसविला ॥४॥
