संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. १०९२
📿 जगासी तारक हरि हा उच
1092.
जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटें जेणे ॥१॥
पाहता ब्रह्मांडी व्यापका तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं भरलासे ॥२॥
एका जनार्दनी रिता ठाव कोठे । पुंडलीक पेठे उभा नीट ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०९४
📿 पंढरीचे वारकरी । ते
1094.
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥
पुंडलिका दिला वर । करुणाकरे विठ्ठले ॥धृपद॥
मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥२॥
तुका म्हणे खरे जाले । एका बोले संतांच्या ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. १०९६
📿 जागृती स्वप्नीं आणि
1096.
जागृती स्वप्नीं आणि सुषुप्ती । तिही अवस्थात हरि म्हणता मुक्ति ॥१॥
ऐसे वेदशास्त्रे गर्जती । विवादतीं पुराणे ॥२॥
नाम निरंतर मुखी सदा । नोहे बाधा भौतिक ॥३॥
एका जनार्दनी शरण । भुक्तिमुक्तिची नाही कारण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०९७
📿 न कळे ते कळो येईल उग
1097.
न कळे ते कळो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥१॥
न दिसे ते दिसो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥धृपद॥
न बोलो ते बोलो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥२॥
न भेटे ते भेटो येईल आपण । करिता चिंतन विठोबाचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०९७
📿 देव रुक्माबाई आणिक स
1097.
देव रुक्माबाई आणिक साधुजन | करिती समाधान निवृत्तीचे ॥१॥
ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती | अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥
धन्य तुमचा महिमा बोलती पुराणी | दृश्य कांही मनी आठवू नये ॥३॥
आकाशाचे ठायी अभ्रे येती जाती | कोण त्याची खंती करू पाहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०९८
📿 बहुजन्मे केला लाग ।
1098.
बहुजन्मे केला लाग । तो हा भाग लाधलो ॥१॥
जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥धृपद॥
गेले मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥
तुका म्हणे तांतड करू । पाय धरू बळकट ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. १०९८
📿 मुखाचा व्यापार । करा
1098.
मुखाचा व्यापार । करावा हरिनाम उच्चार ॥१॥
पायांचा व्यापार । करावे तीर्थाटन निर्धार ॥२॥
हातांचा व्यापार । करावे दानधर्म सार ॥३॥
एका जनार्दनाचा निर्धार । मुखी नामाचा उच्चार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०९९
📿 भक्तीप्रेमसुख नेणवे
1099.
भक्तीप्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियांसी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ती सुख दुर्लभ त्या ॥२॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हे वर्म पडे ठायी ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. ११०१
📿 परसा भागवते केला नमस
1101.
परसा भागवते केला नमस्कार | सारे लहान थोर जमा जाले ॥१॥
सकळांचिया पायी नमियले नमना | केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥
प्रथम पायरी बाहेरील जेथ | उभा पंढरीनाथ भेटावया ॥३॥
देव म्हणे बापा अमृत नेदी पाट | फार केले कष्ट जगासाठी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११०३
📿 जेथे आठवती स्वामींचे
1103.
जेथे आठवती स्वामींचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥
रान अथवा घर एकांत लोकात । समाधान चित्त ते ते घडी ॥धृपद॥
धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहाता संकल्प गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणे । भाग्य नारायण उत्तम ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. ११०३
📿 नाही अटक काळ वेळ । स
1103.
नाही अटक काळ वेळ । सदा सोंवळें हरिनाम ॥१॥
भलते वेळीं भलते काळी । वाचे वदा नामावळी ॥२॥
न लगे मुहूर्त अथवा योग । संकल्प सांग मनाचा ॥३॥
एका जनार्दनी नेम । सोपे नाम जपतां ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११०४
📿 तुज न भे भी कळीकाळा
1104.
तुज न भे भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥१॥
माझा बळीया नेणसी कोण । संता साहे नारायण ॥धृपद॥
शंख वधिला सागरी । वेद घेउनि आला चारी ॥२॥
कूर्मे दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११०५
📿 सर्वा भूती द्यावे अन
1105.
सर्वा भूती द्यावे अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथे बीज पेरीजे ॥१॥
पुण्य करिता होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतले ॥धृपद॥
भूमी पाहाता नाही वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥
म्हणोनि विवेके । काही करणे ते निके । तुका म्हणे फिके । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. ११०७
📿 श्री सोपानदेव समाधी
1107.
श्री सोपानदेव समाधी
मग उड्डाण केले गरुडे । गगन आक्रमिले चंडे ।
वरी आरुढले प्रचंडे । भक्त देव सकळिक ॥१॥
पक्षाचेनि फडत्कार । ग्राम ठाकिला संवत्सर ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११०८
📿 केली प्रज्ञा मनाशी ।
1108.
केली प्रज्ञा मनाशी । तई मी दान सत्यत्वेशी । नेईन पायापाशी । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥
तोवरी हे भरी पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाही सांपडली वाट । सइराट फिरतसे ॥धृपद॥
ज्यावे आदराचे जिणे । स्वामी कृपा करी तेणे । पाळिल्या वचने । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥
घडे तैसे घडो आता । मायबापाची सत्ता । तुका म्हणे चिंता । काय पाहे मारगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. ११०८
📿 असंख्य वचने असोनी नस
1108.
असंख्य वचने असोनी नसती । कोण तया रीती चालतसे ॥१॥
प्रमाण अप्रमाण देहींचा निवाडा । केलासे उघडा श्रुतींशास्त्रीं ॥२॥
हरि नाम वचन एकचि प्रमाण । हे तो अप्रमाण करील कोण ॥३॥
जनार्दनाचे वचनी द्यावे अनुमोदन । एका जनार्दनी प्रमण तेंचि होय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११०९
📿 नेत्र झाकोनिया काय ज
1109.
नेत्र झाकोनिया काय जपतोसी । जव नाही मानसी प्रेम भाव ॥१॥
उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥धृपद॥
यंत्र मंत्र काही करिसी जडी बुटी । तेणे भूतसृष्टी पावशील ॥२॥
सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. ११०९
📿 आमुचे हेचि साधन खरें
1109.
आमुचे हेचि साधन खरें । नाम बरें जनार्दन ॥१॥
नाही भय आणि चिंता । जन्ममरण वार्ता विसरलो ॥२॥
नाही येणे जाणे मरण धाक । अवघा एक जनार्दन ॥३॥
एका शरण जनार्दनी । जनार्दन जनी वनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १११०
📿 संत मारगी चालती । त्
1110.
संत मारगी चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥
काय करावी साधने । काय नव्हे एक तेणे ॥धृपद॥
शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥
तुका म्हणे संता पायी । जीव ठेविला निश्चयी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. १११०
📿 ऐसा सोपान संबोखिला |
1110.
ऐसा सोपान संबोखिला | महा उत्सव आनंद जाला | अभय वर दिधला | गर्जीन्नला देवराणा ॥१॥
म्हणे तूृते न विसंबे | संवत्सरी असेन स्वयभे | या वटेश्वरी सगुण सुलभे | समारंभ प्रतिवर्षी ॥२॥
सिद्धसाधकाचे स्थळ | तो हा वटेश्वर सानुकुळ | यासी म्हणती सोडविल नीळकंठ | शीतळ प्रथम नाम ॥३॥
पूर्वी हे ब्रह्मयाचे स्थान | तेणे येथे तप साधिले गहन | प्रत्यक्ष शंकर सुप्रसन्न | आशीर्वचन बोलिले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. १११०
📿 आठवण ती हीच असो । वा
1110.
आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥
काया वाचा आणि मन । करु कीर्तन धुमाळी ॥२॥
धरु वैष्णवांचा संग । टाकू कुसंग लाजोनी ॥३॥
म्हणूं आम्ही हरीचे दास । एका जनार्दनी निजदास ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११११
📿 जैसे तैसे बाळ मातेसी
1111.
जैसे तैसे बाळ मातेसी आवडे । बोलता बोबडे शब्द गोड ॥१॥
आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनिया जीवी सुख वाटे ॥२॥
तुका म्हणे काय देऊ परिहार । काय ते साचार जाणा संत ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. ११११
📿 सोपान म्हणे देवोत्तम
1111.
सोपान म्हणे देवोत्तमा | पुर्वी येथे होता ब्रह्मा | आणि तुम्ही सर्वोत्तमा | कोणे स्थळी होता देवा ॥१॥
देव म्हणे कथा परिस | कोट्यानुकोटी युगांस |आम्ही होतो पंढरीस | अनंत कल्पे गेली ॥२॥
अनंत भक्तांचिया मेळी | अनंत वंष्णवे भूमंडळी |माजी गवसले सकळी | केली आगळी पुंडलिके ॥३॥
येणे प्रसन्न केले शंकरा | शंकरे मज दाखविले निर्धारा | आपण राहोनि पाठमोरा | विश्व तारिले कीतने ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. १११२
📿 पूवकथा संवत्सरनगरी |
1112.
पूवकथा संवत्सरनगरी | सांगितली असे अवधारी | मग शोषाद्रि पर्वतावरी | गरुड शिखरी उभा असे ॥१॥
धन्य धन्य हा सोपान | धन्य समाधि संपूर्ण | प्रत्यक्ष येऊनि नारायण | अभयदान दिधलेंसे ॥२॥
अनंत वैष्णव प्रेमळ | दिडी पताका टाळ घोळ | रामकृष्ण नाम सरळ | भक्त सर्वकाळ नाचती ॥३॥
दिव्य उतरली विमाने | देव वर्षेती सुमने |इंद्र चंद्र देवगणे | लोटांगण घालती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. १११२
📿 महा मात्रा हरीचे नाम
1112.
महा मात्रा हरीचे नाम । तरती अधमादि अधम । हाचि कालिमाजीं धर्म । नामापरते न देखे ॥१॥
जगी नाम तारक नौका । आन उपाय नाही देखां । साधन साधिता साधकां । नामापरते थोर नाही ॥२॥
धरा विश्वास बांधा गांठी । नाम जप जगजेठी । एका जनार्दनी भय पोटी । नाही तुम्हा काळाचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. १११३
📿 टाकूनिया निंदा स्तुत
1113.
टाकूनिया निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥
न लगे उपवास पारणे कारणे । सुखे नारायण घरा येती ॥२॥
ठायींच बैसोनि जपे नामावळी । पुर्ण कर्मा होळी होय तेणे ॥३॥
एका जनार्दनी धरिता पायी भाव । रमेसह देव घरी नांदें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १११५
📿 गायत्री विकोनी पोट ज
1115.
गायत्री विकोनी पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकी ॥१॥
कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥धृपद॥
नाम गाऊनिया द्रव्य जे मागती । नेणे तया गति कैसी होय ॥२॥
कैसी होय गती तेच हो जाणती । आम्हासी संगती न लगे त्यांची ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. १११५
📿 तू सद्गुरु आनंद भरित
1115.
तू सद्गुरु आनंद भरित | तुझा आदि ना अंत |तू प्रकाणा प्रकाशमंत | तुज नमो स्वामिया. ॥१॥
बुद्धिपालका वैभवा | तू देवाधिदेवा | तू जाणसी अंतरींचा गोवा | उगवी उगवी स्वामिया |॥२॥
तू सत्त्वरू्पाची चोघडी | आणि परेची पैलथडी | बोधभावे करी उघडी | पार उतरी स्वामिया ॥३॥
तू विश्रांतीचे स्थळ | तू निर्गुणानिगुण निर्मळ | निवृत्तिमतीचा विशाळ | पुरवी आळ सोपानाची ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री सोपानदेवांची समाधी›
📿 अभंग क्र. १११६
📿 स्पष्ट जोडोनिया कर |
1116.
स्पष्ट जोडोनिया कर | मी दासानुदास अपार | प्रार्थना करुनि नमस्कार | उतरी पार भवाब्धि ॥१॥
निवृत्ति मुक्ताई परियेसी | योगीराज जाला उदयासी | वद्य कार्तिक मासी | आळंकापुरी जावे लागे ॥२॥
ज्ञानदेवे मागितला मान | देव वैष्णवांचे आगमन |येऊनि गंधर्वाचे विमान | विधि नारायण संपादिला ॥३॥
इंद्रनीळ पर्वत पुरातन | पुर्वी येथे ब्रह्मयाचे स्थान |कोंडण्यपुरी अंबिकाभुवन | महाब्रह्म योग माया ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९›
📿 अभंग क्र. १११७
📿 जयाचीं ती अनंत नामे
1117.
जयाचीं ती अनंत नामे । अनंत अवतार अनंत जन्में ॥१॥
अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणे ब्रह्मा ॥२॥
अवतार चरित्र नामे । परिसतां निवारे कर्मे ॥३॥
जे जे अवतारी देव सगुण । गाईले निर्गुणाचे गुण ॥४॥