संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६७८
📿 सुटायाचा काही करितो
678.
सुटायाचा काही करितो उपाय । तो हे देखे पाय गोवियेले ॥१॥
ऐसिया दुःखाचे सांपडलो संदी । हारपली बुद्धी बळ माझे ॥धृपद॥
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे । वोढत ठायीचे आले साचे ॥२॥
विधिनिषेधाचे सापडलो चेपे । एक एका लोपे निवडेना ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६७८
📿 माझे मी करिता गेले ह
678.
माझे मी करिता गेले हे दिवस | न धरीच विश्वास रामनामी ॥१॥
अंती तुज उद्धरती रामनाम हरी | राम पंचाक्षरी मंत्रसार ॥२॥
का करशील साठा प्रपंच विस्तार | न तुटे वेरझार नामेविण ॥३॥
नामा म्हणे कैसे रामनामी पिसे | तो उद्धरेल अपैसे इहलोकी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६७८
📿 कस्तुरीची उटी टिळक ल
678.
कस्तुरीची उटी टिळक लल्लाटीं । सांवळां जगजेठी उभा विटे ॥१॥
नाम हे चांगले रुप हे चांगले । दरुशन चांगलें विठोबाचें ॥२॥
आला पंढरीसी पुंडलिकाचें भक्ति । दरुशने मुक्तिं पातकीयांसी ॥३॥
एका जनार्दनी आनंदाचा कंद । उभा तो गोविंद विटेवरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६७९
📿 भय वाटे पर । न सुटे
679.
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥
ऐसा पडिलो काचणी । करी धावा म्हणउनी ॥धृपद॥
विचारिता काही । तो हे मन हाती नाही ॥२॥
तुका म्हणे देवा । येथे न पुरे रिघावा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६७९
📿 कृष्णकथा सांग जेणे त
679.
कृष्णकथा सांग जेणे तुटे पांग | न लागे तुज उद्वेग करणे काही ॥१॥
समर्थ सोईरा राम हा निधान जनी जनार्दन एक ध्याई ॥२॥
नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार | तुटेल वेरझार भवाब्धीची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६८०
📿 उभा विटेवरी कट धरुनि
680.
उभा विटेवरी कट धरुनिया करी । पीतांबर साजिरी बुंथी शोभे ॥१॥
विठोबा विठोबा नामाचा हा छंद । मन ते उद्धबोध जडी पायी ॥२॥
त्री अक्षर नाम जप हा परम । तो मंगळधाम विठ्ठल माझा ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठल कानडा । देखिला उघडा विटेवरी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६८१
📿 सर्वांभूती हरी आहे ह
681.
सर्वांभूती हरी आहे हेचि साच | मायाजाळ न छळे भाविकांसी ॥१॥
सर्व ब्रह्म ऐसे वेद बोले गाढा | ब्रह्मीचा पवाडा अगम्य तो ॥२॥
जाणता नेणता हरीनाम उच्चार | मार्ग तो साचार सुफल सदा ॥३॥
नामा म्हणे कारण जिव्हा होय स्मरण | सर्व नारायण हरी दिसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६८२
📿 आम्ही उतराई । भाव नि
682.
आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायी ॥१॥
तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळी ॥धृपद॥
आमुचा हा नेम । तुम्हा उचित हा धर्म ॥२॥
तुका म्हणे देवा । जाणो सांगितली सेवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६८४
📿 विठ्ठल गीती विठ्ठल च
684.
विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥
विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी । विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी ॥धृपद॥
विठ्ठल जागृति स्वप्नीसुषुप्ति । आन दुजे नेणती विठ्ठलाविण ॥२॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जया नरा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६८४
📿 जन्मातर सुखे घेऊ । श
684.
जन्मातर सुखे घेऊ । श्रीविठ्ठलनाम आठवु ॥१॥
नाही त्यांचे आम्हा कोडे । विठ्ठल उभा मागे पुढे ॥२॥
कळिकाळाचे भय ते किती । पाय यमधर्म वंदिती ॥३॥
एका जनार्दनी सिद्धी । नामे तुटती उपाधी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६८५
📿 संतांचे सुख झाले या
685.
संतांचे सुख झाले या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथे माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥धृपद॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनिया ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६८५
📿 व्यापक विठ्ठल नाम ते
685.
व्यापक विठ्ठल नाम तेव्हाचि होईल । जेव्हा ते जाईल मीतूंपण ॥१॥
आपलें ते नाम जेव्हा वोळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणे ॥२॥
आपले ओळखी आपणचि सांपडे । सर्वत्राही जोडे विठ्ठलनाम ॥३॥
नामविण जन पशुच्या समान । एका जनार्दनी जाण नाम जप ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६८६
📿 जो मानी तो देईल काई
686.
जो मानी तो देईल काई । न मानी तो नेईल काई ॥१॥
आम्हा विठ्ठल सर्वभूती । राहो चित्ती भलतैसा ॥धृपद॥
आधीन ते जना काई । जल्पे वायाविण ठायी ॥२॥
वंदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६८६
📿 सर्वांमाजीं सार नाम
686.
सर्वांमाजीं सार नाम विठोबाचे । सर्व साधनांचे घर जे का ॥१॥
सहा चार अठरा वर्णिताती कीतीं नामे मोक्षप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥
शुकादिकीं नाम साधिलेंसे दृढ । प्रपंच काबाड निरसिले ॥३॥
एका जनार्दनी जनीं ब्रह्मनाम । तेणे नेम धर्म सर्व होय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६८७
📿 भावबळे कैसा झालासी ल
687.
भावबळे कैसा झालासी लाहान । मागे संती ध्यान वर्णियेले ॥१॥
ते मज उचित करूनिया देवा । दाखवी केशवा मायबापा ॥धृपद॥
पाहोनिया डोळा बोलेन मी गोष्टी । आळिंगुनि मिठी देईन पायी ॥२॥
चरणी दृष्टि उभा राहेन समोर । जोडोनिया कर पुढे दोन्ही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६८७
📿 ऐकता कीर्तन होती जीव
687.
ऐकता कीर्तन होती जीवन्मुक्त | दाविसी अनंत नाममात्रे ॥१॥
मृत्युलोकी जो जन्म इच्छी नर | त्याच्या पुण्या पार कोण वाणी ॥२॥
भक्तिसारामृत श्रेष्ठ कलियुगी | उद्धरिले योगी ब्रह्मादिक ॥३॥
नामा म्हणे मज नाही चिंता भय | हृदयी तुमचे पाय पुरे आता ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६८७
📿 सदा सर्वकाळ मनी वसे
687.
सदा सर्वकाळ मनी वसे देव । तेथे नाही भेव कळिकाळाचा ॥१॥
काळ तो पुढरी जोडितसे हात । मुखी नाम गात तयापुढें ॥२॥
म्हणोनि आदरे वाचे नाम घ्यावें । रात्रंदिवस ध्यावे विठ्ठलासी ॥३॥
एका जनार्दनी जपतां नाम होटीं । पुर्वजां वैकुंठी पायवाट ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६८८
📿 कीर्तनाच्या सुखे सुख
688.
कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव | कोण ते वैभव वाणी आता ॥१॥
अंत्यज आणि जातिवंता | मुखी नाम घेता उडी घाली ॥२॥
बैसोनी आसनी आळविता नाम | उभा सर्वोत्तम तयापुढे ॥३॥
प्रेमाचिया भरे उभ्याने गर्जत | नाचे हा अनंत तयासवे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६८८
📿 नाम मुखी सदां धन्य त
688.
नाम मुखी सदां धन्य तो संसारी । वाया हाव भरी होऊ नये ॥१॥
तारक ते नाम तारक ते नाम । तारक ते नाम विठोबाचे ॥२॥
जडजीवां तारी दोषियां उद्धरी । एका जनार्दनी निर्धारी तारक नाम ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६८९
📿 सर्वभावे आलो तुजचि श
689.
सर्वभावे आलो तुजचि शरण । कायावाचामनसहित देवा ॥१॥
आणीक दुसरे नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायी ॥धृपद॥
माझिये जीवीचेकाही जडभारी । तुजविण वारी कोण दुजे ॥३॥
तुझे आम्ही दास आमुचा तू ॠणी । चालत दूरूनी आले मागे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६८९
📿 काळवेळ नसे नामसंकीर्
689.
काळवेळ नसे नामसंकीर्तनी | उंच नीच योनी हेहि नसे ॥१॥
धरा नाम कंठी सदा सर्वकाळ | मग तो गोपाळ सांभाळील ॥२॥
कृपाळू कोंबसा सुखाचा सागर | करील उद्धार भाविकांसी ॥३॥
नामा म्हणे फार सोपे हे साधन | वाचे नाम घेणे इतुकेचि ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६८९
📿 उदार धीरनीधी । श्रीव
689.
उदार धीरनीधी । श्रीविठ्ठल नाम आधी ॥१॥
पतीतपावन सिद्धी । श्रीविठ्ठल नाम आधी ॥२॥
सुखसागरनिधी । श्रीविठ्ठल नाम आधी ॥३॥
एका जनार्दनी बुद्धी । श्रीविठ्ठल नाम आधी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६९०
📿 कई मात माझे ऐकती कान
690.
कई मात माझे ऐकती कान । बोलता वचन संता मुखी ॥१॥
केला पाडूरंगे तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥धृपद॥
म्हणऊनि मुख अवलोकितो पाय । हेचि मज आहे थोरी आशा ॥२॥
माझिया मनाचा हाचि पै विश्वास । न करी सायास साधनांचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६९१
📿 दोन्ही हात ठेवुनि कट
691.
दोन्ही हात ठेवुनि कटी । उभा भीवरेच्या तटी । कष्टलासी साठी । भक्तीकाजे विठ्ठला ॥१॥
भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागी सोपा । दैत्या काळ कृतांत ॥धृपद॥
होतासी क्षीरसागरी । मही दाटली असुरी । म्हणोनिया घरी । गौळियाचे अवतार ॥२॥
केला पुंडलिके गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा । साठी हाती सापडसी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६९१
📿 नामाचे चरित्र सदा अत
691.
नामाचे चरित्र सदा अति गोड | तीर्थे काय चाड नाममात्रे ॥१॥
ऐसा दृढ मनी करावा विचार | नाम परिकर कलियुगी ॥२॥
नामा म्हणे नाम अनादि अक्षर | उभा कटी कर भक्तांसाठी ॥१॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६९२
📿 नाम तेचि रूप रूप तेच
692.
नाम तेचि रूप रूप तेचि नाम | नामरूप भिन्न नाही नाही ॥१॥
देव आकारला नामरूपा आला | म्हणोनि स्थापिला नामवेदी ॥२॥
नामपरता मंत्र नाही हो आणिक | सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥३॥
नामा म्हणे नाम केशव केवळ | जाणती प्रेमळ भक्त भले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ६९३
📿 न धरी लौकिकाची लाज ।
693.
न धरी लौकिकाची लाज । तेणे सहज नामगावे ॥१॥
अनायासेंदेव हाता । साधन सर्वथा दुजे नाही ॥२॥
साधन ते खटपट । नाम वरिष्ठ नित्य गावे ॥३॥
एका जनार्दनी सोपा । विठ्ठलनाम मंत्र जपा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ६९४
📿 विठ्ठलाचे नाम जे माऊ
694.
विठ्ठलाचे नाम जे माऊलीचे ओठी | विठो तिचे पोटी गर्भवासी ॥१॥
जयाचिये कुळी पंढरीची वारी | विठो त्याचे घरी बाळलीळा ॥२॥
नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा | असत्य केशवा वचन होता ॥३॥