🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३१३
📿 मने ब्रह्मादिका केली
3313.
मने ब्रह्मादिका केलीसे थोकडी । तेथे परवडी कोण मानवाची ॥१॥
इंद्रिय न चाले मनाविण देखा । मनाची मनरेखा नुल्लंघवे ॥२॥
शस्त्रे ते न सुटे जळ ते न बुडे । ऐसे ते पोवाडे मने होती ॥३॥
एक जनार्दनी मन ते स्वाधीन । करिता सर्व यज्ञ हाती जोडे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३१४
📿 माझे मज द्यावे । नाह
3314.
माझे मज द्यावे । नाही करवीत नवे ॥१॥
सहस्रनामाचे रूपडे । भक्त कैवारी चोखडे ॥धृपद॥
साक्षीविण बोले । तरी मज पाहिजे दंडिले ॥२॥
तुका म्हणे माल । माझा खरा हा विठ्ठल ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३१६
📿 न लाहिजे जपे न लाहिज
3316.
न लाहिजे जपे न लाहिजे तपे । आम्हासी हे सोपे गीती गाता ॥१॥
न करिता ध्यान न करिता धारणा । तो नाचे कीर्त्तनामाजी हरी ॥धृपद॥
जयासी नाही रूप आणि आकार । तोचि कटी कर उभा विटे ॥२॥
अनंत ब्रम्हांडे जयाचिया पोटी । तो आम्हा संपुष्टी भक्तीभावे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३१७
📿 मना सांडीं विषयखोडी
3317.
मना सांडीं विषयखोडी । लावी विठ्ठलेशीं गोडी ॥१॥
आणिक न लगे साधन । एकले मन करी उन्मन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल सांवळा । पाहे पाहे उघडा डोळा ॥३॥
एका जनार्दनी शराण । मनाचि होय विठ्ठल पुर्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३१९
📿 एकी असे हेवा । येर अ
3319.
एकी असे हेवा । येर अनावडी जीवा ॥१॥
देवे केल्या भिन्नजाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥धृपद॥
प्रीतिसाठी भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥२॥
तुका म्हणे लळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२०
📿 स्वामीचे हे देणे । य
3320.
स्वामीचे हे देणे । येथे पावलो दर्षणे ॥१॥
करू आवडीने वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥धृपद॥
कळावया वर्म । हा तो पायाचाचि धर्म ॥२॥
तुका म्हणे सिद्धी । हेचि पावविली बुद्धी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२१
📿 रुसलो संसारा । आम्ही
3321.
रुसलो संसारा । आम्ही आप आणि परा ॥१॥
म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलो मुरकंडी ॥धृपद॥
परतेचि ना मागे । मोहो निष्ठुर झालो अंगे ॥२॥
सापडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३२१
📿 आणिकांची आस नको करू
3321.
आणिकांची आस नको करू मना । चिंती तू चरणा विठोबाच्या ॥१॥
वाचे नाम गाये वाचे नाम गाये । वाचे नाम गाये विठोबाचे ॥२॥
करकटी उभा चंद्रभागें तटीं । पुंडलिकापाठीं धरूनी ध्यान ॥३॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । वाट पाहे हरी भाविकाची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२२
📿 हे तो वाटले आश्चर्य
3322.
हे तो वाटले आश्चर्य । तुम्हा न धरवला धीर ॥१॥
माझा फुटतसे प्राण । धाव धाव म्हणऊन ॥धृपद॥
काय नेणो दिशा । झाल्या तुम्हाविण वोसा ॥२॥
तुका म्हणे का गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२३
📿 धावा केला धावा । श्र
3323.
धावा केला धावा । श्रम होऊ नेदी जीवा ॥१॥
वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेंकुरा ॥धृपद॥
उशीर तो आता । न करावा हेचि चिंता ॥२॥
तुका म्हणे त्वरे । वेग करी विश्वंभरे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३२३
📿 वाउगी उपाधी न करी रे
3323.
वाउगी उपाधी न करी रे मना । चिंती या चरणा राघवाच्या ॥१॥
अंतकाळीं सखा कोणी नाही दुजा । पुत्र पत्नी वोजा न ये कामा ॥२॥
चालतांचि देह म्हणती माझा माझा । अंतकाळ पैजा यम बांधी ॥३॥
एका जनार्दनी सर्व हे मायिक । शाश्वत ते एकक श्रीरामनाम ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२४
📿 जोडिले अंजुळ । असे द
3324.
जोडिले अंजुळ । असे दान उताविळ ॥१॥
पाहा पाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥धृपद॥
तू स्वामी मी सेवक । आइक्य तो एका एक ॥२॥
करितो विनंती । तुका सन्मुख पुढती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२६
📿 कुंभ अवघा एक आवा । प
3326.
कुंभ अवघा एक आवा । पाकी एकी गू फेडावा ॥१॥
ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धाने वांटे ॥धृपद॥
हिरे दगड एक खाणी । कैचे विजातीला पाणी ॥२॥
तुका म्हणे शिरी । एक एकाची पायरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३२६
📿 मना निश्चय तू करी ।
3326.
मना निश्चय तू करी । म्हणे जाईन पंढरी ॥१॥
नेमधर्मक हाचि माझा । पंढरीवांचूनि नाही दुजा ॥२॥
सर्व तीर्थाचें माहेर । विटे उभा कटी कर ॥३॥
आवडीने धरा भाव । एका जनार्दनी भेटे देव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२७
📿 मांडे पुर्या मुखे स
3327.
मांडे पुर्या मुखे सांगो जाणे मात । तोंडी लाळ हात चोळी रिते ॥१॥
ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाही ॥धृपद॥
बोलो जाणे अंगी नाही शूरपण । काय ते वचन जाळावे ते ॥२॥
तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंगे तेचि मूळ लटिक्याचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३२७
📿 भक्त करुणाकर दीनाचा
3327.
भक्त करुणाकर दीनाचा वत्सल । उभा श्रीविठ्ठल विटेवरी ॥१॥
मना जाय तेथे मना जाय तेथे । मना जाय तेथे पंढरीये ॥२॥
पुरतील काम निवारेल गुंती । आहे ती विश्रांति संतसंगे ॥३॥
आषाढी कार्तिकी सोहळा आनंद । मिळालासे वृंद वैष्णवांचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२८
📿 न लगे चंदना पुसावा प
3328.
न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना ॥धृपद॥
सूर्य नाही जागे करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हूण ॥२॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे । लपविता खरे येत नाही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३२९
📿 चंदनाचे हात पाय ही च
3329.
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाही हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाही पाठी पोटी अंधकार । सर्वांगी साकर अवघी गोड ॥धृपद॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहाता अवगुण मिळेचि ना ॥२॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३३०
📿 मन करा रे प्रसन्न ।
3330.
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥
मने प्रतिमा स्थापिली । मने मन पूजा केली । मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥धृपद॥
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलेंचि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाही नाही आनुदैवत । तुका म्हणे दुसरे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३३०
📿 निवांतपणे मना चित्ती
3330.
निवांतपणे मना चित्ती तू चरण । आणिक कल्पना न करी कांही ॥१॥
चिंतीं पा विठ्ठल कायावाचामनें । संसारबंधन तुटेल तेणे ॥२॥
संसाराची वार्ता नुरेचि पा कांही । आणिकक प्रवाहीं पडुं नको ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठलनामीं छंद । मना तू गोविंद आठवीं का रे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३३१
📿 मायबापे जरी सर्पीण क
3331.
मायबापे जरी सर्पीण कि बोका । त्यांचे संगे सुखा न पवे बाळ ॥१॥
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकी घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३३१
📿 मना ऐक एक मात । धरी
3331.
मना ऐक एक मात । धरी हरिनामीं हेत ॥१॥
तेणे चुकती बंधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥
नारायण नाम । तेणे सर्व होय काम ॥३॥
दृढ धरी भाव । न करी आणिक उपाव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३३२
📿 शिकल्या बोलाचे सांगत
3332.
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणा ॥१॥
पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥
तुका म्हणे जैसी लांचासाठी ग्वाही । देतील हे ठावी नाही वस्तु ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३३२
📿 मना तू एक करी । वाचे
3332.
मना तू एक करी । वाचे आठवी श्रीहरी ॥१॥
आणिक न करी साधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥
सर्व काळ हाचि धंदा । वाचे आठवी गोविंदा ॥३॥
तेणे जीवा सोडवण । शरण एका जनार्दन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३३४
📿 शास्त्राचे जे सार वे
3334.
शास्त्राचे जे सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥
म्हणउनी नाही आणिकाचा पाग । सर्व जाले सांग नामे एका ॥धृपद॥
सगुण निर्गुण जयाचींये अंगे । तोचि आम्हा संगे क्रीडा करी ॥२॥
तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभ आइते केले नव्हो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३३५
📿 कोणे तुझा सांग केला
3335.
कोणे तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंत त्वा थोर मानियेली ॥१॥
कोणे ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊ ॥धृपद॥
तेव्हा तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥
का रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिवसेंदिवस बळ क्षीण होते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३३८
📿 मृगजळा काय करावा उता
3338.
मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥
खापराचे होन खेळती लेंकुरे । काय त्या वेव्हारे लाभ हाणि ॥धृपद॥
मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥
स्वप्नींचे जे सुखदुःख जाले काही । जागृती तो नाही साच भाव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३३८
📿 माझ्या मनाचे ते मन ।
3338.
माझ्या मनाचे ते मन । चरणी ठेवावें बांधून ॥१॥
मग ते जाऊ न शके कोठे । राहे तुमच्या नेहटें ॥२॥
मनासी ते बळ । देवा तुमचे सकळ ॥३॥
एका जनार्दनी देवा । मन दृढ पायी ठेवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३३९
📿 आंधळ्यासि जन अवघेचि
3339.
आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाही ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन सर्व खोटे ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३›
📿 अभंग क्र. ३३३९
📿 ठायी ठेविलिया मन । स
3339.
ठायी ठेविलिया मन । सहज होईल उर्तीण ॥१॥
आलो ज्या कारणा । तेंचि करवा पंढरीराणा ॥२॥
वाउगी ती आस । मनी नसावी सायास ॥३॥
येतो काकुलती । एका जनार्दना प्रती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३४१
📿 नाही आम्ही विष्णुदास
3341.
नाही आम्ही विष्णुदास । करीत आस कोणांची ॥१॥
का हे नष्ट करिती निंदा । नेणो सदा आमुची ॥धृपद॥
असो भलते ठायी मने । समाधाने आपुल्या ॥२॥
तुका म्हणे करू देवा । तुझी सेवा धंदा तो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३४३
📿 वचन ते नाही तोडीत शर
3343.
वचन ते नाही तोडीत शरीरा । भेदते अंतरा वज्रा ऐसे ॥१॥
काही न सहावे काशा हि कारणे । संदेह निधान देह बळी ॥धृपद॥
नाही शब्द मुखी लागत तिखट । नाही जड होत पोट तेणे ॥२॥
तुका म्हणे जरी गिळी अहंकार । तरी वसे घर नारायण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३४३
📿 (व्यभिचारिणी स्त्रीच
3343.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करिता वाया जाय काळ । लटिके ते मूळ फजितीचे ॥धृपद॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३४४
📿 मायेचा मारिला अंगी न
3344.
मायेचा मारिला अंगी नाही घाव । दुःखे तरी लव धडधडी ॥१॥
न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा वेडावली ॥धृपद॥
न पवे धावणे न पवेचि लाग । न लगेची माग धरावया ॥२॥
भेणे तरि अंगा लावियेल्या राखा । तरी त्यासी वाखा करीतसे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३४५
📿 ढालतलवारे गुंतले हे
3345.
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा जुंझो ॥१॥
पोटी पडदाळे सिले टोप ओझे । हे तो झाले दुजे मरणमूळ ॥धृपद॥
बैसविले मला येणे अश्वावरी । धावू पळू तरी कैसा आता ॥२॥
असोनि उपाय म्हणे हे आपण । म्हणे हायहाय काय करू ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३४६
📿 काय करू न करी धंदा ।
3346.
काय करू न करी धंदा । चित्त गोविंदा तुझे पायी ॥१॥
ऐशा संकल्पाच्या संधी । माझे बुद्धी धीर द्यावा ॥धृपद॥
कुटुंबाचा तुम्हा भार । मज व्यवहार निमित्त ॥२॥
तुका म्हणे करिता काम । हृदयी नाम धरीन ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४›
📿 अभंग क्र. ३३४८
📿 इंद्राचे कैवारे कांस
3348.
इंद्राचे कैवारे कांसव पै झाला । देव घुसळिती पृष्ठीं भार वाहिला ॥१॥
तो पहा महाराज विटे उभा नीट । भक्त तारावया केली पंढरी पेठ ॥२॥
एका जनार्दनी रत्नं चौदा काढिलीं । देव सुरवर जेणे सुखी केलीं ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४›
📿 अभंग क्र. ३३४९
📿 रसातळां जाता अवनी ।
3349.
रसातळां जाता अवनी । घेतलें वराहरुप चक्रपाणी ॥१॥
तोचि महाराज पुंडलिकासाठी । कर ठेऊनी कटी उभा विटे ॥२॥
हिरण्याक्ष वधुनी सुखी केले देव । एका जनार्दनी त्याचे पायी ठाव ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३५०
📿 रक्त श्वेत कृष्ण पीत
3350.
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदले डोळा ॥१॥
तेणे अंजनगुणे दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥धृपद॥
देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥
न झाला प्रपंच आहे परब्रम्ह । अहंसोहं ब्रम्ह आकळले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४›
📿 अभंग क्र. ३३५०
📿 भक्त प्रल्हादाकारणेण
3350.
भक्त प्रल्हादाकारणेणे नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्वव केला ॥१॥
तोचि महाराज कर ठेऊनि कटी । उभा राहिला अठठावीस युगें पाठी ॥२॥
एका जनार्दनी भक्तकाज कैवारी । संहारुनी दैत्य वाढवी भक्तांची थोरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३५१
📿 एक ब्रहाचारी गाढवा झ
3351.
एक ब्रहाचारी गाढवा झोबता । हाणोनिया लाता पळाले ते ॥१॥
गाढवही गेले ब्रहाचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाझी ॥धृ॥.
हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायांची ते ॥२॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४›
📿 अभंग क्र. ३३५१
📿 बळीचे द्वारी आपण वाम
3351.
बळीचे द्वारी आपण वामन झाला । इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातिला ॥१॥
तोचि महाराज उभा विटेवरी । करे धरिले कटी पावले दोन्ही साजिरी ॥२॥
भक्ताचिया काजा विटे उभा राहिला । एका जनार्दनी देव डोळा पाहिला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३५३
📿 माझी मज आली रोकडी प्
3353.
माझी मज आली रोकडी प्रचीत । होऊनि फजित दुःख पावे ॥१॥
काही द्वेष त्याचा करिता अंतरी । व्यथा या शरीरी बहुत झाली ॥धृपद॥
ज्ञानेश्वरे मज केला उपकार । स्वप्नी सविस्तर सांगितले ॥२॥
तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आंम्हा थोर । का जो अवतार नामयाचा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३५४
📿 वैष्णवांची याती वाणी
3354.
वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकी ॥१॥
ऐशी वेदश्रुती बोलती पुराणे । नाही ती दुषणे हरीभक्ता ॥धृपद॥
उंच नीच वर्ण न म्हणावा कोणी । जे का नारायणी प्रिय झाले ॥२॥
चहु वर्णासीहि असे अधिकार । करिता नमस्कार दोष नाही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३५५
📿 भक्त भागवत जीवन्मुक्
3355.
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं।
ऐसिया अनंतामाजी तू अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥
ब्रह्मानंद तुके तुळे आला तुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनी ॥धृपद॥
शास्र शीष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४›
📿 अभंग क्र. ३३५६
📿 कलंकी अवतार पुढे होई
3356.
कलंकी अवतार पुढे होईल श्रीहरी । लोपोनी जाता धर्म मग अवतार धरी ॥१॥
दहा अवतार भक्ताकारणें घेतो । भक्ताची आवडी म्हणोनी गर्भवासा येतो ॥२॥
अंबऋषी कैवारें दहा अवतार घेतले । एका जनार्दनी त्याचे चरित्र वर्णिलें ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३६०
📿 नाम वाचे श्रवणी कीर्
3360.
नाम वाचे श्रवणी कीर्ती । पाउले चित्ती समान ॥१॥
काळ सार्थक केला त्यांनी । धरिला मनी विठ्ठल ॥धृपद॥
कीर्तनाचा समारंभ । निर्दंभ सर्वदा ॥२॥
निळा म्हणे स्वरूपसिद्धी । नित्य समाधी हरिनामी ॥३॥