संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३४६
📿 काळा गे दादुला पाहता
346.
काळा गे दादुला पाहता आकळू |तो झाला गोवळू नंदाचा गे ॥१॥
काळा गे दादुला काळा गे दादुला | पंढरी पहा चला विठ्ठल गे ॥२॥
काळा म्हणौनी पाही गेलो जवळा |सुनीळु सांवळा दिसतसे ॥३॥
नामा म्हणे सर्व भक्षितो हा काळु |भक्तांचा क्रुपाळु श्रीविठ्ठल ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३४६
📿 आनुपम्य भाग्य नांदते
346.
आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारी उभ जेथे ॥१॥
अनुपम्य वाहे पुढे चंद्रभागा । दोषा जाती भंगा नाम घेता ॥२॥
अनुपम्य मध्ये पुंडलीके मुनी । अनुपम्य चरणी मिठी त्याच्या ॥३॥
संत शोभती दोही बाही । अनुपम्य देही सुख वाटे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्ती स्वरूप›
📿 अभंग क्र. ३४७
📿 भक्ति ते कठीण इंगळास
347.
भक्ति ते कठीण इंगळासी खाई । रिघणे त्या डोही कठीण असे ॥1॥
भक्ति ते कठीण विषग्रास घेणे । उदास पै होणे जीवे भावे ॥2॥
भक्ति ते कठीण भक्ति ते कठीण । खड्गाची धार बाण न सोसी तया ॥3॥
भक्ति ते कठीण विचारुनि पाहे जनी । भक्ति योगे संतसमागमी सर्व सिद्धी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पांडुरंगाला शेवटचे मागणे›
📿 अभंग क्र. ३४७
📿 माझी तू माउली माझी त
347.
माझी तू माउली माझी तू माउली । माझी तू माउली विठ्ठला तू ॥१॥
मज का मोकलिले वेगळे का केले । का बा धाडियेले मंगळवेढ्या ॥२॥
काय माझा भार झालासे जोजार । म्हणोनी केले दूर पायापरते ॥३॥
चोखा म्हणे मज द्रव्याची नाही चाड । तुझे नाम गोड मुखी गाता ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३४७
📿 काय दरा करील वन । सम
347.
काय दरा करील वन । समाधान नाही जव ॥१॥
तरी काय तेथे असती थोडी । काय जोडी तयांसी ॥धृपद॥
रिगता धावा पेवामध्ये । जोडे सिद्धी ते ठायी ॥२॥
काय भस्म करील राख । अंतर पाख नाही तो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३४७
📿 अनुपम्य घनदाट । करित
347.
अनुपम्य घनदाट । करिती बोभाट अनुपम्य ॥१॥
पंढरीसी जाती अनुपम्य । धन्य जन्म अनुपम्य त्यांचा ॥२॥
अनुपम्य त्यांच्या पुण्या नाही पार । अनुपम्य निर्धार सुख त्यांसी ॥३॥
अनुपम्य दशा आली त्यांच्या दैवा । अनुपम्या देवा चुकले ते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३४८
📿 तेही नव्हे जे करिता
348.
तेही नव्हे जे करिता काही । ध्याता ध्यायी तेही नव्हे ॥१॥
ते ही नव्हे जे जाणवी जना । वाटे मना तेही नव्हे ॥धृपद॥
त्रास मानिजे काटाळा । अशुभ वाचाळा तेही नव्हे ॥२॥
तेही नव्हे जे भोवते भोवे । नागवे धावे तेही नव्हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३४८
📿 पंचक्रोशीचें आंत । प
348.
पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हे समस्त ॥१॥
धन्य पंढरीचा महिमा । नाही द्यावया उपमा ॥२॥
तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाही कोठे ठव ॥३॥
नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दना ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पांडुरंगाला शेवटचे मागणे›
📿 अभंग क्र. ३४९
📿 प्रकरण :- ॥ प्रसाद॥
349.
प्रकरण :- ॥ प्रसाद॥
वासुदेव दिंडी गान । प्रसाद मागू आले दान ।
आणिक आले कोण कोण । त्यांची नावे परिसावी ॥१॥
ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वाणी । मांगू आल्या चारी खाणी ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३४९
📿 बोल बोलता वाटे सोपे
349.
बोल बोलता वाटे सोपे । करणी करिता टीर कापे ॥१॥
नव्हे वैराग्य सोपारे । मज बोलता न वाटे खरे ॥धृपद॥
विष खावे ग्रासोग्रासी । धन्य तोचि एक सोसी ॥२॥
तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ३४९
📿 भक्तिभावार्थे अर्पिल
349.
भक्तिभावार्थे अर्पिले । देवे आपनापाशी ठेविले ॥१॥
नेदी कोणाचिये हाती । भक्तावाचुनी निश्चिती ॥२॥
जुनाट जुगादींचे । ठेवणें होते ते संतांचे ॥३॥
पुंडलिकें करुनी वाद । ठेवणें केले ते प्रसिद्ध ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३४९
📿 इच्छिताती देव पंढरीच
349.
इच्छिताती देव पंढरीचा वास । न मिळे सौरस तया कांही ॥१॥
ऐसे श्रेष्ठ क्षेत्र उत्तमा उत्तम । याहुनी सुगम आहे कोठे ॥२॥
जनार्दनाचा एक म्हणतसे भावे । तीर्थ ते वंदावें पंढरी सदा ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व संतांचे हरिपाठ›📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा›
📿 अभंग क्र. ३५०
📿 ॥श्री संत ज्ञानेश्वर
350.
॥श्री संत ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठ ॥ संपूर्ण व्हिडिओ पहा.
https://youtu.be/4mJeA3tpqXY?si=wzGu-TydqXX5yiI8
॥श्री संत ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठ ॥
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३५०
📿 प्रयागादि क्षेत्रें
350.
प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥
मुंडन ती काया निराहार राहणें । येथे न मुंडणें काया कांही ॥२॥
म्हणोनी सर्व तीर्थामाजी उत्तम ठाव । एका जनार्दनी जीव ठसावला ॥३॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ३५१
📿 भाव शुद्ध रे शुद्ध र
351.
भाव शुद्ध रे शुद्ध रे बरवा धरावा ।
ब्रह्मनिष्ठ रे निष्ठ रे गुरू तो करावा॥
मायामळ रे मळ रे सांडोनिया द्यावा ।
स्वस्वरूपी रे स्वरूपी रे ध्यास असू द्यावा ॥१॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३५१
📿 माझ्या मने तुझ्या चर
351.
माझ्या मने तुझ्या चरणी दिली बुडी |इन्द्रिये बापुडी वेडावली ॥१॥
आता विषयसुख जाणावे हे कोणे |जाणोनी भोगणे कोणे स्वामी ॥२॥
देहे सहज स्थिति राहिले निष्काम |ह्रॄदयी सदा प्रेम वोसंडत ॥३॥
नामा म्हणे केशवा क्रुपेच्या सागरा |तू आम्हा सोयरा आदि अंती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३५३
📿 नामपाठ मुक्ताफळांच्य
353.
नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी । हे सुख सगुणी अभिनव ॥१॥
तरी आम्ही जालो उदास निर्गुणा । भक्ताचिया मना मोक्ष नये ॥धृपद॥
द्यावे घ्यावे ऐसे येथे उरे भाव । जाय ठाया ठाव पुसोनिया ॥२॥
तुका म्हणे आता अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिले ऐसे ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नवीन उपलब्ध अभंग›
📿 अभंग क्र. ३५४
📿 अबीर गुलाल उधळीत रंग
354.
अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग।
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हिन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीनं। ।
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ । चंद्रभागेच्या पाण्याचे अंग अंग न्हाऊ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३५४
📿 भवसिंधूचे काय कोडे ।
354.
भवसिंधूचे काय कोडे । दावी वाट चाले पुढे ॥१॥
तारू भला पांडुरंग । पाय भिजो नेदी अंग ॥धृपद॥
मागे उतरिले बहुत । पैल तिरी साधुसंत ॥२॥
तुका म्हणे लाग वेगे । जाऊ तयाचिया मागे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३५५
📿 नाही साजत हो मोठा ।
355.
नाही साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥१॥
असे तुमचा रजरेण । संता पायी वाहाण ॥धृपद॥
नाही स्वरूपी ओळखी । भक्तीभाव करी देखी ॥२॥
नाही शून्याकारी । क्षर ओळखी अक्षरी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३५५
📿 वाळक माझे मन पांगुळ
355.
वाळक माझे मन पांगुळ पै जाले |हारपोनी गेले साक्षात्कारे ॥१॥
मन हारपले करू आता काय |पहावया गेले तो परतोनी का नये ॥२॥
भक्ति ज्ञान वैराग्य अवघेंचि आहे |अवघेचि होये अवघे येणे ॥३॥
नामा म्हणे जनाबाई आहे वो कैसा |बाबा उदकी घट बुडोनी ठेला जैसा ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नवीन उपलब्ध अभंग›
📿 अभंग क्र. ३५६
📿 हीण याती माझी विठो ।
356.
हीण याती माझी विठो । घडे तु सेवा ॥धृ.।
काही करिता भजेन ।द्वेशी ताती उत्तम कुळी जन ॥१॥
सांगा काय करू याशी । कृपाळु वा ऋशीकेशी ॥२॥
न करी उदास गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३५६
📿 उदंड क्षेत्राची पाहि
356.
उदंड क्षेत्राची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भुवैकुंठ ॥१॥
तीर्थ आणि देव संतसमागम । ऐसे सर्वोत्तम कोठे नाही ॥२॥
सागरादि तीर्थ पाहता पाहिले । परी मन हे वेधले पंढरीये ॥३॥
एका जनार्दनी सुखाची विश्रांती । पाहता विठ्ठलमुर्ति लाभ बहु ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नवीन उपलब्ध अभंग›
📿 अभंग क्र. ३५७
📿 न करी न करी कोन्हाची
357.
न करी न करी कोन्हाची तू निंदा । अंतरी गोविंदा पावसील ॥१॥
जनी जनार्दन कोनासी निंदावे । साक्षेपे वंदावे विश्वरुप ॥२॥
विश्री हा ईश्वर शास्त्रे हे बोलती । जे नर निंदीती त्यासी न कळे ॥३॥
ज्याचे जैसे कर्म त्याचीया ते माया । आपण सर्वथा बोलो नये ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३५७
📿 सत्य तो आवडे । विकल्
357.
सत्य तो आवडे । विकल्पाने भाव उडे ॥१॥
आम्ही तुमच्या कृपादाने । जाणो शुद्ध मंद सोने ॥धृपद॥
आला भोग अंगा । न लवू उसीर त्या त्यागा ॥२॥
तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३५७
📿 उदंड तीर्थे उदंड क्ष
357.
उदंड तीर्थे उदंड क्षेत्रें । परि पवित्र पंढरी ॥१॥
उदंड देव उदंड दैवते । परि कृपांवतं विठ्ठल ॥२॥
उदंड भक्त उदंड संत । परी कृपावंत पुंडलीक ॥३॥
उदंड गातो एक एका । परी एका जनार्दनी सखा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३५८
📿 करावे चिंतन । तेचि ब
358.
करावे चिंतन । तेचि बरे न भेटून ॥१॥
बरवा अंगी राहे भाव । तंग तोचि जाणा देव ॥धृपद॥
दर्शणाची उरी । अवस्थाचि अंग धरी ॥२॥
तुका म्हणे मन । तेथे सकळ कारण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३५८
📿 जे जे क्षेत्र जे जे
358.
जे जे क्षेत्र जे जे स्थळीं । ते ते बळी आपुले ठायीं॥१॥
परे ऐसे माहात्म्य नाही कोठे । जे प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥
ऐत संतसामगाम । ऐसा निरुपम नाममाहिमा ॥३॥
दिंडी टके मृदंग नाद । नाहींभेद यातीसी ॥४॥