सोयरिक सांडियली सर्व
2258.
सोयरिक सांडियली सर्वांची । जोडी केली विठ्ठलाची ॥१॥
लोभ सांडिला सर्वांचा । संग धरिला विठोबाचा ॥२॥
जालो निधडा नि:शंक । गायनाचे कौतुक ॥३॥
प्रेमभरित सर्वदा । मुखी नाम हरि गोविंदा ॥४॥
ऐसा सर्वकाळ गाय । भावे विठोबाचे पाय ॥५॥
नामा म्हणे ऐके हरी । दासी जनीची वाट करी ॥६॥
