वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

लवविले तया सवे लवे ज

🙏 3. संत तुकाराम · ABH-077922 · अभंग क्र. २२३९

2239.
लवविले तया सवे लवे जाती । अभिमाना हाती सापडेना ॥१॥
भोळिवेचे लेणे विष्णुदासा साजे । तेथे भाव दुजे हारपती ॥धृपद॥
अर्चन वंदन नवविधा भक्ती । दया क्षमा शांति ठायी ॥२॥
तये गांवी नाही दुःखाची वसती । अवघा चि भूती नारायण ॥३॥
अव घे चि जाले सोंवळे ब्रम्हांड । विटाळाचे तोंड न देखती ॥४॥
तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहंळा । याही भूमंडळामाजी कीर्ती ॥५॥

अर्थ :
वैष्णवांच्या पुढे जो जसा लवेल तसेच वैष्णव त्याच्यापुढे लवतात कारण त्यांच्या हातात आपल्याला कधीही अभिमान सापडणार नाही. वैष्णवांना भोळेपणाचा अलंकार शोभून दिसतो कारण त्यांच्या ठिकाणावरून द्वैतपणा हरपलेला असतो. अर्चन, वंदन, नवविधाभक्ती असून दया, क्षमा, शांती वैष्णवांच्या ठिकाणी असते. वैष्णवांच्या ठिकाणी दुःखाची केव्हाच वस्ती नसते आणि सर्व भूती हा नारायणच आहे अशी त्यांची भावना असते. सर्व ब्रह्मांडच नारायण स्वरूप झाले त्यामुळे सर्वत्र सोवळे झाले आहेत आणि ते विकाररूपी विटाळाचे तोंड देखील पाहत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवाचा वैकुंठात देखील डंका गाजत असतो आणि भूमंडळावर देखील त्यांची अक्षय कीर्ति राहते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग