🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ३
📿 रुपाचे रुपस विठ्ठल न
3.
रुपाचे रुपस विठ्ठल नाम वेष । पंढरी निवास आत्माराम ॥१॥
पुंडलिक भाग्य वोळले संपूर्ण । दिन निशी कीर्तन विठ्ठल हरी ॥२॥
त्रैलोक्य उध्दरे ऐसी पव्हे त्वरे । कीर्तन निर्धारे तरणोपाय ॥३॥
पुण्य केले चोख तारिले अशेख । जनी वनी एक रुप वसे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 नद्यांच्या आरती›
📿 अभंग क्र. ३
📿 ॥ श्री आरती गोदावरी
3.
॥ श्री आरती गोदावरी ३ ॥
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी ।
कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ॥१॥ धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत निळोबा निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 पूर्ण केला पूर्ण केल
4.
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥
घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥
सांभाळिले सांभाळिले । सांभाळीले अनाथा ॥३॥
केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 तू माझी माउली मी वो
4.
तू माझी माउली मी वो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥
तू माझी माउली मी तुझे वासरु । नको पान्हा चोरु पांडुरंगे ॥२॥
तू माझी हरिणी मी तुझे पाडस । तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज । चारा घाली मज पांडुरंगे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 जातो माघारी पंढरीनाथ
4.
जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन झाले आता ॥१॥
तुझ्या नादाने पाहीली मी । ही तुझीच रे पंढरी ॥२॥
धन्य झालो आम्ही जन्माचे । नाम घेऊ तुझे आवडीने ॥३॥
दिपविली तुझी पंढरी । चालू झाली भक्तांची वारी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण पहिले अभंग ११›
📿 अभंग क्र. ४
📿 तुज पाहता सामोरी । द
4.
तुज पाहता सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली पंढरीराया ॥२॥
नव्हे सारिता निराळे । लवण मेळविता जळे ॥३॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्रीकृष्ण जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 शेषाप्रती बोले लक्ष्
4.
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊ आता ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्हाणे सुरवर सांगु आले ॥२॥
शेष म्हणे मज श्रम झाले फार । यालागी अवतार मी ग घेचि ॥३॥
राम अवतारी झाले लक्षुमण । सेविले अरण्य तुम्हांसवे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्री राम जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 दशरथ राजा उठिला तेथू
4.
दशरथ राजा उठिला तेथूनी । कौसल्येसदनी जाता झाला ॥१॥
पाहातसे दृष्टी तेव्हा श्रावणारी । न माये अंतरी तेज तिचे ॥२॥
तुझिये मानसी होती जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपासी ॥३॥
उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथे उरी देहभावा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. ४
📿 नाही काम माझे काज तु
4.
नाही काम माझे काज तुम्हांसवे । होते गुप्त ठावे केले आता ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी झाले ॥२॥
न धरावा लोभ कांही मजविशी । झाले देवपिशी तुका म्हणे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 एकादशी, द्वादशी, व क्षिरापतीचे अभंग›📂 एकादशी अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 पंधरा दिवसा एक एकादश
4.
पंधरा दिवसा एक एकादशी । का रे न करिसी व्रतसार ॥धृ १॥
काय तुझा जीव जातो एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरी होती उजगरे । देउळासी का रे मरसी जाता ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा›
📿 अभंग क्र. ४
📿 मुंगी आणि राव । आम्ह
4.
मुंगी आणि राव । आम्हा सारखाची जीव ॥१॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥२॥
सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ॥३॥
तुका म्हणे आले । घरा वैकुंठ सांवळे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 पूजेचे अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 नाम गाऊ नाम ध्याऊ ।
4.
नाम गाऊ नाम ध्याऊ । नाम विठोबासी वाहू ॥१॥
आम्ही दैवाचे दैवाचे ॥दास पंढरीरायाचे ॥२॥
टाळ दिंडी घेऊनि हाती । केशवराज गाऊ गीति ॥३॥
नामा म्हणे लाखोली सदा । अनंत नामे वाहू गोविंदा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरपूर महात्म्य अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 पाहता देऊळाची पाठ ।
4.
पाहता देऊळाची पाठ । तीर्थे घडली तीनशेसाठ ॥१॥
स्नान करिता पद्माळे । उध्दरती सर्व कुळे ॥२॥
सन्मुख पाहता विठाई । त्यासी उपमा द्यावया नाही ॥३॥
ऐसा पंढरीचा महिमा । काय वर्णू म्हणे नामा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 बोलावा विठ्ठल पहावा
4.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसे मन जाले हांवभरी । परती माघारी घेत नाही ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी । देता आली मिठी सावकाशे ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठले । कामक्रोधे केले घर रीते ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 रविवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ४
📿 एके घाई खेळता न पडसी
4.
एके घाई खेळता न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।
त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांची तरी धरी सोई रे ॥१॥
खेळ खेळोनिया निराळाची राही । सांडी या विषयाची घाई रे ।
येणेचि खेळे बसवंत होसी । ऐसे सत्य जाण माझ्या भाई रे ॥२॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ४
📿 आम्ही तो जातीचे आहे
4.
आम्ही तो जातीचे आहे ती महार । तुम्ही तो थोर उंच वर्ण ॥१॥
अन्नपाणी देता निंदितील जन । करतील ताडण मजलागी ॥२॥
ऐकोनिया मात येरू बोले वचन । यातीस कारण नाही मज ॥३॥
माझा तू वांचवी अन्न देउनी प्राण । पुढील कारण पाहू नको ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ४
📿 आता बहु बोलणे सारोनि
4.
आता बहु बोलणे सारोनिया ठेवा । उगवा हा गोंवा मायबापा ॥१॥
संसाराचा छंद नकोसा हा झाला । परमार्थ भला संतांसंगे ॥२॥
जे आहे कड ते ते लागे गोडू । गोडाचे जे गोड़ ते लागे कडु ॥३॥
निर्मळा म्हणे सुख तुमचे पायी । आणिक मी कांही नेणे दुर्जे॥ ॥४॥
🙏 संत कर्ममेळा›📚 संत कर्ममेळा अभंग गाथा›📖 संत कर्ममेळा अभंग गाथा २७›📂 संत कर्ममेळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ४
📿 आता येथवरी । मज नका
4.
आता येथवरी । मज नका बोलू हरी ॥१॥
तुमचे आहे तुम्हा ठावे । माझे म्यांच करावे ॥२॥
आमुच्या संचिता । तुम्हा बोल काय आता ॥३॥
माझे मन मज ग्वाही । वाया बोलोनिया काई ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४
📿 आपुलिया हिता जो असे
4.
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥धृपद॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाही ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४
📿 आज मी राहिलो डोंगरी
4.
आज मी राहिलो डोंगरी । आनंद होतो ब्रह्मगिरी ॥1॥
पांचा तत्वाची दिवटी । निवद भरियेला ताटी ॥2॥
आनंदे घातला गोंधळ । होतो प्रेमाचा कल्लोळ ॥3॥
उदो बोला हा आनंद । काळ हरियेल छंद ॥4॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ४
📿 हीन दिन जात मोरी पंढ
४.
हीन दिन जात मोरी पंढरीके राया । ऐसा तुमने नामा दरजी कायकु बनाया ॥१॥
टाळ बिना लेके नामा राऊलमे गया । पूजा करते बम्हन उन्ने बाहेर ढकाया ॥२॥
देवलके पिछे नामा अल्लक पुकारे । जदिर जीदर नामा उदर देऊळ ही फिरे ॥३॥
नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध । तुम कहाके बम्हान हम कहाके सुद ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 मंगला चरण›
📿 अभंग क्र. ४
📿 गाणे जरी म्हणो तरी ग
4.
गाणे जरी म्हणो तरी गणेश शारदा । आणीक नाही दुजा यावांचुनी ॥१॥
नाचेन म्हणू जरी तांडव महेश्वरु । तोही नृत्य करु जाणे एक ॥२॥
बोलू म्हणो जरी बोलके वाचा चारी । ( म्ह.चारीवेद ) त्या एकाची उरी मग मी बोलो ॥३॥
जाणो म्हणे जरी अठराहि जाणे । त्या पै काय उणे मग मी जाणो ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ४
📿 पाहता साधन विठ्ठल की
4.
पाहता साधन विठ्ठल कीर्तन । भक्त संजिवन आत्माराम ॥१॥
विठ्ठल सधर भिवराते नीर । नाम निरंतर केशवाचे ॥२॥
शिव सुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तन विचार पंढरीसी ॥३॥
निवृत्ति कीर्तन दिननिशी ध्यान । मनाचे उन्मन इये रुपी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत जनाबाई निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 धरिला पंढरीचा चोर ।
5.
धरिला पंढरीचा चोर । गळा बांधोनिया दोर ॥१॥
हृदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
शब्दे केली जुडाजुडी । विठ्ठल पायी घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्री राम जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 न बोलेचि काही इसी का
5.
न बोलेचि काही इसी काय झाले । भूते झडपिले निश्र्चयेसी ॥१॥
माझिये अदृष्टी नाही हा नंदन । म्हणोनिया विघ्न ओढवले ॥२॥
निवारी हे विघ्न वैकुंठनायका । रक्षी या बाळका सुदर्शने ॥३॥
तुझा मी किंकर आजि अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेचि आता ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 हनुमान जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 सुवर्च्यानामे स्वर्ग
5.
सुवर्च्यानामे स्वर्गीची देवांगना । ब्रम्हशापे जाणा घारी झाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥
शृंगी पायसपात्र दिधले वसिष्ठा हाती । त्वरे करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठे करुनी निश्चिती । दिधले राणी हाती तिघी तीस ॥४॥