🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९९९
📿 जीहीं जाणितलें वर्मा
1999.
जीहीं जाणितलें वर्मासी । त्याचे दास्य करिसी । गर्भवास सोसिशी । त्याचे साठी ॥१॥
घर कुंटुंब ना आभावो । गांव न तुज ठावो । सोलाट तुं पाहा हो । लागला जगी ॥२॥
बहुतांचें ठेवणें । बुडविलें येणे । शेख जीव घेणे । मागत्यासी ॥३॥
मायबापेंविण । वाढला हा जाण । शरण एका जनार्दनी । जाती गोतपणे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. २०००
📿 जोडोनिया कर । उभा रा
2000.
जोडोनिया कर । उभा राहिलो समोर ॥१॥
हे चि माझे भांडवल । जाणे कारण विठ्ठल ॥धृपद॥
भाकितो करुणा । आता नुपेक्षावे दीना ॥२॥
तुका म्हणे डोई । ठेवी वेळोवेळा पायी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २००१
📿 आम्ही घ्यावे तुझे ना
2001.
आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रमे ॥१॥
ऐसे निवडिले मुळी । संती बैसोनि सकळी ॥धृ
माझी डोयी पायावरी । तुम्ही न धरावी दुरी ॥२॥
तुका म्हणे केला । खंड दोघाचा विठ्ठला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २००१
📿 सर्वस्व हरुनी म्हणसी
2001.
सर्वस्व हरुनी म्हणसी बळीसी । म्या बांधिले विचारिसे कोण कोण ॥१॥
द्वारी द्वारपाळ झालासी अंकीत । सांग बुद्धिमंत ऐसा कोण ॥२॥
ऐसे नाथिलेंसी आपणा गोंविसी । एका जनार्दनी बोल आम्हा का ठेविसी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २००२
📿 वारिले लिगाड । बहुदि
2002.
वारिले लिगाड । बहुदिसांचे हे जाड ॥१॥
न बोलावे ऐसे केले । काही वाउगे तितुले ॥धृपद॥
जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥
तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २००२
📿 बळी आर्पिती देहासी ।
2002.
बळी आर्पिती देहासी । द्वारपाळ होसी तयासा ॥१॥
सांगा थोरपणा आहे कोण । घेतल्यावांचुन न देशी तू ॥२॥
धर्म आधी पूजा करी । म्हणोनि घरी राबसीं तू ॥३॥
एका जनार्दनी ऐसा उदार । घेता निर्धार देशी तू ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २००६
📿 बैसलोंसे दारी । धरणे
2006.
बैसलोंसे दारी । धरणे कोंडोनि भिकारी ॥१॥
आता कोठे हालो नेदी । बरी सांपडली संदी ॥धृपद॥
किती वेरझारा । मागे घातलीया घरा ॥२॥
माझे मज नारायणा । देता का रे नये मना ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २००६
📿 निर्वाणींची हे सांगि
2006.
निर्वाणींची हे सांगितली खूण । कैबल्य चरण विठो-बाचे ॥१॥
वेद शास्त्र स्मृति वदती पुराणे । पाहूनि जाणणे हेंचि सत्य ॥२॥
क्रिया कर्म धर्म ज्यालगि करणे । ते खूण निर्वाण हेंचि असे ॥३॥
जप तप अनुष्ठान का करिजे साधन । तेंचि प्रत्यक्ष निधान हेंचि असे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २००९
📿 दुर्बळाचे कोण । ऐके
2009.
दुर्बळाचे कोण । ऐके घालूनिया मन । राहिले कारण । तयावाचूनि काय ते ॥१॥
कळो आले अनुभवे । पांडुरंगा माझ्या जीवे । न संगता ठावे । पडे चर्या देखोनि ॥धृपद॥
काम क्रोध माझ्या देही । भेदाभेद गेले नाही । होते तेथे काही । तुज कृपा करिता ॥२॥
हे तो नव्हे उचित । नुपेक्षावे शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हा न कळे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २००९
📿 पायी जडले माझे मन ।
2009.
पायी जडले माझे मन । चित्त जाले समाधान ॥१॥ तुमच्या नामाचा महिमा । आजी पावन केले आम्हां॥२॥कृपा केली तुम्ही । लावियेले आपुले नामी ॥३॥एका जनार्दनी पूर्ण कृपा । तेणे मार्ग जाला सोपा॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०१०
📿 आम्ही भाव जाणो देवा
2010.
आम्ही भाव जाणो देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥
तरी म्या काय गा करावे । कोण्या रीती तुज पावावे । न सांगता ठावे । तुम्हा विण न पडे ॥धृपद॥
दोनी फाकविल्या वाटा । गोवा केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड राने भरती ॥२॥
तुका म्हणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आता येणे वेळे । चरण जीवे न सोडी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०११
📿 वेरझारी जाला सीण । ब
2011.
वेरझारी जाला सीण । बहु केले खेदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथे फावला ॥१॥
आता काय भीड भार । धरूनिया लोकांचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥धृपद॥
आले बहुतांच्या मना । का रे न होशी शहाणा । मुळींच्या वचना । आह्मी जागो आपुल्या ॥२॥
तुका म्हणे चौघांमधी । तुज नेले होते आधी । आता नामधी । उरी काही राहिली ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०११
📿 तुमचे तीर्थ आम्ही आद
2011.
तुमचे तीर्थ आम्ही आदरे सेवावे | तेणे ते पावावे परब्रह्म ॥१॥
विश्वाकरवी ब्रह्म म्हणविता तुम्ही | म्हणो जी माय आम्ही पिता तुम्ही ॥२॥
जो तुमचे चरणिचा तो नाही आम्हा | विष्णुदास नामा नसे तेथे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०१२
📿 कल्पतरूखाली । फळे ये
2012.
कल्पतरूखाली । फळे येती मागीतली ॥१॥
तेथे बैसल्याचा भाव । विचारूनि बोले ठाव ॥धृपद॥
द्यावे ते उत्तर । येतो प्रतीतीचा तो फेर ॥२॥
तुका म्हणे मनी । आपुल्या च लाभहानि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०१३
📿 रंगलिया या रंगे पालट
2013.
रंगलिया या रंगे पालट न घरी । सेवले अंतरी पालटेना ॥१॥
सावळे निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगे कैसे शोभा देती ॥धृपद॥
पवित्र जाले ते न लिंपे विटाळा । नैदी बैसो मळा आडवरी ॥२॥
तुका म्हणे काळे काळे केले तोंड । प्रकाश अभंड देखोनिया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०१३
📿 देवराज आले मंचकी बैस
2013.
देवराज आले मंचकी बैसले | भक्तांसी दिधले अभयदान ॥१॥
दास हो तुम्ही सकळ सुखी रहा | सुखी राहोनिया आनंद करा ॥२॥
रात्रंदिवस माझे करावे चितन | यमाचे बंधन नाही तुम्हा ॥३॥
विष्णुदास नामा गाऊनिया गेला | सेजे पहुडला देवराणा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०१३
📿 देवासी कांही नेसणें
2013.
देवासी कांही नेसणें नसे । जेथे तेथे देव उघडांची दिसे ॥१॥
देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पाहा तुम्ही ॥२॥
न लाजे तेथे नाही गांव । पांढरा डुकर झाला देव ॥३॥
एका जनार्दनी एकल्या काज । भक्ति तेणेंचि नेली लाज ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०१४
📿 हरीचें पाहता श्रीमुख
2014.
हरीचें पाहता श्रीमुख । सुखावलें मन नित्य नवा हर्ष ॥१॥
परमाप्रिय वो श्रीहरी । ध्याता ध्यान ध्येय सर्व हरि ॥२॥
एका जनार्दनी पाहता हरी । हरिरुप दिसे चराचरी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०१६
📿 अवधी चित्तवृत्ति एकव
2016.
अवधी चित्तवृत्ति एकवटोनि जेणे | अवघा धरिला मने पांडुरंग ॥१॥
अवघे सुख एक तयासि फावले | अवघे सुफळ जाले जन्म त्याचे ॥२॥
अवधी व्रते दाने केली प तेणे | ज्याचे विठ्ठली ध्यान मन जडले ॥३॥
नित्य विठ्ठल नाम गर्जती सप्रेमे | अवघे नित्य नेम जाले त्यांचे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०१९
📿 नागवे कळिकाळ बीदावळी
2019.
नागवे कळिकाळ बीदावळी पायी | तोचि लवलाही ध्यायिजेसु ॥१॥
स्मरण विठ्ठल चित्ती पांडुरंग | नाही तया मग जन्ममरण ॥२॥
आपणचि नांदे भक्ताचिये घरी | आपणचि करी सर्व कृत्य ॥३॥
नामा म्हणे देव पंढरिनिवास | कळिकाळासी वास पाहो नदी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०१९
📿 नाम घेता रुप आठवलें
2019.
नाम घेता रुप आठवलें सांवळे । ही खुण गोपाळें दिली मज ॥१॥
येणे जन्में कृष्ण दाटोनी टाकणें । आडवस्ती पेणे चुकविली ॥२॥
चुकविली वस्ती एका जनार्दनी । संसार सांडणे सांडोनिया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०२०
📿 तुमचे नामसंकीर्तन ।
2020.
तुमचे नामसंकीर्तन । हेंचि माझे संध्यास्नान ॥१॥
तुमच्या पायाचे वंदन । हेंचि माझे अनुष्ठान ॥२॥
तुमच्या पायाचा साक्षेप । हाचि माझा कालक्षेप ॥३॥
तुमच्या प्रेमे आली निद्रा । हीच माझी ध्यान मुद्रा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०२१
📿 आता माझ्या भावा । अं
2021.
आता माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥
आले भागा ते करितो । तुझे नाम उच्चारितो ॥धृपद॥
दृढ माझेमन । येथे राखावे बांधोन ॥२॥
तुका म्हणे वाटे । नका फुटो देऊ फांटे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०२३
📿 मागणे ते मागो देवा ।
2023.
मागणे ते मागो देवा । करू भक्ती त्याची सेवा ॥१॥
काय उणे तयापाशी । रिद्धीसिद्धी ज्याच्या दासी ॥धृपद॥
कायावाचामन । करू देवा हे अर्पण ॥२॥
तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्याने हे चराचर ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०२३
📿 आम्हांसे तो पुरे विठ
2023.
आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक । वाउगाची देखा दुजा न मनी ॥१॥ ध्यानीं धरु विठ्ठल करु तयाचे कीर्तन । आणिक चिंतन नाही दुजे ॥२॥ ध्येय ध्याता ध्यान खुंटला पै शब्द विठ्ठ्ल उद्धबोध सुख आम्हा ॥३॥ एका जनार्दनी विठ्ठल भरला । रिता ठाव उरला कोठे सांगा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०२४
📿 चित्ती नाही आस । त्य
2024.
चित्ती नाही आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥
असे भक्तांचिये घरी । काम न सांगता करी ॥धृपद॥
अनाथाचा बंधु । असे अंगी हा संबंधु ॥२॥
तुका म्हणे भावे । देवा सत्ता राबवावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०२४
📿 आगमी नाम निगमो नाम |
2024.
आगमी नाम निगमो नाम | पुराणी नाम केशवाचे ॥१॥
अर्थी नाम पदी नाम | धूपदी नाम त्या केशवाचे |॥२॥
अनुभवे भावे कपटे प्रपचे | परि हरिचे नाम येऊ दे वाचे ॥३॥
नाम व्हावे नाम व्हावे | नाम व्हावे त्या केशवाचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०२४
📿 भीवरेचे तीरीं उभा ।
2024.
भीवरेचे तीरीं उभा । धन्य शोभा विठ्ठल ॥१॥
विटेवरी समचरण । तेथे मन गुंतले ॥२॥
संत जाती तया ठाया । मजहि गांवा त्वा न्यावे ॥३॥
उपकार करा साचा । दाखवा दीनाचा सोयरा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०२५
📿 जे जे पुण्य जोडे हरि
2025.
जे जे पुण्य जोडे हरिनाम गजरी | त्याचे वांटेकरी दोघेजण ॥१॥
सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता | जो भजे अनंता निर्विकल्प ॥२॥
तेणे सुखे सुख वाढे नीच नवे | जाणती अनुभवे संतजन ॥३॥
हाती सुदर्शन आनंद कीर्तनी | उमा चक्रपाणि मार्गे पुढे |॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०२७
📿 जाणावे ते सार । नाही
2027.
जाणावे ते सार । नाही तरी दगा फार ॥१॥
डोळे झांकिलिया रवि । नाही ऐसा होय जेवी ॥धृपद॥
बहु थोडया आड । निवारिता लाभे जाड ॥२॥
तुका म्हणे खरे । नेले हातीचे अंधारे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०२७
📿 मागे एक पुढे एक । दो
2027.
मागे एक पुढे एक । दोन्ही मिळोनि विठ्ठल देख ॥१॥
ऐसा होतांची मिळाणी । दिले संसारासी पाणी ॥२॥
एक एक पाहता दिठी । होय विठ्ठलेसी भेटी ॥३॥
एका सांडुनि दुजा नाही । एका जनार्दनी ध्याई ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०२८
📿 मुळी नेणपण । जाला तर
2028.
मुळी नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥
वाया जावे हे चि खरे । केले तेणे चि प्रकारे ॥धृपद॥
अराणूक नाही कधी । जाली तरि भेदबुद्धी ॥२॥
अंतरली नांव । तुका म्हणे नाही ठाव ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०२९
📿 संवसार साते आले हो आ
2029.
संवसार साते आले हो आइका । तुटीचे ते नका केणे भरू ॥१॥
लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथे ॥धृपद॥
शृंगारिले दिसे न कळे अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥
तुका म्हणे खोटे गुंपता विसारे । हातिंचिया खरे हाती घ्यावे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०२९
📿 ध्येय ध्याता ध्यान व
2029.
ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपूर्ण । ज्ञेय ज्ञाता पुर्ण विठ्ठल माझा ॥१॥
योगयाग तप विठ्ठलनाम जप । पुण्य आणि पाप विठ्ठल बोला ॥२॥
उन्मनी समाधी विठ्ठल बोला वाणी । तारील निर्वाणीं विठ्ठल माझा ॥३॥
मज भरंवसा कायामनेंवाचा । एक जनार्दनी त्याचा शरणांगत ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मुमुक्षुस उपदेश›
📿 अभंग क्र. २०३१
📿 ऐसा आज्ञापी भक्तांसी
2031.
ऐसा आज्ञापी भक्तांसी आपण | त्यागा अभिमान तुम्ही जाण |॥१॥
जाणावे प्रत्यक्ष स्वरूप सगुण | सवे नारायण तोचि दिसे ॥ २|!दिसे गोपाळांसी गोपिकांसहित | आनंदे डुल्लत म्हणे नामा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०३१
📿 गातो एका ध्यातो एका
2031.
गातो एका ध्यातो एका । अंतरबाहीं पाहातो एका ॥१॥
अगुणां एक सगुणीं एका । गुणातीत पाहातो एका ॥२॥
जनी एका वनी एका । निरंजनी देखो एका ॥३॥
संत जना पढिये एका । जनार्दनी कडिये एक ॥४॥