🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३›
📿 अभंग क्र. ३६४४
📿 गोरियानें केला मनासी
3644.
गोरियानें केला मनासीं विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥
लिगाड ते आपोआप मावळले । विषयांचे जाहलें तोंड काळे ॥२॥
विठ्ठले करुणा केली सर्वपरी । तारियेलें भवपुरीं संसाराचे ॥३॥
एका जनार्दनी खुंटला वेव्हार । नाही आन विचार प्रपंचाचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६४५
📿 (सीताशोक)
3645.
(सीताशोक)
राम म्हणता तरे जाणता नेणता । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥
राम म्हणता न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥धृपद॥
राम म्हणे तया नये जवळी भूत । कैचा यमदूत म्हणता राम ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३›
📿 अभंग क्र. ३६४५
📿 उपवर ती कांता जाहली
3645.
उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्याची वासना नाही कामीं ॥१॥
विठोबाची आण घालोनि निरविलें । उभयतां ते वहिले पाळा तुम्ही ॥२॥
सांगूनिया बध्द आपुल्या ग्रामा गेला । पुढे काय विचार जाहला परियेसा ॥३॥
एका जनार्दनी सुखरुप तिघें । कामधाम वेगे करिताती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६४६
📿 (सीताशोक)
3646.
(सीताशोक)
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥
अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापिले सर्वत्र बाहेरी भीतरी आत ॥धृपद॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३›
📿 अभंग क्र. ३६४६
📿 ऐसे बहुत दिन तयांसी
3646.
ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळले गुज त्याचे ॥१॥
स्त्रियेचे चरित्र न कळे ब्रम्हादिकां । उभयतां विचार देखा करिताती ॥२॥
दोघी दो बाजूंस करिती शयन । कर उचलोनि धरती ह्रदयीं ॥३॥
सावध होउनी पाहे कर चोरी गेला । एका जनार्दनी त्याला शिक्षा करु ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३›
📿 अभंग क्र. ३६४७
📿 चोरासी खंडन करावे हा
3647.
चोरासी खंडन करावे हाचि धर्म । आणीक नाही वर्म दुजे कांही ॥१॥
माझ्या विठोबाची आज्ञा पै मोडिली । शपथ पाळिलीं नाही दुष्टे ॥२॥
घेऊनियां शस्त्र केले पै ताडन । खंडिले कर जाण उभयतां ॥३॥
एका जनार्दनी करिता सुपरीत । तो घडले विपरीत स्त्रियेसीं हे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६५०
📿 (सीताशोक)
3650.
(सीताशोक)
आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥१॥
आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरे वाद्यांचे गजर ॥धृपद॥
करिती अक्षवाणे ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३›
📿 अभंग क्र. ३६५१
📿 पाहूनिया गोरा दंडवत
3651.
पाहूनिया गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हा ॥१॥
पंढरीसी राहतों परदेशी आम्ही । नाम तरी स्वामीं विठु माझे ॥२॥
सांगतो कांता आहे बरोबरी । परिवार तरी एवढाचि ॥३॥
ऐकोनिया मात गोरा संतोषला । रहावे कामाला माझे घरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६५३
📿 (सीताशोक)
3653.
(सीताशोक)
मी अल्पमतिहीन । काय वर्णु तुझे गुण । उदकी तारिले पाषाण । हे महिमान नामाचे ॥१॥
नाम चांगले चांगले । माझे कंठी राहो भले । कपिकुळ उद्धरिले । मुक्त केले राक्षसा ॥धृपद॥
द्रोणागिरी कपिहाती । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३›
📿 अभंग क्र. ३६५३
📿 आषाढीची यात्रा आला प
3653.
आषाढीची यात्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ पंढरीसी ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही अनुभवी संत बहु ॥२॥
येता त्याची मार्गे तेरेसी ते आले । तिही पुशियेलें गोरोबासी ॥३॥
गावांतील जन सांगती प्रकार । गोरियाचा विचार जाहला सर्व ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६५७
📿 (घोंगडीची रूपके)
3657.
(घोंगडीची रूपके)
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशी ते ही होते ॥१॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवो द्या ॥धृपद॥
व्हावे ऐसे निसंतान । घेईन आन तुजपाशी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६५८
📿 (घोंगडीची रूपके)
3658.
(घोंगडीची रूपके)
नाही तुझे उगा पडत गळा । पुढे गोपाळा जाऊ नको ॥१॥
चाहाड तुझे दाविन घरी । बोलण्या उरी नाही ऐसी ॥धृपद॥
तुम्हा आम्हा पडदा होता । सरला आता सरोबरी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३›
📿 अभंग क्र. ३६५९
📿 संत ती मंडळी महाद्वा
3659.
संत ती मंडळी महाद्वारां आली । मूर्ति देखियेली विटेवरी ॥१॥
चरणावरी माथा ठेविती भक्तजन । आनंदले लोचन पाहुनी भक्त ॥२॥
महाद्वारी नामा कीर्तनी उभा ठेला । मिळालासे मेळा सकळ संत ॥३॥
सद्रदित कंठ कीर्तन करता । एका जनार्दनी सर्वथा भक्त होती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६६०
📿 (घोंगडीची रूपके)
3660.
(घोंगडीची रूपके)
मुळींचा तुम्हा लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥
घ्यावे त्याचे देणेंचि नाही । येचि वाहि देखतसो ॥धृपद॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३›
📿 अभंग क्र. ३६६०
📿 कीर्तनाचा गजर होत आन
3660.
कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥
टाळी बाहुनी होते मुखी वदा नाम । ऐकता सकाम भक्त जाहले ॥२॥
गोरियाचे मना संकोच वाटला । कर नाही आपुल्याला टाळी वाहता ॥३॥
वाटलेंसे दु:ख नयनी नीर आले । एका जनार्दनी बोले नाम मुखी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६६१
📿 (घोंगडीची रूपके)
3661.
(घोंगडीची रूपके)
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवे ॥१॥
हा गे चोर धरा धावा कोणी । घरांत राहाटे चहू कोणी ॥धृपद॥
नोळखवे म्या धरिला हाती । देह्यादिप माया लाविली वाती ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६६२
📿 (घोंगडीची रूपके)
3662.
(घोंगडीची रूपके)
आता मी देवा पाघरो काई । भिकेचे ते ही उरेचि ना ॥१॥
सदैव दुबळे नेणे चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥धृपद॥
नाही मजपाशी फुटकी फोडी । पाचांनी घोंगडी दिली होती ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६६३
📿 (घोंगडीची रूपके)
3663.
(घोंगडीची रूपके)
मी माझे करित होतो जतन । भीतरिल्या चोरे घेतले खान ॥१॥
मज आल्याविण आधीच होता । मज न कळता मज माजी ॥धृपद॥
घोंगडे नेले घोंगडे नेले । उघडे केले उघडेंचि ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६६४
📿 (घोंगडीची रूपके)
3664.
(घोंगडीची रूपके)
घोंगडे नेले सांगो मी कोणा । दुबळे माझे नाणीत मना ॥१॥
पुढे ते मज न मिळेती आता । जवळी सत्ता दाम नाही ॥धृपद॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६›
📿 अभंग क्र. ३६६४
📿 सांवतामाळीचरित्र - अ
3664.
सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६
भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोनी धरी स्वये ॥१॥ नामदेवाप्रती जाहला अभिमान । लाडिकाचि पूर्ण मी तो भक्त ॥२॥ कौतुक दावावया माव देव करिती । नामदेवाप्रती काय बोले ॥३॥ एका जनार्दनी परिसा सादर । देव भक्तांचा परिकर संवाद तो ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६›
📿 अभंग क्र. ३६६५
📿 देव म्हणे नाम्या जात
3665.
देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी । काढी पा धुंडोनी मजलागी ॥१॥ ऐसे म्हणोनी देवे घातलीसे कास । निघे ह्रषीकेश पाहुनी नाम्या ॥२॥ क्षणी होय गुप्त क्षणी तो प्रगट । पाठी लागे स्पष्ट नामदेव ॥३॥ दूर गेलिया देव माळा पुष्पें टाकी खूण । ती ते ओळखून नामा येत ॥४॥ एका जनार्दनी भक्ताचा कैवारी । अभिमान बोहरी करितसे ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६६७
📿 (सद्गती आणि अधोगतीया
3667.
(सद्गती आणि अधोगतीयांचे उपाय)
ऐका संतजन उत्तरे माझे बोबडे बोल । करी लाड तुम्हापुढे हो कोणी झणी कोपाल ॥१॥
उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावे चित्ती ॥धृपद॥
धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाही लाज ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६›
📿 अभंग क्र. ३६६८
📿 देव म्हणे सांवत्या ल
3668.
देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥ लपावया स्थान नसे दुजे आन । उदर फ़ाडून लपविला ॥२॥ भक्ताचे उदरी बैसे नारायण । कृपेचे सिंहासन घालूनिया ॥३॥ एका जनार्दनी नामा तेथे आला । माग तो वहिला नाही कांही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६›
📿 अभंग क्र. ३६६९
📿 पाहुनी दशदिशा नामा र
3669.
पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । का बा पांडुरंगे ऐसे केले ॥१॥ चरणाचा माग येथवरी आला । येथे गुप्त जाहला करु काय ॥२॥ का हो केशिराजा अवकृपा केली । माझी सांडी सांडिली देवराया ॥३॥ एका जनार्दनी रडतां नामदेव । पाहिलेंसे तेव्हा सांवत्याने ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६›
📿 अभंग क्र. ३६७०
📿 येवोनी जवळीं कुर्वाळ
3670.
येवोनी जवळीं कुर्वाळिलें वदन । चालिले स्फ़ुंदन सदगदित ॥१॥ सांवता म्हणे नाम्या का रे रडतोसी । काय जाहले तुजसी सांग मज ॥२॥ नामा म्हणे देव पळोनिया आले । येथे गुप्त जाहले न कळे कांही ॥३॥ एका जनार्दनी करितसे खेद । का हो तो गोविंद दुरी गेला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६७१
📿 (कोडे)
3671.
(कोडे)
पुसतसे सांगा मी हे माझे ऐसे काई । रुसू नका नुगवे तो झवे आपुली आई ॥१॥
कोडे रे कोडे ऐका हे कोडे । उगवूनि फार राहे गुंतोनिया थोडे ॥धृपद॥
सांगतो हे मूळ काही न धरावी खंती । ज्याले जीवो मेले मरो प्रारब्धा हाती ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६›
📿 अभंग क्र. ३६७१
📿 बैसोनी निकटीं सांवत्
3671.
बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । का हो वनमाळी न दिसे मज ॥१॥ का हे कर्म आड आजी आलेंसें बाड । न दिसे उघड विठु माझा ॥२॥ कोणत्या लिगाडें पाडिलीसे तुटी । का हो जगजेठी अंतरला ॥३॥ मजविण क्षण तयासी कंठेना । एका जनार्दनी मना कठिण केले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६७२
📿 (कोडे)
3672.
(कोडे)
नुगवे ते उगवून सांगितले भाई । घालुनिया ताळा आता शुद्ध राखा घाई ॥१॥
आता काही नाही राहिले । म्या आपणा आपण पाहिले ॥धृपद॥
कमाईस मोल येथे नका रीस मानू । निवडू नये मज कोणा येथे वानू ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६७३
📿 (काला व खेळया संबंधी
3673.
(काला व खेळया संबंधीचे अभंग)
हा रस आनंदाचा । घोष करा हरीनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचे संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥धृपद॥
काय पाहाता हे भाई । हरुषे नाचा धरा घाई । पोटभरी काही । घेता उरी न ठेवा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६७४
📿 (काला व खेळया संबंधी
3674.
(काला व खेळया संबंधीचे अभंग)
अवघे गोपाळ म्हणती या रे करू काला । काय कोणाची सिदोरी ते पाहो द्या मला ।
नका काही मागे पुढे रे ठेवू खरे च बोला । वंची वंचला तोचि रे येथे भोवंडा त्याला ॥१॥
घेतल्या वाचून झाडा रे नेदी आपुले काही । एका एक ग्वाही बहुत देती मोकळे नाही ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६›
📿 अभंग क्र. ३६७५
📿 घालूनिया मिठी करीत स
3675.
घालूनिया मिठी करीत स्फ़ुंदन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥ का रे मायबापा लावियेली सवे । ऐशी वा का माव केली आता ॥२॥ नामयासी देवे करे उचलिलें । प्रीतीनें आलिंगिलें तये वेळीं ॥३॥ एका जनार्दनी सज्जनांचा दास । म्हणोनी चरित्रास कथियेले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६७६
📿 (काला व खेळया संबंधी
3676.
(काला व खेळया संबंधीचे अभंग)
आम्हा निकट वासे । कळो आले जैसे तैसे । नाही अनारीसे । कान्होबाचे अंतरी ॥१॥
पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥धृपद॥
खेळ खेळे न पडे डाई । ज्याचा भार त्याच्या ठायी । कोणी पडतील डाई । कोणी कोडी उगवीती ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६›
📿 अभंग क्र. ३६७६
📿 माळियांचे वंशी सांवत
3676.
माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१॥ त्यासवे हरी खुरुपूं लागे अंगें । धांउनी त्याच्या मागे काम करी ॥२॥ पीतांबर कास खोवोनी माघारी । सर्व काम करी निजसंगें ॥३॥ एका जनार्दनी सांवता तो धन्य । तयाचे महिमान न कळे कांही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६७९
📿 (गौळण)
3679.
(गौळण)
या हो या चला जाऊ सकळा । पाहो हा सोहंळा आजि वृंदावनीचा ॥१॥
वाहिला गोपाळे वेणुनाद पडे कानी । धीर नव्हे मनी चित्त झाले चंचळ ॥धृपद॥
उरले ते सांडा काम नका करू गोवी । हीच वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८›
📿 अभंग क्र. ३६७९
📿 तया ठायी जाता शुध्द
3679.
तया ठायी जाता शुध्द होय अमृत । नारदे ही मात सांगितली ॥१॥ तेव्हा एकादशी आली सोमवारी । विमान पंढरीं उतरले ॥२॥ अमृताचें ताट घेउनी आला इंद्र । गर्जती सुरवर जयजयकारे ॥३॥ देव सुरवर आले पंढरीसी । नामा कीर्तनासी उभा असे ॥४॥ सुरवर देव बैसले समस्त । कीर्तनी नाचत नामदेव ॥५॥ एका जनार्दनी देव कीर्तनासी । सांडोनी स्वर्गासी इंद्रराव ॥६॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८›
📿 अभंग क्र. ३६८०
📿 ऐसा समुदाव चंद्रभागे
3680.
ऐसा समुदाव चंद्रभागे तीरीं । तेव्हा आपुले घरी चोखा होता ॥१॥ एकादशी व्रत करती दोघेजण । उपवास जागरण निशीमाजीं ॥२॥ तीन प्रहर जाहले उपवास जागरण । चोखामेळा म्हणे स्त्रीसी तेव्हा ॥३॥ तुझिया घरासी येऊ पारण्यासी । सांगून मजसी गेला देव ॥४॥ एका जनार्दनी चोखा करी करुणा । तेव्हा नारायणा जाणवलें ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८›
📿 अभंग क्र. ३६८२
📿 चोख्याचे अंगणी बैसल्
3682.
चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती । स्त्री ते वाढिती चोखियाची ॥१॥ अमृताचें ताट इंद्रें पुढे केले । शुध्द पाहिजे केले नारायणा ॥२॥ तेव्हा देवराव पाचारी चोखियासी । शुध्द अमृतासी करी वेगी ॥३॥ चोखामेळा म्हणे काय हे अमृत । नामापुढे मात काय याची ॥४॥ अमृताचे ताट घेउनी आला इंद्र । हेतु गा पवित्र करी वेगी ॥५॥ चोखियाची स्त्री चोखा दोघेजण । शुध्द अमृत तेणे केले देखा ॥६॥ चोखियाच्या घरी शुध्द होय अमृत । एका जनार्दनी मात काय सांगू ॥७॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६८४
📿 (हमामा)
3684.
(हमामा)
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालिता ठकले पोर । करी येरझार चौर्यांशीची ॥१॥
पहिले पहारा रंगासि आले । सोहं सोहं से बार घेतले । देखोनि गडी ते विसरले । डाई पडिले आपणची ॥धृपद॥
दुसर्या पहारा महा आनंदे । हमामा घाली छंदछंदे । दिस वाडे तो गोड वाटे । परि पुढे नेणे पोर काय होते ते ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८›
📿 अभंग क्र. ३६८४
📿 चोखियाची भक्ति कैसी
3684.
चोखियाची भक्ति कैसी । प्रेमे आवड देवासी ॥१॥ ढोरें वोढी त्याचे घरी । नीच काम सर्व करी ॥२॥ त्याचे स्त्रीचे बाळंतपण । स्वये करी जनार्दन ॥३॥ ऐसी आवड भक्तासी देखा । देव भुलले तया सुखा ॥४॥ नीच याती न मनी कांही । एका जनार्दनी भुलला पाही ॥५॥ :::::::::::::::::::::::::{}:::::::::::::::::::::::::
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८›
📿 अभंग क्र. ३६८६
📿 संत आले वरले दिंडीं
3686.
संत आले वरले दिंडीं । हाती खुरक्या काखेंत मुंडी ॥१॥ पंढरपुरीं पडली होड । मुटक्या परीस धांगडगोड ॥२॥ आली वैष्णवांची मांदी । मेले डुकर बांधलें खांदी ॥३॥ एका जनार्दनी अर्थ उलटा । तो जाणे तो गुरुचा बेटा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८›
📿 अभंग क्र. ३६८८
📿 देऊळ बांधिले कळस साध
3688.
देऊळ बांधिले कळस साधिले । स्थापन ते केले लिंगाप्रती ॥१॥ पाया जो खांदला मध्येचि भंगला । शब्द मावळला काय सांगों ॥२॥ वरिल्या मंडपा मुंगीये धरिले । त्रिभुवनी व्यापिले मकुड्यानें ॥३॥ एका जनार्दनी मंडप उडाला । देवही बुडाला देवळा सहित ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोशी ३६८९ ते ३६९३›
📿 अभंग क्र. ३६८९
📿 जोशी ३६८९ ते ३६९३
3689.
जोशी ३६८९ ते ३६९३
मी परात्पर जोशी । होरा सांगेन संतसभेसी । माझे वचन मानाल मानसी । तरी दृढनिश्चयेसी परिसावे नाना ॥१॥ ऐका ऐका राजेश्री । प्रजा मोकदम कारभारी । शेटे महाजन चौधरी । बरवी नगरी वसविली नाना ॥२॥ रहाटकाटाचेदिवस आले । जागे सांडोनी फेरे केले । मागे कष्टबहुत भोगिलें । शेवटी फळ आले नरदेहासी नाना ॥३॥ या पंढरीत मागे बहुत आले । जोशी भविष्यसांगो गेले । त्यांचे तुम्ही नाही ऐंकीले । दगे झालेथोर थोर नाना ॥४॥ काळाचे फेरे घेऊन गेले । थोर नगराचे संहार झाले । साच मान माझ्या बोलें।जोडी करा आत्मयुक्ति नाना ॥५॥ धेडा मांगाच्यामान्यता झाल्या । उत्तम योनी भिकेस लागल्या । ते ऐका मज जोशाच्या बोला । उत्तमते पडले अधमघरीं नाना ॥६॥ नांव काय पाटीलबुवाचें । पुढीलभविष्य सांगेन साचे । वचन ऐक मज जोशाचें । तेणे तुझे समाधान होईल नाना ॥७॥ एका बायकोचीसंगत घडली । तेणे तुझी महिमा बुडाली । जुनीभाकर सरोनी गेली । गाठ पडली दरीद्राची नाना॥८।तिचा संग टाकी दादा । बरवा चालेल तुझाधंदा । साच मानी माझ्या शब्दा । सदा सर्वदा सुखीहोसी नाना ॥९॥ नांव काय आवाजींचे । कल्याणहोईल बयाचे । पुढील भविष्य सांगेन साचे । तरीतुझे तेणे समाधान होईल बये ॥१०॥ बया आणिकएक सांगतो मात । टाक कुबुद्धी पाहू दे हात । फारबरेपणा दोघांत । स्त्रीपुरूषांत बहु गोडीबये ॥११॥ विघ्न दिसते वरले आळीं । नाडुपहातोथोर थोर बळी । पूर्वपुण्ये जाहली होळी । फेरे पाळीचुकेना गे बये ॥१२॥ दहा लेकुरें जाहली आई । परी तू एकाचे सुख देखिले नाही । आता येथुन पुढेपाही । सुख होईल ते ऐक बये ॥१३॥ एका लेकीचीसासुरवाडी । अपार सुख देखशील पुढी । माझेंवचन नको मार्नु लबाडी । सत्य तुजपुढे बोलतोंबय ॥१४॥ कुबुद्धीची कांचोळी । लेऊं नको काळीचोळी । दुष्टगत झाली सगळी । ऐक नाम तुझेंबये ॥१५॥ विकल्प उडदांचा मेळावा । द्वैत तांब्याचा पाउड द्यावा । संदेह तेलाचा घटभरावा । ओवाळुन द्यावा मज जोशाकारणेबये ॥१६॥ विषम बुद्धीचे नाणे । ओंवाळुन द्यावेंमज जोशाकारणे । आपुले नि:शेष बरे करणे । तरीदान करी वेगेसी बये ॥१७॥ साच मानी माझ्याबोला । येथुनिया तुझा शनैश्वर गेला । जन्मगुरूचापालट झाला । संग घडला साधुसंतांचा बये ॥१८॥ पूर्ण जोशी जनार्दन । सुर्यवंशी रघुनंदन । तयासीअनन्य जाता शरण । वंश उद्धरण तयाचाबये ॥१९॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोशी ३६८९ ते ३६९३›
📿 अभंग क्र. ३६९३
📿 आम्ही अलक्षपुरीचे जो
3693.
आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी । तेणे चुकतीचौर्याऎंशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥१॥ होरा ऎका दादांनो॥ध्रु॥नका जाऊ मना मागे । थोर थोरा जाहले दगे । मी बोलत नाही वाउगे । सावध रहा दादांनो ॥२॥ वासना वाईट ही बा थोर । पुरविले लहान थोर । फिरतीचौर्याऎंशी लक्ष घर । पडाल फशी दादांनो ॥३॥ एका जनार्दनी जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी । रामनाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ॥४॥