वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 75. श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५

ऐके उद्धवा प्रेमळा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087760 · अभंग क्र. २२६६

2266.
ऐके उद्धवा प्रेमळा । सांगतो जीवाचा जिव्हाळा । तुं भक्तराज निर्मळा । सुचित्तें ऐके ॥१॥
मी बैसोनी आसनी । पुजा करितो निशिदिनी । ते पूय मुर्ति तुजलागुनी । नाही ठाउको उद्भवा ॥२॥
जयाचोनि माते थोरपण । वैकुंठादि हे भुषण । तयाचे पूजेचे महिमान । एक शिव जाणे ॥३॥
येरा न कळेचि कांही । वाउगे पडती प्रवाहीं । उद्धवा तुं पुसिले पाही । म्हणोनि तुज सांगतो ॥४॥
माझे जे अराध्य दैवत । ते कोण म्हणसी सत्य । भक्त माझे जीवेचे हेत । जाणती ते ॥५॥
तयांविण मज आवड । नाही कोणता पोवाड । माझा भक्त मज वरपड । काया वाचा मनेंसी ॥६॥
माझे विश्रांतीचे स्थान । माझे भक्त सुखनिधान । काया वाचा मन । मी विकिलो तयांसी ॥७॥
ते हे भक्त परियेसीं । उद्धवा सांगे हृषीकेशी । एका जनार्दनी सर्वासी । तेंचि वदतसे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग