वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

संपदा सोहंळा नावडे म

🙏 3. संत तुकाराम · ABH-078298 · अभंग क्र. २२४०

2240.
संपदा सोहंळा नावडे मनाला । करी ते टकळा पंढरीचा ॥१॥
जावे पंढरिसी आवडी मनासी । कधी एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥

अर्थ :
संपदा सोहंळा मनाला आवडत नाही तर केवळ पंढरीचा ध्यास मनाला लागलेला आहे. पंढरीला जाणे मनाला फार आवडते आणि कधी एकादशी आषाढी येईल आणि मी पंढरपूरला जाईल असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अशी आर्त इच्छा ज्याच्या मनात असते त्याची चक्रपाणि हरी वाट पाहत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग