🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४८
📿 सूकरासी विष्ठा माने
448.
सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥
तेवी अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्या गोड परमार्थ ॥धृपद॥
श्वानासी भोजन दिले पंचामृत । तरी त्याचे चित्त हाडावरी ॥२॥
तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमिता विखार विष जाले ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४४८
📿 मत्स्य कच्छ क्रोड मृ
448.
मत्स्य कच्छ क्रोड मृग ते खुजट | जेथूनि प्रगट जाली रुपे ॥१॥
तेंचि ब्रह्म उभे भिवरेच्या तीरी | हात कटावरी ठेवूनिया ॥२॥
मातृघाती हिंडे वनी जो रडत | चोर जार घाट करी दुष्ट ॥३॥
दिगंबर अश्वारुढ खड्गधारी | पृथ्वीचा जो करी ग्रास एक ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४८
📿 सप्तपुर्या क्षेत्र
448.
सप्तपुर्या क्षेत्र पवित्र सोपार । तयांमांजी श्रेष्ठ पंढरपुर ॥१॥
जा रे आधी तया ठाया । जेथे वास वैकुंठराया ॥२॥
पुंडलिकांचे दारुशनें । तुटती प्राणीयांची बंधनें ॥३॥
स्नान करिता भीमेसी । पुर्वज उद्धरई सरसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४८
📿 जे जे करिती ते ते वृ
448.
जे जे करिती ते ते वृथा ।
पंढरिनाथा न भजता ॥१॥
दिसे पुढे परी ते माया ।
जाइल विलया क्षणमात्रे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४४९
📿 दुजे द्वैत सांडी एकत
449.
दुजे द्वैत सांडी एकतत्त्व मांडी ।
अद्वैत ब्रह्मांडी पैसु कीजे ॥१॥
ते रूप पंढरी पुंडलिका द्वारी ।
मुक्तिमार्ग चारी वश्य रया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४९
📿 वेदे प्रतिपाद्य केले
449.
वेदे प्रतिपाद्य केले असे कर्म ।
मोक्षाचे हे वर्म पाहोनिया ॥१॥
परी ते नाणती करिता चुकले ।
तेणेचि पावले जन्म-मृत्यु ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४९
📿 रासभ धुतला महा तीर्थ
449.
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥
तेवी खळा काय केला उपदेश । नव्हेचि मानस शुद्ध त्याचे ॥धृपद॥
सर्पासी पाजिले शर्करापीयूष । अंतरीचे विष जाऊ नेणे ॥२॥
तुका म्हणे श्वाना क्षिरीचे भोजन । सवेचि वमन जेवी तया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४४९
📿 अंगाचिये सेज फणि छाय
449.
अंगाचिये सेज फणि छाया धरी | सहस्त्रमुखी करी स्तुति शेष ॥१॥
परि तयाते तुझे चरित्र अकल्पित | तेथे माझे गीत कोणीकडे ॥२॥
कैशापरी तुज आम्ही ध्यावे देवा | हे वर्म केशवा सांग मज ॥३॥
मार्कंडेयो भृशुंडी लोमहर्ष अगस्ति | करिता तुझी स्तुति कल्प गेले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४९
📿 उत्तम स्थळ पंढरी देख
449.
उत्तम स्थळ पंढरी देखा । उभा सखां विठ्ठल ॥१॥
एकदां जा रे तये ठायी । प्रेमा उणें मग काई ॥२॥
भाग्य जोडले सर्व हाता । त्रैलोकीं सत्ता होईल ॥३॥
मोक्षामुक्ती तुम्हीपुढें । दास्यत्व घडे तयांसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४९
📿 जेणे आणियेली क्षिती
449.
जेणे आणियेली क्षिती ।
रसातळींहुनी वरती ॥१॥
तो हा उभा कृपावंत ।
ठेवुनी कटांवरी हात ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५०
📿 एकी म्हणे भाव धरू ने
450.
एकी म्हणे भाव धरू नेदी मौन ।
तेथींचे वो ज्ञान सांगे ॥१॥
एकीने सांगितले दुजीने परिसिले ।
प्रपंच पुसले तेणे रूपे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५०
📿 वेदा ऐसी नाही माउली
450.
वेदा ऐसी नाही माउली आणिक ।
प्राणिया विवेक सांगितला ॥१॥
परी ते नेणती वेदार्थीचे वर्म ।
चुकोनिया कर्म आचरती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५०
📿 जेवी नवज्वरे तापले श
450.
जेवी नवज्वरे तापले शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥
तेवी परमार्थ जीही दुराविला । तयालागी झाला सन्निपात ॥धृपद॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥
तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५०
📿 चारी वेद तुझ्या नांद
450.
चारी वेद तुझ्या नांदती नगरी | तेथे मी भिकारी काय वानू ॥१॥
वर्णिता पार नेणे चतुरानन | तेथे मी अज्ञान काय जाणे ॥२॥
अंगलग सेवक तो सारिखा | तेथे माझा लेखा कोणीकडे ॥३॥
कैलासींचा राणा करितसे ध्यान | तेथे भ्रांत मन केवी रिघे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५०
📿 एकदा जारे तेथवरी । प
450.
एकदा जारे तेथवरी । पहा पुंडलीक हरी ॥१॥
जन्मा आलीया विश्रांती । निरसेल अवधी भ्रांती ॥२॥
विठ्ठलपायी ठेवा भाळ । जन्म मग तुमचा सुफळ ॥३॥
पुंडलीकां नमस्कार । विनवणी जोडीन कर ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५०
📿 नित्य निरामय सागरी ।
450.
नित्य निरामय सागरी ।
मथन करुनी विचारशूरी ॥१॥
कढिला नवनींताचा गोळा ।
तो हा विटेवरी सावळा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५१
📿 तत्त्वे तत्त्व धरी क
451.
तत्त्वे तत्त्व धरी कोहंभाव होकरी ।
सोहं सोहं करी कोण सये ॥१॥
सोकरी पुंडलिकु ज्ञान पुण्यश्लोकु ।
विठ्ठली त्रैलोक्य उद्धरिले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५१
📿 वेदार्थ हा पाहुनि वर
451.
वेदार्थ हा पाहुनि वर्तती जे ।
वर्णाश्रमी आश्रम त्यासि साजे॥
मोक्षासि हा कारण प्राणियासी ।
बहेणि म्हणे वेद मना उपासी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५१
📿 आता असो मना अभक्तांच
451.
आता असो मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामी ॥१॥
नये त्याची कदा गोष्टी करू मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नावे ॥धृपद॥
प्रभाते न घ्यावे नांव माकडाचे । तैसे अभक्ताचे सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे आता आठवू मंगळ । जेणे सर्वकाळ सुखरूप ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५१
📿 वेदा नकळे पार श्रुति
451.
वेदा नकळे पार श्रुतिसी गव्हार | उपनिषदा सार नकळेचि ॥१॥
तो हरि गोकुळी वसुदेवा कुळी | यशोदेजवळी बाळकृष्ण ॥२॥
ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती | शास्त्रांसी तो गति नकळेचि ॥३॥
योग्यांचे चिंतन मुनीचे अंजन | शेषादिका ध्यान सदा ज्यांचे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५१
📿 पंढरीसी जा रे आधी ।
451.
पंढरीसी जा रे आधी । कृपानिधी तो पाहा ॥१॥
संसाराअचीअ तुटेल बेडी । उबगे घडी पंढरीये ॥२॥
गाताती भाळे भोळे । प्रेमे सांवळे नाचत ॥३॥
कुंचे पताका गरुड टके । वैष्णवा निके मेळ मिळे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५१
📿 निरोप मागावया संत ।
451.
निरोप मागावया संत ।
आले राउळा समसत ॥१॥
चरणी ठेऊनिया माथा ।
विनविती पंढरिनाथा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५२
📿 जयाते पाहता परतला आग
452.
जयाते पाहता परतला आगमु ।
निगमा नाकळे दुर्गुमु ।
सिद्ध साधक निरूते वर्मु ।
न पडे ठायी सर्वथा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५२
📿 ब्रह्मचर्यी जया जाली
452.
ब्रह्मचर्यी जया जाली निर्वासना ।
तेथोनिच जाणा मोक्ष तया ॥१॥
निर्वासना मूळ असावी नेटकी ।
आश्रमी विवेकी वेद बोले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५२
📿 नाम आठविता सद्गदित क
452.
नाम आठविता सद्गदित कंठी । प्रेम वाढे पोटी ऐसे करी ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्री । अष्टांग ही गात्री प्रेम तुझे ॥धृपद॥
सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी । गाऊ निशिदिनी नाम तुझे ॥२॥
तुका म्हणे दुजे न करी कल्पांती । सर्वदा विश्रांती संतापायी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५२
📿 सहस्त्र तोंडाचा तोहि
452.
सहस्त्र तोंडाचा तोहि भागियेला | अंत नाही ज्याला गुणालागी ॥१॥
तेथे मी पामर काय बोलू वाणी | तुझी कीर्ति जनी काय कैसी ॥२॥
यथामति काही बोलियलो बोलु | तोचि हा विठ्ठलु नामा म्हणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५२
📿 पंढरीसी जा रे सदा ।
452.
पंढरीसी जा रे सदा । पुंडलीक वरदा येथे उभा ॥१॥
तुम्ही कारा हाचि नेम । धरा संतसमागम ॥२॥
देतो सकळांसि मोक्ष । न लगी ध्येय ध्यान लक्ष ॥३॥
जनार्दने शिकविले । एका जनार्दनी लाधले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५२
📿 नेऊनिया बळी ।
452.
नेऊनिया बळी ।
जेणे घातला पाताळी ॥१॥
तो हा देवांचाहि देवो ।
विटे उभा ठेवूनी पावो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५३
📿 जन्मोजन्मीच्या सायास
453.
जन्मोजन्मीच्या सायासी ।
विठ्ठल लाधला पुंडलिकासी ॥१॥
पूर्वी पुण्य केले वो माये ।
विटे लाधले या विठोबाचे पाये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५३
📿 वेदाचाआधार सर्वहीआश्
453.
वेदाचाआधार सर्वहीआश्रमा ।
वेदासी उपमा नाही खरी ॥१॥
यालागी प्रमाण सर्वाअंसी हा वेद ।
आश्रमासी वंद्य महावाक्य ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५३
📿 जननी हे जाणे बाळकाचे
453.
जननी हे जाणे बाळकाचे वर्म । सुख दुःख धर्म जे जे काही ॥१॥
अंधापुढे जेणे दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥धृपद॥
शरणागता जेणे घातले पाठीशी । तो जाणे तेविशी राखो तया ॥२॥
कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५३
📿 अगणित गुण वर्णिती पु
453.
अगणित गुण वर्णिती पुराणे | पंढरीचे राणे ख्याती जगी ॥१॥
अलक्ष भेटी लक्षिताची नाही | पुंडलिके कांही तप केले ॥२॥
युगे गेली अठ्ठावीस ते अझुनी | उभा चक्रपाणि राहिलासी ॥३॥
वेद म्हणती नेति पुराणे ते किती | भांबावल्या मती म्हणे नामा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५३
📿 गाती नाचती आनंदे वैष
453.
गाती नाचती आनंदे वैष्णवजन । ते दाखवा भुवन पंढरी ॥१॥
आदरे येती वारकारी । नानापरी संवगडे ॥२॥
नरनारी एके ठायी । पाहतीं वीठ्ठल रखुमाई ॥३॥
सुख अदभुत विश्रांती । एका जनार्दनी धरा चित्ती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५३
📿 निर्गुण निरामय संचले
453.
निर्गुण निरामय संचले ।
गुणीतीत रुपा आले ।
परात्पर ते सगुण झाले ।
उभे ठाकले विटेवरी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५४
📿 आनु नेणे काही ।
454.
आनु नेणे काही ।
विठ्ठलु स्मरे देहभावी ॥१॥
पुंडलिका हे चिंतन ।
म्हणोनी विटेवरी हे ब्रह्म ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५४
📿 वेदाचा अर्थ घेई तदुप
454.
वेदाचा अर्थ घेई तदुपरि दुसरे त्याच मार्गे प्रवाही ।
जाणे वस्तूसि देही निरखुनी मग मही हिंड तू सर्व पाही॥
भावार्थे नाम गाई गुरूपद हृदयी सर्वदा त्यासि ध्याई ।
नाही ते वस्तु ठायी बहेणि म्हणतसे सौरसे तेथ जाई ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५४
📿 नका वाटू मन विधिनिषे
454.
नका वाटू मन विधिनिषेधासी । स्मरावा मानसी पांडुरंग ॥१॥
खादलिया अन्ना मासी बोलो नये । अवघेचि जाये एका घासे ॥धृपद॥
जोडी होते परी ते बहु कठिण । करिता जतन सांभाळावे ॥२॥
तुका म्हणे येथे न मना विषाद । निंबेविण व्याध तुटो नये ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५४
📿 खोळ बुंथीचा तो देवकी
454.
खोळ बुंथीचा तो देवकीनंदन | उभा देखिला तो गे बाई ॥१॥
नंदाचा नंदनु संतांचे जीवन | उभा देखिला तो गे बाई ॥२॥
कामिनीमनोहर नामया दातार | उभा देखिला तो गे बाई ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५४
📿 संसारा आलिया जा रे प
454.
संसारा आलिया जा रे पंढरीपुरा । पाडुरंग सोयरा पहा आधी ॥१॥
पुरती मनोरथ इच्छिले ते सांचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥२॥
करिता स्नान भीमरथी तटीं । पुंडलीक दृष्टी लक्षुनियां ॥३॥
वेणुनाद गया पिडंदान फळ । गोपाळपूर सकळ देखिलिया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५४
📿 पुजूनिया पुंडलिके ।
454.
पुजूनिया पुंडलिके ।
चरण अवलोकिले निके ॥१॥
तोहि जाणतो महिमान ।
ह्रदयी कवळिले म्हणवून ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५५
📿 तळवे तळवटी असे ।
455.
तळवे तळवटी असे ।
विटे फावले अनायासे ॥१॥
आम्हा न संडवे पंढरी ।
विठ्ठलराज विटेवरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५५
📿 वेदार्थ-विचारे आत्मा
455.
वेदार्थ-विचारे आत्मा दुरी नाही ।
सर्वांतरी पाही वोतप्रोत ॥१॥
परी ते नेणती कल्पनेचे योग ।
इंद्रियांच्या संगे भ्रांत झाले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५५
📿 नको होऊ देऊ भावी अभा
455.
नको होऊ देऊ भावी अभावना । याचि नावे जाणा बहु दोष ॥१॥
मेघवृष्टि येथे होते अनिवार । जिव्हाळ्या उखर लाभ नाड ॥धृपद॥
उत्तमा विभागे कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥२॥
तुका म्हणे जिणे बहु थोडे आहे । आपुलिया पाहे पुढे बरे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५५
📿 फेडूनि पीतांबर उभा द
455.
फेडूनि पीतांबर उभा दिगंबर | कटी ठेवूनि कर वाळवंटी ॥१॥
मोतियाचे हार सांडूनि रत्नकीळा | तुळशीच्या माळा गळा घाली ॥२॥
पर्यक शयन शेषांचे आसन | सांडूनि निजभुवन उभे येथे ॥३॥
सांडूनिया भक्ति सनकादिकी प्रेमा | कलियुगी नामा आवडला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५५
📿 जन्मासी येऊनि पहा रे
455.
जन्मासी येऊनि पहा रे पंढरी । विठ्ठल भीमातीरीं उभा असे ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । आलियांसी तारी दरुशने एका ॥२॥
पंचक्रोशी प्रानी पुनीत पै सदा । ऐशी ही मर्यादा पंढरीची ॥३॥
एका जनार्दनी कीर्तनगजर । ऐकता उद्धार सर्व जीवां ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५५
📿 कणचि आले हे घनदाट ।
455.
कणचि आले हे घनदाट ।
कणिसे ताट नाढळे ॥१॥
लुंगी भुस नाही कोंडा ।
पीक बहमांडा न समाये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५६
📿 क्षीरसागरीचे निजरूपड
456.
क्षीरसागरीचे निजरूपडे ।
पाहता पारखिया त्रिभुवनी न संपडे ।
ते उभे आहे वाडेकोडे ।
पुंडलिकाचे आवडी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५६
📿 आत्म्यावरी जग विस्ता
456.
आत्म्यावरी जग विस्तारले सर्व ।
विश्वामाजी ठाव असे तया ॥१॥
पहा अनुभवे आपुलिया मनी ।
ब्रह्मी ब्रह्मापणी ब्रह्मानंदे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५६
📿 त्याग तव मज न वजता क
456.
त्याग तव मज न वजता केला । काहीच विठ्ठला मनातूनि ॥१॥
भागलिया आला उबग सहज । न धरिता काज झाले मनी ॥धृपद॥
देह जड झाले ॠणाच्या आभारे । केले संवसारे कासावीस ॥२॥
तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारले ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५६
📿 पुंडलिकाचे भेटी भिवर
456.
पुंडलिकाचे भेटी भिवरेचे तटी |परब्रह्म उभे वाळुवंटी गे माये ॥१॥
उभा वीटेवरी कर ठेवूनि कटावरी |उभा भीमातीरी जगजेठी गे माय ॥२॥
विठ्ठल कान्हा चरणी वांकी तोडर |कांसे पीतांबर पदकलीळा मनोहर गे माय ॥३॥
कान्हा विठ्ठल कान्हा प्रसन्न वदन थोरा | जो आथी करुणाकरा हरि नामया दातारा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५६
📿 हरी म्हणोनी टाकी पाय
456.
हरी म्हणोनी टाकी पाय । तया लाभा उणें काय ॥१॥
नेमे जाती पंढरीसी । आषाढी कार्तिकी वारीसी ॥२॥
घनदाट पिकली पेठ । आले चोखट ग्राहीक ॥३॥
वस्तु अमोल विटेवरी । एका जनार्दनी अंगिकरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५६
📿 पांडुरंगा न पाहती ।
456.
पांडुरंगा न पाहती ।
ज्ञान गाडेवर बोलती ॥१॥
त्यांचे न व्हावे दर्शन ।
दूवा दूषिती म्हणऊन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५७
📿 नेणो ब्रह्ममार्ग चुक
457.
नेणो ब्रह्ममार्ग चुकले ।
उघडे पंढरपुरा आले ।
भक्ते पुंडलिके देखिले ।
उभे केले विटेवरी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५७
📿 काष्ठामाजी अग्न जैसा
457.
काष्ठामाजी अग्न जैसा असे गुप्त ।
आत्मा सर्वगत तैसा असे ॥१॥
विवेके करूनी पडिजेल ठायी ।
महावाक्य पाही शोध लागे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५७
📿 मढे झाकुनिया करिती प
457.
मढे झाकुनिया करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहो ॥१॥
तयापरी करी स्वहित आपुले । जयासी फावले नरदेह ॥धृपद॥
ओटीच्या परिस मुठीच्या ते वाढे । यापरि कैवाडे स्वहिताचे ॥२॥
नाही काळसत्ता आपुलिये हाती । जाणते हे गुंती उगविती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५७
📿 देहुडा चरणु वहातसे व
457.
देहुडा चरणु वहातसे वेणु | गोपिकारमणु स्वामी माझा ॥१॥
देखिला गे माय यमुनेचे तीरी | हात खांद्यावरी राधिकेच्या ॥२॥
गुंजावर्ण डोळे शिरी वावर झोटी | मयूरपिच्छ वेटि शोभतसे ॥३॥
सगुण मेघ: श्याम लावण्या सुंदर | नामया दातार केशवराज ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५७
📿 निर्धारीतां सुख पंढर
457.
निर्धारीतां सुख पंढरीसी आहे । म्हणोनि उभारिती बाह्मा वेदशास्त्रे ॥१॥
साधन पसारा न करी सैरावैरा । जाया तु निर्धारा पंढरीये ॥२॥
एका जनार्दनी धरुनी विश्वास । विठोबाचा दास होय वेगे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५७
📿 भवसिंधु तरावया ।
457.
भवसिंधु तरावया ।
भजावे राया पंढरीच्या ॥१॥
करील तोचि तरणोपावो ।
दाविल ठावे निजाचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५८
📿 हे नव्हे आजिकालिचे ।
458.
हे नव्हे आजिकालिचे ।
युगा अठ्ठाविसांचे ।
मज निर्धारिता साचे ।
हा मृत्युलोकुचि नव्हे ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५८
📿 रविसि उदय होता वर्तत
458.
रविसि उदय होता वर्तती लोक कर्मे ।
करि सकळ जनांची पुण्यपापे कुकर्मे॥
न लगती परि सूर्या जाण कर्मे तयांची
म्हणत बहेणि तैसी या स्थिती आत्मयाची ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५८
📿 राजा चाले तेथे वैभव
458.
राजा चाले तेथे वैभव सांगाते । हे काय लागते सांगावे त्या ॥१॥
कोणी कोणा तेथे न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥धृपद॥
शृंगारिले नाही तगोयेत वरी । उमटे लौकरि जैसे तैसे ॥२॥
तुका म्हणे घरी वसे नारायण । कृपेची ते खुण दिसो येते ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५८
📿 हरि भोळा हरि भोळा |
458.
हरि भोळा हरि भोळा | आम्ही डोळा पाहिला ॥१॥
हरि श्रेष्ठ हरि श्रेष्ठ | आम्हा कष्ट नाही ते ॥२॥
हरि उदार हरि उदार | आम्हा धीर होईना ॥३॥
नामा म्हणे हरि डाटा | आम्हा दासा रक्षितो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५८
📿 स्वहित हित विचारीं म
458.
स्वहित हित विचारीं मानसी । का रे नागविसी देहासी या ॥१॥
साव्धान हो पाहे बा पंढरी । धरी तु अंतईं संतसंग ॥२॥
नको पंडुं फेरी चौर्यायंशीं आवृत्ती । गाय तुं किर्ती वैष्णवांची ॥३॥
तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरी ऐसा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५८
📿 मुगुट कुंडले वनमाळा
458.
मुगुट कुंडले वनमाळा ।
केशर कस्तुरीचा टिळा ॥१॥
विठो देखिला म्या दिठी ।
अंगी चंदनाची उटी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४५९
📿 पंढरीचे वाटे अनंत घड
459.
पंढरीचे वाटे अनंत घडती याग ।
वैकुंठीचा मार्ग तेणे संगे ॥१॥
जप तप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म ।
हे जाणताती वर्म संतजन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४५९
📿 चुंबक चालवी लोखंडा प
459.
चुंबक चालवी लोखंडा प्रत्यक्ष ।
क्लेश हे तयास जेवी नाही ॥१॥
तेवी आत्मा सर्व करोनि अकर्ता ।
पाहे तू स्वचित्ता वोळखोनि ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४५९
📿 वत्स पळे धेनु धावे प
459.
वत्स पळे धेनु धावे पाठीलागी । प्रीतीचा तो अंगे आविर्भाव ॥१॥
शिकविले काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकाच्या ॥धृपद॥
सांडिले ते नाही घेत मेळविता । म्हणऊनि लाता मागे सारी ॥२॥
तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे हा गे अनुभव ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४५९
📿 अधरीचे अमृत सेविसी ए
459.
अधरीचे अमृत सेविसी एकला | काय पुण्य केले नेणो पावया ॥१॥
तुळशीच्या माळा शोभति गोपाळा | तयाहूनि आगळा पावया तू ॥२॥
सोळासहस्त्र गोपी बोलतील प्रौढी | अधरींची गोडी नेली तुवा ॥३॥
विष्णुदास नामा केशवी सौरस | उद्धरिला वंश पावया तुवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४५९
📿 करा करा लागपाठ । धरा
459.
करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट ।
पुंडलिकांची पेठ । सोपी आहे सर्वांसी ॥१॥
नाही कोठे गोवा गुंती । दुजा नको रे सांगाती ।
एका चित्तवृत्ति । दृढ करी मानसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४५९
📿 माथा मोरपिसे कुंडले
459.
माथा मोरपिसे कुंडले गोमटी ।
कस्तुरी लल्लाटी रेखिली दिसे ॥१॥
ह्रदयी निकेतन श्रीवत्सलांछन ।
मूर्ती विराजमान शंख चक्र ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४६०
📿 कल्पना वृक्षासी देखि
460.
कल्पना वृक्षासी देखिले ।
चिंतामणीसी चिंतिले ।
कामधेनुसी अपेक्षिले ।
जीण्या जिवविले तेचि हरिरुप पंढरिये ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४६०
📿 पद्मपत्र जैसे उदकात
460.
पद्मपत्र जैसे उदकात असोन ।
लिप्त नव्हे जाण जेणेपरी ॥१॥
तैसाची तो आत्मा विश्वाकार भासे ।
ज्ञानियासी दिसे वेगळाची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४६०
📿 देवाच्या संबंधे विश्
460.
देवाच्या संबंधे विश्वचि सोयरे । सूत्र ओढे दोरे एका एक ॥१॥
आहाच हे नव्हे विटायासारिखे । जीव जीवनी देखे सामावले ॥धृपद॥
आणिकाचे सुख दुःख उमटे अंतरी । एथील इतरी तेणे न्याये ॥२॥
तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती । शोभाचि पुढती विशेषता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४६०
📿 वैकुंठ ते घर | सांडू
460.
वैकुंठ ते घर | सांडूनिया निरंतर ॥१॥
तो हा पुंडलिका द्वारी | उभा कर कटावरी ॥२॥
क्षीर सागरींची मूर्ती | तो हा रुक्मिणीचा पती ॥३॥
नये योगियांचे ध्यानी | छंदे नाचतो कीर्तनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४६०
📿 श्रीपांडुरंगाचे दरुश
460.
श्रीपांडुरंगाचे दरुशन । वास पंढरीसी जाण ।
कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्यची ॥१॥
हाचि माना रे विश्वास । धरा संतवचनीं निजध्यास ।
मोक्षाचा सायास । न लगे कांही अनुमात्र ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४६०
📿 अष्टहि दिग्गज आणि दि
460.
अष्टहि दिग्गज आणि दिकपाळ ।
थावरिले कुळाचळ निज सत्ता ॥१॥
तो हा परमात्मा श्रीहरी ।
येऊनि इटेवरी ठाकला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४६१
📿 जोडनिया जोडी जेणे हु
461.
जोडनिया जोडी जेणे हुंडारिली दूरी ।
भिकेची आवडी नावडे पंढरी ॥१॥
करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे ।
सदैव सभाग्य तोचि हरिरंगी नाचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४६१
📿 माया कोठूनिया जालीसे
461.
माया कोठूनिया जालीसे निर्माण ।
इचे अधिष्ठान वोळखावे ॥१॥
सात्त्विक बुद्धीने सद्गुरूची कृपा ।
वेदार्थ घेई पा विवेकसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४६१
📿 अवघा वेचलो इंद्रियां
461.
अवघा वेचलो इंद्रियांचे ओढी । जाले ते ते घडी निरोपिले ॥१॥
असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्या भार उतरिला ॥धृपद॥
कायावाचामने तोचि निजध्यास । एथे जालो ओस भक्तीभावे ॥२॥
तुका म्हणे करू येईल धावणे । तरि नारायणे सांभाळावे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४६१
📿 अनंता श्रीधरा गोविंद
461.
अनंता श्रीधरा गोविंदा केशवा } मुकुंदा माधवा नारायणा ॥१॥
देवकीतनया गोपिकारमणा | भक्त उद्धरणा त्रिविक्रमा ॥२॥
मकर कुंडले श्रवणी शोभती | एकावळी दीप्ति तेजे भारी ॥३॥
नामा म्हणे तुझा नकळेचि पार | भजो निरंतर सर्वकाळ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४६१
📿 न लगे करा खटपट । धरा
461.
न लगे करा खटपट । धरा पंढरीची वाट । विठ्ठलीं बोभाट । अठ्ठहास्य करावा ॥१॥
धरा संतांचा समागम । मुखी उच्चारा रे नाम । जाते क्रोध आणि काम । दिगंतरीं पळोनीं ॥२॥
आशा मनशांचे काज । सहज दुर होते निज । घडता सहज । विठ्ठलचेअं दरुशन ॥३॥
एका जनार्दनी मन । राखा पायी ते नेमून । काया वाचा शरण तया पदी होईजे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४६१
📿 मिरवी अंगी अवतार लेण
461.
मिरवी अंगी अवतार लेणी ।
विराजित कीर्ति भूषणी ।
मुगुट कंडले कोटी तरणी ।
तैसे तेज बंबाळ ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४६२
📿 वाजतसे बोंब कोण्ही न
462.
वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानी ।
हरिहरि न म्हणती तया थोर जाली हानी ॥१॥
उठा उठा जागा पाठी भय आले मोठे ।
पंढरी वांचूनी दुजा ठाव नाही कोठे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४६२
📿 स्फूर्तिरूप तेथे माय
462.
स्फूर्तिरूप तेथे मायेचा उद्भव ।
प्रपंचासी ठाव मूळ तेथे ॥१॥
ब्रह्म एकले ते गमेना म्हणोनि ।
स्फूर्ती हे चिंतनी स्वसंवेद्य ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४६२
📿 राहो आता हेचि ध्यान
462.
राहो आता हेचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवे । देहभावे पूजीन ॥धृपद॥
होईल येणे कळसा आले । स्थिरावले अंतरी ॥२॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पाया पडो द्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४६२
📿 उभा विटेवरी भक्तांचा
462.
उभा विटेवरी भक्तांचा कैवारी।भेटाया उभारी दोन्ही बाह्या ॥१॥
गुण दोष त्याचे न पोहचि डोळा |भेटे वेळोवेळा केशिराज ॥२॥
ऐसा दयावंत घेत समाचार |लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥
सर्वांलागी देतो समान दरुशन |उभा तो आपण सम पायी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४६२
📿 तरीच यावे जन्मा । ठे
462.
तरीच यावे जन्मा । ठेवा पांडुरंगी प्रेमा ॥१॥
नाही तरी श्वानसुकर । जन्मा आले ते अपार ॥२॥
नेणे पंढरीची वारी । जन्मा आलातो भिकारी ॥३॥
संतसेवा दया नेणे । जन्मा आला तो पाषाण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४६२
📿 आरुपी रुपाचा विस्तार
462.
आरुपी रुपाचा विस्तार ।
अगुणी गुणांचा श्रृंगार ।
अनामी नामांचा बडिवार ।
सहस्त्रावरी विराजला ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 मागणे
›
📿 अभंग क्र. ४६३
📿 द्वारकेच्या राया । ब
463.
द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥1॥
मतिमंद तुझी दासी । ठाव देंई चरणांपासी ॥2॥
तुझे पदरी पडले खरी । आता सांभाळ करी हरी ॥3॥
न कळे हरीची करणी । म्हणे नामयाची जनी ॥4॥.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४६३
📿 शरीर हे स्थळ ।
463.
शरीर हे स्थळ ।
मळानिर्मळाचे मूळ ।
पाहोनी चौखाळ ।
आदिपुरुषासी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४६३
📿 सत्य म्हणो जरी मायेस
463.
सत्य म्हणो जरी मायेसी तत्त्वता ।
तरीं निश्चितार्था असत्यची ॥१॥
न कळेचि पार इचा विधितिया ।
वेदान्ताही ठाया नये खरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४६३
📿 आदि मध्य अंत दाखविले
463.
आदि मध्य अंत दाखविले दीपे । तो आपणापे यत्न बरा ॥१॥
दास्यत्वे दाविले धन्याचे भांडार । तोंतो नव्हे सार एथुनिया ॥धृपद॥
उपायाने सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आले ॥२॥
तुका म्हणे दृष्टि सकळाचे शिरी । वचनेचि करी बैसोनिया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४६३
📿 सत्यसंकल्पाचा कर्ता
463.
सत्यसंकल्पाचा कर्ता जो विश्वाचा | अनाथा जीवांचा मायबाप ॥१॥
पुंडलिके तया आणिले रंगणी | कटावरी पाणि ठेवूनिया ॥२॥
अणुरेणुमाजि व्यापूनी राहिला | आनत्व जाहला एकलाचि ॥३॥
नामा म्हणे वेद त्यालागी बोभाय | जोडोनिया पाय ठाके उभा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४६३
📿 करुनी निर्धारा । जाय
463.
करुनी निर्धारा । जाय जाय पंढरपुरा ॥१॥
उणें पडों नेदी काही । धावें देव लवलाही ॥२॥
संकट कांही व्यथा । होऊं नेदी सर्वथा ॥३॥
शंख चक्र घेउनी करी । एका जनार्दनी घरटी करी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४६३
📿 ध्यान राहिले मानसी ।
463.
ध्यान राहिले मानसी ।
सर्वकाळ दिवानिशी ॥१॥
जेणे धरिले कटी कर ।
रुपे सावळा सुकुमार ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४६४
📿 विवेक नदीये बैसोनी ।
464.
विवेक नदीये बैसोनी ।
सांगड सत्त्वाची बांधोनी ॥१॥
एक पंढरी वैकुंठ ।
येर वाउगे बोभाट ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४६४
📿 सत्यासत्यातीत मायेसी
464.
सत्यासत्यातीत मायेसी म्हणता ।
आलीसे तत्वता नागवण ॥१॥
बीजेविण वृक्ष की द्विजेविण पक्ष ।
वळेविण दक्ष केवी घडे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४६४
📿 साठविला वाण । पैस घा
464.
साठविला वाण । पैस घातला दुकान ॥१॥
जे ज्या पाहिजे जे काळी । आहे सिद्धचि जवळी ॥धृपद॥
निवडिले साचे । उत्तममध्यमकनिष्ठाचे ॥२॥
तुका बैसला दुकानी । दावी मोला ऐसी वाणी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४६४
📿 तुझिया सत्तेने वेदास
464.
तुझिया सत्तेने वेदासी बोलणे | सूर्यासी चालणे तुझिया बळे ॥१॥
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी | वर्म हे जाणूनि शरण आलो ॥२॥
मेघांनी वर्षावे पर्वती बैसावे | वायूने विचरावे सत्ते तुझे ॥३॥
नामा म्हणे काडी न हाले साचार | प्रभू तू निर्धार पांडुरंगा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४६४
📿 पंचक्रोशी पाप नसे ।
464.
पंचक्रोशी पाप नसे । ऐसा देव तेथे वसे ॥१॥
चला चला पंढरपुरा । दीन अनाथांच्या माहेरा ॥२॥
चंद्रभागे करिता स्नान । होती कोटी कुळें पावन ॥३॥
एक जनार्दनी भेटी । तुटे जन्ममरण गांठी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट