वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 248. नरहरी मेहता

स्वति श्रीनगर द्वारक

🙏 4. संत नामदेव · ABH-083916 · अभंग क्र. २२६५

2265.
स्वति श्रीनगर द्वारकापुरीचे । श्रीरणछोडजीचे सेवेमधे ॥१॥
दासानुदास चरणरज साचार । विनंती अपार लिहितसे ॥२॥
यात्रेकरी याने राखिले रुपये । तीन शते साठ द्यावे यांसी ॥३॥
ऐसे पत्र दिले हुंडी ते लिहून । नगरीचे बाम्हण पाचारिले ॥४॥
बोलावुनी त्यांसी वांटी दक्षिणेसी । यात्नेकरी यासी विस्मय वाटे ॥५॥
म्हणती धर्मात्मा सुशील मेहता । दानशूर दाता जगी खरा ॥६॥
घेवोनी द्रव्याते दिले ब्राम्हणांसी । लिहुनी हुंडीसी दिधले तेणे ॥७॥
नामा म्हणे धन्य नरसी मेहती । ऋणी देव होता हुंडी भरी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग