वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

यम सांगे दूता तुम्हा

🙏 3. संत तुकाराम · ABH-078096 · अभंग क्र. २२४९

2249.
यम सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता । जेथे होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊ तया गांवा नामधारकाच्या शिवा । सुदर्शन येवा घरटी फिरे भोवती ॥धृपद॥
चक्र गदा घेउनी हरी उभा असे त्यांचे द्वारी । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥
ते बळयाशिरोमणी हरीभक्ती ये मेदिनी । तुका म्हणे कानी यम सांगे दूतांचे ॥३॥

अर्थ :
यम आपल्या दूतांना सांगतो की मी तुम्हाला जेथे जेथे सांगेल तेथे तेथे तुम्हाला जाण्याची सत्ता नाही. ती जागा म्हणजे जेथे हरिकथा चालू आहे आणि जेथे नेहमी हरिनाम चालू असते तेथे तुम्हाला जाण्याचा अधिकारच नाही. अशा वैष्णवांच्या गावाला तर काय त्या गावाची हृद्द जेथे संपते त्या शिवेपर्यंत सुद्धा जाऊ नका. कारण त्या गावाच्या भवताली भगवंताचे सुदर्शन चक्र सुरक्षा कवच म्हणुन फिरत असते. हरी खुद्द त्यांच्या द्वारात शंखचक्र घेऊन उभे असतात. अशा नामधारक वैष्णवांच्या घरी लक्ष्मी रिद्धी सिद्धी सहित काम करणारी दासी म्हणून कामाला असते. तुकाराम महाराज म्हणतात या पृथ्वीतलावर सर्वात बलवानाचेही शिरोमणी हरिभक्त आहेत. अशी कीर्ती हरी भक्तांची आणि नामधारकाची यम आपल्या दूतांना कानात सांगतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग