संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६३०
📿 येई हृषिकेशी दिव्य र
630.
येई हृषिकेशी दिव्य रूप दिसे | मन हे उल्हासे भेटीलागी ॥१॥
त्राहे हृषिकेशी नामे तरले संभ्रमे | नित्य रामनामे भवसिंधु ॥२॥
आराधने धन ऋषीसी संपूर्ण | नाम कोटी यज्ञ जाले तया ॥३॥
पावन हृषिकेशी हेंचि ध्यान मन | नाम सनातन हृषिकेशी ॥४॥

🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६३१
📿 जळो माझी ऐसी बुद्धी
631.
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधी । आवडी हे विधि । निषेधीच चांगली ॥१॥
तू स्वामी मी सेवक । उंच पद निच एक । ऐसे करावे कौतुक । नको करू खंडणा ॥धृपद॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता तो निराळा । तेणे गोडी निवडिली ॥२॥
हिरा शोभला कोंदणे । अळंकारी मिरवे सोने । एक असता तेणे । काय दुजे जाणावे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६३१
📿 आजी नीलवर्ण कुसुमसम
631.
आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी ॥१॥
अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । भोंवाता शोभे संग संतजन ॥२॥
निळीय भासत तो रंग दिसत । शामंकित शोभत विठ्ठल देव ॥३॥
एका जनार्दनी नीलवर्ण रुपडें । पाहता चहुकडे कोंदाटले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६३२
📿 मनी वसे त्याचे आवडे
632.
मनी वसे त्याचे आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसे ॥१॥

जातीचे ते झुरे येर येरासाठी । वियोगे ही तुटी नेघे कधी ॥धृपद॥
भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर मागुताले ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६३२
📿 येई वो दामोदरे पवित्
632.
येई वो दामोदरे पवित्र हे करे | मना हो नावरे प्रेमलोट ॥१॥
पाहे कृपादृष्टी साहे जगजेठी | पूर्ण पान्हा घोटी ऐसे करी ॥२॥
दामोदरे नाम मदन परिकरे | हाचि वो विचार मने केला ॥३॥
येई तू निर्धारे पावे तू झडकरी | येई वो लवकरी दामोदरे ॥४॥

📿 अभंग क्र. ६३३
📿 येई तू कृपाळे संकर्ष
633.
येई तू कृपाळे संकर्षण माटे | पवित्र पूर्णभरिते गुणनिधि ॥१॥
त्राहे त्राहे वेगी पावे वो झडकरी | ब्रीद चराचरी वर्णिताती ॥२॥
संकर्षण गंगा सर्वांगी तू असे | जनी वनी दिसे रूप तुझे ॥३॥
कटावरी कर सांवळी सुंदर | मनाचा विचार इच्या चरणी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६३३
📿 येई तू कृपाळे संकर्ष
633.
येई तू कृपाळे संकर्षण माटे | पवित्र पूर्णभरिते गुणनिधि ॥१॥
त्राहे त्राहे वेगी पावे वो झडकरी | ब्रीद चराचरी वर्णिताती ॥२॥
संकर्षण गंगा सर्वांगी तू असे | जनी वनी दिसे रूप तुझे ॥३॥
कटावरी कर सांवळी सुंदर | मनाचा विचार इच्या चरणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६३४
📿 कोठे देवा आले अंगा थ
634.
कोठे देवा आले अंगा थोरपण । बरे होते दीन होतो तरी ॥१॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीने नाम गाईन ते ॥धृपद॥
न पुसते कोणी कोठे ही असता । समाधान चित्ताचिया सुखे ॥२॥
तुका म्हणे जन अव्हेरिते मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६३४
📿 स्वर्गासुख आम्ही मान
634.
स्वर्गासुख आम्ही मानु जैसा ओक । सांडुनियां सुख पंढरीचें ॥१॥
पंढरीं पावन चंद्रभागा स्थान । आहे तो निधान विठ्ठल देव ॥२॥
मध्यस्थळीं राहे पुंडलीक मुनी । तयाचे दरुशनी पातक हरे ॥३॥
दोनी कर कटी उभा जगजेठी । एका जनार्दनी भेटी सुख होय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६३५
📿 चतुर मी जालो आपुल्या
635.
चतुर मी जालो आपुल्या भोवता । भावेविण रिता स्फुंद अंगी ॥१॥
आता पुढे वाया जावे हे ते काई । कामक्रोधे ठायी वास केला ॥धृपद॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुद्धी ॥२॥
तुका म्हणे करू उपदेश लोका । नाही जालो एका परता दोषा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६३६
📿 धन्य ते संसारी । दया
636.
धन्य ते संसारी । दयावंत जे अंतरी ॥१॥
येथे उपकारासाठी । आले घर ज्या वैकुंठी ॥धृपद॥
लटिके वचन । नाही देही उदासीन ॥२॥
मधुरा वाणी होटी । तुका म्हणे वाव पोटी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६३६
📿 आगमी निगमीं पाहता तो
636.
आगमी निगमीं पाहता तो सुगमीं । वेदादिकां दुर्लभ आम्हा तो सुगमीं ॥१॥
नवचे वाचे बोल बोला तो वेगळा । व्यापुनी ब्रह्मांडी आहे तो उगला ॥२॥
सार मथिल कोढोनि चैत्यन्य गाभा । पाहता दिसे त्याची अनुपभ्य शोभा ॥३॥
सांकडे नव्हे भेटी जाता लवलाहे । उभारुनि बाह्मा आलिंगी लाहे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६३७
📿 येई तू पुरुषोत्तम सं
637.
येई तू पुरुषोत्तम संजीवनी रामे | योगिया विश्रामे पुरुषश्रेष्ठा ॥१॥
त्राहे मनोधर्म नाम पुरुषोत्तम | साधन आगम ऐसी माये ॥२॥
येई वो सांभाळी लवलाहे मने | जुनाट हो जुने पुरुषोत्तमे ॥३॥
तुझे नाम धन्य पुरुष हे सौजन्य | द्वैत हे अभिन्न अद्वैत हे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६३७
📿 येई तू पुरुषोत्तम सं
637.
येई तू पुरुषोत्तम संजीवनी रामे | योगिया विश्रामे पुरुषश्रेष्ठा ॥१॥
त्राहे मनोधर्म नाम पुरुषोत्तम | साधन आगम ऐसी माये ॥२॥
येई वो सांभाळी लवलाहे मने | जुनाट हो जुने पुरुषोत्तमे ॥३॥
तुझे नाम धन्य पुरुष हे सौजन्य | द्वैत हे अभिन्न अद्वैत हे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६३७
📿 ऊंचा उंचपणा नीचा नीच
637.
ऊंचा उंचपणा नीचा नीचपणा । ते नाही कारण विठ्ठलभेटी ॥१॥
उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणता मुक्ती जड जीवा ॥२॥
उभारुनि बाह्मा कटी कर उभा । एका जनार्दनी शोभा विटेवरी ॥३॥
🙏 संत बहिणाबाई›📚 संत बहिणाबाई अभंग गाथा›📖 संत बहिणाबाई अभंग गाथा›📂 संत बहिणाबाई गाथा›
📿 अभंग क्र. ६३८
📿 सूर्याए निजतेज सार श
638.
सूर्याए निजतेज सार श्रुतिचे जे गूढ या सृष्टिचे ।
ज्ञानी पंडित मानभाव तपसी तत्त्वार्थ या जीविचे॥
ब्रह्मा शंकर आदि ध्यान करिती सारैक या राशिचे ।
ती ही मूर्ति भिमातिरी प्रगटली जे बीज वेदांति॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६३८
📿 कळो येते तरि का नोहे
638.
कळो येते तरि का नोहे । पडती गोवे भ्रमाचे ॥१॥
जाणताचि होतो घात । परिसा मात देवा हे ॥धृपद॥
आमिषासाठी फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥
तुका म्हणे होणार खोटे । कर्म मोठे बळीवंत ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६३८
📿 काळे ना सांवळे गोरें
638.
काळे ना सांवळे गोरें नापिवळें । वर्ण व्यक्ति वेगळें विटेवरी ॥१॥
आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद विटेवरी ॥२॥
निगुण सगुण चहु वांचावेगळा । आदि अंत पाहता डोळा न दिसे कांही ॥३॥
एका जनार्दनी देखिला तो डोळा । त्रिगुणा वेगळा विटेवरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६३९
📿 मोकळे मन रसाळ वाणी ।
639.
मोकळे मन रसाळ वाणी । याचि गुणी संपन्न ॥१॥
लक्ष्मी ते ऐशा नावे । भाग्ये ज्यावे तरि त्यांनी ॥धृपद॥
नमन ते नम्रता अंगी । नेघे रंगी पालट ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नावे । घेता व्हावे संतोषी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६३९
📿 येई वो केसरी नरसिंह
639.
येई वो केसरी नरसिंह उच्चारी | पवित्र साचारी तिही लोकी ॥१॥
नरसिंह वामन प्रल्हादरक्षण | आमुचे ते धन नाम तुझे ॥२॥
शंखचक्र करी पावे वो लवकरी | येई तू केसरी लवलाहे ॥३॥
नरसिंह हे नाम नरसिंह हे प्रेम | उत्तम उत्तम तिन्ही लोकी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६३९
📿 येई वो केसरी नरसिंह
639.
येई वो केसरी नरसिंह उच्चारी | पवित्र साचारी तिही लोकी ॥१॥
नरसिंह वामन प्रल्हादरक्षण | आमुचे ते धन नाम तुझे ॥२॥
शंखचक्र करी पावे वो लवकरी | येई तू केसरी लवलाहे ॥३॥
नरसिंह हे नाम नरसिंह हे प्रेम | उत्तम उत्तम तिन्ही लोकी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६३९
📿 जे जे देखिले ते ते भ
639.
जे जे देखिले ते ते भगले । रुप एक उरले विटेवरी ॥१॥
डोळियाची धनी पाहता पुरलीं । परी वासना राहिली चरणाजवळील ॥२॥
एका जनार्दनी विश्वास तो मनी । संतांचे चरणी सदा बैसों ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६४१
📿 करितो कवित्व म्हणाल
641.
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥धृपद॥
काय मी पामर जाणेअर्थ : भेद । वदवी गोविंद तेचि वदे ॥२॥
निमित्त मापासी बैसविलो आहे । मी तो काही नव्हे स्वामिसत्ता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६४१
📿 बळी पृष्ठी जे शोभले
641.
बळी पृष्ठी जे शोभले । ते विटेवरी देखिले ॥१॥
पुंडलीके जे ध्याइले । ते विटेवरी देखिले ॥२॥
सनकादिकी जे पाहिले । तेंविटेवरे देखिले ॥३॥
एका जनार्दनी वंदिलें । ते विटेवरी देखिले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६४२
📿 आह्मी गावे तुह्मी को
642.
आह्मी गावे तुह्मी कोणी काही न म्हणावे । ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे ॥१॥
म्हणा रामराम टाळी वाजवा हाते । नाचा डोला प्रेमे आपुलिया स्वहिते ॥धृपद॥
सहज घडे तया आळस करणे ते काई । अग्नीचे भातुके हात पाळिता का पायी ॥२॥
येथे नाही लाज भक्तीभाव लौकिक । हासे तया घडे ब्रम्हहत्यापातक ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ६४३
📿 देव घ्या कोणी देव घ्
643.
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥
देव न लगे देव न लगे । साठवणाचे रुधले जागे ॥धृपद॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करू ॥२॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल काही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६४३
📿 येई तू हरिरूपे विठ्ठ
643.
येई तू हरिरूपे विठ्ठल स्वरूपे | कळीकाळ कांपे नाम घेता ॥१॥
नामे हरि हरि त्राहे वो झडकरी | शिणलो मी भारी जननीये ॥२॥
हरिनामधन सर्व जनार्दन | हरी हे आठवण जिव्हे सदा ॥३॥
हरि हरि म्हणता हरिरूप संता | नाम हे अनंताक्षर विलसे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 चोवीस नामांचा महिमा›
📿 अभंग क्र. ६४३
📿 येई तू हरिरूपे विठ्ठ
643.
येई तू हरिरूपे विठ्ठल स्वरूपे | कळीकाळ कांपे नाम घेता ॥१॥
नामे हरि हरि त्राहे वो झडकरी | शिणलो मी भारी जननीये ॥२॥
हरिनामधन सर्व जनार्दन | हरी हे आठवण जिव्हे सदा ॥३॥
हरि हरि म्हणता हरिरूप संता | नाम हे अनंताक्षर विलसे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ६४४
📿 जे द्रौपदीनें स्मरिल
644.
जे द्रौपदीनें स्मरिलें । ते विटेवरी शोभले ॥१॥
जे अर्जुन स्मरिलें । ते विटेवरी शोभले ॥२॥
जेणे गजेंद्रा उद्धारिलें । ते विटेवरी शोभले ॥३॥
जे हनुमंते स्मरिलें । ते विटेवरी शोभले ॥४॥