संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४०८
📿 काय धर्म नीत । तुम्ह
2408.
काय धर्म नीत । तुम्हा शिकवावे हित ॥१॥
अवघे रचियेले हेळा । लीळा ब्रम्हांड सकळा ॥धृपद॥
नाम महादेव । येथे निवडला भाव ॥२॥
तुका म्हणे वेळे । माझे तुम्हा का न कळे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४०८
📿 प्रतिमाचि देवो ऐसा ज
2408.
प्रतिमाचि देवो ऐसा ज्याचा भावो । तो न करी निर्वाहो आम्हांलागीं ॥१॥
असता सबराभरित बाहेर जो अंतरी । तो संपुष्टामाझारी म्हणती देवो ॥२॥
द्वारका पंढरी देवयात्रा करी । सर्वत्र न धरी तोचि भावो ॥३॥
सुक्षेत्रीं पुण्य मा अन्यत्र ते पाप । नवल हा संकल्प कल्पनेचा मतवाद्या ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४०९
📿 भांडावे ते गोड । पुर
2409.
भांडावे ते गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥
ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटा जवळा ॥धृपद॥
हाक देता दारी । येती जवळी सामोरी ॥२॥
तुका म्हणे शिवे । मागितले हाती द्यावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१०
📿 तेरा दिवस जाले निश्च
2410.
तेरा दिवस जाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी झाले तुज ॥धृपद॥
तुजवरी आता प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४१०
📿 सर्वाभुतीं दिसे देव
2410.
सर्वाभुतीं दिसे देव । जया ऐसा अनुभव ॥१॥
तया चित्ती देव असे । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥
देव जन देव विजन । देवीं जडले तन मन ॥३॥
देव घरी देव दारी । देव दिसे व्यवहारीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१२
📿 करिसी की न करिसी माझ
2412.
करिसी की न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥
देसी की न देसी पायाचे दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाही ॥धृपद॥
बोलसी की न बोलसी मजसवे देवा । म्हणोनिया जीवा भय वाटे ॥२॥
होईल की न होय तुज माझा आठव । पडिला संदेह हाचि मज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४१२
📿 ब्रह्मी नाही कर्म ना
2412.
ब्रह्मी नाही कर्म नाही उपासना । नाही ध्येय ध्याना ठाव जेथे ॥१॥
जाणीव नेणीव भगवंती नाही । विज्ञान जे तेंहीं लया जाय ॥२॥
नामरुपा ठाव नाही जया ठायी । ज्ञेय ज्ञाता तेंही नाही जेथे ॥३॥
एका जनार्दनी आहे एकरुप । सहज स्वरुप नित्य शुद्ध ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१३
📿 ऐसा माझा कोण आहे भीड
2413.
ऐसा माझा कोण आहे भीडभार । नावाचा मी फार वाया गेलो ॥१॥
काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । ते मज राउळ कृपा करी ॥धृपद॥
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणे पडे वर्म तुझे ठायी ॥२॥
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगी एक बळ आहे सत्ता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१४
📿 साच मज काय कळो नये द
2414.
साच मज काय कळो नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥
करावे ते बरे जेणे समाधान । सेवावे हे वन न बोलावे ॥धृपद॥
शुद्ध माझा भाव होईल तुझे पायी । तरि च हे देई निवडूनि ॥२॥
उचित अनुचित कळो आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४१४
📿 साधन कांही नेणे मी अ
2414.
साधन कांही नेणे मी अबळा । शाम हे रूप बैसलेंसे डोळा ।
लोपली चंद्रसुर्याची कळा । तो माझा राम जीवांचा जिव्हाळा ॥१॥
राम हे माझे जीवींचे जीवन । पाहता मन हे माझे उन्मन ॥२॥
प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेंही मार्ग न दिसे आकाशा ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१५
📿 नाही कंटाळलो परि वाट
2415.
नाही कंटाळलो परि वाटे भय । करावे ते काय न कळता ॥१॥
जन वन आम्हा समान चि झाले । कामक्रोध गेले पावटणी ॥धृपद॥
षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळे तुझ्या ॥२॥
म्हणऊनि मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावे ते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१६
📿 वायाविण वाढविला हा ल
2416.
वायाविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघा ॥१॥
नाही ऐसा जाला देव माझ्या मते । भुकेले जेविते काय जाणे ॥धृपद॥
शब्दज्ञाने गौरविली हे वैखरी । साच ते अंतरी बिंबे चि ना ॥२॥
जालो परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४१६
📿 पहाला तो दीन हरिखाचा
2416.
पहाला तो दीन हरिखाचा आम्हा । सर्वाभुतीं अभिन्न सदा देखो श्रीरामा ॥१॥
काय सांगु गोविंदा तुझी आवडी । जनी वनी नयनी नीत नवी गोडी ॥२॥
निमिष्य जैसे वर्ष तैसे आम्हा गोडी । हरिरुप पाहता हरिखे मनबुद्धि वेडी ॥३॥
जनवनमन अवघे जाले जनार्दन । एकाएकी पाहता तेथे हारपले मन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१७
📿 न कळे तत्त्वज्ञान मू
2417.
न कळे तत्त्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातो चित्ती चरणकमळ ॥१॥
आगमाचे भेद मी काय जाणे । काळ तो चिंतने सारीतसे ॥धृपद॥
काही नेणे परि म्हणवितो दास । होईल त्याचा त्यास अभिमान ॥२॥
संसाराची सोय सांडिला मारग । दुराविले जग एका घाये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१८
📿 संसारसोहंळे भोगिती स
2418.
संसारसोहंळे भोगिती सकळ । भक्ता त्याचे बळ विटोबाचे ॥१॥
भय चित्ती धाक न मनिती मनी । भक्ता चक्रपाणि सांभाळीत ॥धृपद॥
पापपुण्य त्यांचे धरू न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावे ॥२॥
नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव त्यांचा भार सर्व वाहे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४१९
📿 देवासी अवतार भक्तांस
2419.
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहीचा विचार एकपणे ॥१॥
भक्तांसी सोहंळे देवाचिया अंगे । देव त्यांच्या संगे सुख भोगी ॥धृपद॥
देवे भक्ता रूप दिलासे आकार । भक्ती त्याचा पार वाखाणिला ॥२॥
एका अंगी दोन्ही झाली ही निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४२०
📿 पाहता पाहता वेधले मन
2420.
पाहता पाहता वेधले मन । झाले उन्मन समाधिस्था ॥१॥
ऐसा परब्रह्मा पुतळा देखिलासे डोळा । पाहिला सावळा डोळेभरी ॥२॥
तनु मन वेधले तयाचे चरणी । शरण एका एकपणे जनार्दनी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४२१
📿 वाढविले का गा । तुम्
2421.
वाढविले का गा । तुम्ही एवढे पांडुरंगा ॥१॥
काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥धृपद॥
ब्रम्हसंतर्पण । लोकी करावे कीर्तन ॥२॥
निमित्याचा धणी । तुका म्हणे नेणे कोणी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४२२
📿 आनंद अद्वय नित्य निर
2422.
आनंद अद्वय नित्य निरामय । जे का निजध्येय योगियांचे ॥१॥
ते हे समचरण साजिरे विटेवरी । पहा भीमा तिरी विठ्ठलरुप ॥धृ॥
पुराणासी वाड श्रुती नेंणती पार । ते झाले साकार पुंडलिका ॥२॥
तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळ दैवत पांडुरंग ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४२२
📿 खांबसुत्राची बाहुली
2422.
खांबसुत्राची बाहुली । सुत्राआधीन उगली ॥१॥
माझे मीपण नाही स्वतंत्र । क्रियाकर्म ते परतंत्र ॥२॥
बाहुलीये नाही स्वतंत्रता तैसा नव्हे कर्म कर्ता ॥३॥
एका एकपणाचे सूत्र । जनार्दनपायीं स्वतंत्र ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४२३
📿 वाचेचिया आळा कवळिले
2423.
वाचेचिया आळा कवळिले ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥
सुलभ झाले सुलभ झाले । जवळी आले पंढरिये ॥धृपद॥
नामरूपाचे बांधले मोटळे । एक एका वेळे सारियेले ॥२॥
तुका म्हणे वाटे चुकली वसती । उधार तो हाती आणियेला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४२३
📿 वदे तोचि कल्पित शास्
2423.
वदे तोचि कल्पित शास्त्र ते शाब्दिक । पुराणा सकळिक बाष्कळचि ॥१॥
बाहुली तो जीव सुत्रधारी तो शिव । मिथ्याचि हे भाव जग सर्व ॥२॥
येथे कैंचा मुक्त मुळींच नाही बद्ध । सर्वहि अबद्ध दिसे जे का ॥३॥
एका जनार्दनी ऐसी याची खूण । जाणे तोचि धन्य गुरुपुत्र ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४२४
📿 सवंग झाले सवंग झाले
2424.
सवंग झाले सवंग झाले । घरा आले बंदरींचे ॥१॥
आता हेवा करु सोस । भक्तीरस बहु गोड ॥धृपद॥
पाउल वेचे चिंता नाही । आड काही मग नये ॥२॥
तुका म्हणे संचिताचे । नेणे काये राहो ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४२४
📿 जेथे निरसोनिया द्वैत
2424.
जेथे निरसोनिया द्वैत म्हणताती अद्वैत । त्याहुनी अतीत स्वरुप माझे ॥१॥
ते मी लक्ष्याही लक्ष्य पराचेंही पर । जेथे वेदशास्त्रे लाजोनी गेली ॥२॥
गिळोनी अज्ञान निखळ म्हणती ज्ञान । उभयाहुनी भिन्न स्वरुप माझे ॥३॥
सच्चिदानंदा प्रतिपादिती वेद । याहुनी अगाध स्वरुप माझे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४२५
📿 तुम्ही संत मायबाप कृ
2425.
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणू ॥१॥
अवतार तुम्हा धराया कारणे । उद्धरावे जन जड जीव ॥धृपद॥
वाढविले सुख भक्ती भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी । तैसे तुम्ही जगी संतजन ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४२५
📿 देव जाला पाठींपोटी ।
2425.
देव जाला पाठींपोटी । तया नाही आटापाटी ॥१॥
जेथे जाय तेथे देव । नाही भेव सर्वथा ॥२॥
संसारासी मारुनी लाथा । केला तत्त्वता देशोधडी ॥३॥
विषयांचें ठेचिलें तोंड । मोडिलें बंड पांचाचें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४२६
📿 साचपणें देवा शरण पै
2426.
साचपणें देवा शरण पै जाती । तया वैकुंठपती विसरेना ॥१॥
जैसी कन्या दुरदेशीं एकटी । रात्रंदिवस संकटीं घोकी मायबाप ॥२॥
पतिव्रतेचें सर्व मन पतिपायीं । तैसा देव ठायींतिष्ठतसे ॥३॥
एका जनार्दनी मज हा अनुभव । जनार्दने देव दाखविला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४२७
📿 सांखळिलो प्रीती गळा
2427.
सांखळिलो प्रीती गळा । भुंके वेळा जाणोनिया ॥१॥
तुमचे मी केशीराजा । सुने या काजा पाळिलो ॥धृपद॥
आले गेले कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥
तुका म्हणे आले वारी । दुरिते दुरी नातळता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४२८
📿 जाणती हे कळा हारपोनि
2428.
जाणती हे कळा हारपोनि गेली
जाणती हे कळा हारपोनि गेली । वृत्ति मावळली तयामाजीं ॥१॥
पाहता पहाणें हारपोनि गेले । मी माझे सरलें तयामाजीं ॥२॥
अंतर बाहेरीं पाहता शेजारी । शून्याची वोवरी ग्रासियेली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४२९
📿 सुनियांची आवडी देवा
2429.
सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाही काही ॥१॥
सिकविले जवळी बैसो । जेथे असो तेथे चि ॥धृपद॥
नेदी दुजे बोलो करू । गुरुगुरु न साहे ॥२॥
तुका म्हणे कृवाळिता । अंग सत्ता संगाची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४२९
📿 सत्त्व रज तम गेले नि
2429.
सत्त्व रज तम गेले निरसोनी । दृश्याची लावणी कैशी झाली ॥१॥
गेलिआ माघारीं पाहता न दिसे । स्वतः तो प्रकाशे सदोदित ॥२॥
अंतर बाहेरीं पाहता शेजारी । प्रकाशतां अंतरी लखलख ॥३॥
एका जनार्दनी प्रकाश संपुर्ण । सर्व नारायण बिंबलासे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४३२
📿 धन वित्ते कुळे । अवघ
2432.
धन वित्ते कुळे । अवघियाने ते आगळे ॥१॥
ज्याचे नारायण गाठी । भरला हृदय संपुटी ॥धृपद॥
अवघे चि गोड । त्याचे पुरले सर्व कोड ॥२॥
तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४३३
📿 बोलावे ते आम्ही आता
2433.
बोलावे ते आम्ही आता अबोलणे । एकाचि वचने सकळांसी ॥१॥
मेघवृष्टी काही न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळे ॥धृपद॥
तुका म्हणे नाही समाधाने चाड । आपणा ही नाड पुढिलांसी ॥२॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४३३
📿 नेत्राचेनीं तेजे पोळ
2433.
नेत्राचेनीं तेजे पोळला चंडाश । नभचि नाही तेथे कैंचे अवकाश ॥१॥
रात्र हारपली पाहुं मी कोठे । दिवस रुसुनी गेला पहाता न भेटे ॥२॥
अंगाचेनी तेजे डोळा आली चवी । पाहु गेलों तंव बुडाला रवी ॥३॥
एका जनार्दनी पाहता पाहणें । रात्रंदिवस दोन्ही गेले हरपोन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४३४
📿 अधिकार तैसा करू उपदे
2434.
अधिकार तैसा करू उपदेश । साहे ओझे त्यास तेची द्यावे ॥ १ ॥
मुंगीवरि गजाचे पालाण । घालिता ते कोण कार्यसिद्धी ॥ २ ॥
#तुका म्हणे फासे वाघुरा कुर्र्हडी । प्रसंगी ते काढी पारधी तो ॥ ३ ॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४३५
📿 येणे जानें खुंटले क्
2435.
येणे जानें खुंटले क्रियाकर्म ठेले । मज माझे भेटलें आत्मरुप ॥१॥
त्यागुं ते काय भोगुं ते काय । सर्व ब्रह्मारुप पाहे कोंदाटले ॥२॥
क्रियाकर्मधर्म निखिळ परब्रह्मा । त्यागुं भोगुं तेथे केवळ भ्रम ॥३॥
एका जनार्दनी सहजीं सहज एक । एकीएक पहाता कैंचे अनेक ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४३६
📿 मागे चिंता होती आस ।
2436.
मागे चिंता होती आस । केला नास या काळे ॥१॥
तुम्ही आम्हा उदासीन । भिन्नाभिन्न वारिले ॥धृपद॥
मोहजाळे दुःख वाढे । ओढे ओढे त्यास ते ॥२॥
तुका म्हणे कोण देवा । आता हेवा वाढवी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४३९
📿 वारकरी पायापाशी । आल
2439.
वारकरी पायापाशी । आले त्यासी विनविले ॥१॥
काय काय ते आइका । विसरो नका रंकासी ॥धृपद॥
चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥२॥
तुका म्हणे संसारा । रुसलो खरा यासाठी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४३९
📿 अभेदाच्या द्वारापाशी
2439.
अभेदाच्या द्वारापाशीं । तीर्थे प्रयागादि काशीं ॥१॥
भक्तिमुक्तिचें माहेर । अभेदाचें ते घर ॥२॥
ऐसी अभेद भक्ति घडे । कामक्रोध तेथे दडे ॥३॥
एका जनार्दनी शरण । अभेद भक्ति मुख्य ज्ञान ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४४०
📿 जीवीचे का नेणा । परि
2440.
जीवीचे का नेणा । परि हे आवडी नारायणा ॥१॥
वाढवावे हे उत्तर । काही लाड करकर ॥धृपद॥
कोठे वाया गेले । शब्द उत्तम चांगले ॥२॥
तुका म्हणे बाळा । असता तात्पर्य खेळा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४०
📿 समुळ मुळी पाहता पाहण
2440.
समुळ मुळी पाहता पाहण्या उपरम 2440
समुळ मुळी पाहता पाहण्या उपरम । भोग भोक्ता तेथे सहज परब्रह्मा ॥१॥
भोगुं मी काय त्यागुं मी काय । त्याग भोग दोन्ही चैतन्य माय ॥२॥
भोग भोगितां भोग त्यागितां त्याग । दोन्हींचें निखळ अधिष्ठान अंग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४४१
📿 वोढविले अंग । आता कर
2441.
वोढविले अंग । आता करूनि घ्यावे सांग ॥१॥
काय पूजा ते मी नेणे । जाणावे जी सर्वजाणे ॥धृपद॥
पोटा आले बाळ । त्याचे जाणावे सकळ ॥२॥
तुका म्हणे हरी । वाहावे जी कडियेवरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४१
📿 देह जाईल तरी जावो रा
2441.
देह जाईल तरी जावो राहील तरी राहो । दोराचिया सर्पा जिणें मरणे न वावो ॥१॥
आम्ही जिताची मेलो जिताची मेलो । मरोनियां जालो जीवेविण ॥२॥
मृगजळाचें जळ भरले असता नाही । आटलिया तेथे कोरडे होईल काई ॥३॥
एका जनार्दनी जगाचि जनार्दन । जिणें मरणें तेथे सहज चैतन्यघन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४४२
📿 शेवटींची हे विनंती ।
2442.
शेवटींची हे विनंती । पाय चित्ती रहावे ॥१॥
ऐसे करा कृपादान । तुम्हा मन सन्निध ॥धृपद॥
भाग्याविण कैची भेटी । नव्हे तुटी चिंतने ॥२॥
तुका म्हणे कळसा आले । हे विठ्ठले परिसावे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४२
📿 पाणियाचा मासा जाला ।
2442.
पाणियाचा मासा जाला । नामरूपा नाही आला ॥१॥
ते पूर्वीच पाणी आहे । तेथे पारधी साधील काय ॥२॥
जंव पारधी घाली जाळें । तंव त्याचेंच तोंड काळे ॥३॥
एका जनार्दनी सर्वही पाणी । माशियाची कैंची खाणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४४३
📿 करूंनिया शुद्ध मन ।
2443.
करूंनिया शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥१॥
तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥धृपद॥
तेथे सरे शुद्ध साचे । अंतरीचे बीज ते ॥२॥
तुका म्हणे लवणकळी । पडता जळी ते होय ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४३
📿 मीच देवो मीच भक्त ।
2443.
मीच देवो मीच भक्त । पूजा उपचार मी समस्त ॥१॥
मीच माझी करी पुजा । मीच माझा देवो सहजा ॥२॥
हेंचि उपासनाकांडाचे सार । आगमनिगमांचे गुह्मा भांडार ॥३॥
एका जनार्दनी देव । स्वये पाहे देवाधिदेव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४४४
📿 जिकडे पाहे तिकडे देव
2444.
जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे काही ॥१॥
काय केलो एकदेशी । गुणदोषी संपन्न ॥धृपद॥
पडे तेथे तुझ्या पाया । करी वाया न वजते ॥२॥
तुका म्हणे विषमे सारी । ठाणे धरी जीवासी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४४५
📿 सरे ऐसे ज्याचे दान ।
2445.
सरे ऐसे ज्याचे दान । त्याचे कोण उपकार ॥१॥
नको वाढू ऐसे काचे । दे वो साच विठ्ठला ॥धृपद॥
रडत मागे सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥
तुका म्हणे कीर्ती वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४५
📿 सकळ गोडिये जे गोड आह
2445.
सकळ गोडिये जे गोड आहे । ते रसनाची जाली स्वये ॥१॥
आता चाखावे ते काये । जिव्हा अमृता वाकुल्या वाये ॥२॥
तया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगी निघती जिभा ॥३॥
एका जनार्दनी गोड । तया क्षण एक रसना न सोडी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४६
📿 जो जो कोणी मनी ध्याय
2446.
जो जो कोणी मनी ध्याये । तो मीचि होऊनियां राहे ॥१॥
ऐसा अनुभव बहुता । अर्जुनादि सर्वथा उद्धवा ॥२॥
एक एक सांगता गोष्टी । कल्प कोटी न सरेचि ॥३॥
शरण येता जीवेभावें । एका जनार्दनी भावे हरीसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४७
📿 साक्षीभूत आत्मा म्हण
2447.
साक्षीभूत आत्मा म्हणती आहे देही । वाया का विदेही जाहला मग ॥१॥
नानामतें तर्क करिता विचार । पापांचे डोंगर अनायासें ॥२॥
देही असोनि देव वाया का शिणती । एका जनार्दनी फजिती होती तया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४४८
📿 मागे बहुता जना राखिल
2448.
मागे बहुता जना राखिले आडणी । धावसी निर्वाणी नाम घेता ॥१॥
ऐसे ठावे झाले मज बरव्या परी । म्हणऊनि करी धावा तुझा ॥धृपद॥
माझेविशी तुज पडिला विसरु । आता काय करू पांडुरंगा ॥२॥
अझुनि का नये तुह्मासी करुणा । दुरि नारायणा धरिले मज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४८
📿 आत्मत्वाचें ठायी सर्
2448.
आत्मत्वाचें ठायी सर्व एकाकार । नाही नारीनर भेद भिन्न ॥१॥
वर्णाश्रम धर्म ज्ञाति कुलगोत । एकाकारी होत आत्मतत्त्वीं ॥२॥
सदोदित पाहे सर्वाठायीं आहे । एकाजनार्दनी सोय धरी त्याची ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४४९
📿 कळले माझा तुज नव्हे
2449.
कळले माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवू आता ॥१॥
तू काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता झाले जिणे ॥धृपद॥
पतितपावन राहिलो या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥
आता कोण करी माझा अंगीकार । कळले निष्ठुर झालासी तू ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४४९
📿 देही वाढे जों जों शा
2449.
देही वाढे जों जों शांती । तो तो विरक्ति बाणे अंगी ॥१॥
ऐसा आहे अनुभव । देही देव प्रकाशे ॥२॥
देही आत्मा परिपुर्ण । भरला संपूर्ण चौदेहीं ॥३॥
एका जनार्दनी रिता ठाव । नाही वाव पाहता जगी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४५०
📿 बहुतापुण्येंकरूनि जो
2450.
बहुतापुण्येंकरूनि जोडला नरदेह । नाही त्याचा वेवसाव घडला कांही ॥१॥
न करावे ते केले मनामागें धांवणे । परि नारायणें करुणा केली ॥२॥
आवरुनि इंद्रियें धरियेली हाती । कामक्रोधाची शांती केली सर्व ॥३॥
वाया जाये परि श्रीगुरु भेटला । एका जनार्दनी जाहला कृतकत्य ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४५२
📿 आम्ही तुझ्या दासीं ।
2452.
आम्ही तुझ्या दासीं । जरि जावे पतनासी ॥१॥
तरि हे दिसे विपरीत । कोठे बोलिली हे नीत ॥ध्रु.॥
तुझे नाम कंठी । आम्हा संसार आटी ॥२॥
तुका म्हणे काळ । करी आम्हांसी विटाळ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४५२
📿 निमाले राहिले गेले ऐ
2452.
निमाले राहिले गेले ऐसे म्हणती । वाया फजीत होती आपुल्या मुखें ॥१॥
नासलें कलेवर घेऊनिया मांडीं । वाउगे ते तोंडी बोलताती ॥२॥
स्वये आत्मज्योति जया नाही आदिअंत । तो आत्मा प्रत्यक्ष निमाला म्हणती ॥३॥
एका जनार्दनी उफराटी बोली । कैसी भ्रांती पडली त्यांचे मनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४५३
📿 आहारनिद्रे न लगे आदर
2453.
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर तेचि होय ॥१॥
परमितेविण बोलणे ते वाया । फार थोडे काया पिंड पीडी ॥धृपद॥
समाधान त्याचे तोचि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनिया ॥२॥
तुका म्हणे होय पीडा ते न करी । मग राहे परी भलतिये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४५४
📿 भूमि अवघी शुद्ध जाणा
2454.
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥
तैसे वोसपले जीव । सांडी नसता अंगी घाव ॥धृपद॥
जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥
तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४५४
📿 रामनाम स्मरे पुरुषोत
2454.
रामनाम स्मरे पुरुषोत्तम रे । सहज विद्या ज्ञेय हाही अविद्या धर्म रे ॥१॥
अहं आत्मा हेंही न साही सर्व क्रिया भ्रम रे । विजनवन निरंजन जनार्दन रे ॥२॥
अगम्य गति ध्येय ध्यान साधन बंधन रे । एका जनार्दनी एका स्वानंद परिपुर्ण रे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४५५
📿 सरते माझे तुझे । तरि
2455.
सरते माझे तुझे । तरि हे उतरते ओझे ॥१॥
न लगे सांडावे मांडावे । आहे शुद्ध चि स्वभावे ॥धृपद॥
घातला तो आशा । मोहोजाळे गळा फासा ॥२॥
सुखदुःखाचा तो मान । नाही दुःखाचा तो शीण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४५५
📿 दर्पणामाजीं आपण । जी
2455.
दर्पणामाजीं आपण । जीवरुपें शिव जाण ॥१॥
जेणे स्वरूपें आपण । तद्रूप बिंब दिसे जाण ॥२॥
अग्नि राखें झाकोळिला । तरी अग्नीपणें संचला ॥३॥
जीवशिव दोन्ही हो का एक । तरी मलीन एक चोख ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २४५६
📿 आपणा आपण पाहे विचारु
2456.
आपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं ॥१॥
तूंचि देव असता फिरशी वनोवनीं । प्रगटली काहाणी बोलायासी ॥२॥
देहींचे देवळीं आत्माराम नांदे । भांबावला भक्त हिंडे सदा रानें ॥३॥
एका जनार्दने भ्रमाची गोष्टी । वायांचि शिणती होती कष्टी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २४५८
📿 करिसी लाघवे । तू हे
2458.
करिसी लाघवे । तू हे खेळसी आघवे ॥१॥
केला अहंकार आड । आम्हा जगासी हा नाड ॥धृपद॥
इत्थंभुते यावे । दावू लपोही जाणावे ॥२॥
तुका म्हणे हो श्रीपती । आता चाळवाल किती ॥३॥