संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ३९
📿 चण्डभिल्ल तेणे ऐकिले
39.
चण्डभिल्ल तेणे ऐकिले बोलणे । सावधान मने करो-निया ॥१॥
तेव्हा होती चित्ती वासना जे खोटी । जिरऊनि पोटी चाकाटला ॥२॥
भीतिल यालागी वृक्षा आड आला । ऐको जो लागला शब्द त्यांचे ॥३॥
नामा ह्मणे ऐसा राहिला पारधी । ऐकावे ते संधि काय झाले ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ३९
📿 निर्मळेसी करिता स्ना
39.
निर्मळेसी करिता स्नान । कोटी प्रयाग समान ॥१॥
तेथे करिता अन्नदान । स्वये तुष्ठे नारायण ॥२॥
तेथे करिता प्रदक्षिणा । कोटी तीर्थे घडली जाणा ॥३॥
ऐसी विख्यात मेहुणपुरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ३९
📿 ज्ञानियाचा राजा ज्ञा
39.
ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माउली । खेचरा बोळली कृपासिंधु ॥१॥
ज्ञानदेवा चरणी खेचर शरण । नामदेवा पूर्ण कृपा केली ॥२॥
नामदेवे हात चोखियाचे शिरी । विठ्ठल ती अक्षरी उपदेशिले ॥३॥
बंका म्हणे माझा चोखा गुरू माउली । तयाचे पाउली लोटांगण॥४
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ३९
📿 कान्हो काहेकू मारो म
39.
कान्हो काहेकू मारो मोकू कांकरी, कांकरी कांकरी कांकरीरे॥धृ०॥
गायो भेसो तेरे अवि होई है । आगे रही घर बाकरीरे॥ कानो॥१॥
पाट पितांबर काना अबही पेहरत है । आगे न रही कारी घाबरीरे॥ का०॥२॥
मेडी मेहेलात तेरे अबी होई है । आगे न रही वर छापरीरे॥ का०॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३९
📿 परिमळ म्हणूनी चोळू न
39.
परिमळ म्हणूनी चोळू नये फूल । खाऊ नये मूल आवडते ॥१॥
मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहू नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छू नये काम । तुका म्हणे वर्म दावू लोका ॥३॥
अर्थ :
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ३९
📿 जन्मोजन्मी आमचा केला
39.
जन्मोजन्मी आमचा केला प्रतिपाळ । करितसे सांभाळ रात्री दिवस ॥
तरि तू आमचा मातापिता । सोयरा सर्वथा निवारिली वेथा जन्मांतरिची ॥
फेडियेले रिण तोडियेले हिण । कैसी मोहियेले मन पांडुरंगा ॥
अनंत कोटी आमच्या पातकाच्या रासि । त्या तु हृषीकेशी दुर केल्या ॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४०
📿 करू हे किर्तन रामनार
40.
करू हे किर्तन रामनारायण । जनी जनार्दन हेचि खरे ॥१॥
जगाचा जनक रामकृष्ण एक । न करिता विवेक स्मर राम ॥२॥
तुटेल भवजाळ का करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥
नामा म्हणे गोविंद स्मरे तू सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्ने ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४०
📿 अवघा तो शकुन । हृदयी
40.
अवघा तो शकुन । हृदयी देवाचे चरण ॥१॥
येथे नसता वियोग । लाभा उणे काय मग ॥२॥
संग हरीच्या नामाचा । शुचिर्भुत सदा वाचा ॥३॥
तुका म्हणे हरीच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४०
📿 वाजतसे बोंब कोणी नाय
40.
वाजतसे बोंब कोणी नायकती कानी । हरि हरि न म्हणती तया थोर झाली हानी ॥१॥
उठा उठा जागा पाठी भय आले मोठे । पंढरीवांचुनि दुजा ठाव नाही कोठे ॥२॥
तापत्रय अग्नीचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥३॥
देखोनि ऐकोनि एक अंध बहिर झाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ४०
📿 दुसरी जे होती गर्भिण
40.
दुसरी जे होती गर्भिण कुरंगी । तेही लागवेगी आली तेथे ॥१॥
आहा ऐसे काय केले वो साजणी । नयेसी अझुनी कोंपटासी ॥२॥
लहान पाडसे आक्रंदती भुके । कैसी येथे सुखे राहिलिसी ॥३॥
जाई लवलाही त्यांसी स्तन देई । सांगू आता कांही बोलवेना ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ४०
📿 ऐसी वाट पाहे कांही न
40.
ऐसी वाट पाहे कांही निरोप का मूळ । काहो कळवळ तुम्हा उमटे चि ना ॥१॥
अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनिया आस चाळवूनी ठेविले ॥धृ॥
काय जन्मा येवूनिया केली म्या जोडी । ऐसे घडीघडी चित्ता येते आठवू ॥२॥
तुका म्हणे खरा न पवे चि विभाग । धिक्कारिते जग हे चि लाहो हिशोबे ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ४०
📿 का गा न येसी विठ्ठल
40.
का गा न येसी विठ्ठला । ऐसा कोण दोष मला ॥1॥
मायबाप तूचि धनी । मला सांभाळी निर्वाणी ॥2॥
त्वा बा उद्धरिले थोर । तेथे किती मी पामर ॥3॥
दीनानाथा दीनबंधू । जनी ह्मणे कृपासिंधू ॥4॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ४०
📿 पंच ही भूते अवघा त्य
40.
पंच ही भूते अवघा त्यांचा खेळ । आत्मा तो निमर्ळ शुध्द आहे ॥१॥
तेथे मरते ते कोण राहते ते कोण । जयाचे कारण तोचि जाणे ॥२॥
वायाचि वोझे घेती आपुलाते शिरी । वाउगे हांव भरी होती वाया ॥३॥
सोयरा म्हणे यांचे वाटते नवल । न कळे कांही वाल परमार्थाची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४०
📿 माया तेचि ब्रम्ह ब्र
40.
माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेचि माया । अंग आणि छाया जयापरी ॥१॥
तोडिता न तुटे सारिता निराळी । लोटांगणातळी हारपती ॥धृपद॥
दुजे नाही तेथे बळ कोणासाठी । आणिक ते आटी विचाराची ॥२॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणे । ठेंगणी लवणे जैसी तैसी ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४०
📿 जयदेव जयदेव जय विश्व
40.
जयदेव जयदेव जय विश्वंभरा । दर्शन व्यापक तुजविण नाही दुसरा ।
तारक मारक हरि तू भक्तांचा सोयरा । आरती ओवाळू तुज परात्परा ॥
विश्व व्यापक तो हा विश्वाचे ठायी । प्रकृतीवेगळा अससी विदेही ।
देहीचा चालक तू खेळविता पाही । तुजवाचुनी आणिक कोणीही नाही ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ४०
📿 निर्दोष रहित सर्व गु
40.
निर्दोष रहित सर्व गुणी हेत । द्वैत विवर्जित अरुप सदा ॥१॥
ते रुप स्वरुप कृष्ण बाळलीला । माजि त्या गोपाळा सदा वसे ॥२॥
गुणागुणी धीट वासना अविट । तद्रूप प्रगट निरंजन ॥३॥
विकार विवर्जित विवरण सोपे । आकार पै लोपे एक नामे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४१
📿 मी माझे करिता गेले ह
41.
मी माझे करिता गेले हे दिवस । न धरीच विश्वास रामनामी ॥१॥
अंती तुज उद्धरती रामकृष्णहरी । राम पंचाक्षरी मंत्रसार ॥२॥
का करीशी सांठा प्रपंचविस्तार । न तुटे येरझार नामेंवीण ॥३॥
नामा म्हणे ऐसे रामनमामी पिसे । तो उद्धरेल आपैसे इहलोकी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४१
📿 हे नव्हे आजिकालिचे ।
41.
हे नव्हे आजिकालिचे । युगे अठ्ठाविसांचे ।
मज निर्धारिता साचे । हा मृत्युलोकुचि नव्हे ।
हाचि मानी रे निर्धारु । येर सांडि रे विचारु ।
जरी तु पाहासी पराप्तरु । तरी तु जाये पंढरीये ॥१॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ४१
📿 येरी म्हणे काय करू व
41.
येरी म्हणे काय करू वो सुंदरी । आता आहे धरी काय माझे ॥१॥
प्राणनाथे पेणे केले स्वर्गलोका । जाईन मी देखा तयासये ॥२॥
वडिलपणे तुह्मी लोभ असो द्यावा । सांभाळ करावा बाळकांचा ॥३॥
वागुरे माझारी गुंतलासे कांत । कायसे जीवित विचारी पा ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ४१
📿 भक्तांचिया लोभा वैकु
41.
भक्तांचिया लोभा वैकुंठ सांडिले । उभेंचि राहिले पंढरीये ॥१॥
कनवाळु उदार तो हा श्रीहरि । जडजीवा उध्दरी नामे एका ॥२॥
बांधियेले ब्रीद तोडर चरणी । त्रैलोक्याचा धनी पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल । नलगे काळ वेळ नाम घेता ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ४१
📿 कारे कारे सबसे बुरे
41.
कारे कारे सबसे बुरे ओधव प्यारे॥धृ०॥
कारेको विश्वास न कीजे अतिसे भूल परे॥१॥
काली जात कुजात कहीजे । ताके संग उजरे॥२॥
श्याम रूप कियो भ्रमरो । फुलकी बास भरे॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४१
📿 जवळी असता राम अंतरला
41.
जवळी असता राम अंतरला दुरी । माया मोहो जाळे कैसा वाहोली दुरी ॥
देहेक सृजा भोगुनी जोडियेली जोडी । अंतकाळे जाता नये फुटकी कवडी ॥
जंवरि देह बळ तंववरी जिंकावा हा काळ । आठवा रघुवीरा हेची सोडवण करा ॥
बोधला म्हणे का रे भुललेसी । सोडुनीया भ्रांती शरणे जावे विठ्ठलासी ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ४१
📿 परब्रम्हा जे चितसी ।
४१.
परब्रम्हा जे चितसी । असा ते न भावसी । रामभगत चेतियके अचिंत मन रासी ॥१॥
कैसे मन करेगार संसारसागर बिखैको बना । झुटी माया देखके भुलारे मना ॥२॥
सिंपिके जन्मदेला गुरुपदेश भला । संतके प्रसाद नामा हरसे मिला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२›
📿 अभंग क्र. ४१
📿 भोळे ते साबडे गोपिका
41.
भोळे ते साबडे गोपिका ते भावे । चुंबन बरवे देती तया ॥१॥ यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥ घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥ एका जनार्दनी व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥
42.
ऐसा ज्याचा अनुभव । विश्वदेव सत्यत्वे ॥१॥
देव तयाजवळी असे । पाप नासे दर्शने ॥२॥
काम क्रोधा नाही चाली । भूती झाली समाता ॥३॥
तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४२
📿 तुज सगुण म्हणो की नि
42.
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥
अनमाने ना अनुमाने ना । श्रृति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥
तुज स्थुळ म्हणो की सुक्ष्म रे । स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारु म्हणो की निराकारु रे । आकारु निराकारु एकु गोविंदु रे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ४२
📿 का गा केविलवाणा केलो
42.
का गा केविलवाणा केलो दीनाचा दीन । काय तुझी हीन दशा जालीसी दिसे ॥१॥
लाज येते मना तुझा म्हणविता दास । गोडी नाही रस बोलिली या सारिखी ॥धृ॥
लाजविली मागे संतांची ही उत्तरे । कळो येते खरे दुजे एकावरूनि ॥२॥
तुका म्हणे माझी कोणे वदविली वाणी । प्रसादा वांचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ४२
📿 नाही केली तुझी सेवा
42.
नाही केली तुझी सेवा । दुःख वाटतसे माझे जिवा ॥1॥
नष्ट पापीण मी हीन । नाही केले तुझे ध्यान ॥2॥
जे जे दुःख झाले मला । ते त्वा सोसिले विठ्ठला ॥3॥
रात्रंदिवस मजपाशी । दळू कांडू लागलासी ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ४२
📿 कालोकी रेन बिहारी ।
42.
कालोकी रेन बिहारी । महाराज कोण बिलमायो॥धृ०॥
काल गया ज्या जाहो बिहारी । अही तोही कौन बुलायो॥१॥
कोनकी दासी काजल सार्यो । कोन तने रंग रमायो॥२॥
कंसकी दासी काजल सार्यो । उन मोहि रंग रमायो॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४२
📿 वृत्ति भूमि राज्य द्
42.
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिंती देव नाही ॥१॥
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरीचे सार लाभ नाही ॥धृपद॥
देवपूजेवरी ठेवूनिया मन । पाषाणा पाषाण पूजी लोभे ॥२॥
तुका म्हणे फळ चिंतिती आदरे । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४२
📿 जागा जागारे आपले मनी
42.
जागा जागारे आपले मनी । भाव ठेउनी गुरुचरणी ॥
मन राखेल जनी वनी गा रामा । कृष्णा बा हरि ॥
भले भले रे पूर्वदत्ता । केले फळ ते आले हाता । मग भेटी जाली भगवंता ॥
वासनेचा वास हा मोडी । आशा मनसा घाली दवडि । कुबुध्दीची कुलपे मोडी ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ४२
📿 सांप कुच छोडे बिख नह
४२.
सांप कुच छोडे बिख नही छांडे । उडुक भाहे जेसे बकध्यान मांडे ॥१॥
काहेको किजे ध्यान जपना । जबते सुध नही मन अपना ॥२॥
सिंघ अच भोजन जो नर जाने । ऐसेही फल देव बखाने ॥३॥
नामेके स्वामी लाहके झगडा । राम रसायन पिवो दे रगडा ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ४२
📿 रुप नाम अरुप रुपाचे
42.
रुप नाम अरुप रुपाचे रुपस । कांसवी डोळस निगमागमे ॥१॥
तो हा ब्रह्मामाजि गोपाळ सांगाती । यशोदे हो प्रति दुध मागे ॥२॥
जो रेखा अव्यक्त रेखेसिहि पर । दृश्य द्रष्टाकार सर्वाभूती ॥३॥
निवृत्ति तटाक चक्रवाक एक । वासनासि लोक गुरुनामे ॥४॥
43.
उजळले भाग्य आता । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शने हा लाभ । पाद्मनाभ जोडला ॥२॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करुनि पोटी सांठवू ॥३॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ४३
📿 सत्यज्ञानानंत गगनाचे
43.
सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण । नाही रुप वर्ण गुण जेथे ॥१॥
तो हा रे श्रीहरि पाहिला डोळेभरी । पाहते पाहणे दुरी सारोनिया ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती । ती हे उभी मूर्ति विटेवरी ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ४३
📿 जळो माझे कर्म वाया क
43.
जळो माझे कर्म वाया केली कटकट । जाले तैसे तंट नाही आले अनुभवा ॥१॥
आता पुढे धीर काय देऊ या मना । ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ॥धृ॥
गुणवंत केलो दोष जाणायासाठी । माझे माझे पोटी बळकट दूषण ॥२॥
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटी ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ४३
📿 मज तो नवल वाटतसे जीव
43.
मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले ॥१॥
कवणिया सुखा परब्रह्म भुलले । गुंतोनि राहिले भक्तभाके ॥२॥
निर्गुण होते ते सगुण पै झाले । विसरोनी गेले आपआपणा ॥३॥
चोखा म्हणे कैसा हा नवलाव । देवाधिदेव वेडावला ॥४॥