🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४३
📿 जै तुज मज झाली भेटी
43.
जै तुज मज झाली भेटी । तुझे पायी पडली माझी मिठी ।
पंढरीनाथा आता तु कैसा जासी । तुज ओढुनी बांधेन गळियासी ॥
जये देखियेल तुझे मुख गेली गेली माझी तान भुक । पंढरीनाथा ॥
गळा देखिली वैजयंती माळा । माझ्या डोळियासी सुकाळ जाला ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ४३
📿 मन मेरे गज जिव्हा मे
४३.
मन मेरे गज जिव्हा मेरी काती । माप माप काटो जमकी फासी ॥१॥
कहा करु जाती कहा करू पाती । रामको नाम जपो दीन औ राती ॥२॥
रागबिन रागो सिवबिन सीवो । रामनामबिन कही न जीवो ॥३॥
हम तो भगति करू हरीके गुन गाऊ । आठ प्रहर आपना खसमकू त्यागु ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ४३
📿 वर्ण व्यक्ती सरवे वर
43.
वर्ण व्यक्ती सरवे वर्णाश्रम मुखे । ब्रह्मनाम सौख्य योगीजन ॥१॥
ते हे कृष्ण नाम देवकीसबळ । वसुदेवकुळ गोपवेषे ॥२॥
धर्म धरि धार धारण धीरट । निरालंब पीठ सौख्य शोभा ॥३॥
निवृत्ति सौभाग्य ब्रह्म सर्व सांग । गुरुनामे पांग हरे एक ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ४४
📿 पट्टाची मी राणी वडील
44.
पट्टाची मी राणी वडील मानाची । जे गति मृगाची तेचि मज ॥१॥
जाईन सांगाते न सोडी संगती । निश्चय हा चित्ती दृढ केला ॥२॥
तुझी बाळे घरी कष्टती क्षुधेने । जाई वेगी स्तने पान देई ॥३॥
बाळांकडे जाई पाहे कंठी काळ । न करी उतावीळ मन आता ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ४४
📿 जळोत ती येथे उपजविती
44.
जळोत ती येथे उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आता मज साहे येथे करावे देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥धृ॥
भोगे रोगा जोडोनिया दिले आणीका । अरुचि ते हो का आता सकळांपासूनि ॥२॥
तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी । नाही ये लौकिकी आता मज वर्तने ॥३॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ४४
📿 बहुतांपरी वानितसे दे
44.
बहुतांपरी वानितसे देवा । न कळे केशवा कांही मज ॥१॥
सेवा कैसी करू काय ध्यान करू । न कळे साचार कांही मज ॥२॥
कैसी ती भक्ति करावी देवा । न कळे कांही हेवा दुजा मज ॥३॥
तुमच्या उकच्छष्टाची आस निधार्री । म्हणतसे म्हारी चोखियाची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४४
📿 आशाबद्ध जन । काय जाण
44.
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥धृपद॥
भ्रमले चावळे । तैसे उचित न कळे ॥२॥
तुका म्हणे विषे । अन्न नाशियले जैसे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४४
📿 झाली आत्मपूजा देव शे
44.
झाली आत्मपूजा देव शेजे पहुडला । म्हणोनिया थोर थोर आनंद झाला ॥
वैकुंठीचा देव कैसा पंढरिसा आला । पुंडलिकाचा भाव देखोनि तन्मय झाला ॥
धामणगावी भक्त एक थोर ऐकीला । गरुडावर बैसोनी कैसा धावत आला ॥
बोधला म्हणे थोर आनंदु झाला । हृदयी प्रगटे बोधला निज निजेला ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ४४
📿 लेआईके कुंभ भराइके ।
४४.
लेआईके कुंभ भराइके । उदका ठाकुरके स्नान करो ॥१॥
ब्यालीस लख जी जलमे होते विठ्ठल भला कसे क्या जत्र जाव तत्र विठ्ठल भला महा आनंद करो सब केला ॥२॥
ले आइके फूल पेहराइके माला ठाकूरकी मै पूजा करू ॥३॥
पहले बास लई है भवरे विठल भला क्या करे ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ४४
📿 मंगल मांगल्य बिरह्म
44.
मंगल मांगल्य बिरह्म ते सखोल । ब्रह्मरुपे खोल ब्रह्म भोगी ॥१॥
ते हे कृष्ण नाम वोळले त्या नंदा । आनंदे यशोदा गीत गात ॥२॥
विश्वाद्य वेदाद्य श्रुतीसी अभेद्य । ते ब्रह्मपणे वंद्य ब्रह्म भोगी ॥३॥
ॐकार मूर्धनि प्रणव प्रणम्य । वेदादि आगम आंगभूत ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ४५
📿 न संगता तुम्हा कळो य
45.
न संगता तुम्हा कळो येते अंतर । विश्वी विश्वंभर परिहार चि न लगे ॥१॥
परि हे अनावर आवरिता आवडी । अवसान ते घडी पुरो देत नाही ॥धृ॥
काय उणे मज येथे ठेविलिये ठायी । पोटा आलो तई पासूनिया समर्थ ॥२॥
तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आता नारायणा दुसरियापासूनि ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४५
📿 तरुणपण भर देही । पुढ
45.
तरुणपण भर देही । पुढे नाठवे काही । भ्रांती हे येत डोळा । तेणे पडिलो वाही ।
माझे माझे म्हणता रे अंती न चले काही । गुरुवचन भावबळे । विश्वासे राही ॥
रामकृष्ण वासुदेवा । घरी संतसंग सेवा । त्याणेची हीत होईल । मग पावसील देवा ।
वाया तु नवजासी करी गुरुची सेवा । आता तरी सावध होई का भुललासी मुढा ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ४५
📿 एक अनेक व्यापक पूरक
४५.
एक अनेक व्यापक पूरक जद देखो तद सोई । माया चित्रबिचित्र विमोहेत बिर्ला बूझे कोई ॥१॥
सब गोविंद है सब गोविंद है गोविंद बिन नही होई । सूत एक मनसतसहंस है जैसे ओतप्रोत प्रभु सोई ॥२॥
जलतरंग और फेन बुदबुदा जलते भिन्नन होई । यह प्रपंच परब्रम्हाकी लीला औ बिचारत आन न होई ॥३॥
मिथ्या परम अर सुपन मनोरथ सत पदारथ जान्या । सुकिर्त मनसा गुरुपदेशी जागृतीही मन मान्या ॥४॥
46.
कोण पुण्ये यांचा होईन सेवक । जिही द्वंद्वंदिक दुराविले ॥१॥
ऐसी वर्मे मज दावी नारायणा । अंतरींच्या खुणा प्रकटोनी ॥२॥
बहु अवघड असे संत भेटी । तरी जगजेठी करुणा केली ॥३॥
तुका म्हणे मग नये वृत्तीवरी । सुखाचे शेजारी पहुडईन ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ४६
📿 निघोनिया दखो आली त्य
46.
निघोनिया दखो आली त्या तटाका । झाली एकमेका मेटी तेथे ॥१॥
परस्परे दु:ख देखता वाढले । धैर्याचेंचि बळ केले त्यांनी ॥२॥
देहभाव कांही नाठवे तयांसी । गुंतोनी मोहासी जीव देती ॥३॥
नामा ह्मणे देवे सोडवावे त्यांसी । हे तो अने-कांसी आटोपेना ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ४६
📿 तुजसवे आम्ही अनुसरलो
46.
तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा । नको अंगी कळा राहो हरी हीन देऊ ॥१॥
सासुरवासा भीतो जीव ओढे तुजपाशी । आता दोहिवीशी लज्जा राखे आमुची ॥धृ॥
न कळता संग जाला सहज खेळता । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरि ॥२॥
तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे । वचन या भावे वेचुनिया विनटलो ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ४६
📿 आह्यी जावे कवण्या ठा
46.
आह्यी जावे कवण्या ठाया । न बोलसी पंढरीराया ॥1॥
सरिता गेली सिंधूपाशी । जरी तो ठाव न दे तिसी ॥2॥
जळ कोपले जळचरासी । माता न घे बाळकासी ॥3॥
ह्मणे जनी आले शरण । जरी त्वा धरिलेंसे मौन्य ॥4॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 प्रकरण नसलेले›
📿 अभंग क्र. ४६
📿 तुझी नाही केली सेवा
46.
तुझी नाही केली सेवा । दुःख वाटतसे जीवा ॥1॥
नष्ट पापीण मी हीन । नाही केले तुझे ध्यान ॥2॥
जे जे दुःख झाले मला । ते तू सोशिले विठ्ठला ॥3॥
क्षमा करी देवराया । दासी जनी लागे पाया ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ४६
📿 करावी ते पूजा मनेचि
46.
करावी ते पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असे ॥१॥
कळावे तयासि कळे अंतरीचे । कारण ते साचे साच अंगी ॥धृपद॥
अतिशया अंती लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजा ऐसे ॥२॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐसे ते भजन पार पावी ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४६
📿 त्रिभुवनामाजी पंढरी
46.
त्रिभुवनामाजी पंढरी थोर । तेथील सेठ्या पुंडलिक भला रे ॥
पतित पावन जडमूढ भारी । तया स कौल दिल्हा रे ॥
निंदक दुर्जन कंटक भारी । कौल नाही तयाला रे ॥
अनंत कोटी पुण्य जयांचे । तोचिये पेठेसी आले रे ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ४६
📿 सुफल जन्म मोको गुरू
४६.
सुफल जन्म मोको गुरू किना । दु:ख बिसार सुख अंतर दिना ॥१॥
ग्यान जन मोको गुरू दिना । रामनाम बिन जीवन मन हिना ॥२॥
नामदेव स्मरण कर जाना । जगजीवनसे जीव समाना ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ४६
📿 ग्रासूनी भान मान दृश
46.
ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न । आपण चिद्घन वैकुंठी रया ॥१॥
ते रुप सखोल कृष्ण रुपे खेळे । नंदयशोदेमेळे गोपीसंगे ॥२॥
नित्यता प्रकाश सर्व पूर्ण सार । आपण श्रीधर सर्व सुखे ॥३॥
तेंची हे रुपडे कृष्णनामे पिकले । यमुने स्थिरावले वेणू वार्ता ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ४७
📿 पारधी तो झड घालोनी प
47.
पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरे ॥१॥
भयाभीत झाली पांचही ते काळी । वासना गुंतली एकमेका ॥२॥
वडील कुरंगी येऊनि त्यापाशी । लागोनी पायांसी काय बोले ॥३॥
नको मारू पति तृषेने पीडिला । मारी तू मजला तया आधी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ४७
📿 कामे नेले चित्त नेदी
47.
कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख । बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय ॥१॥
का जी सासुरवासी मज केले भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही ॥धृ॥
प्रभातेसि वाटे तुमच्या यावे दर्शना । येथे न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥
येथे अवघे वांया गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥३॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ४७
📿 माझे माझे म्हणुनी गु
47.
माझे माझे म्हणुनी गुंतले हावभरी । वाया या संसारी मृगजळा ॥१॥
आपली आपण करा आठवण । संसार बंधन तोडा वेगी ॥२॥
नाम निज नौका विठ्ठल हे तारू । भवाचा सागरू उतरील ॥३॥
हाचि पे विश्वास धरावा अंतरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ४७
📿 तुझीया सत्तेने हाले
47.
तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले । सांग विठ्ठल माये माझे ॥
साच की लटके विचारी मनासी । हा बोला कोणासी ठेवसील ॥
हे मृतिकेचे भांडे भुसी वोतीयेले । वोंकारे फोडिला टाहो तेथे ॥
सकळ देहीचा चाळकु बुधी खेळवणा । तुची एकु, नाही बा आणिक दुजा तेथे ॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेणी - अभंग ४३ ते ४७›
📿 अभंग क्र. ४७
📿 आल्हादयुक्त गोपिका आ
47.
आल्हादयुक्त गोपिका आली आपुले सदनी । नंदासहित मोक्षदानी प्रवेशलें भुवनी ॥१॥ म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तू खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥ एका जनार्दनी माझा अपराध नाही । जया जैसा भाव तया तोचि देही ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ४७
📿 गगनवाड दृष्टी सर्व त
47.
गगनवाड दृष्टी सर्व तत्व शेखी । जीव शिव शेखी कारण सिध्द ॥१॥
तेची हे सांवळे स्वरुप गोजिरे । कृष्णनाम खरे नंदाघरी ॥२॥
पृथ्वीचे तळवट अनंत विराट । आपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥
निवृत्ति तत्पर लक्षते स्वानंद । नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥
48.
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वानू ॥१॥
अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जड जीव ॥२॥
वाढवया सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचे ॥३॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी । तैसे तुम्ही जगी संतजन ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ४८
📿 सकळा आगराचे जे मूळ ।
48.
सकळा आगराचे जे मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥
वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठू माझा ॥२॥
कैवल्य देखणा सिध्दांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या हृदयी बिंबला । त्रिभुवनी प्रकाशला विठू माझा ॥४॥