🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ८६
📿 आदीची अनादि मूळ पै स
86.
आदीची अनादि मूळ पै सर्वथा । परादि या कथा हारपती ॥१॥
ते अव्यक्त रूप देवकीचे बाळ । वसुदेवकुळ कृष्णठसा ॥२॥
मुराली ब्रम्हांडे अमिते पै अंडे । ढिसाळ प्रचंडे जया माजी ॥३॥
निवृत्तीचे धन माजी तो श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न गायनिराजे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ८७
📿 दाते बहुत असती परि न
87.
दाते बहुत असती परि न देती साचार । मागत्याची आशा बहु तेणे न घडे विचार ।
सम देणे सम घेणे या नाही प्रकार । लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवघा असार ॥१॥
तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार । तुष्टला माझया देही दिधले अक्षय अपार ।
न सरेचि कल्पांती माप लागले निर्धार । मागतेंपण हारपले दैन्य गेले साचार ॥२॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ८७
📿 जागो बंसी वारे जागो
87.
जागो बंसी वारे जागो मोरे ललन ।
रजनी बीती भोर भयो है घर घर खुले किवारे ।
गोपी दही मथत सुनियत है कंगना के झनकारे ।
उठो लालजी भोर भयो है सुर नर ठाढ़े द्वारे ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ८७
📿 न करी रे संग राहे रे
87.
न करी रे संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥१॥
या नावे अद्वैत खरे ब्रम्हज्ञान । अनुभवावाचून बडबड ते ॥धृपद॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरी या थारा आनंदाचा ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८७
📿 वर्षाचा दिन आनंद झाल
87.
वर्षाचा दिन आनंद झाला । आनंदाचे सुख संतमेळा मिळाला ॥
वर्षाचा सण आम्हा नित्य दिवाळी । भावे भक्त ओवाळी साधुसंत ॥
सेवा मुख आम्हा नित्य ते भोजनी । आम्ही तुष्ट मनी जेविता सदा ॥
बोधला म्हणे आम्हा जाहला निरोप । पंढरपूरी आहे आमुचा मायबाप ॥
88.
एका बीजा केला नाश । मग भोगीले कणीस ॥१॥
कळे सकळा हा भाव । लहान थोरांवरी जीवा ॥२॥
लाभ नाही फुकासाठी । केल्यावीण जीवा साठी ॥३॥
तुका म्हणे रणी । जीव देता लाभ दुणी ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८८
📿 वासना बडी छिनाल । फि
88.
वासना बडी छिनाल । फिरती चारोराज ।
मेरी बात सुनती नहि । बहुत किये हैरान ॥
एक दिन मै पडि हात । दीओ पेडु परळात ।
शरण आयी पेट मे । निकली दाढी पकडी हात ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ८८
📿 हरहर करत मीटे सब भर्
८८.
हरहर करत मीटे सब भर्मा । हरको नाम ले उत्तम धर्मा ॥१॥
हरहर करत जात कुलहरी । सो हर आंधेलेकी लकरी ॥२॥
हरे नमस्ते हरेनम: हरहर कत नही दु:खजन । हर हरनाखुष हरे प्राण आजिल कियो बैकुंठे थान ॥३॥
सुवा पढावत गणका तरी । सो हर नैनोकी पुतरी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 राधा विलास›
📿 अभंग क्र. ८८
📿 मध्यान्हकाळी मग हरीस
88.
मध्यान्हकाळी मग हरीसी घेऊनि । करीतसे भोजन यशोदा ते ॥१॥
भोजन करूनि पलंगी निजत । श्रीकृष्णासी घेत पुढे तेव्हा ॥२॥
यशोदेसी सुखनिद्रा हो लागली । राधिका ते गेली यमुनेसी ॥३॥
नेत्रासी पदर लावोनि रडत । अंतरी अनंत आठ-वोनि ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ८९
📿 अहो पतित पावना पंढरी
89.
अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥
धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गुरूडध्वजा मायबापा ॥२॥
दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करी पांगिला दुजीयासी ॥३॥
चोखा म्हणे आता दावी मज वाट । मग मी बोभाट न करी कांही ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ८९
📿 जोसीड़ा ने लाख बधाई
89.
जोसीड़ा ने लाख बधाई रे अब घर आये स्याम॥
आज आनंद उमंगि भयो है जीव लहै सुखधाम ।
पांच सखी मिलि पीव परसिकै आनंद ठामू ठाम॥
बिसरि गयो दुख निरखि पियाकूं, सुफल मनोरथ काम ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ८९
📿 तीर्थी धोंडा पाणी ।
89.
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ॥१॥
मिळालिया संतसंग । समर्पिता भले अंग ॥धृपद॥
तिर्थी भाव फळे । येथे आनाड ते वळे ॥२॥
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८९
📿 व्यापक हा हृषिकेशी ।
89.
व्यापक हा हृषिकेशी । आहे आम्हा पाशी । विश्वास मानसी धरा थोर ॥
चालविता बोलविता । सकळ त्याची सत्ता । त्या वाचुनी कर्ता नाही कोण्ही ॥
खास सुत्रधारी । खेळविता दोरी । नाचवी नानापरि । बाहुलिया ॥
बोधला म्हणे मीपण सांडा जाण । कर्ता नारायण पांडुरंग ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ८९
📿 मेरे अंधेकी टेक तेरा
८९.
मेरे अंधेकी टेक तेरा नाम खुंद करा । मै गरीबमै मसकीन तेरा नाम है अधारा ॥१॥
करीमा रहिमा अल्लाह तू गनी । हाजरा हजूर दर पेस तू मनी ॥२॥
दरियाव तू हिंदद तू बिसवायार तू धनी । देह लेह एक तू दिगर को नही ॥३॥
तू दाना तू बिना मै बिचार क्या करी । नामेके स्वामी बकसिंद तू हरी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 राधा विलास›
📿 अभंग क्र. ८९
📿 चेंडु देखोनिया यशोदा
89.
चेंडु देखोनिया यशोदा कोपली । ह्मणे तयेवेळी राधिकेसी ॥१॥
महा नष्ट तुम्ही अवघिया गवळणी । माझा चक्रपाणी ब्रह्मचारी ॥२॥
इतुके ऐकोनि राधा ते चालिली । स्वगृहासी गेली आपुलिया ॥३॥
राधेचिया मनी समजले पूर्ण । ब्रह्मसनातन श्रीकृष्ण हा ॥४॥
90.
आंधळ्यासी जन अवघेचि आंधळे । आपणासी डोळे दृष्टी नाही ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासी कारण चवी नाही ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ९०
📿 असोनिया दृष्टी जाहल
90.
असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा । आपंगिले जिही जाहलो त्या वेगळा ।
मायबाप माझे म्हणती मज माझ्या बाळा । शेवटी मोकलिती देती हाती काळा ॥१॥
संत तुम्ही मायबाप माझी राखा कांही दया । लागतो मी वारंवार तुमचीया पाया ॥२॥
इंद्रिये माझी न चलता क्षणभरी । गुंतलो मायामाहे या संसाराचे फेरी ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ९०
📿 भक्त जे जे कर्म करित
90.
भक्त जे जे कर्म करिती । ते तू होसी कृपामूर्ती ॥1॥
हे तो नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥2॥
वाग्दोर धरुनी दांती । चारी घोडे चहू हाती ॥3॥
धूता लाज नाही तुला । दासी जनी ह्मणे भला ॥4॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९०
📿 विठ्ठल पाहुणा आला आम
90.
विठ्ठल पाहुणा आला आमुच्या घरी । लिंब लोण करी सावळिया ॥
दुरल्या देशीचा माझ्या आवडीचा । भिवराथडीचा नारायण ॥
षडरस पक्वान्न वाढियेले ताट । जेऊ एकवटी बोधला म्हणे ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गोकुळजनांचे वृंदावनी प्रयाण›
📿 अभंग क्र. ९०
📿 गोकुळजनांचे वृंदावनी
90.
गोकुळजनांचे वृंदावनी प्रयाण.
गोकुळी अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ॥१॥
वृद्ध ते म्हणती येते आमुच्या मना । जाऊ वृंदावना सकळीक ॥२॥
समस्ता मानला तयांचा विचार । निघती नारीनर शीघ्र तेव्हा ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ९१
📿 देव भावाचा लंपट । सो
91.
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥1॥
पुंडलिकापुढे उभा । सम चरणांवरी शोभा ॥2॥
हाती चक्र पायी वांकी । मुख भक्तांचे अवलोकी ॥3॥
उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडे भक्त कथा ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ९१
📿 देखोनि पुराणिकांची द
91.
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥
प्रेम खरे दिसे जना । भिन्न अंतरी भावना ॥धृपद॥
आवरीता नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥
बोलो नये मुखावाटा । म्हणे होता ब्यांचा तोटा ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९१
📿 विठोबाचे नाम जीवाचा
91.
विठोबाचे नाम जीवाचा विश्राम । तोडियेला प्रेम संसाराचा ॥
नामाचा महिमा कळला नारायणा । लक्ष चौऱ्याशी भ्रमणा चुकविल्या ॥
बोधला म्हणे साक्ष आली माझे मान । सांगतो सज्जना एकभावे ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ९१
📿 कोई बोले निरवा कोई ब
९१.
कोई बोले निरवा कोई बोले दूर । जलकी मछरी चले खजूर ॥१॥
काहेरे बकवा दलायो । जिन हर पायो तिने छपायो ॥२॥
पंडत होके बेद बखाने । मूरख नामदेव रामरामही जाने ॥३॥
कानको कुलंक रह्यो रामनाम लेत ही । भयो पतत पवित्न भये । राम कहीतही ॥४॥
92.
गाढवाचे ताने । पालटते क्षणक्षणे ॥१॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाही मन ॥२॥
उपजता बरे दिसे । रुप वाढता ते नासे ॥३॥
तुका म्हणे भुकंतेवेळे । वेळ अवेळ न कळे ॥४॥
🙏 संत सोपानदेव काका›📚 संत सोपानदेव अभंग गाथा›📖 संत सोपानदेव गाथा हरिपाठ›📂 श्रीसोपानदेवांची समाधी अभंग›
📿 अभंग क्र. ९२
📿 श्रीसोपानदेवांची समा
92.
श्रीसोपानदेवांची समाधी - अभंग
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
मग उड्डाण केलें गरुडे । गगन आक्रमिले चंडें ।
वरी आरुढले प्रचंडें । भक्त देव सकळिक ॥१॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ९२
📿 दुःशासन द्रौपदीसी ।
92.
दुःशासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥1॥
दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥2॥
आता उपाय कृष्णा काय । धावे माझे विठ्ठल माय ॥3॥
निरी ओढिता दुर्जन । झाले आणिक निर्माण ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ९२
📿 आता कासया हा दाखविता
92.
आता कासया हा दाखविता खेळ । म्या तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथे ब्रह्मादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिले तयांलागी ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलो वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अविठ हा खेळ । भुलले सकळ ब्रह्मांडाचि ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९२
📿 विठोबा सुखाचा विसावा
92.
विठोबा सुखाचा विसावा । चला विठोबाच्या गावा ॥
सीण अवघा सांगावा । आपल्या जलमत्रीचा ठेवा ॥
मग तो का रे कुरवाळीला । कुभाविला ॥
बोधला म्हणे सत्य सत्य । जाणाबाप पंढरीचा राणा ॥
93.
सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथे अळंकार शोभती सकळ । भावबळे फळ इच्छेचे ते ॥२॥
अंतरीचे बीज जाणे कळवळा । व्यापक सकळा ब्रह्यांडाचा ॥३॥
तुका म्हणे नाही चालत तांतडी । प्राप्त काळघडी आल्यावीण ॥४॥