संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४४३
📿 अपाय उपाय न टाकी कीर
1443.
अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण ॥१॥
तयाचिये घरी वसे नारायण । लक्ष्मी सह आपण कार्य करी ॥२॥
एका जनार्दनी कीर्तनासाठीं । देव धांवें पाठी त्या मागे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४४४
📿 तेच किती वारंवार । ब
1444.
तेच किती वारंवार । बोलो फार बोलिले ॥१॥
आता माझे दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥धृपद॥
आवडी ते नीच नवी । जाली जीवी वसती ॥२॥
तुका म्हणे बरवे जाले । घरा आले बंदरीचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४४४
📿 सांडोनि संसार जालो म
1444.
सांडोनि संसार जालो मी अंकित | ऐशियाचा अंत पाहू नको ॥१॥
पातकी मी सत्य पातकी मी सत्य | पातकी मी सत्य पांडुरंगा ॥२॥
माझे गुणदोष न धरिसी चित्ती | थोरपण ख्याति दावी आम्हा ॥३॥
ऐसा अपराध आणू नको मना | पंढरीच्या राणा म्हणे नामा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४४५
📿 देशी परदेशी जालो तुज
1445.
देशी परदेशी जालो तुजविण | माझे समाधान कोण करी ॥१॥
चातक चकोरापरी पाहे वास | तू का गे उदास पांडुरंगे ॥२॥
नामा म्हणे चित्त देई माझ्या बोला| जीउ हा उरला तो निघो पाहे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४५०
📿 कोणापाशी आता सांगो म
1450.
कोणापाशी आता सांगो मी बोभाट । कधी खटपट सरेल हे ॥१॥
कोणा आराणूक होईल कोणे काळी । आपुलाली जाळी उगवूनि ॥धृपद॥
माझा येणे दुःखे फुटतसे प्राण । न कळता जन सुखी असे ॥२॥
भोगा आधी मने मानिलासे त्रास । पाहे लपायास ठाव कोठे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४५१
📿 पांचमुखी रुद्र स्वये
1451.
पांचमुखी रुद्र स्वये करी स्तुति | चहू मुखी कीर्ति वर्णी ब्रह्मा ॥१॥
देवी देव सर्व विस्मयो पावती | विठोबाची ख्याति कोण वानी ॥२॥
परीक्षितीसाठी प्राण त्यजी सर्व रावणाचा गर्व स्वये हाणी ॥३॥
नामा म्हणे तुज सकळ समान | माझे दोष गुण मानी काय ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५१
📿 संतकृपेने प्राप्त झा
1451.
संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार)
अवघ्याचि संपत्ती आलीया घरा ।
तुमचिया दातारा आगमने ॥१॥
शीतळ झालो पावन झालो ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४५२
📿 आम्हा एकविधा पुण्य स
1452.
आम्हा एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणकमळ स्वामीचे ते ॥१॥
चित्ताचे संकल्प राहिले चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असो ॥धृपद॥
दुजिया पासाव परतले मन । केले द्यावे दान होईल ते ॥२॥
तुका म्हणे आता पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४५२
📿 गुण दोष माझे पाहो नक
1452.
गुण दोष माझे पाहो नको आता | तारिसी अनंता मज आता ॥१॥
अगाध महिमा काय वानू हरी | गोकुळाभीतरी गाई राखी ॥२॥
अंबऋषीसाठी जन्म सोशियले महत्त्वाचे केले हूड स्वये ॥३॥
नामा म्हणे तुझे नामाचेनि बळ | प्रसादे केवळ लाधलो मी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५२
📿 आईका हो संत तुम्ही म
1452.
आईका हो संत तुम्ही मुनेश्वर ।
माझिये निर्धार अंतारींचा ॥१॥
विठोबावाचूनि न मनीचि दैवत ।
न धरी माझे चित्त भाव कोठे ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४५३
📿 मी तो तुझा दास न करी
1453.
मी तो तुझा दास न करी उदास | मायामोहपाश तोडी देवा ॥१॥
प्राण जावो परी नको करू त्याग करी अंगसंग अंगिकार ॥२॥
अंगीकारी आता अजामेळ अंती | समान श्रीपती सम करी ॥३॥
नामा म्हणे ऐसे वर्णावे म्या किती | नामे केली ख्याति चराचरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४५३
📿 आणिक ते आम्हा न दिसे
1453.
आणिक ते आम्हा न दिसे प्रमाण । कीर्तनावांचून आनु नेणो ॥१॥
राम कृष्ण हरि विठ्ठल उच्चार । करु हा गजर वाहुं टाळी ॥२॥
आनंदे नामावळी गाऊ पै कीर्तनी । श्रुतीं टाळ घोळ लाऊनी गजरेंसी ॥३॥
एका जनार्दनी हाचि आम्हा छंदा । वाऊगा तो ढंग न करु कांही ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५३
📿 उपायाच्या करिता श्रे
1453.
उपायाच्या करिता श्रेणी ।
परि जेथ कोणी न पवेचि ॥१॥
तया पावविलो ठाया ।
संती करुनिया निज कृपा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४५४
📿 चंदन तो चंदनपणे । सह
1454.
चंदन तो चंदनपणे । सहज गुणेसंपन्न ॥१॥
वेधलिया धन्य जाती । भाग्ये होती सन्मुख ॥धृपद॥
परिसा अंगी परिसपण । बाणोनि ते राहिले ॥२॥
तुका म्हणे कैची खंती । सुजाती ते टाकणी ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५४
📿 उत्तीर्ण त्यांचे काय
1454.
उत्तीर्ण त्यांचे काय व्हावे ।
न कळे भावे वंदितो ॥१॥
जीव पायी ठेवू म्हणे ।
लटिकेपणे तो मिथ्या ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४५५
📿 लय लक्षी मन न राहे न
1455.
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथे बळ आसनाचे ॥१॥
हे तो असाध्य जी सर्वत्र या जना । भले नारायणा आळवि ॥धृपद॥
कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥
कर्म उसंतावे चालत पाउली । होय जो राहिली देहबुद्धि ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५५
📿 उत्तीर्ण त्याचे नव्ह
1455.
उत्तीर्ण त्याचे नव्हिजे आता ।
जिवही अर्पिता थोडाची ॥१॥
ओंवाळूनि सांडू काया ।
वरुनी पाया संतांच्या ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४५६
📿 ऐसे काहो न करा काही
1456.
ऐसे काहो न करा काही । पुढे नाही नास ज्या ॥१॥
विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥धृपद॥
श्रुतीचे का नेघा फळ । सारमूळ जाणोनि ॥२॥
तुका म्हणे पुढे काही । वाट नाही यावरी ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५६
📿 उत्तम संचित होते गाठ
1456.
उत्तम संचित होते गाठी ।
तेणेचि या भेटी संतांसवे ॥१॥
सुकृतासी आली फळे ।
भावबळे लगटोनी ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४५७
📿 शरीराचा भाव तुज नाही
1457.
शरीराचा भाव तुज नाही देवा | तेथे मी केशवा काय बोलू ॥१॥
अंगदाचे अंगी बळ देसी फार | बहु उपकार कळो आले ॥२॥
तुम्हा नित्य न्याय नोव्हे साचपण | बळि तूते दान देउनि ठके ॥३॥
नामा म्हणे सदा काय म्या गान्हाणे | किती नारायणे देऊ आता ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४५७
📿 नेणो कळायुक्ती व्युप
1457.
नेणो कळायुक्ती व्युप्तत्ती सर्वथा । करु हरिकथा नाम गाऊ ॥१॥
कलियुगामाजीं साधन वरिष्ठ । श्रेष्ठांचे ते श्रेष्ठ नाम जपुं ॥२॥
हाचि अनुभव बहुतांसी आला । म्हणोनि वर्णिला नाममहिमा ॥३॥
एका जनार्दनी नामयज्ञ कथा । पावन सर्वथा जड मूढा ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५७
📿 ऐसा संतांच उपकार ।
1457.
ऐसा संतांच उपकार ।
काय मी पमार आठवू ॥१॥
करुनिया अनुमोदन ।
दिधले वचन अभयाचे ॥२॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५८
📿 कोठे फावो येता मग ।
1458.
कोठे फावो येता मग ।
निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥१॥
आजि संतसंगगुणे ।
हरिची नामे उच्चारणे ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४५९
📿 दुर्घट ते दुःख लागो
1459.
दुर्घट ते दुःख लागो नेदी भक्ता | त्याची तुज चिंता असे फार ॥१॥
आणिक प्रकार घडे तो निकट पैठणी प्रकट रूप दावी ॥२॥
जेथुनि सत्वर निघाले स्वदेशा | मुक्त केले महिषा मार्गी जाण ॥३॥
जाणती प्रेमळ कीर्तनासी नर | समाधि निरंतर म्हणे नामा ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४५९
📿 कृपा केली संतजनी ।
1459.
कृपा केली संतजनी ।
लाविलो भजनी श्रीहरीच्या ॥१॥
नाही तरी जातो वाया ।
लक्ष भोगावया चौर्यांयशी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४६०
📿 या हो या चला जाऊ कीर
1460.
या हो या चला जाऊ कीर्तना । आनंद तेणे मना नाचती वैष्णव ॥१॥
राम कृष्ण हरि वासुदेवा । गातती प्रेमभाव आवडी आदरे ॥२॥
सुख तेथे शांती विरक्ति कोण पुसे । सबाह्म अभ्यंतरीं अवघा वासुदेव वसे ॥३॥
एका जनार्दनी वासुदेवी मन । जन वन तेथे अवघा जनार्दन ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६०
📿 खाती आपण जे जेविती ।
1460.
खाती आपण जे जेविती ।
तेचि आणिकाही वाढिती ॥१॥
आजि बहुता भाग्ये भेटी ।
झाली चरणी पडली मिठी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४६१
📿 सरले आता नाही । न म्
1461.
सरले आता नाही । न म्हणे वेळकाळ काही ॥१॥
विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमे पान्हायेली ॥धृपद॥
सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठुर नाही राग ॥२॥
भेदाभेद नाही । तुका म्हणे तिच्याठायी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४६१
📿 आशा मनिषा तृष्णा लाग
1461.
आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठी | धांव जगजेठी स्वामी माझ्या ॥१॥
गेलासि कैउता वाढिले दुश्चिता | अगा कृपावंता स्वामी माझ्या ॥२॥
नामा म्हणे मज नाही कोण गत | तारिसी अनंत स्वामी माझ्या ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६१
📿 जिकडे जिकडे भासे रवी
1461.
जिकडे जिकडे भासे रवी ।
प्रभा नीच नवी सांगाते ॥१॥
तैसे केले माझे वाचे ।
तुम्ही सामार्थ्याचे बोलणे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४६२
📿 तुज पाहावे हे धरितो
1462.
तुज पाहावे हे धरितो वासना । परि आचरणा ठाव नाही ॥१॥
करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥धृपद॥
बाहिरल्या वेषे उत्तम दंडीले । भीतरी मुंडले नाही तैसे ॥२॥
तुका म्हणे वाया गेलोंच मी आहे । जरि तुम्ही साह्य न व्हा देवा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४६२
📿 तुजविण आम्हा कोण हो
1462.
तुजविण आम्हा कोण हो पोषिता | अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥
न करी विठ्ठला आता लाजिरवाणे | मी तुझे पोसणे पांडुरंगा ॥२॥
काकुळती कोणा येऊ हो मी आता | अनाथाचे नाथा विठ्ठला तू ॥३॥
एक वेळ आता पाहे मजकडे | नामा म्हणे तेहे रंक तुझे ॥ | ४ ॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४६२
📿 तान मान सर्वथा । ते
1462.
तान मान सर्वथा । ते भजन न मने चित्ता ॥१॥
वेडेंवाकुडें तुमचे नाम । गाइन सदोदित प्रेम ॥२॥
वाचा करुनी सोंवळी । उच्चारीन नामावळी ॥३॥
नाम तारक हे जनी । व्यास बोलिले पुराणीं ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६२
📿 धन्य काळ आजिचा दिवस
1462.
धन्य काळ आजिचा दिवस ।
हरिचे दास भेटले ॥१॥
दंडवत घालीन पाया ।
करीन काया कुरवंडी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४६३
📿 दुष्ट आचरण ग्वाही मा
1463.
दुष्ट आचरण ग्वाही माझे मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥
आता तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसे केले ॥धृपद॥
व्याह्याजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिज तो काळ नव्हे काही ॥२॥
तुका म्हणे आता जालो शरणागत । पुढिल उचित तुम्हा हाती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४६३
📿 माझे मनोरथ पूर्ण कीज
1463.
माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाही नाही मज आणिक सोयरा न करी अव्हेरा पांडुरंगा ॥२॥
अनाथाचा नाथ होसी तू दयाळा | किती वेळोवेळा प्रार्थ आता ॥३॥
नामा म्हणे जीव होतो कासावीस केली तुझी आस आता बरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४६३
📿 ऐसे सुख कोठे आहे । भ
1463.
ऐसे सुख कोठे आहे । भजन सोडोनि करिशी काय ॥१॥
सोंडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ति मागसी अधमा ॥२॥
सांडोनिया संतसंग । काय मुक्ति ते अभंग ॥३॥
एका जनार्दनी मुक्ति । भजन केलिया दासी होती ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६३
📿 धन्य झालो कृपा केली
1463.
धन्य झालो कृपा केली ।
भेटी दिधली अवचिती ॥१॥
सांभाळिले तुम्ही संती ।
केल्या आर्ती परिपूर्ण ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४६४
📿 आता भय नाही ऐसे वाटे
1464.
आता भय नाही ऐसे वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥
आता माझ्या मने धरावा निर्धार । चिंतनी अंतर न पडावे ॥धृपद॥
येथे नाही जाली कोणांची मिरास । आल्या याचकास कृपेविशी ॥२॥
तुका म्हणे येथे नाही दुजी परी । राया रंका सरी देवा पायी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४६४
📿 समर्थाचे बाळ पांघरे
1464.
समर्थाचे बाळ पांघरे वाकळ | हांसती सकळ लाज कोणा ॥१॥
देव आप्त दैन्य उरे कंचे बापा | आम्हांसि तू का पा विसरलासी ॥२॥
ऐसा तू अविनाश त्रिभुवनचा राजा | नामा म्हणे माझा तूंचि स्वामी ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६४
📿 नव्हती माझे फुकट बोल
1464.
नव्हती माझे फुकट बोल ।
जाणे विठ्ठल सत्य मिथ्या ॥१॥
संतकृपेची हे जाती ।
ओघेंचि चालती अक्षरे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४६५
📿 वैष्णव चोरटी । आली घ
1465.
वैष्णव चोरटी । आली घरासी करंटी ॥१॥
आजि आपुले जतन । करा भांडे पाघुरण ॥धृपद॥
ज्याचे घरी खावे । त्याचे सर्वस्वे ही न्यावे ॥२॥
तुका म्हणे माग । नाही लागो देत लाग ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६५
📿 न वजो यावरी आता कोठे
1465.
न वजो यावरी आता कोठे ।
सांडुनि चरण हे गोमटे ॥१॥
जोडले ते भाग्ययोगे ।
येणे काळे संतसंगे ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४६६
📿 नेणे घातमात नव्हे कळ
1466.
नेणे घातमात नव्हे कळावंत | शास्त्रज्ञ पंडित तोहि नव्हे ॥१॥
रंकाहुनि रंक संतांचा सेवक | मी नामधारक विठोबाचा ॥२॥
नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ | नव्हे मी वाचाळ तर्कवादी ॥३॥
नामा म्हणे राया विठोचा डिंगर नामे पैलपार पावविलो ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४६६
📿 भजन भावाते उपजवी । द
1466.
भजन भावाते उपजवी । देव भक्तांतें निपजवी ॥१॥
ऐसा भजनेंचि देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥२॥
भक्ताकारणे हा संकल्प । भक्त देवाचाहि बाप ॥३॥
देव भक्ताचीये पोटी । जाला म्हणोनी आवड मोठी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६६
📿 निज सायासे जोडुनी ।
1466.
निज सायासे जोडुनी ।
होते निक्षेपुनी ठेविले ॥१॥
तेचि दिधले माझया हाती ।
आजी संती कृपादान ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४६७
📿 आणिकाची सेवा करावी श
1467.
आणिकाची सेवा करावी शरीरे । ती येथे उत्तरे कोरडींच ॥१॥
ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा याचकाच्या ॥धृपद॥
आणिकाचे देणे काळी पोट भरे । येथील न सरे कल्पांती ही ॥२॥
आणिकाचे भेटी आडकाठी पडे । येथे ते न घडे वचन ही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४६७
📿 तरी मी गाण नव्हे गाण
1467.
तरी मी गाण नव्हे गाणीव करी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपजे ॥१॥
जाण नव्हे मी ते जाणीव हे करी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपजे ॥ २॥
दाता नव्हे जे मी दातृत्व ते करी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपजे ॥ ३॥
बहुरूपि नव्हे जे मी अभिनव नट धरी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपज़े ॥ ४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४६७
📿 जीव परमात्मा दोन्ही
1467.
जीव परमात्मा दोन्ही । ऐसे जाणती तेचि ज्ञानी ॥१॥
ऐस असोनि संपन्न । सदा करिती माझे भजन ॥२॥
माझ्या भजना हाती । उसंतु नाही दिवसराती ॥३॥
जन नोहें जनार्दन । एका जनार्दनी लोटांगण ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६७
📿 नेणोनिया आपपर ।
1467.
नेणोनिया आपपर ।
होते सुकर निक्षेपींचे ॥१॥
तेणे हाती धरोनिया ।
संती ठाया पावविलो ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४६८
📿 लटिका मी गाईन लटिका
1468.
लटिका मी गाईन लटिका मी नाचेन | संतासि देखोन लटिका लवे ॥१॥
लटिका माझा भाव लटिकी माझी भक्ति | तू तंव श्रीपती कृपासिंधु ॥२॥
लटिकी माझी क्रिया लटिके माझे कर्म | परि सत्य तुझे नाम गातु असे ॥३॥
लटिके माझे ध्यान लटिके माझे ध्यान | तू तंव सहजगुण सत्यरूप ॥४॥