🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६६५
📿 गव्हंची राशी जोडिल्य
1665.
गव्हंची राशी जोडिल्या हाती । सकळ पक्कान्ने तै होती ॥१॥
ऐसा नरदेह उत्तम जाण । वाचे वदे नारायण ॥२॥
द्रव्य जोडितां आपुले हाती । सकळ पदार्थ घरा येती ॥३॥
भावे करी संतसेवा । एका जनार्दनी प्रिय देवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६६६
📿 जालो आता दास । माझे
1666.
जालो आता दास । माझे तोडोनिया पाश ॥१॥
ठाव द्यावा पायापाशी । मी तो पातकाची राशी ॥धृपद॥
सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥२॥
तुका म्हणे भय । करा जवळी ते नये ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६६६
📿 कृपा करोनि त्वा मज प
1666.
कृपा करोनि त्वा मज प्रसन्न व्हावे | आणि म्या मागावे बुद्धिज्ञान ॥१॥
ऐसी भुली मज न घाली पांडुरंगा | बिघड संत्संगा न करी मज ॥२॥
मोक्षासी साधन एका ते उपाधी | दाखवुनि बुद्धिभ्रंश केले ॥३॥
एका पुत्र कलत्र राज्याचा संभ्रम | दावोनी दुर्गम भ्रम केला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६६७
📿 अंतरीचे जाणा । तरि क
1667.
अंतरीचे जाणा । तरि का येऊ दिले मना ॥१॥
तुमची करावी म्या सेवा । आता अव्हेरिता देवा ॥धृपद॥
नव्हती मोडामोडी । केली मागे तेचि घडी ॥२॥
तुका म्हणे दिला ठाव । पायी लागो दिला भाव ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६६८
📿 जेथे जेथे मन जाईल गा
1668.
जेथे जेथे मन जाईल गा माझे | तेथे तेथे तुझे रूप असो ॥१॥
ऐसी मज संवई लावी निरंतर | जन्मजन्मांतरी केशिराजा ॥२॥
आपणांस काम जरूर कायसा | आता पंढरीशा आटोपावे ॥३॥
नामा म्हणे नको पाहो माझी लाज | संसाराचे बीज मूळ खुडी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६६९
📿 काय ऐसा जन्म जावा वा
1669.
काय ऐसा जन्म जावा वायाविण । काही तरी ॠण असो माथा ॥१॥
कोणे तरी काळे होईल आठव । नाही जरी भाव भार खरा ॥धृपद॥
शता एकातरी जन्माच्या शेवटी । कृपाळुवा पोटी येईल दया ॥२॥
तुका म्हणे तरी नाही फांको देत । सर्वाचे उचित सापडले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६७०
📿 नाही कोणी दिस जात वा
1670.
नाही कोणी दिस जात वायाविण । साध्य नाही सीण लटिकाचि ॥१॥
एकाचिये माथा असावे निमित्त । नसो नाही हित कपाळी ते ॥धृपद॥
काही एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाको ॥२॥
तुका म्हणे वर्मे कळो येती काही । ओळखी जे ठायी होईल ते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६७१
📿 करील ते काय नव्हे वि
1671.
करील ते काय नव्हे विश्वंभर । सेवका दरिद्र लाज नाही ॥१॥
मजपासूनि हे पडिले अंतर । काय तो अव्हेर करू जाणे ॥धृपद॥
नामाच्या चिंतने नासी गर्भवास । नेदी करू आस आणिकाची ॥२॥
तुका म्हणे नेणो किती वाया गेले । तया उद्धरिले पांडुरंगे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६७२
📿 संध्या करितोसी केशवा
1672.
संध्या करितोसी केशवाच्या नावे । आरंभी ते ठावे नाही कैसे ॥१॥
किती या सांगावे करूनि फजित । खळ नेणे हित जवळी ते ॥धृपद॥
माजल्या न कळे उचित ते काय । न द्यावे ते खाय द्यावे सांडी ॥२॥
तुका म्हणे घेती भिंती सवे डोके । वावसी ते एके अंधारली ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६७२
📿 करीन ह्मणसी व्यापार
1672.
करीन ह्मणसी व्यापार ॥ नाम चोखट करी अक्षर ॥१॥
देवा तुझा मी व्यापारी ॥ सेवा करीन नानापरी ॥ २॥
धर्म खर्डा केला जमा ॥ खर्च घातला पूर्वकर्मा ॥ ३ ॥
दोन्ही रोजनामे महिन्याचे ॥ एकादशी द्वादशी पोत्याचे ॥ ४ ॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६७३
📿 दुधाचे घागरी मद्याचा
1673.
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥
तैसे खळा मुखे न करावे श्रवण । अहंकारे मन विटाळले ॥धृपद॥
काय करावी ती बत्तीस लक्षणे । नाक नाही तेणे वाया गेली ॥२॥
तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी । आपुलिया जैसी संसर्गे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६७४
📿 सांगावे हे बरे असते
1674.
सांगावे हे बरे असते हे पोटी । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥
आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥धृपद॥
नाही मागे येत बोलिले वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥
तुका म्हणे बहु भ्यालो खटपटे । आता देवा खोटे शब्द पुरे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६७५
📿 काय आम्हापाशी आहे धन
1675.
काय आम्हापाशी आहे धन वित्त | दान ते उचित देऊ काय ॥१॥
देता घेता आम्हा पुरे पुरे जाले | संगती त्यागिले भिवोनिया ॥२॥
काय वाणू गुण भिकारपणाची | होसी पंढरीची नामनीका ॥३॥
नामा म्हणे पुढे दाखवी मारग | आम्ही तुज मार्गे येऊ सुखे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६७६
📿 तुम्ही विश्वनाथ । दी
1676.
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडी । पाया पडिलो बराडी ॥धृपद॥
काय उणे तुम्हापाशी । मी तो अल्प चि संतोषी ॥२॥
तुका म्हणे देवा । काही भातुके पाठवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६७८
📿 मथुरेच्या राया । माझ
1678.
मथुरेच्या राया । माझे दंडवत पाया ॥१॥
तुमचे कृपेचे पोसने । माझा समाचार घेणे ॥धृपद॥
नाम धरिले कंठी । असे आर्तभूत पोटी ॥२॥
जीवीचे ते जाणा । तुका म्हणे नारायणा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६७८
📿 काय करू आता देवा विश
1678.
काय करू आता देवा विश्वंभरा | मजलागी थारा नाही कोठे ॥१॥
उबगति सोयरी धायरी समस्त | काय करू अंत पाहसी माझा ॥२॥
तूंचि मातापिता गुरुबंधू होसी | जाऊ मी कोणासी शरण आता ॥३॥
पायी थारा मागे नाम्याची विनंति | चित्त था श्रीपति आता वेगे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६७९
📿 पंढरीची वारी आहे ज्य
1679.
पंढरीची वारी आहे ज्याचे घरी । तोचि अधिकारीं धन्य जगी ॥१॥
आपण तरुनी तारितसे लोका । भुक्ति मुक्ति देखा तिष्ठताती ॥२॥
धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एका जनार्दनी मात धन्य त्याची ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६८०
📿 नको ऐसे जाले अन्न ।
1680.
नको ऐसे जाले अन्न । भूक तहान ते गेली ॥१॥
गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥धृपद॥
राहिले ते राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥
देह घरिला त्याचे फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६८१
📿 वाट पाहे हरी का नये
1681.
वाट पाहे हरी का नये आझूनि । निष्ठुर का मनी धरियेले ॥१॥
काय करू धीर होत नाही जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥धृपद॥
नाही माझा धावा पडियेला कानी । कोठे चक्रपाणी गुंतलेती ॥२॥
नाही कळो आले अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६८२
📿 नाही दिले कधी कठिण उ
1682.
नाही दिले कधी कठिण उत्तर । तरी का अंतर पडियेले ॥१॥
म्हणऊनि आता वियोग न साहे । लांचावले देहे संघष्टणे ॥धृपद॥
वेळोवेळा वाचे आठवितो नाम । अधिकचि प्रेम चढे घेता ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६८२
📿 कृपणाचे धन असे भूमि
1682.
कृपणाचे धन असे भूमि आंत | तेथे जाय चित्त जेथे धन ॥१॥
ऐसी मज देवा लावावी हे सवे | हेंचि मज द्यावे पांडुरंगा ॥२॥
जेथे जेथे मन जाईल हे माझे | तेथे तेथे तुझे रूप भासे ॥३॥
नामा म्हणे मी सर्वोपरी अज्ञान विभवी आम करून पांडुरंगा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६८२
📿 आवाडी जाती पंढरीसी ।
1682.
आवाडी जाती पंढरीसी । अहर्निशी ते वारकरी ॥१॥
तयांचे पायी माझे भाळ । सर्वकाळ असो देवा ॥२॥
हाती टाळ मुखी नाम । नेणती सकाम दुसरे ॥३॥
एकविध तयांचे मन । शरण एका जनार्दन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६८४
📿 जेथे जेथे जासी । तेथ
1684.
जेथे जेथे जासी । तेथे मजचि तू पाहासी ॥१॥
ऐसा पसरीन भाव । रिता नाही कोणी ठाव ॥धृपद॥
चित्त जडले पायी । पाळती हे ठायी ठायी ॥२॥
तुका म्हणे पोटी । देवा घालुनि सांगे गोष्टी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६८४
📿 मनी जे जे देखे परी द
1684.
मनी जे जे देखे परी दृष्टी नेणे | प्रेमाची ते खूण जाणावया ॥१॥
काय करू माय बाप गा विठ्ठला | मजसि का अबोला धरिलासी ॥२॥
मानसी वसणे प्रत्यक्ष पाहणे | तुझे नाम गाणे तरी साच ॥३॥
नामा म्हणे किती सांगावे गा तुज | केशवा है गुज पुरवी माझे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६८५
📿 धर्म अर्थ काम । जिही
1685.
धर्म अर्थ काम । जिही अर्पिला संपुर्ण ॥१॥
तेचि जाती जा वाटा । पंढरी चोहटा नाचती ॥२॥
आणिकांसी नोहे प्राप्ती । संत गाती तो स्वादु ॥३॥
शीण आअदि अवसानी । पंढरपूर न देखता नयनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६८६
📿 सापडला हाती । तरी जा
1686.
सापडला हाती । तरी जाली हे निश्चिंती ॥१॥
नाही धावा घेत मन । इंद्रियांचे समाधान ॥धृपद॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥
तुका म्हणे काम । निरसुनिया घेतो नाम ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६८७
📿 सेवीन उच्छिष्ट लोळेन
1687.
सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणी । वैष्णवा चरणी होइन किडा ॥१॥
ऐसे जन्म आता मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥धृपद॥
त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीन ते शिरी जाईन मागे ॥२॥
तुका म्हणे येथे राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनिया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६८९
📿 नेणे भक्ति कांही करू
1689.
नेणे भक्ति कांही करू कैसी सेवा | हे तो मज देवा समजेना ॥१॥
करू कैसा जप करू कैसे ध्यान | नाही माझे मन स्थिर देवा ॥२॥
कामक्रोध यांची मोठी हे जाचणी | जालो वेड्यावाणी समजेना ॥३॥
नामा म्हणे माझे सांवळे विठाई येऊनिया राही हृदयामाजी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६८९
📿 संत सज्जन जिवलग माझे
1689.
संत सज्जन जिवलग माझे । त्यांचे चरण चुरीन वोजे ॥१॥
त्यांचे संगे सुख मना होय । आनंद आनंदी पाहता होय ॥२॥
त्यांचे पिसे मजलागी मोठें । ऐसे भाविक केवी भेटे ॥३॥
त्यांचे नामाची घेऊ धणीं । तया जाऊ लोटांगणी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६९०
📿 तुज दिले आता यत्न कर
1690.
तुज दिले आता यत्न करी याचा | जीवभाव वाचा काया मने ॥१॥
भागलो दातारा शीण जाला भारी | आता मज तारी अनाथासी ॥२॥
नेणता सोसिली तयांची आटणी | नव्हती ही कोणी कांही माझी ॥३॥
वर्म नेणे दिशा हिंडती मोकाट | इंद्रिय सुसाट सर्व पृथ्वी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६९१
📿 संताचिये द्वारी होईन
1691.
संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगता सकळ करीन काम ॥१॥
तेणे माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाही ॥२॥
शेष उष्टावळी काढीन पत्रावळी । पूर्वकर्मा होळी सहज होय ॥३॥
एका जनार्दनी हेंचि पै मागत । नाही दुजा हेत सेवेविण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६९२
📿 तरी आम्ही तुझी धरिये
1692.
तरी आम्ही तुझी धरियेली कास । नाही कोणी दास वाया गेला ॥१॥
आगा पंढरीच्या उभा विटेवरी । येई लवकरी धावा नेटे ॥धृपद॥
पालवितो तुज उभरोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥
तुका म्हणे तुज बहु कान डोळे । का हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६९२
📿 संताचिये घरी होईन श्
1692.
संताचिये घरी होईन श्वानयाती । उच्छिष्ट ते प्रीति मिळेल मज ॥१॥
तेणे या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥२॥
आशा पाश सर्व जातील तुटोनी । जीव हा बंधनीं मुक्त होय ॥३॥
एका जनार्दनी भाकीन करुणा । श्रीसंतचरणा वारंवार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६९३
📿 करावा काटाळा नव्हे ह
1693.
करावा काटाळा नव्हे हे उचित । आधी च का प्रीत लावियेली ॥१॥
जाणतसा तुह्मी लाघव रूपाचे । आपुले ते जीव घेते ऐसा ॥धृपद॥
काय म्हणऊनि आलेती आकारा । आम्हा उजगरा करावया ॥२॥
तुका म्हणे भीड होती आजिवरी । आता देवा उरी कोण ठेवी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६९३
📿 प्रपंचाविषयी नव्हतो
1693.
प्रपंचाविषयी नव्हतो आम्ही दीन । दिनानाथ कोण म्हणे तुज ॥१॥
सुष्ट दुष्ट तरी माझे आचरण । ते तुज भूषण झाले देवा ॥२॥
पतीतपावन कैसोनी जोडतो । जरी ते न्हवते कर्म आड ॥३॥
नामा म्हणे ऐसा आहेसी गा देवा । विचारिसी केशवा मायबापा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६९३
📿 संताचिये परिवारी । ल
1693.
संताचिये परिवारी । लोळेन मी निर्धारी ॥१॥
जीवा होईल महालाभ । ऐसा घडता उद्योग ॥२॥
सांडोनिया थोरपण । शिव घालीं लोटांगण ॥३॥
आपुलें महत्त्व । तेथे मिरवुं नये सत्य ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६९४
📿 धरूनि पालव असुडीन कर
1694.
धरूनि पालव असुडीन करे । मग काय बरे दिसे लोकी ॥१॥
काय ते विचारा ठायीचे आपणा । जो हा नारायणा अवकाश ॥धृपद॥
अंतर पायासी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालो नेदी ॥२॥
रुसलेती तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावे हे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६९५
📿 निष्ठुर उत्तरी न धरा
1695.
निष्ठुर उत्तरी न धरावा राग । आहे लागभाग ठायीचाचि ॥१॥
तू माझा जनिता तू माझा जनिता । रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥धृपद॥
मुळींच्या ठेवण्या आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलो होतो ॥२॥
पोटींच्या आठवा पडिला विसर । काही आला भार माथा तेणे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६९५
📿 माझिया मनाचे हिंडणे
1695.
माझिया मनाचे हिंडणे जे जे ठायी | तेथे तेथे राही पांडुरंगा ॥१॥
भीमा चंद्रभागा वैकुंठ पंढरी | दावी दृष्टीभरी निरंतर ॥२॥
पुंडलिकासमोर लक्ष निरंतरी | तैसाची अंतरी येऊनि राहे ॥३॥
कटी कर विटे समचरण गोमटे | पाहता अति निकट हेंचि ध्यान ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६९६
📿 सांगता गोष्टी लागती
1696.
सांगता गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥
सुख जाले सुख जाले । नये बोले बोलता ॥धृपद॥
अंतर ते नये दिसो । आता सोस कासया ॥२॥
तुका म्हणे नाही भेद । देवा करू नये वाद ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६९६
📿 आसनी शयनी आठवी अनुदि
1696.
आसनी शयनी आठवी अनुदिनी | नित्य समाधानी रूप तुझे ॥१॥
काम धाम कांही नलगे माझ्या चित्ती | न देखे विश्रांति तुजविण ॥२॥
तापत्रय ओणवा लागला चहूंकडे | न देखे उघडे तुजविण ॥३॥
तुजविण ते जिवलग दुर्जे कोण होईल | ते माझे निवारील उद्वेग हे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 सख्य›
📿 अभंग क्र. १६९८
📿 विष पाजावया पूतना ते
1698.
विष पाजावया पूतना ते आली | ते तुवा तारिली काय म्हणुनि ॥१॥
पुसा या म्हणोनि वेश्या वोभाईलि | ती तुवा तारिली काय म्हणूनि ॥२॥
पिंगळेची आख्या पुराणी ऐकिली | ते तुवा तारिली काय म्हणुनि ॥३॥
गौतमाचे शाप अहल्या शिळा जाली | ते तुवा तारिली काय म्हणुनि ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६९८
📿 एक आहे मज आस । संत द
1698.
एक आहे मज आस । संत दासाचा मी दास ॥१॥
कै पुराती मनोरथ । संत सनाथ करतील ॥२॥
मनींचे साच होईल कोई । क्षेम मी देई संतांची ॥३॥
शरण एका जनार्दनी । माझा मनी नवस पुरे ॥४॥