🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९३२
📿 तुम्ही बहुतांचे केले
1932.
तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणे । आता नारयणे कठेण केले ॥१॥
हो उनी उदास अवलोकितो दिशा । पुरवा माझी इच्छामायाबापा ॥२॥
एका जानर्दनीं त्रैलोकीं नाम । तुम्ही तो निष्काम देवा बहु ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९३३
📿 न्यावयासी मूळ पाठवील
1933.
न्यावयासी मूळ पाठवील कधी । मज कृपानिधी पांडुरंग ॥१॥
प्राण फुठे माझा त्याचिये वियोगे । घडी जाय युगे एकी एकी ॥धृपद॥
त्याचिये गावीची आवड ती जीवा । जीव हा सांडावा वोवाळूनी ॥२॥
दिनो दिन चिंता वाढते बहुत । नावडे संचित करावेसे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९३३
📿 जर हेंचि खळे आयुष्या
1933.
जर हेंचि खळे आयुष्याची रासी | काळ माप उसी मवीतसे ॥१॥
माप ते लागले माप ते लागले | माप ते लागले झडाझडा ॥२॥
नामा म्हणे जावे शरण केशवा | सळेचा जो ठेवा न पवसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९३३
📿 धांवण्या धांवतां न ल
1933.
धांवण्या धांवतां न लावा उशीर । हा श्रेष्ठाचार मागे आला ॥१॥
गुणदोष नाही पाहिले कवणाचे । केले बहुतांचे धांवणे देवा ॥२॥
एका जनार्दनी पतितपावन । हे तो तुम्हा वचन साजतसे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९३४
📿 पाळीला विधी तो आजि फ
1934.
पाळीला विधी तो आजि फळा आला । ऐसा हा कळला साच भाव ॥१॥
नामाची आवडी लागलीसे चित्ता । पाय आठविता सुख वाटे ॥धृपद॥
धरिल्या देहाचे साधले कारण । पुढील्या खंडन गर्भवासा ॥२॥
तुका म्हणे लाभ झाला एक सरे आणिक दुसरे नाही आता ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९३४
📿 अतिथी आलिया द्यावे अ
1934.
अतिथी आलिया द्यावे अन्नदान | अप जीव प्राण परमार्थी ॥१॥
तोचि एक नर श्रीहरि समान | करी दुजे कोण नाही ऐसा ॥२॥
दीनासी सन्मान करिता आदर | त्याचे उपकारा पार नाही ॥३॥
नामा म्हणे ऐसे असावे भाविका सर्वांभूती ऐक्य देखा पाहे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९३४
📿 जाणा पाळूं कळा । कृप
1934.
जाणा पाळूं कळा । कृपाळुवा जी दयाळा ॥१॥
का हो आता उपेक्षिले । मज दीनासी ये वेळे ॥२॥
पाहतं वास देऊनी धीर । का हो पडियेला विसर ॥३॥
चित्त सर्व तुमचे पायी । कृपावंत भेटी देई ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९३६
📿 माझिये जातीचे मज भेट
1936.
माझिये जातीचे मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥
आवडे ज्या हरी अंतरापासूनि । ऐसियाचे मनी आर्त माझे ॥धृपद॥
तयालागी जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥२॥
सुफळ हा जन्म होईल तेथून । देता आलिंगन वैष्णवांसी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९३६
📿 एकी एकादशी करिता काय
1936.
एकी एकादशी करिता काय वेंचे | उपवासी राहता काय वेंचे ॥१॥
एक तुळसीदळ वाहता काय वेंचे | पाऊली वंदिता काय वेंचे ॥२॥
तुज जागरणा जाता काय वेंचे | हरि हरि म्हणता काय वेंचे ॥३॥
संतसमागमा जाता काय बेचे | चरणरज वंदिता काय वेंचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९३८
📿 जोडिले ते आता न सरे
1938.
जोडिले ते आता न सरे सारिता । जीव बळी देता हाता आले ॥१॥
संचित सारूनि बांधिले धरणे । तुंबिले जीवन आक्षेपे हे ॥धृपद॥
शीत उष्ण तेथे सुखदुःख नाही । अंतर सबाही एक जाले ॥२॥
बीज तो अंकुर पत्र शाखा फळे । प्राप्तबीज मुळ अवघे नासे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९३८
📿 निंदील हे जन सुखे नि
1938.
निंदील हे जन सुखे निंदू द्यावे | सज्जनी क्षोभावे नये बापा ॥१॥
निंदा स्तुति ज्याला समान मे जाली | त्याची स्थिति आली समाधिसी ॥२॥
शत्रु मित्र ज्याला होती समानत्वे | तोचि मे देवाते आवडला ॥३॥
माती आणि सोने ज्या भासे समान | तो एक निधान योगिराज ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९३९
📿 भवसागर तोडिता का रे
1939.
भवसागर तोडिता का रे करितसा चिंता | पैल उभा दाता पांडुरंग ॥१॥
निजाचे जे पीठ सोडूनि वैकुंठ | येथे वाळवंट आवडले ॥२॥
देव गुज सांगे पंढरीसी यारे | प्रेमसुख घ्यारे नाम माझे ॥३॥
तारीन भवसिंधु घ्यारे माझी भाक | साक्ष पुंडलिक करूनि सांगे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९४०
📿 एक तत्त्व त्रिभुवनी
1940.
एक तत्त्व त्रिभुवनी | दुसरे न धरी तू मनी ॥१॥
म्हणे का नरहरि नारायण | मग तुज गांजिल कवण ॥२॥
दोन मनी जरी तू धरिसी | तरी वाया दंडिला जासी ॥३॥
त्रिविध भक्ती चराचरी | तयामाजी एक तू करी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९४१
📿 हरिनामी उदास तो पतित
1941.
हरिनामी उदास तो पतित निष्ठुर | तया यमकिंकर गांजितील ॥१॥
तोचि हरिचा दासु नामी ज्या विश्वासु | तथा गर्भवासु नाही नाही ॥२॥
मार्ग सांडोनिया आडमार्गी जाती | ते व्याघ्रा वरपडे होती क्षणामाजी ॥३॥
नामा म्हणे जेणे नामी आळस केला | तो येवोनि गेला व्यर्थ एक |॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९४३
📿 जिकडे जाय तिकडे सवे
1943.
जिकडे जाय तिकडे सवे । आता यावे यावरी ॥१॥
माझ्या अवघ्या भांडवला । तू एकला जालासी ॥धृपद॥
आता दुजे धरा झणी । पाया हुनी वेगळे ॥२॥
तुका म्हणे आता देवा । नका गोवायावरी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९४३
📿 दाही दिशा फेरे कष्टव
1943.
दाही दिशा फेरे कष्टविसी सैरा | किती येरझारा कल्पकोटी ॥१॥
विठ्ठलाचे नामी दृढ धरी भाव | येर सांडी बाब मृगजळ ॥२॥
भक्ति मुक्ति सिद्धि जोडोनिया कर | करिती निरंतर वोळगण ॥३॥
नामा म्हणे मना धरी मे विश्वास | मग तुज गर्भवास नव्हे नव्हे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९४४
📿 स्मराता का घडे नास ।
1944.
स्मराता का घडे नास । विष्णुदास यावरी ॥१॥
ऐसी सीमा जाली जगी । तरी मी वेगी अनुसरलो ॥धृपद॥
धरिले ते निवडे आता । न घडे चित्ता वेगळे ॥२॥
तुका म्हणे नाश नाही । पुराणे ही गर्जती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९४४
📿 मागणे हेंचि माझे देव
1944.
मागणे हेंचि माझे देवा । दुजेपा दुरी ठेवा ॥१॥
मी तुं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करी ॥२॥
रंक मी एक दीन । माझे करावे स्मरण ॥३॥
नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनी आस पुरवावी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९४५
📿 आधी नाही कळो आला हा
1945.
आधी नाही कळो आला हा उपाय । नाही तरी काय चुकी होती ॥१॥
घालितो पायासी मिठी एकसरे । नेदी तो दुसरे आड येऊ ॥ध्रु॥
कासया पडितो लटिक्याचे भरी । नव्हता का शिरी भार घेतो ॥२॥
संसाराचा हाटक फिरतो दुकानी । भरोवरी धन मेळवीतो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९४५
📿 व्यर्थ का हव्यास करि
1945.
व्यर्थ का हव्यास करिसी परोपरी | नाम निरंतरी न म्हणा का रे ॥१॥
आयुष्य जाईल क्षणांत सरोन | पावसी पतन कुंभिपाकी ॥२॥
नाम संकीर्तन नाइके स्वभावे | प्रत्यक्ष ते शव जगामाजी ॥ ३ |
नामा म्हणे ऐसे गेले बहुतेक | सांगे सकळिक हेंचि आता |॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९४५
📿 आम्ही दीन तू दीनानाथ
1945.
आम्ही दीन तू दीनानाथ । तिही लोकी तुझी मात ॥१॥
आम्ही पतित तू पावन । ऐसे साजे नामभिधान ॥२॥
आम्ही अनाथ तू कैवारी । ऐसे तुझी आहे थोरी ॥३॥
आम्ही दीन तू वत्सल । ऐकीला तो ऐसा बोल ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९४६
📿 आता बरे झाले । माझे
1946.
आता बरे झाले । माझे मज कळो आले ॥१॥
खोटा ऐसा संसार । मजि पायी द्यावा थार ॥ध्रु॥
उघडल्या डोळे । भोग देता कळी काळे ॥२॥
तुका म्हणे जीवा । होता तडामोडी देवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९४७
📿 बोलिलो ते धर्म अनुभव
1947.
बोलिलो ते धर्म अनुभव अंगे । काय पांडुरंगे उणे केले ॥१॥
सर्व सिद्धी पायी वोळगती दासी । इच्छा नाही ऐसी व्हावे काही ॥धृपद॥
संतसमागमे अळंकारू वाणी । करू हे पेरणी शुद्ध बीजे ॥२॥
तुका म्हणे रामकृष्णनामे गोड । आवडीचे कोड माळ ओवू ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९४७
📿 पवित्र आणि परिकर | उ
1947.
पवित्र आणि परिकर | उभविले मंदिर |दीपेंविण मनोहर | शोभा न पवे ॥१॥
श्यामअंगी तरुणी | सुंदर होय रमणी |पुरुषाविण कामिनी | शोभा न पवे ॥२॥
द्रव्याविण नर | जरी जाहला सुंदर |तो त्याविण चतुर | शोभा न पवे ॥३॥
योगिया आणि कठिण | इंद्रिया नाही दमन |षट्कर्मेविण ब्राह्मण | शोभा न पवे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९४८
📿 ज्याचे माथा जो जो भा
1948.
ज्याचे माथा जो जो भार । तोची फार तयासी ॥१॥
मागे पुढे अवघे रिते । कळो येते अनुभवे ॥धृपद॥
परिसा अंगी अमूप सोने । पोटी हीन धातूचे ॥२॥
आपुला तो करी धर्म । जाणे वर्म तुका ते ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९४८
📿 निरंतर तुम्ही करावा
1948.
निरंतर तुम्ही करावा विचार | भवाब्धीचा पार होय कैसा ॥१॥
जन्म गेले वाया विषयाचे संगे | भुलले वाउगे मायामोहे ॥२॥
अवघा करिता संसाराचा धंदा | वाचे वदा सदा हरिनाम ॥३॥
सर्वभावे एका विठोबाते भजा | आरते करा पूजा हरिभक्त ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९५०
📿 माझे मन अति चंचळ । त
1950.
माझे मन अति चंचळ । त्यासी बांधा तुम्ही सबळ ॥१॥
मग ते कोठे नव जाय । तुमचे सोडोनियां पाय ॥२॥
सुखदुःखाचे कारण । मनचि हे अधिष्ठान ॥३॥
एका जनार्दनी शरण । मने मनासी बंधन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९५१
📿 माझी आता लोक सुखे नि
1951.
माझी आता लोक सुखे निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥
कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करू देवा ॥धृपद॥
तुका म्हणे काय करू लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥२॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 जनास उपदेश›
📿 अभंग क्र. १९५२
📿 देवो देवी वोळे दे तू
1952.
देवो देवी वोळे दे तू जीवन भाते | मेहुडे दुभते जना यया ॥१॥
तैसे मनी करा भजन भाव धरा | विषय पसारा टाका वेगी ॥२॥
उपायो न लगे दया ते धरावी | आपुली म्हणावी माय जगी |॥३॥
नामा म्हणे बाप विठ्ठल तो आमुचा | कुळदेव साचा पुरातन ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९५३
📿 जेथे जेथे मन जाईल वा
1953.
जेथे जेथे मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई ॥१॥
वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धिचा ठाव पुसा सर्व ॥२॥
भेदाची भावना तोडावी कल्पना । छेदावी वासना समूळ कंद ॥३॥
एका जनार्दनी नका दुजा छंद । रामकृष्ण गोविंद आठवावा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९५४
📿 येवढा पुरवा मनींचा छ
1954.
येवढा पुरवा मनींचा छंद । वाचे गोविंद आठऊ द्या ॥१॥
मग मी तुमच्या न सोडी पाया । कारीन काया कुर्वंडी ॥२॥
वारंवार क्षणक्षणा । संत चरणी वंदीन ॥३॥
दुजा नका काही हेत । एका जनार्दनी मागत ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९५५
📿 मागणें ते एक आम्हांप
1955.
मागणें ते एक आम्हांप्रती द्यावे । निरंतर यावे जागरणा ॥१॥
या हरिदासांचा संग बरवा । आनंदें राघवा गाऊ गीती ॥२॥
जो न लभे तप तीर्थदानीं । तो हरिकीर्तनी तिष्ठातसे ॥३॥
जनार्दनाचा एका म्हणे । कृपा करणे जागरणें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९५७
📿 एक शेरा अन्ना चाड ।
1957.
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥
का रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशी ॥धृपद॥
ओठ हात तुझा जागा । येर सिणसी वाउगा ॥२॥
तुका म्हणे श्रम । एक विसरता राम ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९५८
📿 आले धरायच पेठे । पुढ
1958.
आले धरायच पेठे । पुढे मागुते न भेटे ॥१॥
नाही कोणांचा सांगात । दुःख भोगिता आघात ॥धृपद॥
होसी फजीती वरपडा । लक्ष चौऱ्यांशीचा वेढा ॥२॥
एका पाउलाची वाट । कोणा सांगावा बोभाट ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९५९
📿 संसार करिता देव जे स
1959.
संसार करिता देव जे सांपडे | तरि का जाले वेडे सनकादिक ॥१॥
संसारी असता देव जरी भेटता | शुकदेव कासया जाता तया लागी ॥२॥
घराश्रमी जरी जोडे परब्रह्म | तरी का घराश्रम त्याग केला ॥३॥
जातीच्या आचारे सांपडे जरी सार | तरी का निरहंकार जाले साधु ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९५९
📿 कांही न करु आणिक आन
1959.
कांही न करु आणिक आन । वाचे गुण गाऊ तुमचे ॥१॥
पाहु डोळेभरी मुख । तेणे सुख इंद्रिया ॥२॥
न करी कोना ताडातोडी । आहे खोडी दूर करु ॥३॥
एका जनार्दनी प्रमाण । वाचे नारायण आठवुं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९६१
📿 झरा लागला सुखाचा । ऐ
1961.
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥
जो हे माप तोंडे धरी । सळे जाली ते आवरी ॥धृपद॥
जाले बहु काळ । कोणा नाही ऐसे बळ ॥२॥
तुका म्हणे तळ । नाही पाहेसा सकळ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १९६२
📿 आम्ही बोलो ते तुज कळ
1962.
आम्ही बोलो ते तुज कळे । एक दोही ठायी खेळे ॥१॥
काय परिहाराचे काम । जाणे अंतरीचे राम ॥धृपद॥
कळोनिया काय चाड । माझी लोकासी बडबड ॥२॥
कारण सवे ऐका । अवघे आहे म्हणे तुका ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९६२
📿 नेणे साधन पसारा । व्
1962.
नेणे साधन पसारा । व्रता तपाच्या निर्धारा ॥१॥
आवडी गाऊ तुझे नाम । तेणे पुरती सर्वकाम ॥२॥
आणिक न करु चावटी । आगमनिगम आटाआटी ॥३॥
न करी साधन कांही । एका जनार्दनी पाही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९६३
📿 देवा तुम्ही आहांत सम
1963.
देवा तुम्ही आहांत समर्थ । काय मागूं मी पदार्थ ॥१॥
देणे द्याला तरी हेंचि द्यावे । संतचरंण मी वंदावें ॥२॥
दुजे मागणें सायासी । नाही नाही हषीकेशी ॥३॥
बोलतसे तोंडभरी । ऐसे नका म्हणे हरि ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९६४
📿 अवघे निरंतर करा हा व
1964.
अवघे निरंतर करा हा विचार | भवसिंधूचा पार तरिजे केवी ॥१॥
अवघे जन्म वाया गेले विषयसंगे | भुललेती वाउगे मायामोहे ॥२॥
अवधा वेळ करिता संसाराचा धंदा | वाचे वसो सदा हरि नाम ॥३॥
अवध्या भावी एका विठ्ठलाते भजा |आते पूजा करा हरिदासाची ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. १९६४
📿 दास्यत्व करीन मी देव
1964.
दास्यत्व करीन मी देवा । माझी पुरवा आस तुम्ही ॥१॥
देऊनिया कृपादान । निरवावें जाण संतांसी ॥२॥
मग ते धरिता आपुलें करी । होती कामारी भुक्ति मुक्ति ॥३॥
एका जनार्दनी शरण । तुमचे महिमान न कळे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 संसारीकांस उपदेश›
📿 अभंग क्र. १९६५
📿 अवघे सावधान होऊनि वि
1965.
अवघे सावधान होऊनि विचारा | सोडवण करा संसाराची ॥१॥
अवघा काळ वाचे म्हणा नारायण | वाया एक क्षण जाऊ नेदी ॥२॥
अवघे हे आयुष्य सरोनि जाईल | मग कोण होईल साह्य तुम्हा ॥३॥
अवघा हा प्रपंच जाणोनि लटिका | शरण रिघा एका पंढरिराया ॥४॥