नामदुषी त्याचे नको द
2263.
नामदुषी त्याचे नको दरुषण । विष ते वचनवाटे मज ॥१॥
अमंगळ वाणी नाईकावी कानी । निंदेची पोहणी उठे तेंथे ॥धृपद॥
काय साच लभ्य त्याचिये वचनी । कोण त्या पुराणी दिली ग्वाही ॥२॥
काय आड लावू त्याचिया तोंडासी । आता या जिभेंसी काय करू ॥३॥
तुकाम्हणे संत न मानिती त्यास । घेउ पाही ग्रास यमदूत ॥४॥
अर्थ :
जे हरिनामाला दूषण देतात निंदा करतात त्यांचे तोंडही मला पाहुशी वाटत नाही त्यांचे बोलणे म्हणजे मला कडवट विषा प्रमाने वाटतात. त्यांची अमंगळवाणी कानाने ऐकू देखील वाटत नाही कारण त्यांच्या वाणीतून निंदेची दुर्गंधी येत असते. त्याचे म्हणणे असते की हरिनाम हे चांगले नाही जर त्याचे खरे आहे तर मग आतापर्यंत पुराणाने तरी कोठे याविषयी ग्वाही दिली आहे. अशा निर्लज्ज मनुष्याच्या तोंडाला मी काय आड लावू त्याचे तोंड तरी कसे बंद करू आता त्याच्या जीभेला तरी मी काय करू? तुकाराम महाराज म्हणतात अशा अधम मनुष्याला संत मान्यता देत नाहीत या मनुष्याला यमदूत गिळू घेऊ पाहत असतात.
