🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१६४
📿 द्रव्य घेऊनिया कथा ज
3164.
द्रव्य घेऊनिया कथा जरी करी । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥
माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा । तरी नारायण जिव्हा झडो ॥धृपद॥
साह्य तू झालासी काय उणे तुपे । आणीक भूतांपे काय मागो ॥२॥
तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायी । तू माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१६५
📿 जरि हा हो कृपा करिल
3165.
जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हेचि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥
कोठोनिया काही न लगे आणावे । न लगे कोठे जावे तरावया ॥धृपद॥
जरी देव काही धरिल पै चित्ती । तरि हेचि होती दिव्य चक्षु ॥२॥
तुका म्हणे जरी देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१६५
📿 देही धर्म विहित करी
3165.
देही धर्म विहित करी । अद्वैत भाव चित्ती धरी । सर्वभावे नमस्कारी । एक आत्मा म्हणोनी ॥१॥
तेणे तुटे रे बंधन । वाचे जपे जनार्दन । आणिक नको रे साधन । रामकृष्ण स्मर सुखें ॥२॥
पवित्र त्याचे हे कुळ । आचार त्याचाचि सुशीळ । अखंड जे सर्वकाळ । नाम जपती ॥३॥
एका जनार्दनी नाम । परब्रह्मा ते निष्काम । हरे भवश्रम । जन्मजराव्याधी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१६६
📿 रात्री दिवस आम्हा यु
3166.
रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥
जीवा ही आगोज पडती आघात । येऊनिया नित्य नित्य वारू ॥धृपद॥
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे । अवघीयांचे काळे केले तोंड ॥२॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१६६
📿 येणे पंथे बहुत तरले
3166.
येणे पंथे बहुत तरले निश्चिती । आवडी जे गाती विठोबासी ॥१॥
तारक हा मंत्र सोपा पै सर्वासी । उच्चारिता अहर्निशी सर्वसिद्ध ॥२॥
पापा प्रायश्चित कलियुगी नाम । आणिक सोपे वर्म संतसेवा ॥३॥
न लगे दंडन मुंडन ते आटी । नाम घेता होटीं सर्व जोडें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१६८
📿 कासया व्हावे आम्ही ज
3168.
कासया व्हावे आम्ही जीवन्मुक्त । सांडुनिया थीत प्रेमसुख ॥१॥
वैष्णवाचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असो सुखी ॥धृपद॥
काय त्या गाठीचे पडले सुटोन । उगलाचि बैसोन धीर धरू ॥२॥
सुख आम्हासाठी केले हे निर्माण । निर्दैव तो कोण हाणे लाता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१७०
📿 प्रपंच परमार्थ संपाद
3170.
प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही नीदानी न घडे त्यासी ॥१॥
दोही पेवावरी ठेवू जाता हात । शेवटी अपघात शरीराचा ॥२॥
तुका म्हणे तया दोहीकडे धक्का । शेवटी तो नरकामाजी पडे ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१७१
📿 आम्हा भय धाक कोणाचा
3171.
आम्हा भय धाक कोणाचा रे पाहे । काळ मशक काय मानव हे ॥१॥
आम्हासी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥धृपद॥
काय करावी हे कोणाची मान्यता । करिता अनंता कोण वारी ॥२॥
नाही शीण आम्हा झाले कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१७२
📿 तांबीयाचे नाणे न चले
3172.
तांबीयाचे नाणे न चले खऱ्या मोले । जरी हिंडविले देशोदेशी ॥१॥
करणीचे काही न मने सज्जना । यावे लागे मना वृद्धांचिया ॥धृपद॥
हिरियासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळा न पाहाती ॥२॥
देऊनिया भिंग कामाविले मोती । पारखिया हाती घेता नये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१७३
📿 चित्ता मिळे त्याचा स
3173.
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभविता दूर तेचि भले ॥१॥
ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥धृपद॥
हो का पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रही धरू नये ॥२॥
तुका म्हणे सत्य पाळावे वचन । अन्यथा आपण करू नये ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१७३
📿 जया म्हणती नीचवर्ण ।
3173.
जया म्हणती नीचवर्ण । स्त्री शुद्रादि हीनजन ॥१॥
सर्वाभूतीं देव वसे । नीचा ठाई काय नसे ॥२॥
नीच कोठोनि जन्मला । पंचभूता वेगळा जाला ॥३॥
तया नाही का जनन । सवेंचि होत पतन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१७४
📿 आपुली कसोटी शुद्ध रा
3174.
आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीने भूषण अधिक पुटा ॥१॥
नाही कोणासवे बोलणे लागत । निश्चिंतीने चित्तसमाधान ॥धृपद॥
लपविले ते ही ढेकरे उमटे । खोटियाचे खोटे उर फोडी ॥२॥
तुका म्हणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१७४
📿 शास्त्रज्ञ पंडित हो
3174.
शास्त्रज्ञ पंडित हो का वेदवक्ते । परी हरि भजनी रत वंद्य सदा ॥१॥
भक्तीचे कारण तेणे सरतेपण । वाउगाची शीण जाणिवेचा ॥२॥
मी एक जाणता पैल नेणता । ऐसा विकल्प भाविता पतन जोडे ॥३॥
एका जनार्दनी विकल्प त्यजोनी । विठ्ठल चरणी मिठी घाली ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१७५
📿 साधिता साधन योगी शिण
3175.
साधिता साधन योगी शिणताती । तेथे तुझी मति काय बापा ॥१॥
उलट पालट न करी गोल्हाट । आहे तोचि नीट पाहे बापा ॥२॥
पंचाग्नी साधन धूम्रपान यज्ञ । आहे तो संपूर्ण उभा बापा ॥३॥
साधन खटपट वाउगा तो बोभाट । एका जनार्दनी नीट उभा बापा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१७६
📿 अज्ञानाची भक्ती इच्छ
3176.
अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥1॥
अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥
अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥2॥
अज्ञानानाचें ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥3॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१७६
📿 शिणसी का रे वाया । व
3176.
शिणसी का रे वाया । वाचे वदे पंढरीराया ॥१॥
मग तुज नाही रे बंधन । पारुषे पा कर्माकर्म ॥२॥
कर्म धर्म न करी तू सोस । अवघा विठ्ठलचि देख ॥३॥
नको करू कुंथाकुंथी । तेणे होते फजिती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१८१
📿 नर नारी बाळे अवघा ना
3181.
नर नारी बाळे अवघा नारायण । ऐसे माझे मन करी देवा ॥१॥
न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥धृपद॥
असावे म्या सदा विषयी विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायी ॥२॥
करोनिया साह्य पुरवी मनोरथ । व्हावे कृपावंत तुका म्हणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१८१
📿 देह आहे तुम्हा आधीन
3181.
देह आहे तुम्हा आधीन । तोंवरी करा भजन ॥१॥
पडोनि जाईल शरीर । मग कराल विचार ॥२॥
यातना यमाची अपार । कोण तेथे सोडविणार ॥३॥
आला नाही अंगी घाव । तंव भजा पंढरीराव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१८३
📿 प्राक्तनाच्या योगे आ
3183.
प्राक्तनाच्या योगे आळशावरी गंगा । स्नान काय जगा करू नये ॥१॥
उभी कामधेनु मांगाचे अंगणी । तिसी काय ब्राम्हणी वंदू नये ॥धृपद॥
कोढियाचे हाते परिसे होय सोने । अपवित्र म्हणोन घेऊ नये ॥२॥
यातिहीन झाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानू नये ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१८३
📿 काय मनुष्यदेहाचें हो
3183.
काय मनुष्यदेहाचें होय । नाशिवंत जाय शेवटी ॥१॥
हे तो काळाचे खाजे सहजी । कांही तरी राजी हरि करा ॥२॥
जाता आयुष्य न लगे वेळ । स्मरें घननीळ रामराणा ॥३॥
एका जनार्दनी भाकी कींव । वाया हांव धरूं नका ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१८४
📿 बोलिलो उत्कर्षे । प्
3184.
बोलिलो उत्कर्षे । प्रेमरस दासत्वे ॥१॥
साच करिता नारायण । जया शरण गेलो तो ॥धृपद॥
समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥
तुका म्हणे लडिवाळाचे । द्यावे साचे करूनिया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१८५
📿 विचा केला ठोबा । म्ह
3185.
विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥१॥
का रे नेणा त्याचे नांव । काय वेदासि नाही ठाव ॥धृपद॥
शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग झाला ॥२॥
तुका म्हणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१८७
📿 अदृष्टी असेल जे जे व
3187.
अदृष्टी असेल जे जे वेळे । ते ते मिळेल ते ते काळे ॥१॥
ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिका न चुकतीं ॥२॥
जे जे होते ज्या संचितीं । ते तयासवे चालती ॥३॥
जैशी जैशी कर्मरेषा । तैसे भोगणें सहसा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१८८
📿 न घडे मायबापे बाळकाच
3188.
न घडे मायबापे बाळकाचा घात । आपणा देखत होऊ नेदी ॥१॥
का मी मनी चिंता वाहू भय धाक । काय नव्हे एक करिता तुज ॥धृपद॥
वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तहान भूक वाहे कडिये खांदी ॥२॥
तुका म्हणे तू गा कृपावंत भारी । ऐसे मज हरी कळो आले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१८८
📿 होणार जणार न चुके कल
3188.
होणार जणार न चुके कल्पांती वाउगी । कुंथाकुंथी करुनी काय ॥१॥
लिहिलें संचितें न चुके कल्पांती । वाउगाचि भ्रांती फळ काय ॥२॥
एका जनार्दनी प्रारब्धाचा भोग । करिता उद्वेग न टळेची ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१८९
📿 करावे कीर्तन । मुखे
3189.
करावे कीर्तन । मुखे गावे हरीचे गुण ॥१॥
मग काही नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥धृपद॥
शांति खड्ग हाती । काळासी ते नागविती ॥२॥
तुका म्हणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१८९
📿 नेणती ब्रह्मादिक ऐसे
3189.
नेणती ब्रह्मादिक ऐसे याचे कर्म । दृढादृढा वर्म सबळ मागे ॥१॥
न चुके न चुके भोगिल्यावांचुनीं । वायांचि तो मनी शीण वाहे ॥२॥
एका जनार्दनी शरण एकपणीं । गाय चक्रपाणी एकभावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१९०
📿 साधनाच्या कोटी । केल
3190.
साधनाच्या कोटी । केल्या आटी होत्या त्या ॥१॥
देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपी ॥धृपद॥
केले होती वृथा श्रम । उपरम न होता ॥२॥
तुका म्हणे कळो आले । सर्व जाले आपरूप ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१९०
📿 प्रारब्ध क्रियमाण सं
3190.
प्रारब्ध क्रियमाण संचिताचा भोग । भोगिल्याची भोग तो न सुटे ॥१॥
ज्या जैसी कल्पना त्या तैशी भावना । अंती जे वासना जडोनी ठेली ॥२॥
एका जनार्दनी वासना टाकुनी । हरीचे भजनी सावध होई ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१९१
📿 तुज काय करू मज एक सा
3191.
तुज काय करू मज एक सार । अमृतसागर नाम तुझे ॥१॥
काय उणे आम्हा तयाचिये पोटी । गोविता हे कंठी कामधेनु ॥धृपद॥
नोळखे तानुले माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥
जो नाही देखिला याचक नयनी । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१९२
📿 कृपेचे सागर हे साधुज
3192.
कृपेचे सागर हे साधुजन । तिही कृपादान केले मज ॥१॥
बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणे माझा स्थिर केला जीव ॥धृपद॥
तेणे सुखे मन स्थिर झाले ठायी । संती दिला पायी ठाव मज ॥२॥
नाभी नाभी ऐसे बोलिलो वचन । ते माझे कल्याण सर्वस्व ही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१९४
📿 साच हा विठ्ठल साच हे
3194.
साच हा विठ्ठल साच हे करणे । संत जे वचने बोलियेले ॥१॥
साच ते स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥
तुका म्हणे घेती साच साच भावे । लटिके वर्म ठावे नाही त्यासी ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१९४
📿 जेथे पापपुण्यकर्माचर
3194.
जेथे पापपुण्यकर्माचरण । वाढविताहे जन्ममरण ॥१॥
जया पुण्याचीया गोडी । स्वधर्म जोडिताती जोडी ॥२॥
जय नाही हा विश्वास । असोनि न दिसे जगी भाष ॥३॥
एका जनार्दनी डोळा । असोनि देही तो अंधळा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१९५
📿 देहबुद्धी खुंटली येथ
3195.
देहबुद्धी खुंटली येथे माया तुटली । देहाची स्थिती दैवाधीन ठेली ॥१॥
दैवाचेनी बळे देहींचे कर्म चळे । स्वसुखाचे सोहळे विदेह भावे ॥२॥
भोगी का त्यांगी अथवा हो योगी । देही देहपण न लगे त्याच्या अंगी ॥३॥
एका जनार्दनी एकपणाच्या तुटी । सहज चैतन्यासी मिनला उठाउठी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१९६
📿 पुण्यपापा ठाव नाही स
3196.
पुण्यपापा ठाव नाही सुखदुःखा । हानि लाभ शंका नासलिया ॥१॥
जिंता मरण आले आप पर गेले । मूळ छेदियेले संसाराचे ॥धृपद॥
अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाही सत्यअसत्याशी ॥२॥
जन वन भिन्न आचेत चळण । नाही दुजेपण ठाव यासी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१९८
📿 देव कैचा तया दुरी ।
3198.
देव कैचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥
आळवित्या न लगे घर । माय जाणे रे भातुके ॥धृपद॥
नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥
आता परदेशी तुका । झाला लोकांवेगळा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१९९
📿 भक्ती ज्याची थोडी ।
3199.
भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥
तो नरचि नव्हे पाही । खर जाणावा तो देही ॥धृपद॥
भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥
तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३१९९
📿 लहानाहूनि लहान न धरी
3199.
लहानाहूनि लहान न धरी अभिमान । तेणे हो कारण सर्व बापा ॥१॥
उंचपणें पाहता वेळुचीये परी । लोहाळा अंतरी नम्र होये ॥२॥
भक्ति करता मुक्ति संताचें संगतीं । मग मनी विश्रांति हरी जोडे ॥३॥
एका जनार्दनी संतांसी शरण । धरूनिया कान नाचू द्वारी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२००
📿 संतांनी सरता केलो तै
3200.
संतांनी सरता केलो तैसेपरी । चंदनी ते बोरी व्यापियेली ॥१॥
गुण दोष याती न विचारिता काही । ठाव दिला पायी आपुलिया ॥२॥
तुका म्हणे आले समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२०१
📿 चित्ती तुझे पाय डोळा
3201.
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान । अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेचि एक तुम्हा देवा मागणे दातारा । उचित ते करा माझा भाव जाणूनि ॥धृपद॥
खुंटली जाणींव माझे बोलणे आता । कळो यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥२॥
तुका म्हणे आता नको देऊ अंतर । न कळे पुढे काय बोलो विचार ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२०३
📿 हरीजना प्राण विकली ह
3203.
हरीजना प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरी झालो ॥१॥
म्हणिये सत्वर करीन सांगता । घेईन मी देता शेष त्यांचे ॥धृपद॥
आस करूनिया राहेन अंगणी । उच्छीष्ठाची धणी घ्यावयासी ॥२॥
चालता ते मार्गी चरणीचे रज । उडती सहज घेईन आता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२०५
📿 भक्ती आम्ही केली सां
3205.
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलो हे संग सुख याचे ॥१॥
सुख आम्हा झाले धरिता यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥
तुका म्हणे सुख बहु झाले जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२०५
📿 जाणिवेच्या मागे होत
3205.
जाणिवेच्या मागे होत कुंथाकुंथी । हे तो प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥
जाणीव शहाणीव येथे नाही काम । वाचे वदता नाम सर्व साधे ॥२॥
जाणिव जाणपण नेणिवा नेणपण दोहींचे । अधिष्ठान एकनाम ॥३॥
एका जनार्दनी नामक परते आन । दुसरे साधन सीण जगी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२०६
📿 इंद्रियांसी नेम नाही
3206.
इंद्रियांसी नेम नाही । मुखी राम म्हणोनि काई ॥१॥
जेवि मासीसंगे अन्न । सुख नेदी ते भोजन ॥धृपद॥
कीर्तन करावे । तैसे करूनी दावावे ॥२॥
हे तो अंगी नाही चिन्हे । गाइले वेश्येच्या ढव्याने ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२०६
📿 विवाद वाद हे तो अधम
3206.
विवाद वाद हे तो अधम लक्षण । भक्तीचें कारण न साधे येणे ॥१॥
मुख्य एक करी एकविधपण । सम दरुशने देखे जगी ॥२॥
नर अथवा नारी असो भलते याती । वंदावे विभूति म्हणोनिया ॥३॥
एका जनार्दनी बोध धरी मना । होऊनियां साना सानाहुनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२०८
📿 पावलो प्रसाद इच्छा क
3208.
पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान ॥१॥
मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजे ॥धृपद॥
सांभाळासी येऊ नेदीच उणीव । अधिकारगौरव राखे तैसा ॥२॥
तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२१०
📿 क्षुधा तृषा काही सर्
3210.
क्षुधा तृषा काही सर्वथा नाठवे । पहावया धावे कोल्हांटासी ॥१॥
कथेसी साक्षेपे पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरी कोणी नाही ॥धृपद॥
बलत्कारी जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनिया ॥२॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२११
📿 आता वांटो नेदी आपुले
3211.
आता वांटो नेदी आपुले हे मन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥
दुजियाचा संग लागो नेदी वारा । आपुल्या शरीरावरूनिया ॥धृपद॥
यावे जावे आम्ही देवा चे सांगाते । मागूनी करीत हेचि आलो ॥२॥
काय वाया गेलो तो करू उद्वेग । उभा पांडुरंग मागे पुढे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२१२
📿 आता जावे पंढरीसी । द
3212.
आता जावे पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥
चंद्रभागेचिया तिरी । आम्ही नाचो पंढरपुरी ॥धृपद॥
जेथे संतांची दाटणी । त्याचे घेऊ पायवणी ॥२॥
तुका म्हणे आम्ही बळी । जीव दिधला पाया तळी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२›
📿 अभंग क्र. ३२१२
📿 निःशेष कांही नेणिजे
3212.
निःशेष कांही नेणिजे । ते शुद्ध ज्ञान म्हनिजे । मा सर्व जे जेणे जाणिजे । ते अज्ञान कैसे बा ॥१॥
ज्ञान ते कवण अज्ञान ते कवण । दोहोंचें लक्षण पाहते पाहा ॥धृ.॥
ज्ञानाचे जे ज्ञातेपण । तया नांवाची अज्ञान । अज्ञानाचे जे ज्ञान । तया नांव शुद्ध ज्ञान ॥२॥
ज्ञान ते अज्ञाना आले । अज्ञान ते ज्ञाना गेले । एका जनार्दनी मुलें । बागुलाचीं दोनीं ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३२१३
📿 आम्हा नरका जाता काय
3213.
आम्हा नरका जाता काय येईल तुझ्या हाता । ऐसा तू अनंता विचारी पा ॥१॥
तुज शरण आलियाचे काय हेचि फळ । विचारा दयाळ कृपानिधी ॥धृपद॥
तुझे पावनपण न चले आम्हासी । ऐसे हृषीकेशी कळो आले ॥२॥
आम्ही दुःख पावो जन्ममरण व्यथा । काय तुझ्या हाता येत असे ॥३॥