संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११९२
📿 कष्ट न करिता योग्य ज
1192.
कष्ट न करिता योग्य जरी साधी । श्रम ते उपाधि वाउगी का बा ॥१॥
नाम ते सोपे श्रम नाही कांही । उच्चारिता पाही सर्व जोडे ॥२॥
एका जनार्दनी नको योगयाग । म्हणावा श्रीरंग वाचे सदा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११९३
📿 आता माझे नका वाणू गु
1193.
आता माझे नका वाणू गुण दोष । करितो उपदेश याचा काही ॥१॥
मानदंभासाठी छळीतसे कोणा । आण या चरणा विठोबाची ॥२॥
तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा । काय कळे जगा अंतरीचे ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. ११९३
📿 विमानी बैसली विठ्ठल
1193.
विमानी बैसली विठ्ठल सुखमूर्ती | घेतला निवृत्ति मध्यभागी ॥१॥
राही रखुमाई बैसले सुरगण | उठली विमाने गंधर्वांची ॥२॥
गोपाळांचे भार उठले तातडीने | चालिली विमाने सुरवरांची ॥३॥
आता त्वरे चला तुम्ही सप्तश्रृंगा | कार्य हे गोविंदा सिद्धि न्यावे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११९३
📿 योगयाग तप व्रते आचरि
1193.
योगयाग तप व्रते आचरितां । नाम सोपे गातांसर्व जोडें ॥१॥
पाहोनिया प्रचीत नाम घे अनंत । तुटे नाना जपे नाम ॥२॥
एका जनार्दनी नामाचा महिमा । वर्णिता उपरमा शेष आला ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. ११९४
📿 टाळ हे मृदंग गायने प
1194.
टाळ हे मृदंग गायने पुढती | रंजविती निवृत्ति अवघेजण ॥१॥
गीतार्थ करिती योगी मुनिजन | रंजविती मन निवृत्तीचे ॥२॥
आत्मसुख एक बोलती बोलणी | ज्ञानराज मनी आठवतो | | ३॥ज्ञानराजे आमुचे निवविले डोळे | आता ऐसे खेळे नाही कोणी ॥४॥
ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी | आता ऐसी सखी नाही कोणी ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११९४
📿 करिता साधनांच्या कोट
1194.
करिता साधनांच्या कोटी । नामाहुनि त्या हिंपुटी ॥१॥
नाम वाचे आठवितां । साधने सर्वा येती हाता ॥२॥
नामापरतां दुजा मंत्र । नाहींनाही धुंडिता शास्त्र ॥३॥
एका जनार्दनी नाम । शुद्ध चैतन्य निष्काम ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११९५
📿 परते मी आहे सहज चि द
1195.
परते मी आहे सहज चि दुरी । वेगळे भिकारी नामरूपा ॥१॥
न लगे रुसावे धरावा संकोच । सहज ते नीच आले भागा ॥धृपद॥
पडिलिये ठायी उच्छिष्ट सेवावे । आरते ते चि देवे केले ऐसे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आम्हा जी वेगळे । केले ते निराळे द्विज देवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११९५
📿 नाम श्रेष्ठ तिही लोक
1195.
नाम श्रेष्ठ तिही लोकी । म्हणोनि शिव नित्य घोकी ॥१॥
सदा समाधी शयनी । राम चिंती ध्यानीं मनी ॥२॥
अखंड वैराग्य बाणले अंगी । म्हणोनि वंद्य सर्वा जगी ॥३॥
एका जनार्दनी वाचे । नाम वदे सर्वदा साचे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. ११९६
📿 जे जे सुख आम्ही अनुभ
1196.
जे जे सुख आम्ही अनुभविले मना | त्याचा नारायणा आठव होतो ॥१॥
ऐस पदोपदी निवृत्तिराज कष्टी | कोणकोणाच्या गोष्टी आठवाव्या ॥२॥
ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे | केले नारायणे उफराटे ॥३॥
उफराटे फार कळले माझे मनी | वळचणीचे पाणी आढ्या गेले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११९६
📿 कळिकाळा नाही बळ । ना
1196.
कळिकाळा नाही बळ । नाम जपे तो सबळ ॥१॥
ऐसेंअ नाम सदा जपे । कळिकाळा घाली खेपे ॥२॥
हरिचिया दासा साचे । भय नाही कळिकाळाचे ॥३॥
एका जनार्दनी काळ । काळ होय तो कृपाळू ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. ११९७
📿 हरी हा भक्तांच्या अं
1197.
हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो
अनुरागे भजती देवा ।
त्यांच्या भावा साक्षी तो ॥१॥
म्हणोनिया मागे पुढे ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११९८
📿 माझा स्वामी तुझी वाग
1198.
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथे मी पतित काय आलो ॥१॥
तीर्थे तुमच्या चरणी जाहाली निर्मळ । तेथे मी दुर्बळ काय वाणू ॥२॥
तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तो काय निंद्य हीन याती ॥३॥
अर्थ :
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. ११९८
📿 अवघ्या कळा याचे हाती
1198.
अवघ्या कळा याचे हाती ।
न करी काय एक श्रीपती ।
विष पाजिता अमृती ।
केली तृप्ती प्रल्हादा ॥१॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. ११९९
📿 सप्तंश्रृंगालागी केल
1199.
सप्तंश्रृंगालागी केली प्रदक्षिणा | आता नारायणा सिद्ध व्हावे ॥१॥
मार्गी आदिमाया पूजिली आनंदी | म्हणती धन्य मांदी वैष्णवांची ॥२॥
चालता चालता दिवस जाले फार | होईल उशीर समाधीसी ॥३॥
तीन रात्र तेथे राहिले गोपाळ | मग म्हणती सकळ चला आता ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. ११९९
📿 आपणा समान केले त्यास
1199.
आपणा समान केले त्यासी ।
धरिले ज्यासी निजहाती ॥१॥
ऐसा देवो कृपासिंधु ।
म्हणोनि बंधु दीनांचा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२००
📿 आम्हा विष्णुदासा हे
1200.
आम्हा विष्णुदासा हे चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥
वाणी नाही घ्यावे आपुलिया हाते । करोनिया चित्ते समाधान ॥२॥
तुका म्हणे द्रव्य मेळविले मागे । हे तो कोणासंगे आले नाही ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. १२००
📿 वंदिली अंबिका निघाले
1200.
वंदिली अंबिका निघाले बाहेर | कीर्तन गजर पुढे होत ॥१॥
गोदातीरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर | उतरले भार वैष्णवांचे ॥२॥
म्हणती पांडुरंगे दावियेले स्थळ | निवृत्तिराज विकळ पार जाले ॥३॥
पंचमीचे दिवशी गेले पंचवटी | उतरले तटी गौतमीचे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२००
📿 आले शरण त्याचा करी प
1200.
आले शरण त्याचा करी प्रतिपाळ ।
न म्हणे हा दुर्बळ सदैव काही ॥१॥
नेदी लागो वारा कल्पनेचा तया ।
न वजे पासोनिया दुरी कोठे ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. १२०१
📿 सुंदर नारायण गौरविले
1201.
सुंदर नारायण गौरविले फार | केला नमस्कार वैष्णवांनी ॥१॥
सुरस सर्व॑ तीथे आदि पुरातन | केली नारायणे तीर्थयात्रा ॥२॥
विसोबा खेचर परिसा भागवत | अनेक ते संत बसविले ॥३॥
मध्ये निवृत्तिराज पांडुरंग पुंडलिक | पाहाती कौतुक गौतमीचे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०१
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२०२
📿 काय देवे खाता घेतले
1202.
काय देवे खाता घेतले हातीचे । आले हे तयाचे थोर भय ॥१॥
म्हणता गजरे राम एकसरे । जळती पापे थोरे भयधाकें॥धृपद॥
काय खोळंबले हात पाय अंग । नाशिले हे सांग रूप काय ॥२॥
कोण लोकी सांग घातला बाहेरी । म्हणता हरी हरी तुका म्हणे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. १२०२
📿 सहसमुदायेसी उठावे शा
1202.
सहसमुदायेसी उठावे शारंगधरा | हरिहरेश्वरा जाऊ आता ॥१॥
उठले वैष्णव आणि हृषिकेशी | आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥२॥
एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासी | उत्सव निवृत्तीसी देवे केला ॥३॥
दादद्षी पारणे सोडिती वैष्णव | समारंभ देव करितसे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ महाराज नमन›
📿 अभंग क्र. १२०२
📿 पांच दिवस उत्सव केला
1202.
पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी | काला आमावास्येसी त्र्यंबकेश्वरी ॥१॥
प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरी | कीर्तन गजरी पुढे होत ॥२॥
कांही ऋषीश्वर राहियेले तेथे | गेले बहुत ते आळंकापुरी ॥३॥
गरुडावरी सिद्ध जाले नारायण | चालली विमाने गंधर्वांची ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०२
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. १२०३
📿 आपुलिया अंगे साहित्य
1203.
आपुलिया अंगे साहित्य श्रीरंगे | पूजियेले सांग संतसाधू ॥१॥
निवृत्तिदेवे केली विठोबाची पूजा | उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥२॥
पश्चिमेसी स्थळ अनादि समूळ | उघडिली शीळ समाधीची ॥३॥
म्हणती योगेश्वर अनादि या शेजा | चिद्रत्ने ती पूजा केली असे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२०३
📿 शुकादिक योगी रंगले श
1203.
शुकादिक योगी रंगले श्रीरंगी । नाम पवित्र जगी जपा आधी ॥१॥
साधने साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपे सर्वा गोड गाता ॥२॥
परंपरा नाम वाचे ते सुगम । सनकादिक श्रम न करिती ॥३॥
एका जनार्दनी नाम ते पावन । वाचे उच्चारिता जाण श्रम हरे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०३
📿 उष्मे न तपेचि सुधाकर
1203.
उष्मे न तपेचि सुधाकर ।
सीते न पीडे वैश्वानर ॥१॥
तेवि हरिभक्तांते हरी ।
नेदी बुडो भवसागरी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२०४
📿 भय हरीजनी । काही न ध
1204.
भय हरीजनी । काही न धरावे मनी ॥१॥
नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥धृपद॥
चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥
तुका म्हणे मन । असो द्यावे समाधान ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ समाधी›
📿 अभंग क्र. १२०४
📿 तुळसी बेल पुष्पे समर
1204.
तुळसी बेल पुष्पे समर्पिली वर | पाहाती ऋषीवर पहिली पूजा ॥१॥
नारा विठा गोंदा पाठविला महादा | झाडावया शेजा पुढे जाले ॥२॥
सभोंवती जागा झाडिली निर्मळ | अनादि हे स्थळ निवृत्तिराजा ॥३॥
संभोंबते दीप लाविले समाधी | म्हणती पूजा आधी केली असे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ महाराज नमन›
📿 अभंग क्र. १२०४
📿 गेले दिगंबर ईश्वर वि
1204.
गेले दिगंबर ईश्वर विभूति | राहिल्या त्या कीर्ति जगामाजी ॥१॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी | आता ऐसे कोणी होणे नाही ॥२॥
सांगतील ज्ञान म्हणतील खूण | नयेचि साधन निवृत्तीचे ॥३॥
|परब्रह्म डोळा दावू ऐसे म्हणती | कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२०४
📿 वेदांचे वचन शास्त्रा
1204.
वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन । पुराणीं कथन हेंचि केले ॥१॥
कलियुगामाजीं नाम एक सार । व्यसाची निर्धार वचनोक्ति ॥२॥
तरतील येणे विश्वासी जे नर । तत्संगें दुराचार उद्धरती ॥३॥
एका जनार्दनी ऐसा हा अनुभव । प्रत्यक्ष सांगे देव उद्धवासी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०४
📿 एकाचिया हुंडया भरी ।
1204.
एकाचिया हुंडया भरी ।
एका दास्यत्व ॥१॥
एकाची हा पेरी शेते ।
घरे हाते शाकारी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२०५
📿 आयुष्य मोजावया बैसला
1205.
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तू का रे वेव्हारी संसाराचा ॥१॥
नेईल ओढोनि ठाउके नसता । न राहे दुश्चिता हरीविण ॥धृपद॥
कठीण हे दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायी ॥२॥
राहतील दुरी सज्जन सोयरी । आठवी श्रीहरी लवलाही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ महाराज नमन›
📿 अभंग क्र. १२०५
📿 नानापरी खेद आठविती म
1205.
नानापरी खेद आठविती मना | आता नारायणा सिद्धि न्यावे ॥१॥
समाधीसी केली आरति पंचारती | राहिली निवृत्ति स्वरूपी तुझ्या ॥२॥
सुखाचे साधन जाली चौघेजणे | केली नारायणे बोळवण ॥३॥
पंचक्रोशावरी उभे ठेले भार | केला नमस्कार समाधीसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२०५
📿 नामेंचि तरलें नामेंच
1205.
नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥
ऐसे नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥
पापांचे पर्वत नामाग्नीनें शांत । येरा कोण मात नामापुढे ॥३॥
एका जनार्दनी तारक हे नाम । पावती निजधाम गाता वाचे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०५
📿 एकोबाची सेवा करी ।
1205.
एकोबाची सेवा करी ।
वाहे घरी जीवन ॥१॥
गंधाक्षता तुळशीमाळा ।
पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२०६
📿 होऊ नको काही या मना
1206.
होऊ नको काही या मना आधीन । नाइके वचन याचे काही ॥१॥
हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥धृपद॥
आपुले आधीन करूनिया ठेवा । नाही तरि जीवा घातक हे ॥२॥
तुका म्हणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२०६
📿 चांडाळादि तरले । महा
1206.
चांडाळादि तरले । महादोषी उद्धरले ॥१॥
नाम पावन पावन । नामापरतें थोर कोण ॥२॥
नामाग्नीनें न जळे । ऐसे दोष नाही केले ॥३॥
वाल्मिक म्हणती दोषी । नाम उच्चारिता वंद्य सर्वांसी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०६
📿 अंतर कोणा नेदी सहसा
1206.
अंतर कोणा नेदी सहसा ।
आपुलिया दासा सांभाळी ॥१॥
परम कृपावंत हरी ।
नामोच्चारी प्रगट होय ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ महाराज नमन›
📿 अभंग क्र. १२०७
📿 काय म्या बोलावे किती
1207.
काय म्या बोलावे किती माझी मति | तुम्ही रमापति गोड केले ॥१॥
विश्वरूप घडी उघडिली धडफुडी | आता काय थोडी कृपा म्हणू ॥२॥
चिन्मय लहरी येती उन्मळुनी | दया नारायणी थोर केली ॥३॥
समाधि चरित्र केले यथामति | रखूमाईचा पति आर्जदिला ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०७
📿 कल्पोकल्पी युगायुगी
1207.
कल्पोकल्पी युगायुगी ।
व्यवसाय हाचि तुम्हालागी ॥१॥
करावे दासाचे पाळण ।
निवारुनि त्यांचा शिण ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२०८
📿 संत गाती हरीकीर्त्तन
1208.
संत गाती हरीकीर्त्तनी । त्यांचे घेइन पायवणी ॥१॥
हेचि तप तीर्थ माझे । आणीक मी नेणे दुजे ॥धृपद॥
काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥
संत महंत माझी पूजा । आन भाव नाही दुजा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 निवृत्तीनाथ महाराज नमन›
📿 अभंग क्र. १२०८
📿 समाधि श्रवण करिती नि
1208.
समाधि श्रवण करिती निशिदिनी | त्यासि चक्रपाणि देईल भेटी ॥१॥
समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास | नाही नाही दोष पातकांचा ॥२॥
समाधि विरक्ताची पतिता वाराणसी | कोटि कुळे त्याची उद्धरील ॥३॥
जो कोणी बसेल समाधिश्रवणा | तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०८
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२०९
📿 जयाची तुम्हासी करणे
1209.
जयाची तुम्हासी करणे चिंता ।
तयाते पुरविता आनकळित ॥१॥
आलिया गेलियाचेनी हाते ।
सभाग्य तयाते धरु धावा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२१०
📿 शुद्ध ऐसे ब्रम्हज्ञा
1210.
शुद्ध ऐसे ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥
रवि रसा सकळा शोषी । गुणदोषी न लिंपे ॥धृपद॥
कोणासवे नाही चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥
सत्य तरी ऐसे आहे । तुका पाहे उपदेशी ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१०
📿 जागे आपुल्या उचितावर
1210.
जागे आपुल्या उचितावरी ।
सावधान हरि सर्वदा ॥१॥
परि हा कळो नेदी भेद ।
वाटे प्रालब्ध फळ देते ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ›
📿 अभंग क्र. १२११
📿 नामा म्हणे देवा ज्ञा
1211.
नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टी | पडेल का दृष्टी पुन्हा आता ॥१॥
ज्ञानाचा वियोग जडला हृद्रोग | भेटीचा प्रयोग करा देवा ॥२॥
ज्ञानदेव माझा दाखवा या वेळी | जीव तळमळी त्याच्याविण ॥३॥
संत अंतरला सखा जाला दूर | आता पंढरपूर कैसे कंठू ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२११
📿 नित्य काळ वाचे जया न
1211.
नित्य काळ वाचे जया नाम छंद । तयासी गोविंद मागे पुढे ॥१॥
घात आघात निवारित । छाया पीतांबरी करीत ॥२॥
ऐसा भक्तांचा अंकीत । राहे उभाची तिष्ठत ॥३॥
एका जनार्दनी वेध । वेधामाजीं परमानंद ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२११
📿 जिही धरुनी हरि मनी ।
1211.
जिही धरुनी हरि मनी ।
ह्रदयी वदनी रंजविला ॥१॥
त्यांचा झाला अंकित ऐसा ।
घरिंचा जैसा म्हणियारा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२१२
📿 भाग्यांचें भाग्य धन्
1212.
भाग्यांचें भाग्य धन्य ते संसारी । सांठविती हरि हृदयामाजीं ॥१॥
धन्य त्यांचे कुळ धन्य त्याचे कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥
संकटीं सुखात नाम सदा गाय । न विसंबे देवराया क्षण एक ॥३॥
एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव । उभा स्वयमेव देव घरी ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१२
📿 ज्याचा केला अंगिकार
1212.
ज्याचा केला अंगिकार ।
चालवी भार त्याचा हा ॥१॥
ऐसा आहे कृपावंत ।
सद्गुरुनाथ दीनांचा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२१३
📿 भाग्याचें ते नारीनार
1213.
भाग्याचें ते नारीनार । गाती निरंतर मुखी नाम ॥१॥
धन्य धन्य त्याचा जन्म । सुफळ सर्व कर्म धर्म ॥२॥
उपासना त्यांची निकी । सदा नाम गातीं मुखी ॥३॥
नामापरते आन । त्यासी नाही पै साधन ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१३
📿 ज्याचा केला अंगिकार
1213.
ज्याचा केला अंगिकार ।
न मानी भार त्याचा हा ॥१॥
चंद्रहास्य अर्जुनाचा ।
पुंडलिकाचा कैवारी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२१४
📿 मासं चर्म हाड । देवा
1214.
मासं चर्म हाड । देवा अवघीच गोड ॥१॥
जे जे हरीरंगी रंगले । काही न वचे वाया गेले ॥धृपद॥
वेद खाय शंखासुर । त्याचे वागवी कलेवर ॥२॥
तुका म्हणे ऐसा । बराडी या भक्तीरसा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२१४
📿 जयामुखीं नाममंत्र ।
1214.
जयामुखीं नाममंत्र । तया जग हे पवित्र ॥१॥
नाम वंदें ज्याची वाचा । देव हृदयी वसे साचा ॥२॥
नामी प्रीति अखंड ज्यासी । मोक्ष तया करी वसे ॥३॥
एका जनार्दनी नाम । हेंचि चैतन्य निजधाम ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो›
📿 अभंग क्र. १२१४
📿 ज्या ज्या भक्ती जेथे
1214.
ज्या ज्या भक्ती जेथे जेथे ।
पाचारिले ज्या ज्या आर्थे ।
तुम्ही जाउनिया तेथे ।
साह्य केले श्रीहरी ॥१॥