🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 अक्रुराची व श्रीकृष्णाची भेट›
📿 अभंग क्र. १८४
📿 अक्रुराची व श्रीकृष्
184.
अक्रुराची व श्रीकृष्णाची भेट
तनु हे आकाश चंद्रमा ते मुख । असे निष्कलंक परी-क्षिती ॥१॥
पूर्णिमेचा चंद्र त्याहूनि अधीक । शोभत श्रीमुख कृष्ण-जीचे ॥२॥
भोंवता हा शोभे नक्षत्रांचा मेळ । खेळत सांवळा जगद्नुरु ॥३॥
185.
परमअमृते रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायी ॥१॥
सकळही तेथे वोळली मंगळे । वृष्टि केली जळे आनंदाच्या ॥२॥
सकळ इंद्रिये झाली ब्रम्हरुप । ओतले स्वरुप माजी तया ॥३॥
तुका म्हणे जेथे वसे भक्तराव । तेथे नांदे देव संदेह नाही ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १८५
📿 त्या वैष्णवांच्या मा
185.
त्या वैष्णवांच्या माता । तो नेणे देवताता ॥1॥
तिही कर्मे हे पुसिले । अकर्म समूळ नाहीसे केले ॥2॥
कानाचा हो कान । झाले धरुनिया ध्यान ॥3॥
डोळियाचा हो डोळा । करुनी झाले प्रेम सोहळा ॥4॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 बळीराम व अक्रूर यांची भेट व नंदगृही अक्रूरपूजन›
📿 अभंग क्र. १८५
📿 बळीराम व अक्रूर यांच
185.
बळीराम व अक्रूर यांची भेट व नंदगृही अक्रूरपूजन
भेट देई मज ह्मणे बळीराम । न वर्णवे प्रेम अक्रूराचे ॥१॥
पेंद्यासी पुसती अवघे गडी तेव्हा । कोणरे हा बावा आला येथे ॥२॥
आपुल्या कान्होबाच्या पाया का पडतो । काय हा मागतो सांग आह्मा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विटीदांडु - अभंग १८४ ते १८८›
📿 अभंग क्र. १८५
📿 बारा सोळा अठरा गडिया
185.
बारा सोळा अठरा गडियांचा मेळ
बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥
खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥
पांच सात बारा नव तेरा यांची नका धरु गोडी । खेळ खेळता दांत विचकुन पडाल घशींतोंडीं ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १८५
📿 आम्हा जप नाम गुरुखूण
185.
आम्हा जप नाम गुरुखूण सम । जन वन धाम गुरुचेचि ॥१॥
नेघो कल्पना न चढो वासना । एका पूर्णघना शरण जाऊ ॥२॥
तप हे अमूप नलगे संकल्प । साधिता संकल्प जवळी असे ॥३॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिले धन । हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत ज्ञानेश्वर गौळणी›
📿 अभंग क्र. १८६
📿 तुजविण येकली रे कृष्
186.
तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती । तंव तुंवा नवल केले वेणू घेउनी हाती ।
आलीये तेचि सोय तुझी म्या ओळखली गती ॥१॥
नवल हे वालभ रे कैंसे जोडले जीवा । दुसरे दुरी ठेले प्रीती केला रिघावा ॥धृ॥
पारू रे पारू कान्हा झणे करिसी अव्हेरू । तू तंव हृदयींचा होसी चैतन्य चोरू ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १८६
📿 देहभाव प्राण जाय । त
186.
देहभाव प्राण जाय । तेव्हा हे धैर्य सुख होय ॥1॥
तया निद्रे जे निजले । भाव जागृती नाही आले ॥2॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ॥3॥
तेथे सर्वांग सुखी झाले । लिंगदेह विसरले ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नाम›
📿 अभंग क्र. १८६
📿 आमुचे संचित जैसे जैस
186.
आमुचे संचित जैसे जैसे आहे । तेथे तो उपाय न चले कांही ॥१॥
सुखे आठवीन तुमचे हे नाम । न होय तेणे श्रम जीवा कांही ॥२॥
कासया करू जिवासी आटणी । नाम निर्वाणी तारीतसे ॥३॥
मागेही तरले पुढेंही तरती । चोखा म्हणे चित्ती दृढ वसो ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १८६
📿 आम्हा हेंचि थोर सद्
186.
आम्हा हेंचि थोर सद्गुरुविचार । नलगे संप्रधार नानामते ॥१॥
नेघो ते काबाड न करू विषम । ब्रह्मांड हे होम आम्हा राम ॥२॥
नेदू यासि दुःख उन्मनीचे सुख । न करू हा शोक आला गेला ॥३॥
निवृत्ति म्हणे आम्हा सद्गुरु उपदेश । सर्व भूती वास हरि असे ॥४॥
187.
होईल तो भोग भोगीन आपुला । न घली विठ्ठला भार तुज ॥१॥
तुम्हांपासाव हे इच्छीतसे दान । अंतरींचे ध्यान मुखी नाम ॥धृ॥
नये काकुलती गर्भवासांसाटी । न धरी हे पोटी भय काही ॥२॥
तुका म्हणे मज उदंड एवढे । न वांचावे पुढे मायबापा ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १८७
📿 चराचरी हरि गुरुमुखे
187.
चराचरी हरि गुरुमुखे खरा । माजि ब्रह्म सैरा विचरो आम्ही ॥१॥
आम्हा ऐसे व्हावे तरीच हे भोगावे । निरंतर ध्यावे पोटाळूनि ॥२॥
नाही येथे काळ अवघे शून्यमये । निर्गुणी सामाये तुन माझी ॥३॥
निवृत्ति म्हणे परत्रिंकूटगोल्हाट । त्यावरील नीट वाट माझी ॥४॥
188.
न करावी आता पोटासाटी चिंता । आहे त्या संचिता माप लावू ॥१॥
दृष्टी ते घालावी परमार्था ठायी । क्षुल्लका उपायी सिण जाला ॥धृ॥
येथे तंव नाही घेइजेसे सवे । काही नये जीवे वेचो मिथ्या ॥२॥
खंडणे चि नव्हे उद्वेग वेरझारी । बापुडे संसारी सदा असो ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १८८
📿 बाई मी लिहिणे शिकले
188.
बाई मी लिहिणे शिकले सद्गुरायापासी ॥ध्रु0॥
ब्रह्मी झाला जो उल्लेख । तोचि नादाकार देख ।
पुढे ओंकाराची रेख । तूर्या ह्मणावे तिसी ॥1॥
माया महतत्त्वाचे सुभर । तीन पांचाचा प्रकार ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विटीदांडु - अभंग १८४ ते १८८›
📿 अभंग क्र. १८८
📿 विटिदांडु चेंडु भला
188.
विटिदांडु चेंडु भला रे । मनी समजोनी मारा टोला रे ॥१॥
खेळू विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ.॥
सहा चारएकत्र करुनी अवघे पुढे रहा । सावध होऊनि धरा चेंडु कोणी कोणाकडे न पहा ॥२॥
प्रपंचाचे घाई धन वित्त म्हनता भाई । हातीचा चेंडु सोडुनी देई पुढे मारील डोई ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १८८
📿 नव्हे ते पोसणे नव्हे
188.
नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन । उपदेशखुण वेगळी रया ॥१॥
न भेदे पालथे वज्रे मढियेले । जीवन घातले न भरे घटी ॥२॥
नाइके उपदेश नव्हे खुण सिद्ध । योनिसी प्रसिद्ध मढियेले ॥३॥
निवृत्ति म्हणे जरी कृपा करि श्रीगुरु । तरिच हा संप्रधारु घरी आम्हा ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १८९
📿 नम्रतेविण योग्यता मि
189.
नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केवी पावती ब्रह्मसुख ॥1॥
लटिके नेत्र लावूनि ध्यान पै करिती । ते केवी पावती केशवाते ॥2॥
एक संत म्हणविती नग्न पै हिंडती । अंतरींची स्थिति खडबड ॥3॥
झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ॥4॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १९०
📿 शब्दाचे ब्रह्म लौकिक
190.
शब्दाचे ब्रह्म लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥1॥
ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहीचा आपण साक्षभूत ॥2॥
स्वये सुखे धाला आपणाते विसरला । तो योगि राहिला नाही येथे ॥3॥
नामयाची जनी सागरी मिळाली । परतोनि मुळी केवी जाय ॥4॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चेंडूफळी - अभंग १८९ ते १९०›
📿 अभंग क्र. १९०
📿 सहज तो चेंडु समान फळ
190.
सहज तो चेंडु समान फळी । झेलुं जाणेतो खेळियां बळी ॥१॥
झेला रे भाइनों झेलारे सदगुरुवचनें झेला रे ॥धृ.॥
अवघे गडी समान रहा । येता यावा सावध पहा ॥२॥
सुटे सुटाए तंव सरिसाचि पावे । लक्ष जाणे तो माघारा नव्हे ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १९०
📿 प्राकृत संस्कृत एकचि
190.
प्राकृत संस्कृत एकचि मथीत । गुरुगम्य हेत पुराणमहिमा ॥१॥
वेदादिक मत शास्त्र हे बोलत । श्रुतीचा संपत वाद जेथे ॥२॥
पृथ्वी हे ढिसाळ आकाश कव्हळ । जन्म मायाजाळ विरत जेथे ॥३॥
निवृत्ति म्हणे गुरु गयनि सौरसे । आपण जगदीश सर्वारूपी ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १९१
📿 अखंडित ध्यानी । पांड
191.
अखंडित ध्यानी । पांडुरंग जपे वाणी ॥1॥
पांडुरंग नाम जपे । हेचि माझे महा तप ॥2॥
ऐसे आले प्रत्ययासी । सहज तेणे तत्त्वमसी ॥3॥
पावलिया हो स्वपद । सहज विराला तो शब्द ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नाम›
📿 अभंग क्र. १९१
📿 गणिका अजामेंळे काय स
191.
गणिका अजामेंळे काय साधन केले । नामाचि उच्चारिले स्वभावता ॥१॥
नवल हे पहा नवल हे पहा । अनुभवे अनुभवा देहामाजी ॥२॥
उच्चारिता नाम वैकुंठीचे पेणे । ऐसे दुजे कोणे आहे कोठे ॥३॥
ब्रम्हहत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उध्दरिला ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १९१
📿 सार निःसार निवडूनि ट
191.
सार निःसार निवडूनि टाकीन । सर्व हा होईन आत्माराम ॥1 ॥१॥
राम सर्वा घटी बिंबलासे आम्हा । पूर्ण ते पूर्णिमा सोळाकळी ॥2 ॥२॥
न देखो दूजे हरिविण आज । आणिकाचे काज नाही तेथे ॥3 ॥३॥
निवृत्ति गौरव गुरुमुखे घेत । आपणचि होत समरसे ॥4 ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १९२
📿 देव खाते देव पीते ।
192.
देव खाते देव पीते । देवावरी मी निजते ॥1॥
देव देते देव घेते । देवासवे व्यवहारिते ॥2॥
देव येथे देव तेथे । देवाविणे नाही रीते ॥3॥
जनी म्हणे विठाबाई । भरुनि उरले अंतरबाही ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नाम›
📿 अभंग क्र. १९२
📿 गाता नाम विठ्ठ लाचे
192.
गाता नाम विठ्ठ लाचे । भय नाही त्या यमाचे ॥१॥
ऐसा धरावा विश्वास । नाम जपा सावकाश ॥२॥
जप तप तीथार्टणी । नको आटणी दाटणी ॥३॥
सायासाचे नाही काम । अखंड जपे रामनाम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 लगोरी - अभंग १९१ ते १९२›
📿 अभंग क्र. १९२
📿 त्रिगुणात्मक माडियेल
192.
त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥
कान्होबा खेळू लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायी सहज होईलमेळा ॥२॥
चौदा बारा सोला पंचविसाचा करुनी मेळ । एक एका पुढे पळती अवघा हलकलोळ ॥३॥
एका जनार्दनी म्हणे कन्होबा खेळ अतु आवरीं । खेळ खेळतां शिणलों आम्ही पुरे बा वेरझारी ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १९२
📿 पृथ्वी श्रीराम आकाश
192.
पृथ्वी श्रीराम आकाश हे धाम । आपण विश्राम स्थूलरूपे ॥1 ॥१॥
सूक्ष्मस्थूल राम साधक परम । नाम सर्वोत्तम सर्वारूपी ॥2 ॥२॥
आकार विकार सम सारिखाचि हरि । बाह्यअभ्यंतरी आपणचि ॥3 ॥३॥
निवृत्ति निष्टंक ज्ञान ते सम्यक् । गयनि विवेक सिद्ध पंथ ॥4 ॥४॥
193.
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाईजे एकांती । अलभ्य ते येती लाभ घरा ॥धृ॥
आणीका अंतरी निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥
तुका म्हणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचू नये ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 आत्मस्वरूप स्थिती›
📿 अभंग क्र. १९३
📿 श्रीमूर्ति असे बिंबल
193.
श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥1॥
धन्य माझा इह जन्म । ह्रुदयी विठोबाचे नाम ॥2॥
तृष्णा आणि आशा । पळोन गेल्या दाही दिशा ॥3॥
नामा म्हणे जनी पाहे । द्वारी विठ्ठल उभा आहे ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. १९३
📿 तापत्रयी तापली गुरूत
193.
तापत्रयी तापली गुरूते गिवसिती भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी ।
तव ते नेणोनि उपदेशाची रीती आनान उपदेशिती ठकले निश्चिती तैसे झाले ॥
संत ते कोण संत ते कोण । हे जाणवी खूण केशीराजा ॥
कोणी एक प्राणी क्षुषेने पडिले । म्हणोनि दोडे तोडे गेले ।
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नाम›
📿 अभंग क्र. १९३
📿 त्रैलो्य वैभव ओवाळोन
193.
त्रैलो्य वैभव ओवाळोनि सांडावे । नाम सुखे घ्यावे विठोबाचे ॥१॥
आणिक साधने आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम । गाता नाचता प्रेमे मुक्त तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणे वारे ॥४॥