संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गोप नवस लीला›
📿 अभंग क्र. ७४
📿 गोपीने घृतासी चोरोनी
74.
गोपीने घृतासी चोरोनी ठेविले । देवासी कळले अंत-र्यामी ॥१॥
सेजे घरी होते ठेविले चोरून । सौंगडे घेऊन गेला तेथे ॥२॥
आज्य घेऊनिया गोपाळांसी देत । आपन भक्षीत प्रेमानंदे ॥३॥
तृप्त होवोनिया गेला क्रीडायासी । पूर्ण नवसासी केले त्याच्या ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ७४
📿 गगनी वोळले येते ते द
74.
गगनी वोळले येते ते देखिले । दर्पणी पाहिले बिंबलेपण ॥१॥
ते रूप सुरुप सुरूपाचा विलास । नामरूपी वेष कृष्ण ऐसे ॥२॥
सांडुनी धिंटिव जालासे राजीव । सर्वत्र अवेव ब्राह्मपणे ॥३॥
निवृत्ति घडुला सर्वत्र बिंबला । दर्पण वीराला आत्मबोधी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 काला व बाळक्रीडा›
📿 अभंग क्र. ७५
📿 कोणासी हे वर्म न कळे
75.
कोणासी हे वर्म न कळे तुमचे । ब्रम्हादिक पिसे वेडे झाले ॥१॥
तयांसी न कळे तुमचे लाघव । केली असे माव बाळपणी ॥२॥
वेडावोनी ब्रह्मा लागतसे चरणी । तुमची करणी न कळे कांही ॥३॥
चोखा म्हणे तुमचा ऐसा तो खेळ । असे तो आकळ वेदशास्त्रा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ७५
📿 गौळीयाची ताकपिरे । क
75.
गौळीयाची ताकपिरे । कोण पोरे चांगली ॥१॥
येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥धृपद॥
काय उपास पडिले होते । कण्याभोवते विदुराच्या ॥२॥
तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७५
📿 महा दोष होत अगणित ।
75.
महा दोष होत अगणित । नामे पावत वैकुंठ ॥
चला हात धरुनी जाऊ । माझ्या विठोबाला पाहु ॥
भिमा भरली दोनी थड्या । चला टाकु आत उड्या ॥
बांधु नामाची सांगडी । तेणे उतर पैल थडी ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ७५
📿 लोभ लहेर अति निझर बा
७५.
लोभ लहेर अति निझर बाजे । काया डूबे केशवा ॥१॥
संसार समुद्रे तरक गोविंदे । तारले बाप विठला ॥२॥
आन लवेडा हो खेवट न साको । तेरा पार न पाया विठला ॥३॥
होऊ द्या दल सद्रुरु मिलवो तू मोको पार उतार केशवा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गोप नवस लीला›
📿 अभंग क्र. ७५
📿 कांही एक दिवस लोटलिय
75.
कांही एक दिवस लोटलियावरी । गोपी तिचे घरी प्रवेशली ॥१॥
म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीने सदन धुंडा-ळिले ॥२॥
म्हणे सये येथे नाही माझे घृत । ऐकोनिया मात क्रोधा-वली ॥३॥
चोरी नवनीत तुझे नाही गेले । माझे काय झाले पुसतसे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ७५
📿 माझा कृष्ण देखिला का
75.
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥धृ.॥ हाती घेऊनिया फूल । अंगणी रांगत आले मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥ माथा शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥ संगे घेऊनि गोपाळ । बाळ खळॆ आळुमाळ । पायी पोल्हारे झळाळ । गळा माळ वैजंयती ॥३॥ एका जनार्दनी माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें ते काय । कोणी सांगा गे ॥४॥
76.
पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाईन अहर्निशी मुखी नाम ॥२॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे । बीज कल्पांतींचे तुका म्हणे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , वासुदेव अभंग›
📿 अभंग क्र. ७६
📿 ओले मृतिकेचे मंदिर ।
76.
ओले मृतिकेचे मंदिर । आंत सहा जण उंदिर ।
गुंफा करिताती पोखर । याचा नका करु अंगिकार गा ॥१॥
वासदेव करितो फेरा । तू अद्यापि का निदसुरा ।
सावध होई रे गव्हारा । भज भज तू शारंगधरा गा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ७६
📿 आता तरी पुढे हाचि उप
76.
आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥धृपद॥
हित ते करावे देवाचे चिंतन । करूनिया मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७६
📿 मागिल्या जन्माचा सां
76.
मागिल्या जन्माचा सांगितला विचार । दाविली साचार साक्ष मज ॥
तेंव्हा माझे मन जाले समाधान । एरवी अनुमान होता मज ॥
साक्षतेची पहावा साक्षतेची घ्यावा । मग समाधान जीवा वाटे थोर ॥
बोधला म्हणे नव्हे हे बोधाची कहाणी । आपले नयनी देखियले ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ७६
📿 साहेब संकट व्हैस सेव
७६.
साहेब संकट व्हैस सेवक भजे । चिरकाल न जीवे दौ कुल ह्से तेरी भक्ति न छोडू भावसे भजे ॥१॥
चरन कमा मेरे हिया वसे जैसे अपने धनी प्राणी मरण मांडे । तैसे संतजन राम नाम न छांडे ॥२॥
गंगा गया गोदावरी संसारके कामा । नारायण सो प्रसन्न होये ता सेवक नामा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रीकृष्ण गोपी संवाद›
📿 अभंग क्र. ७६
📿 श्रीकृष्ण गोपी संवाद
76.
श्रीकृष्ण गोपी संवाद.
एकदा श्रीकृष्ण खेळत असता । प्रवेशे अवचिता गोपीगृही ॥१॥
दोही करी तेव्हा नेत्र चोळीतसे । गोपी पुसते काय झाले ॥२॥
कृष्ण ह्मने माझे दुखताती डोळे । उपाय न कळे करू काय ॥३॥
77.
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडूरंगा ॥१॥
देह हे काळाचे धन कुबेराचे । येथे मनुष्याचे काय आहे ॥२॥
देता देवविता नेता नेवविता । तेथे याची सत्ता काय आहे ॥३॥
निमित्ताचा धणी केला असे प्राणा । माझे माझे म्हणॊनि व्यर्थ गेला ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ७७
📿 जोसीड़ा ने लाख बधाई
77.
जोसीड़ा ने लाख बधाई रे अब घर आये स्याम॥
आज आनंद उमंगि भयो है जीव लहै सुखधाम ।
पांच सखी मिलि पीव परसिकै आनंद ठामू ठाम॥
बिसरि गयो दुख निरखि पियाकूं, सुफल मनोरथ काम ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७७
📿 मी कर्ता म्हणती तया
77.
मी कर्ता म्हणती तया पडली भ्रांती । व्यापक श्रीपती नेणवेचि ॥
बालक उपजोनि लावियेले स्तनी । सिकविले कोण्ही तयालागी ॥
सिकविता ऐक पंढरीनायेक । त्यावेगळा आणिक नाही कोण्ही ॥
बोधला म्हणे देव तया जैसा भाव । त्या तैसा उपाव करितसे ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ७७
📿 जो गुरुदेवत मिले मुर
७७.
जो गुरुदेवत मिले मुरार । जो गुरुदेवत उतरे पार ॥१॥
जो गुरुदेवत वैकुंठ तरे । जो गुरुदेवत जीवन मरे ॥२॥
सत सत सत गुरुदेव । झुट झुट झुट आन सब सेव ॥३॥
जो गुरुदेवत नाम द्दढावे । जो गुरुदेव न दहदिस धावे ॥४॥
78.
आता उघडी डोळे । जरि अद्यापि न कळे ।
तरी मातेचिया खोळे । दगड आला पोटासी ॥१॥
मनुष्य देहा ऐसा निध । साधील ते साधा सिद्ध ।
करुनि प्रबोध । संत पार उतरले ॥२॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७८
📿 मेरु तळवटी पाच पिंपळ
78.
मेरु तळवटी पाच पिंपळ । खाले वरोडा सेंडा वरी मूळ रे ॥
पाचहि पिंपळा एकचि फळ । त्याणे पक्षि गिळिला समुळ रे ॥
ऐक मी सांगेन पक्षियाची सोये । बाप नाही त्यासा भाये रे ॥
हात नाही त्यासी पाय रे । तो पक्षीविण उडोनिया ये रे ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गोपी गर्व परिवार›
📿 अभंग क्र. ७८
📿 निशी प्राप्त होता भ्
78.
निशी प्राप्त होता भ्रताराचे शेजे । गोपिका ती निजे आनंदाने ॥१॥
संधी पाहोनिया प्रवेशला देव । करीत लाघव काय तेव्हा ॥२॥
भ्रताराचे दाढी कांतेची ते वेणी । एकत्र करोनी ग्रंथी देत ॥३॥
करूनि कौतुक निघोनिया गेला । अरुणोदय झाला तये-वेळी ॥४॥
79.
का रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥
बाळा दुधा कोण करिते उप्तत्ति । वाढवी श्रीपति सवे दोन्ही ॥२॥
फुटती तरुवर उष्णकाळमासी । जीवन तयांसी कोण घाली ॥३॥
तेणे तुझी काय नाही केली चिंता । राहो त्या अनंता आठवूनि ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ७९
📿 पांगुळ जालो देवा नाह
79.
पांगुळ जालो देवा नाही हात ना पाय । बैसलो जयावरी सैराट ते जाय ।
खेटिता कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । आधार नाही मज कोणी बाप ना माये ॥१॥
दाते हो दान करा जाते पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥धृ॥
हिंडता गव्हाने गा शिणलो दारोदारी । न मिळे चि दाता कोणी जन्म दुःखाते वारी ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ७९
📿 काय दिनकरा । केला को
79.
काय दिनकरा । केला कोंबड्याने खरा ॥१॥
का हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथा देवा ॥धृपद॥
आडविले दासी । तरि का मरती उपवासी ॥२॥
तुका म्हणे हाती । कळा सकळ अनंती ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७९
📿 ये माझ्या मंदिरा विठ
79.
ये माझ्या मंदिरा विठोबा उदारा । तोडुनिया थारा अविद्येचा ॥
कुवासना कुबुध्दी मुळी हीन छेदी । अहंकारासी बंदी घालुनिया ॥
घालुनी सिंहासन वरी बैसे आपण । स्वामी हे गुणरत्न पंढरीचे ॥
बोधला म्हणे हरि किंकर तुझे द्वारी । नामक्रीडा करी अखंडित ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ७९
📿 निरासि निर्गुण नुमटे
79.
निरासि निर्गुण नुमटे प्रपंच । विषयसुख साच नाही नाही ॥१॥
ते रूप गोजिरे कृष्णमूर्ति ठसा । तो गोपाळ समरसा माजि खेळे ॥२॥
चित्ताची राहाविते आपणचि द्रष्टे । नेतसे वैकुंठा नाम घेता ॥३॥
निवृत्तिसी ध्यान सर्व जनार्दन । वैकुंठ आपण गोपींसंगे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ८०
📿 देश वेष नव्हे माझा स
80.
देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलो । करू सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहीलो ।
पाय डोळे ह्मणता माझे तींही कैसा मोकलिलो । परदेशी नाही कोणी अंध पांगुळ जालो ॥१॥
आता माझी करी चिंता दान देई भगवंता । पाठी पोटी नाही कोणी निरवी सज्जन संता ॥धृ॥
चालता वाट पुढे भय वाटते चित्ती । बहुत जन गेली नाही आली मागुती ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ८०
📿 झाडलोट करी जनी । केर
80.
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥1॥
पाटी घेऊनिया शिरी । नेऊनिया टाकी दुरी ॥2॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामे करु लागला ॥3॥
जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊ तुला ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 परिपूर्णता - समाधान›
📿 अभंग क्र. ८०
📿 देवा नाही रूप देवा न
80.
देवा नाही रूप देवा नाही नाम । देव हा निष्काम सर्वाठाई ।।१।।
डोळियाचा डोळा दृष्टीच भासला । देव प्रकाशला आदिअंती ।।२॥
नवल वाटले नवल वाटले । देव कोंदाटले मागे पुढे॥ ॥३॥
चोखा म्हणजे माझा संदेश फिटला । देव प्रगटला देहामाजी ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८०
📿 राम माझा बाप । राम म
80.
राम माझा बाप । राम माझी माये । राम निजसोय दाखविली ॥१॥
राम माझ भाव । राम माझी बहिण । राम अंत:करणी । सदा वाये ॥२॥
माये आणी बाप । मावू या बहिणी । गोवियेले यांनी मायाजाळी ॥३॥
कोण्ही न विचारी । माझे काही हित । भुलविले चित्त नानापरी ॥४॥