संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७६५
📿 कैवल्य निधान तुम्ही
1765.
कैवल्य निधान तुम्ही संतजन । काया वाच मन जडले पायी ॥१॥
सर्वभावे दास अंकित अंकीला । पूर्णपणें जाहला बोध देही ॥२॥
जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मारुप । एका जनार्दनी दीप प्रज्वळिला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७६६
📿 सादाविले एका । सरे अ
1766.
सादाविले एका । सरे अवघिया लोका ॥१॥
आता आवडीचे हाती । भेद नाही ये पंगती ॥धृपद॥
मोकळी च पोती । नाही पुसायाची गुंती ॥२॥
तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७६७
📿 नाही भीड चाड बोलसी आ
1767.
नाही भीड चाड बोलसी आगळे | तोंडाचेनि बळे अरे नाम्या ॥१॥
आपुलिया चाडे करितसा सेवा | आभारू का लावा आम्हांलागी ॥२॥
माझ्या ठायी काय मज उणे होते | माते देउनी सरते केले तुम्ही ॥३॥
निर्गुण निराकार होतो निजानंदे | त्यासी तुम्ही भेद केला देखा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७६७
📿 केल सती उपकार । दिधल
1767.
केल सती उपकार । दिधले घर दावुनी ॥१॥
नये ध्यानीं मनी लक्षीं । तो प्रत्यक्षीं दाविला ॥२॥
संकल्पाचे तोंडिलें मूळ । आले समुळ प्रत्यया ॥३॥
एका जनार्दनी कृपावंत । होती संत सारखे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७६८
📿 पितयाचे भाग्य पुत्रा
1768.
पितयाचे भाग्य पुत्रासि पै न ये | विरळा एखादा होय नांव राखे ॥१॥
मी तंब अज्ञान जालो तुमचे पोटी | तुझेनि आम्हा तुटी संसाराची ॥२॥
होणार ते जाले न चले कांही केले | विठ्ठले दुराविले जन्म मरणे ॥३॥
माझिये अदृष्टी ऐसेंचि लिहिले | जे मज निर्मियेले चतुरानने ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७६९
📿 चित्त शुद्ध तरी शत्र
1769.
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष ते अमृत अघाते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥धृपद॥
दुःख ते देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नीज्वाळा ॥२॥
आवडेल जीवा जीवाचे परी । सकळा अंतरी एक भाव ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७६९
📿 पतित अनेक पावन तू एक
1769.
पतित अनेक पावन तू एक | जालासी सुरेख कवणाचेनी ॥१॥
पतित मी भला की पावन तू भला | सांग बा विठ्ठला मायबापा ॥२॥
परिसाचे महिमान कैसेंनी वाढते | निर्माण नसते लोहो जरी ॥३॥
कल्पतरूची कीर्ति कैसेनी वाढते | जरि कल्पना नसती याचकासी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७७०
📿 लाज वाटे मज मानिती ह
1770.
लाज वाटे मज मानिती हे लोक । हे तो नाही एक माझे अंगी ॥१॥
मोजुनि झिजलो मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥धृपद॥
कोमळ कंटक तीक्षण अगरी । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥
चित्रींचे लेप शृंगारिले निके । जीवेविण फिके रूप त्याचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७७०
📿 सर्व जीव तू जालासी आ
1770.
सर्व जीव तू जालासी आपण | आम्ही का पतित तू कैसा पावन ॥१॥
मना इंद्रियाचा तूंचि चाळविता | ठेवविसी सत्ता कोणे ठाई ॥२॥
सुवर्णाच्या पोटी जाला अलंकारु | वानिति साचारु येकि भला ॥३॥
गंगासिंधु मिळणी जाली सहस्रमुख | ओघ तो उदक आन नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७७१
📿 बोलविसी माझे मुखे ।
1771.
बोलविसी माझे मुखे । परी या जना वाटे दुःख ॥१॥
जया जयाची आवडी । तया लागी ते चरफडी ॥धृपद॥
कठीण देता काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥
खाऊ नये तेचि मागे । निवारिता रडो लागे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७७२
📿 रुसलासे नामा उभा गरु
1772.
रुसलासे नामा उभा गरुडपारी | पितांबरधारी पालवी तो ॥१॥
आपुल्या सुखाचा तुज देईन वांटा | तरी येसी वैकुंठा याचि वेळा ॥२॥
आपुले निजपदी तुज बैसवीन | उभा मी राहीन मार्गे पुढे ॥३॥
पितांबर छाया धरीन तुजवरी | तुज मी क्षणभरी न विसंबे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १७७३
📿 काय मी अन्यायी ते घा
1773.
काय मी अन्यायी ते घाला पालवी । आणीक वाट दावी चालावया ॥१॥
माग पाहोनिया जातो तोच सोयी । न वजावे कायी कोणी सांगा ॥धृपद॥
धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही ॥२॥
वारिता ही भय कोण धरी धाक । परी तुम्हा एक सांगतो मी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७७३
📿 चालिती आड वाटा । आणि
1773.
चालिती आड वाटा । आणिका दाविती जे नीटा ॥१॥
न मनी तयांचे उपकार । नाही जोडा तो गंव्हार ॥धृपद॥
विष सेवूनि वारी मागे । प्राण जाता जेणे संगे ॥२॥
बुडता हाक मारी । ठाव नाही आणिका वारी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७७३
📿 नेघे भूमंडळ न घाली त
1773.
नेघे भूमंडळ न घाली तुज सांकडे | तुजवीण केवढी जोडी याची ॥१॥
चरण मी सेवीन गाईन मी नाम | हृदयी धरोन प्रेम नाचेन सदा ॥२॥
ऋद्धिसिद्धि नेषे कामना न लगती | तुजवीण श्रीपती अवघे वेर्थ ॥३॥
रसातळ भूतळ वैकुंठासी नये | तुजवीण न पाहे ठाव कोठे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७७४
📿 कुळाचे दैवत ज्याचे प
1774.
कुळाचे दैवत ज्याचे पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरी ॥१॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाही । करी भलते ठायी दास तुझा ॥धृपद॥
पंढरीस कोणी जाती वारकरी । होईन त्यांचे घरी पशुयाति ॥२॥
विठ्ठलचिंतन दिवसरात्री ध्यान । होईन पायतन त्याचे पायी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७७४
📿 ऐसे नामा बोले आनंदे
1774.
ऐसे नामा बोले आनंदे करोनी | तंव देव विचारूनी बोलियेले ॥१॥
भला भला नाम्या शाहाणा जालासी | का रे तू न घेसी सांग मज ॥२॥
येरू म्हणे देवा हे अवघेंचि नश्वर | तूंचि एक साचार पुरे आम्हा ॥३॥
अनंत कोटी ब्रह्मांडे वसती रोमरंध्री | त्या चरणाचे अग्री वसो आम्ही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७७५
📿 चंदनाचे गावी सर्पाच्
1775.
चंदनाचे गावी सर्पाच्या वसति । भोगिते ते होती द्वीपातरी ॥१॥
एका ओझे एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥धृपद॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावे । जवळी ते जावे भोगे दुरी ॥२॥
तुका म्हणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७७६
📿 अवघिया चाडा कुंठीत क
1776.
अवघिया चाडा कुंठीत करूनि । लावी आपुलीच गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।
करूनिया देशधडी । मीतूपणापासाव गुंतलो मिथ्या । संकल्प तो माझा तोडी ।
तुझिये चरणी माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवी पिंडी रे रे ॥१॥
माझे साच काय केले मृगजळे । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुके खेळती कवतुके । काय त्यांचे साचपण ॥धृपद॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७७७
📿 जन्मजन्मांतरी घेतले
1777.
जन्मजन्मांतरी घेतले धरणे | सांग कवण्या गुणे विष्णुदासा ॥१॥
कांहींच न घेसी कांहींच न मागसी | ऋण किती करिसी सेवारूपे ॥२॥
चतुविधा मुक्ति अथवा धन संपत्ति | नलगे तुझे चित्ती काय करू ॥३॥
समुद्रवलयांकित अवघे भूमंडळ | अथवा रसातळ दुर्लभ कांही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७७८
📿 तुज दिले आता करी यत्
1778.
तुज दिले आता करी यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥
भागलो दातारा सीण जाला भारी । आता मज तारी शरणागता ॥धृपद॥
नेणता सोसिली तयाची आटणी । नव्हता ही कोणी काही माझी ॥२॥
वर्म नेणे दिशा हिंडती मोकाट । इंद्रिये सुनाट दाही दिशा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७७९
📿 दुजेपणी दृष्टी न घाल
1779.
दुजेपणी दृष्टी न घालु । सर्वा चालु एक सत्ता ॥१॥
हाचि पुर्वीचा संकल्प । निर्विकल्प नाम जपूं ॥२॥
नाही काही वाटावाटीं । करु एकवटी मनाची ॥३॥
एका जनार्दनी उदास । जाहलो दास संतचरणी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७८०
📿 जन्ममरणाच्या खुंटती
1780.
जन्ममरणाच्या खुंटती लहरी | वाया का येरझारी सीणतोसी ॥१॥
मी सांगेन ते करी मन मुळी आवरी | एकांती क्षणभरी चला जाऊ ॥२॥
आकारले तितुके आहे नाशिवंत | देव आणि भक्त केंचा तेथे ॥३॥
नामा म्हणे केशवा असो तुझे तुज | तुजवांचोनि मज न लगे कांही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७८१
📿 लोकमान देहसुख । संपि
1781.
लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवाचूनि ॥१॥
तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्ये वीट । तुज दैवे चि लाधली ॥धृपद॥
काय ब्रम्हज्ञान करू कोरडे । रिते मावेचे मापाडे । भेटीविण कुडे । तुझिये अवघे मज वाटे ॥२॥
आत्मिस्थतीचा विचार । काय करू हा उद्धार । न देखता धीर । चतुर्भुज मज नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७८१
📿 काया वाचा आणि मन । स
1781.
काया वाचा आणि मन । संत चरण प्रमाण ॥१॥
ऐसे चालत आले मागे । तया वाउगेंक कोण करी ॥२॥
उपासना मार्ग आधी । भाविकांसी ती समाधी ॥३॥
एका जनार्दनी आस । आहे पायांस दास्यत्वें ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७८२
📿 क्षण एक एकांती बैसोन
1782.
क्षण एक एकांती बैसोनि निवाडे | माग मज पुढे आवडे जे जे ॥१॥
सीणभाग आपुला सांगे पै वहिला | असेल जो वाटला मजविण ॥२॥
पुरवीन जीवींचे सर्व तुझे कोड | गगनाहुनि वाढ असेल जरी ॥३॥
वाटे माझे सर्व धावे तुझे हाती | नामरूपवृत्तिसहित मन ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७८३
📿 विचारिता सहज कोणी नव
1783.
विचारिता सहज कोणी नव्हे माझे | दृढ चरण तुझे धरियेले ॥१॥
हेंचि माझे ज्ञान हाचि गुरुमंत्र | व्रत तप तीर्थ चरण तुझे ॥२॥
हेंचि माझे पुज्य हेंचि माझे पूजन | घ्याई तुझे चरण हृदयकमळी ॥३॥
हेंचि माझी क्रिया हेंचि माझे कर्म | हाचि माझा धर्म चरण तुझे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७८३
📿 धन्य धन्य भुमंडळी ।
1783.
धन्य धन्य भुमंडळी । वैष्णव बळी वीर गाढे ॥१॥
कळिकाळाचे न चले बळ । नामे सबळ वज्रकवची ॥२॥
विठ्ठल देव पाठी उभा । तेथे लाभा काय उणें ॥३॥
एका जानर्दनीं मुक्ती । तेथे दास्यत्व करिती ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७८४
📿 संकल्प विकल्प निरसुन
1784.
संकल्प विकल्प निरसुनिया भ्रांति | दावीन विश्रांति अभिनव तुज ॥१॥
सर्वभावे माझी धरुनि आवडी | आस तू रे सोडी इंद्रियांची ॥२॥
जे जे विषयसुख लागेल तुझे मनी | ते तू खेवा घालुनी घेई मज ॥३॥
श्रवण प्राण रसना त्वचा आणि लोचन | हे सकळ होऊनि मीनि भोगी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७८५
📿 न मनी नाम न मनी त्या
1785.
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥१॥
भाव नाही काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानी ॥धृपद॥
नाही चाड देवाची काही । छळणे टोंके तस्करघाई ॥२॥
तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७८५
📿 सहज तुझे सुख आहे तुज
1785.
सहज तुझे सुख आहे तुजजवळी | वाया मृगजळी बुडो नको ॥१॥
सावध होय पा सोय धरी वेगी | अनुभवांगी आनंद स्वस्वरूपी ॥२॥
हा हो जगडंबर परारला पाल्हाळ | मायामय सकळ स्वप्न सर्व ॥३॥
शरीरसंपत्तीचा मानिसी निर्धार | तो हे क्षणभंगुर सत्य जाण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७८७
📿 माझे मज आता न देखे न
1787.
माझे मज आता न देखे निरसता । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक ।
जीव भाव तुज दिला । नव्हती माझी कोणी मी कवणांचा । आर्त मोहो सांडवला ।
तारी मारी करी भलते दातारा । होऊन तुझा आता ठेलो रे ॥१॥
असो माझे कोडे तुज हे साकडे । मी असेन निवाडे सुखरूप ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १७८८
📿 उद्वेगासी बहु फांकती
1788.
उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसे अंग माझे होते ॥१॥
आता कोण यासी करणे विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥
मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥२॥
तुका म्हणे आहे वचनाची उरी । करितो तोवरी विज्ञापना ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७८८
📿 नाम गोड नाम गोड । पु
1788.
नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥१॥
रसना येरा रसा विटे । घेता घोट अधिक हे ॥धृपद॥
आणिका रसे मरण गाठी । येणे तुटी संसारे ॥२॥
तुका म्हणे आहार जाला । हा विठ्ठला आम्हासी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७८८
📿 केशव पुसे नामयासी |
1788.
केशव पुसे नामयासी | तुझी नांदणूक कैसी ॥१॥
आम्हा काय उणे काय उणे | तुझेनि धर्मे दातारा ॥२॥
तुम्हा घरी बोचके लुगडी | आम्हा घरी पोरे उघडी ॥३॥
तुम्हा घरी दुर्ग दारवंटा | आम्हा घरी बारा वाटा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७८८
📿 जडजीवासी उद्धार । कर
1788.
जडजीवासी उद्धार । करावयासी निर्धार ॥१॥
पापी दोषी जैसे तैसे । लाविले कांसे अपुलिया ॥२॥
जया जे जे गोड लागें । ते ते अंगेंक देताती ॥३॥
एका जनार्दनी शरण । शरणागता नाही न्युन ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७८९
📿 भक्त पुंडलिके अससी उ
1789.
भक्त पुंडलिके अससी उभा केला | त्याचेनि रागे मजसी धरिला अबोला ॥१॥
मी तुझे पोसणे मी तुझे पोसणे | मी तुझे पोसणे पांडुरंगा ॥२॥
तुझी कृपा नाहि रे सत्य | मी तरि प्रत्यक्ष रूप अवलोकितो ॥३॥
नामा म्हणे केशवा तू जाणतोसी माते | उफराटे पाहोनी गिळीन मी तूंते ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १७८९
📿 संताचिया माथा चरणांव
1789.
संताचिया माथा चरणांवरी माझा । देही भाव दुजा नाही नाही ॥१॥
नामांचे चिंतन करिती सर्व काळ । ते माझे केवळ मायबाप ॥२॥
मायबाप म्हणो तरी लाजिरवाणे । चुकविले पेणे संतजनीं ॥३॥
ज्या ज्या जन्मा जावे मायबाप दोन्ही । परी संतजन निर्वाणी मिळतीना ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७९०
📿 ऐकल्या नव्हे खेळ चां
1790.
ऐकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि ॥१॥
उमटे तेव्हा कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥धृपद॥
दुसऱ्या परी एक ऐसा । वजे रिसा निकुरे ही ॥२॥
तुका म्हणे कळत्या कळे । येर खेळे खेळ म्हणो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७९१
📿 का रे विष्णुदासा कोम
1791.
का रे विष्णुदासा कोमाईलासी वदनी | गांजिलासी कवणी दुराचारी ॥१॥
क्षण एक जीव न गमे मज वेगळा | मीहि त्या जवळा सदा असे ॥२॥
वैकुंठ भुवन नलगे माझे चित्ती | झणी याचि संति होईल तुज ॥३॥
लक्षुमिचे विलासी न घडे माझे मन | झणी याचे प्राण जाजावती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७९२
📿 का हो तुम्ही माझी वद
1792.
का हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥
आणीक म्या कोणा पुसावा विचार । मुळी संवसार दुराविला ॥धृपद॥
स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरी । सांगितले करी कारण ते ॥२॥
तुका म्हणे नाही शिकविले जेणे । तो याच्या वचने उगा राहे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७९३
📿 सेवकासी आज्ञा स्वामी
1793.
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥
आणिकाचा धाक न धरावा मनी । निरोपावचनी ढळो नये ॥धृपद॥
समय सांभाळूनि आगळे उत्तर । द्यावे भेदी वज्र तपायरी ॥२॥
तुका म्हणे तरी म्हणावे सेवक । खादले ते हाक अन्न होय ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७९४
📿 नये पुसो आज्ञा केली
1794.
नये पुसो आज्ञा केली एकसरे । आम्हासी दुसरे नाही आता ॥१॥
ज्याचा तो बळिवंत सर्व निवारिता । आम्हा काय चिंता करणे लागे ॥धृपद॥
बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाही एक अंगी तया ॥२॥
तुका म्हणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाही हाती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १७९४
📿 माझिया भक्ता जे ठेवि
1794.
माझिया भक्ता जे ठेविती दूषणा | तुटोनि रसना पडेल त्यांची ॥१॥
ऐसे दुराचारी असती जे नर | भोगिती अघोर सत्य जाणा ॥२॥
माझिया भक्ता जे करिती छळण बुद्धि | त्याची वंशवृद्धि नव्हे कदा ॥३॥
माझिया भक्तांचा करिती उपहास | त्यांचा समूळ वंश यमलोकी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७९५
📿 बळिवंत आम्ही समर्थाच
1795.
बळिवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥
तेथे मानसाचा कोण आला पाड । उल्लंघोनि जड गेलो आधी ॥धृपद॥
संसाराचे बळी साधिले निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥
तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १७९५
📿 दत्तराया करु प्रथम न
1795.
दत्तराया करु प्रथम नमन । द्वीतीय चरणा सदगुरुच्या ॥१॥
सदगुरुच्या चरणा करावा प्रणाम । मुखी नित्य नाम सद जप ॥२॥
नित्य जपा वाचे गुरुराया स्वामी । तेणे सुखधामीं प्राप्त व्हाल ॥३॥
प्राप्त व्हाल तुम्ही आत्यांतीक सुखा । जेथे जन्म दुःखा पार नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७९६
📿 एक गावे आह्मी विठोबा
1796.
एक गावे आह्मी विठोबाचे नाम । आणिकापे काम नाही आता ॥१॥
मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥धृपद॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळ घोष । सेवू ब्रम्हरस आवडीने ॥२॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळा मात्रे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७९७
📿 वाचा चापल्ये बहु जाल
1797.
वाचा चापल्ये बहु जालो कुशळ । नाही बीजमूळ हाता आले ॥१॥
म्हणोनि पंढरिराया दुखी होते मन । अंतरीचे कोण जाणे माझे ॥धृपद॥
पूज्य जालो अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबले ॥२॥
तुका म्हणे खूण न कळेचि निरुती । सापडलो हाती अहंकाराचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १७९७
📿 प्रकाश तरणी न बोले व
1797.
प्रकाश तरणी न बोले वेदवाणी । बोध विवेक दोन्ही तटस्थ झालीं ॥१॥
वेदासी अगोचर ध्यानासी कानडे । ते ब्रह्मा सांपडें सदगुरु चरणी ॥२॥
काळासी नाकळें कर्मीं जे न मिळे । सर्वांसी न कळे असुनियां ॥३॥
जीवी जीवा न कळे शिवपण वोविलें । नाम या वेगळें सच्चिदनंद ॥४॥