संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ५३
📿 शिणल्या भागलयांचा तू
53.
शिणल्या भागलयांचा तूंचि विसावा । धांवे तू केशवा मायबापा ॥१॥
किती किती मन आवरोनी धरू । परी न सुचे विचारू काय करू ॥२॥
तुम्ही तंव समर्थ आपुल्याच भारे । आमुचे खोटे खरे काय जाणा ॥३॥
मी तो बैसले तुमचिये द्वारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ५३
📿 नेणे गाणे कंठ नाही ह
53.
नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर । घालू तुज भार पांडुरंगा ॥१॥
नेणे राग वेळ काळ घात मात । तुझे पायी चित्त ठेवी देवा ॥२॥
तुका म्हणे मज चाड नाही जना । तुज नारायणा वाचूनिया ॥३॥
अर्थ :
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५३
📿 दिंडी आणि पताका गरुड
53.
दिंडी आणि पताका गरुड टकियाचे भार ।
आनंद गर्जती नाम यादव वीर ॥ध्रु ॥
चलावे विंठोबा राजमंदिरी ।
करी घेऊनि चामर ढाळिती गा सुंदरा ।
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ५३
📿 नाही छाया माया प्रकृ
53.
नाही छाया माया प्रकृतीच्या आया । मनाच्या उपाया न चले काही ॥१॥
ते रुप स्वरुप अपार अमूप । यशोदे समीप खेळतसे ॥२॥
विश्वाचा विश्वास विश्वरुपाधीश । सर्वत्र महेश एकरुपे ॥३॥
निवृत्ति सर्वज्ञ नाममंत्रयज्ञ । सर्व हाचि पूर्ण आत्माराम ॥४॥
54.
सर्व सुखे आजि येथेंचि वोळली । संतांची देखिली चरणांबुजे ॥१॥
सर्व काळ होतो आठवीत मनी । फिटली ते धणी येणे काळे ॥२॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढे झाले चित्त समाधान ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ५४
📿 पारधियासी तेव्हा दाट
54.
पारधियासी तेव्हा दाटला गहींवर । लोटले अपार प्रेम तेव्हा ॥१॥
जीवदान दिल्हे जावे तुम्ही आता । न करावी चिंता कांही येथे ॥२॥
इंद्राचा मी दूत चुकलो सेवेसी । यालागी जन्मासी आलो जाणा ॥३॥
तुमचिया बोले निवाले अंतर । घात इत:पर न करी कांही ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५४
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गर्ग आगमन व नंद प्रार्थना›
📿 अभंग क्र. ५४
📿 गर्गागमन व नंदप्राथन
54.
गर्गागमन व नंदप्राथना.
आले गोकुळासी । हर्ष न माये मानसी ॥१॥
नंदे गर्गाते देखिले । पूजा स्तवनी तोषविले ॥२॥
भूतभविष्यवर्तमान । तुह्मा कळती हो संपूर्ण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ५४
📿 काय याचे बोले तुज वा
54.
काय याचे बोले तुज वाटतसे कोडे । बोलते सांवळा अवघे वितंड ॥१॥ पुरें तुझे गाव नको आता वस्ती । आम्ही जाऊ सर्व मिळुनि मथुरेप्रती ॥२॥ नाही तसे बोल बोलतसे वाया । एका जनार्दनी हा तुझा कान्हया ॥३॥
55.
नव्हती ते संत करिता कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथे नाही वेश सरते आडनांव । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥२॥
नव्हती ते संत धरिता भोपाळा । पांघरती वाकाळा नव्हती संत ॥३॥
नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराण नव्हती संत ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ५५
📿 सोडोनिया गळा मुक्त क
55.
सोडोनिया गळा मुक्त केले त्यांसी । पिऊनि उदकासी आली पुढती ॥१॥
क्षुधेलासी फार न लावी उशीर । घेऊनिय़ा शस्त्र हाणी वेगे ॥२॥
घर तुझे दूर वाहावेना भार । आह्मी तेथवर येत असो ॥३॥
सत्यत्व देखोनि ह्मणतसे पारधी । तुम्ह्यांसी न वधी जावे आता ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ५५
📿 सदा सर्वकाळ नामाचा छ
55.
सदा सर्वकाळ नामाचा छंद । रामकृष्ण गोविंद जपे सदा ॥१॥
अखंड वाचेसि नाही पै खंडण । नाम नारायण सुलभ है ॥२॥
सुखदु:ख कांही न पडे आघात । होय मन शांत जपता नाम ॥३॥
सोयरा म्हणे मज आलीसे प्रचित । नामेंचि पतित उद्धरती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ५५
📿 उपाधीच्या नावे घेतला
55.
उपाधीच्या नावे घेतला सिंतोडा । नेदू आता पीडा आतळो ते ॥१॥
काशासाठी हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥धृपद॥
काय नाही देवे करूनि ठेविले । असे ते आपुले ते ते ठायी ॥२॥
तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार । तेव्हा आपपर बोळविले ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५५
📿 देवकी म्हणे बाळा धन्
५५. देवकी म्हणे बाळा धन्ये भाग्य जाले ।
धन्ये उदरा आले परब्रह्म ॥१॥ धन्य माझे आता
निवती दृष्टी डोळे । धन्ये कडिये खेळे कृष्णु
बाळ ॥२॥ जन लोक बोलती देवकीचा बाळ ।
धन्ये उभयता कुळ उद्धरिले ॥३॥ धन्ये हे भूमीस्थळ
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५५
📿 देवा देवा तुझे चरणाच
55.
देवा देवा तुझे चरणाची आवडी । हे कल्प कोडी जोड माजी ॥
नामाचा हे मात देई अखंडित । तेथ माझे चित्त बैसलेसे ॥
नामा वाचोनिया हीत काही दासा । मन हे बैस आन के ठाई ।
बोधला म्हणे देवा नाम तुला सोप । दिधले माये बाप कृपा करुनी ॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७›
📿 अभंग क्र. ५५
📿 नको करु आता कृष्णा त
55.
नको करु आता कृष्णा तु खोडीं । नाही म्हणोनिया दोनी हात जोडी ॥१॥ काल इचे गृहीं थोडें खादले नववीत । म्हणोनि राधिकेचे स्तनी ठेवी हात ॥२॥ येवढाचि गोळा कढिला बाहेरी । सत्य म्हणोनिया आण वाहतो हरी ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक सांवळा । न कळे ब्रह्मादिका याची अगम्य कळा ॥४॥
56.
जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥
आणिक नये माझ्या मना । हो का पंडित शहाणा ॥२॥
नाम रुपी जडले चित्त । त्याचा दास मी अंकित ॥३॥
तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ५६
📿 गुरु हा संतुकुळीचा र
56.
गुरु हा संतुकुळीचा राजा । गुरु हा प्राणाविसावा माझा ।
गुरुवीणा देव दुजा । पाहता नाही त्रिलोकी ॥१॥
गुरु हा सुखाचा सागरु । गुरु हा प्रेमाचा आगरु ।
गुरु हा धैर्याचा डोंगरु । कदाकाळी डळमळीना ॥२॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ५६
📿 शिणल्या बाह्या आता ।
56.
शिणल्या बाह्या आता । येऊनिया लावी हाता ॥1॥
तू मार्झे वो माहेर । काय पहातोसी अंतर ॥2॥
वोंवाळुनी पाया । जिवेभावे पंढरिराया ॥3॥
धर्म ताता धर्म लेकी । ह्मणे जनी हे विलोकी ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ५६
📿 कौन भरे जल जमुना । स
56.
कौन भरे जल जमुना । सखीको०॥धृ०॥
बन्सी बजावे मोहे लीनी । हरीसंग चली मन मोहना॥१॥
शाम हटेले बडे कवटाले । हर लाई सब ग्वालना॥२॥
कहे मिरा तुम रूप निहारो । तीन लोक प्रतिपालना॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५६
📿 देह हे पंढरी आत्मा प
56.
देह हे पंढरी आत्मा पांडुरंग । नित्य करी संग अहर्निशी ॥
चहु देहाची करुनिया वीट । त्यावरी उभा नीट पांडुरंग ॥
मन पुंडलिक आवरोनी धरा । होईल सोयरा पांडुरंग ॥
बोधला म्हणे माझ्या संचिताचा रेखा । जोडियला सखा पांडुरंग ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ५६
📿 आदिरुप समूळ प्रकृती
56.
आदिरुप समूळ प्रकृती नेम । वैकुंठ उत्तम सर्वत्र असे ॥१॥
ते रुप संपूर्ण वोळले परींपूर्ण । सर्व नारायण गोपवेष ॥२॥
आधारी धरिता निर्धारी धरिता । सर्वत्र पुरता एकरुपे ॥३॥
निवृत्ति साधन सर्वरुपे जाण । एतरुपे श्रीकृष्ण सेवितसे ॥४॥
57.
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥३॥
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाही ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ५७
📿 नित्य धर्म नाम पाठ ।
57.
नित्य धर्म नाम पाठ । तेचि वैकुंठींची वाट ।
गुरुभजनी त्याचा जो विनट । तोचि हरिभक्तु जाणावा ॥१॥
धन्य धन्य धन्य त्याचा वंश । धन्य तो आला जन्मास ।
तया जवळी हृषीकेश । सर्वकाळ नांदतु असे ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , भुपाळ्या अभंग›
📿 अभंग क्र. ५७
📿 आता कोठे धावे मन । त
57.
आता कोठे धावे मन । तुमचे चरण देखलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंद ॥२॥
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥३॥
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठल घोगे खरे माप ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ५७
📿 संतासी तो खूण बाणली
57.
संतासी तो खूण बाणली तुमची । तरी का आमुची सांडी केली ॥१॥
काय साचपण मानू आता देवा । न कळे हा गोंवा उगवा कधी ॥२॥
रात्रंदिवस भ्रमले हे मन । नव्हे समाधान काय करू ॥३॥
सोयरा म्हणे आहे पंढरीनिवासा । लवकरी फांसा तोडा आता ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ५७
📿 न ये नेत्रा जळ । नाह
57.
न ये नेत्रा जळ । नाही अंतरी कळवळ ॥१॥
तो हे चावटीचे बोल । जन रंजवणे फोल ॥धृपद॥
न फळे उत्तर । नाही स्वामी जो सादर ॥२॥
तुका म्हणे भेटी । जव नाही दृष्टादृष्टी ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५७
📿 देह जालिया जर्जर । स
57.
देह जालिया जर्जर । सकळ होईल वार ॥
कोण्ही नव्हे कोणाचे । जन लटिके जे पायेचे ॥
माझ्या रामासी शरण जाता । भय नाही सर्वथा ॥
बोधला म्हणे हरि शरण । चुकविती जन्ममरण ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 महाबळभट विटंबना›
📿 अभंग क्र. ५७
📿 विप्र वेष तेव्हा घेऊ
57.
विप्र वेष तेव्हा घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेगे ॥१॥
पुत्रोत्सव कोठे लोकांला पुसत । भावीत सांगत नंदाघरी ॥२॥
ऐकोनिया ऐसे आला अकस्मात । येशोदा देखत सन्मुख त्या ॥३॥
श्रीकृष्णासी तेव्हा वोसांगी घेतले । दंडवत केले ब्राह्मणासी ॥४॥
58.
बोल बोलता वाटे सोपे । करणी करिता टीर कांपे ॥१॥
नव्हे वैराग्य सोपारे । मज बोलता न वाटॆ खरे ॥२॥
विष खावे ग्रासोग्रासी । धन्य तोचि एक सोसी ॥३॥
तुका म्हणे करुनि दावि । त्याचे पाय माझे जीवी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ५८
📿 मन हे धाले मन हे धाल
58.
मन हे धाले मन हे धाले पूर्ण विठ्ठलचि झाले ।
अंतर्बाह्य रंगुनि गेले विठ्ठलाची ॥१॥
विठ्ठल म्हणता हरले पाप । पदरी आले पुण्य माप ।
धाला दीनाचा माय बाप विठ्ठलची ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , वासुदेव अभंग›
📿 अभंग क्र. ५८
📿 संत कान्होबाराय (तुक
58.
संत कान्होबाराय (तुकयाबंधु) यांचे वासुदेव
मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी ।
पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणे कृपा केली आह्मांवरी गा ॥१॥
ह्मणउनि आलो या देशा । होतो नाही तरी भुललो दिशा ।