🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७१३
📿 आपुले गावीचे न देखेस
713.
आपुले गावीचे न देखेसे जाले । परदेसी एकले किती कंठू ॥१॥
म्हणऊनि पाहे मूळ येता वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥धृपद॥
पाहाता अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढे ॥२॥
तुका म्हणे कोणी न सांगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७१३
📿 नामाचा महिमा कोण करी
713.
नामाचा महिमा कोण करी सीमा | जपा श्रीरामा ऐक्यभावे ॥१॥
न लगती स्तोत्र नाना मंत्र तंत्रे | वर्णिजे वक्त्रे श्रीराम नाम ॥२॥
अनंत पुण्यरासी घडे ज्या प्राण्यासी | तरीच मुखासी नाम येत ॥३॥
नामा म्हणे राम हा जप परम | तो देह उत्तम मृत्युलोकी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ७१३
📿 लाहो करा लाहो करा ।
713.
लाहो करा लाहो करा । वाचे स्मरा विठ्ठल ॥१॥
तुटेल बंधन उपाधी । बाधों न शके आधीव्याधी ॥२॥
न लगे खटपट पसारा । वाचे विठ्ठल उच्चार ॥३॥
एका जनार्दनी सोपे । विठ्ठल म्हणता नुरती पापें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७१४
📿 जन तरी देखे गुंतले प
714.
जन तरी देखे गुंतले प्रपंचे । स्मरण ते त्याचे त्यासी नाही ॥१॥
म्हणऊनि मागे परतले मन । घालणीचे रान देखोनिया ॥धृपद॥
इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायी । फोडीतसे डोई अहंकार ॥२॥
तुका म्हणे देवा वासनेच्या आटे । केली तळपटे बहुतांची ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७१४
📿 कासवीचे दृष्टी जे हो
714.
कासवीचे दृष्टी जे होईजे भेटी | तै अमृताची सृष्टी घडे त्यासी ॥१॥
तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान | वाचे नारायण अमृतमय ॥२॥
धन्य त्याचे कुळ सदा पै सकळ | दिननिशी पळ रामनाम ॥३॥
नामा म्हणे चोखडा भक्त तो उत्तम | वाचेसी सुगम रामनाम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ७१४
📿 एकविध भावे हरी । वाच
714.
एकविध भावे हरी । वाचे उच्चारी सर्वदा ॥१॥
सर्व साधनांचे सार । विठ्ठलमंत्राचा उच्चार ॥२॥
असा सदा हेंचि ध्यान । विठ्ठलनामाचे चिंतन ॥३॥
एका जनार्दनी जपा । विठ्ठलमंत्रसोपा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७१५
📿 धावे त्यासी फावे । द
715.
धावे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥
घ्यावे भरूनिया घर । मग नाही येरझार ॥धृपद॥
धणी उभे केले । पुंडलिके या उगले ॥२॥
तुका म्हणे ठसा । गेला पडोनिया ऐसा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७१५
📿 मी माझे भाविता न फिट
715.
मी माझे भाविता न फिटे हे ओझे | कर्मकांड दुजे आड येते ॥१॥
न तुटे हे कर्म न चले हा धर्म | सर्वत्र हे ब्रह्म न कळे तया ॥२॥
मी माझे हे ओझे अहंताची वाहे | परतोनी न पाहे मी कवण ॥३॥
नामा म्हणे नाम स्मरे त्या कृष्णाचे | भय कळीकाळाचे नाही नाही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ७१५
📿 एक वेळ गाय विठ्ठलाचे
715.
एक वेळ गाय विठ्ठलाचें नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढे उभे ॥१॥
आवडीने घाली तया लोटागण । संताचें चरण वंदी माथा ॥२॥
पंढरेची वारी संतांचा सांगात । पुरती सर्व हेत निश्चयेंसी ॥३॥
एका जनार्दनी धरुनि विश्वास । संतांचा दास होय आधी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७१६
📿 लहानपण दे गा देवा ।
716.
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥धृपद॥
ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥
तुका म्हणे जाण । व्हावे लहनाहुनि लहान ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७१६
📿 उपदेश विव्हळ न कळे य
716.
उपदेश विव्हळ न कळे याचा अर्थ | वायाची हा स्वार्थ प्रपंचाचा ॥१॥
सांडी हा प्रपंच मिथ्या लवलाहो | विठ्ठल हा टाहो नित्य करी ॥२॥
हरी हरी भजन भज दयाशीळ | होसील निर्मळ ब्रह्मरूप ॥३॥
सर्व हा आकार हरीचे शरीर | मायेचा विकार भुलो नको ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७१७
📿 धिक् तो ग्राम धिक् त
717.
धिक् तो ग्राम धिक् तो आश्रम | संत समागम नाही जेथे ॥१॥
धिक् ते संपत्ति धिक् ते संतति | भजन सर्वांभूती नाही जेथे ॥२॥
धिक् तो आचार धिक् तो विचार | वाचे सर्वेश्वर नाही जेथे ॥३॥
धिक् तो वक्ता धिक् तो श्रोता | पांडुरंग कथा नाही जेथे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ७१७
📿 विठ्ठल म्हणता विठ्ठल
717.
विठ्ठल म्हणता विठ्ठलाचि होसी । संदेह येविशी धरु नको ॥१॥
सागरी उठती नाना पईं तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ॥२॥
तैसे मन करी द्वैत न धरी । सर्व चराचरी विठ्ठल एक ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठलावांचुनी । दुजा नेणो कोणी स्वप्नी आम्ही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७१८
📿 उष्ट्या पत्रावळी करू
718.
उष्ट्या पत्रावळी करूनिया गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥
ऐसे जे पातकी ते नरकी पचती । जोवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
तुका म्हणे एका नारायणा घ्याई । वरकडा वाही शोक असे ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७१८
📿 सुख ते आपुले चोरांशी
718.
सुख ते आपुले चोरांशी वाटिले | पाळते घेतले दु:ख त्यांचे ॥१॥
नित्य नवी त्याची सोसिता सोसिणा | नयेचि तुज अझोनी वीट मना ॥२॥
ऐसा तू निर्लज्ज पाहे आत्मघाती | कैसी तुझी खंती न वाटे तुज ॥३॥
लक्ष या चौऱ्याशी सोसिता यातना | भोगिसी पतना ज्यांच्या संगे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७२०
📿 म्हणविता हरीदास का र
720.
म्हणविता हरीदास का रे नाही लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना ॥१॥
काय ऐसे पोट न भरेसे जाले । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥
तुका म्हणे पोटे केली विटंबना । दीन जाला जना कीव भाकी ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७२०
📿 नामामृत गोडी आहे वैष
720.
नामामृत गोडी आहे वैष्णवासी | येरा प्राकृतासी कळेनाची ॥१॥
प्राकृत हे जन भुलले विषयी | नामाचिया गावी कैसे जाती ॥२॥
नामी चित्त व्हावे जावे तेव्हा गावा | मग नाम गोवा तेथे कैचा ॥३॥
नाम तेचि जाहले वर्णरूपातीत | अनाम स्वतंत्र स्वयंभू तो ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ७२१
📿 अचुक साधन कष्ट नाही
721.
अचुक साधन कष्ट नाही कांही । वाचे विठ्ठलरखुमाई म्हणे सुखें ॥१॥
जन्ममरणाच्या तुटतील खेपा । सोपा होय बापा मार्ग तुज ॥२॥
बहुत मार्ग बहुत साधन । परी वाचा जाण शीण दुर्गम ते ॥३॥
एका जनार्दनी कष्ट ना सायास । म्हणा वाचे विठ्ठलास जीवेंभावें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७२२
📿 घरोघरी अवघे जाले ब्र
722.
घरोघरी अवघे जाले ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥
निरे कोणापाशी होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥धृपद॥
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥
काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आत काळकूट ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७२२
📿 सर्वांमाजी सार नाम ह
722.
सर्वांमाजी सार नाम हे देवाचे | सर्व साधनांचे सार जे का ॥१॥
चार साहा आणिक आठरा वर्णिती | नामे निजप्राप्ती अर्धक्षणी ॥२॥
व्यासादिक नाम साधियले दृढ | प्रपंच काबाड निरसेल ॥३॥
नामदेव म्हणे निजधाम ब्रह्म | घेता नेम धर्म सर्व साधे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ७२२
📿 ज्ञान होय आधी संता श
722.
ज्ञान होय आधी संता शरण जाता । मग वोळखिता कळे रुप ॥१॥
नामांचे जे मुळ रुपांचें रुपस । पंढरीनिवास हृदयी धरी ॥२॥
प्रपंचीं परमाथीं तारक हे नाम । ब्रह्मानंद प्रेम सर्व वसे ॥३॥
सच्चिदानंद खूण एका जनार्दनी । स्वयं ब्रह्म जाण नाम असे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७२३
📿 मन करी आपुले वासना त
723.
मन करी आपुले वासना ते वारी | सर्व हेचि हरी भजत जाय ॥१॥
ब्रह्म नाम गोविंद नाही भेदाभेद | तुटे भवबंध हरी नामे ॥२॥
सांडी लगबग न करी तू आळस | विठ्ठली विश्वास असो देणे ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म हेचि निरुपण | सर्व काम पूर्ण याच्या नामे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३›
📿 अभंग क्र. ७२३
📿 गायन ते सोपे गाऊ । व
723.
गायन ते सोपे गाऊ । वाचे ध्याऊं विठ्ठल ॥१॥
तेणे सर्व होय सिद्धि । तुटे उपाधि जन्मजरा ॥२॥
साधनांचा न करु श्रम । गाऊ नाम आवडी ॥३॥
शुकादिक रंगले रंगी । त्याची मार्गीं आम्ही आऊ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७२४
📿 महुरा ऐसी फळे नाही ।
724.
महुरा ऐसी फळे नाही । आली काही गळती ॥१॥
पक्वदशे येती थोडी । नास आढी वेचे तो ॥धृपद॥
विरळा पावे विरळा पावे । अवघड गोवे सेवटीचे ॥२॥
उंच निच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७२५
📿 मानवा रामनामी भजें ।
725.
मानवा रामनामी भजें । तेणे तुझे कार्य होते सहजें ॥१॥
अनुभव घेई अनुभव घेई । अनुभव घेई रामनामी ॥२॥
शंकारादि तरले वाल्मिकादि उद्धरले । ते तू वहिले घेईं रामनाम ॥३॥
एक जनार्दनी नामाच्या परिपाठी । दोष पातके पळती कोटी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७२७
📿 देह आणि देहसंबंधे नि
727.
देह आणि देहसंबंधे निंदावी । इतरे वंदावी श्वानशूकरे ॥१॥
येणे नावे जाला मी माझ्याचा झाडा । मोह नावे खोडा गर्भवास ॥धृपद॥
गृह आणि वित्त स्वदेहा विटावे । इतरा भेटावे श्वापदाझाडा ॥२॥
तुका म्हणे मी हे माझे न यो वाचे । येणे नावे साचे साधुजन ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७२७
📿 देवांचे हे गूज सकळ म
727.
देवांचे हे गूज सकळ मंत्रमय । जे का निजध्येय शंकराचे ॥१॥
ते हे रामनाम सेविती सर्वभावे । रामरुप व्हावे निश्चयेंसी ॥२॥
नष्ट अजामेळाचें पतितत्व गेले । दिव्यरुप जाले वाल्मिकीचें ॥३॥
शरीर संपत्ती बळे अपूर्व सकळ । जाला द्वारपाळ एका जनार्दनी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७२८
📿 सुख रामनामे अपार । श
728.
सुख रामनामे अपार । शंकर जाणे तो विचार ॥१॥
गणिका जाणे रामनाम । गजेंद्र उद्धरिला राम ॥२॥
शिळा मुक्त केली । रामनामे पदा गेली ॥३॥
तारिले वानर । रामनामे ते साचार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७२९
📿 देह नव्हे मी सरे । उ
729.
देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥
म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतने ॥धृपद॥
पाळणाची नाही चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥
तुका म्हणे जीवासाठी । देव पोटी पडेल ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७२९
📿 जन्माचे कारण रामनाम
729.
जन्माचे कारण रामनाम पाठे | जाईजे वैकुंठे एक हेळा ॥१॥
रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा | तो उद्धरेल अपैसा इहलोकी ॥२॥
दो अक्षरी राम हा जप परम | नलगे तुज नेम नाना पंथ ॥३॥
नामा म्हणे पवित्र श्रीरामाचे चरित्र | उद्धरसि गोत्र पूर्वजांसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७२९
📿 भवभयनाशक रामनाम तारक
729.
भवभयनाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख जाणतसे ॥१॥
योगयाग नको आणिक साधने । नामपरतें पेणे आणिक नाही ॥२॥
कालीमाजीं श्रेष्ठ रामनाम निज । यापरतें बीज आणिक नाही ॥३॥
एका जनार्दनी नाम तारक थोर । तुटे वेरझार रामनामे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७३०
📿 गोविंद गोपाळ वाचेसि
730.
गोविंद गोपाळ वाचेसि निखळ | तो उद्धरे तात्काळ कलिमाजी ॥१॥
नारायण नारायण हेचि पारायण | उद्धरले जन इहलोकी ॥२॥
तुटती यातना कर्माच्या भावना | जड जीव उद्धरणा नाम स्मरा ॥३॥
नामा म्हणे राम हा जप परम | न लगती नेम नानाकोटी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७३०
📿 आणीकाचें नामे कोण हो
730.
आणीकाचें नामे कोण हो तरला । ऐसे सांगा मला निवोडोनी ॥१॥
या रामनामे पातकी पतीत । जीव असंख्यात उद्धरीले ॥२॥
जुनाट हा पंथ शिवाचें हे ध्येय । रामनाम गाये स्मशानी तो ॥३॥
गिरजेसी आवडी रामनामे गोडी । एका जनार्दनी जोडी हेंचि आम्हा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७३१
📿 पुण्यविकरा ते मातेचे
731.
पुण्यविकरा ते मातेचे गमन । भाडी ऐसे धन विटाळ तो ॥१॥
आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावे ते नाभी करवी दंड ॥धृपद॥
नागवला अल्प लोभाचिये साठी । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥
तुका म्हणे हात झाडिले परत्री । श्रम तोचि श्रोत्री ठेवी केली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७३२
📿 अंतरीचे ध्यान । मुख्
732.
अंतरीचे ध्यान । मुख्य नांव या पूजन ॥१॥
उपाधि ते अवघे पाप । गोड निरसता संकल्प ॥धृपद॥
आज्ञा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥२॥
तुका म्हणे वृत्ति । अविट हे सहज स्थिति ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७३२
📿 श्रीराम जयराम वदता व
732.
श्रीराम जयराम वदता वाचे । पातकें जाती कोटी जन्मांची ॥१॥
जयजय राम जयजय राम । तुमचे नाम गाये शंकर उमा ॥२॥
नाम थोर तिही लोकी साजे । उफराटे वदता पातक नासलें वाल्हाचे ॥३॥
एका जनार्दनी नाम सारांचे सार । नामस्मरण तुटें भवबंध वेरझार ॥४॥