🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५४८
📿 सर्वविशी माझा त्रासल
548.
सर्वविशी माझा त्रासलासे जीव । आता कोण भाव निवडू एक ॥१॥
संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणता माझे कोणी ॥धृपद॥
देहसुख काही बोलिले उपचार । विष ते आदर बंद वाटे ॥२॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५४९
📿 आणीक काही या उत्तराच
549.
आणीक काही या उत्तराचे काज । नाही आता मज बोलावया ॥१॥
भिन्न भेद हे भावना स्वभाव । नव्हे काही देव एकविध ॥धृपद॥
गुण दोष कोणे निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म ते ॥२॥
तरि भले आता न करावा संग । दुःखाचे प्रसंग तोडावया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता›
📿 अभंग क्र. ५४९
📿 सर्व पाप पुण्य हींचि
549.
सर्व पाप पुण्य हींचि दोन्ही भांडी | विवेक न सांडी येता जाता ॥१॥
तुझे नाम तारू तुझे नाम तारू | तुझे नाम तारू श्री विठ्ठला ॥२॥
विष्णुदास नाम्याने उभारिली शिडी | टाकावया पेढी वैकुंठीची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ५४९
📿 दोन्ही कर ठेवूनी कटी
549.
दोन्ही कर ठेवूनी कटी । उभा भीवरेचे तटीं ॥१॥
रुप सांवळे सुंदर । गळा वैजंयती हार ॥२॥
कानां कुंडले मकराकार । तेज न समाये अंबर ॥३॥
एका जनार्दनी उदार । भीमातीरी दिंगबर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५५०
📿 आपुला विचार करीन जीव
550.
आपुला विचार करीन जीवाशी । काय या जनाशी चाड मज ॥१॥
आपुले स्वहित जाणती सकळ । निरोधिता बळे दुःख वाटे ॥धृपद॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनिया घरी निजो सुखे ॥२॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनिया वाट आणिका लागे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५५३
📿 संतांची उच्छिष्टे बो
553.
संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे । काय म्या गव्हारे जाणावे हे ॥१॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथे मज बोध काय कळे ॥धृपद॥
करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥
काय माझी याति नेणा हा विचार । काय मी ते फार बोलो नेणे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता›
📿 अभंग क्र. ५५३
📿 जय विठ्ठल श्री विठ्ठ
553.
जय विठ्ठल श्री विठ्ठल | जय जय विठ्ठल विठ्ठल ॥१॥
परब्रह्म विठ्ठल मूर्ति विठ्ठल | निरंजन विठ्ठल विठ्ठल ॥२॥
जोचि नाम तोचि देवो | ऐसे म्हणो तरी नाही संदेहो ॥३॥
म्हणे विष्णुदास नामा | तो नेईल परत ग्रामा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५५४
📿 चंदनाच्या वासे धरिती
554.
चंदनाच्या वासे धरितील नाक । नावडे कनक न घडे हे ॥१॥
साकरेची गोडी सारिखी सकळा । थोरा मोठ्या बाळा धाकुटिया ॥२॥
तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते । तरि का निंदित जन मज ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ५५४
📿 सगुण निर्गुण मूर्ति
554.
सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सुर्य दांटे प्रभा तेथे ॥१॥
सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहता पूर्वज उद्धरती ॥२॥
त्रिभुवनी गाजे ब्रीदाचा तोडर॥तोचि कटी कर उभा विटे ॥३॥
एका जनार्दनी नातुडे जो वेदा । उभा तो मर्यादा धरुनि पाठी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५५५
📿 तुज ऐसा कोण उदाराची
555.
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥१॥
शुद्ध हीन काही न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देही ॥२॥
भावे हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्ताच्या परी नावडती ॥३॥
नवजासी जेथे दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५५५
📿 डवरला गिरी कैलास ढवळ
555.
डवरला गिरी कैलास ढवळा | सिंहासन ज्याला ढवळेची ॥१॥
पाहता पाहता निवाले लोचन | भव्य ज्याचे ध्यान एकरूप ॥२॥
ढवळा सर्वांगी देव तो आपण लेईला भूषण ते हि तैसे ॥३॥
पर्वताची बाळा पार्वती ढवळी| अर्धांगी शोभली एकरूप ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ५५५
📿 कर कटावरी वैजयती माळ
555.
कर कटावरी वैजयती माळा । तो हरीडोळां देखियेला ॥१॥
रुप सांवळे शोभे विटेवरी । तो हरी डोळेभरी देखियेला ॥२॥
एका जनार्दनी पाहता रुपडें । त्रिभुवन थोकडें दिसतसे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५५६
📿 एके दिनी रत्नसिंहासन
556.
एके दिनी रत्नसिंहासनावरी| कैसा त्रिपुरारी शोभतसे ॥१॥
सांगो जाता चारही वाचा विसावती | तेथे माझी मति काय सांगो ॥२॥
वामभागी साजे सुंदरी भवानी| सिद्ध ऋषि मुनी करिती सेवा ॥३॥
नारद तुंबर गर्जती गायन | तेथे कर जोडोन उभे देव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ५५६
📿 आल्हाददायकश्रीमुख चा
556.
आल्हाददायकश्रीमुख चांगलें । पाहता मोहिले भक्त सर्व ॥१॥
गाई गोपाळ विधिल्या गोपिका । श्रीमुख सुंदर देखा सजिरें ते ॥२॥
आल्हाददायक ते मुखकमळ । वैजयंती माळ हृदयावरी ॥३॥
एका जर्नादनी पाहता रुपडें । आनंदी आनंद जोडे आपेआप ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५५७
📿 कोणाच्या आधारे करू म
557.
कोणाच्या आधारे करू मी विचार । कोण देईल धीर माझ्या जीवा ॥१॥
शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाही ॥२॥
कलियुगी बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गाता ॥३॥
मज हा संदेह झाला दोही सवा । भजन करू देवा किंवा नको ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५५७
📿 तेव्हा प्रश्न करी पा
557.
तेव्हा प्रश्न करी पार्वती आदरे | शिवाप्रती कर जोडोनिया ॥१॥
सांगावा जी स्वामी ऐसा इतिहास| गाता जोडे वास तुझे पायी ॥२॥
जाळोनिया पापे सुखाची उन्नति | विश्व सुखी होती जेणे योगे |॥३॥
नामा म्हणे सुटे काळासी दरारा| विश्वासिया नरा मुक्ति जोडे ॥ ४
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५५८
📿 काय उणे जाले तुज समर
558.
काय उणे जाले तुज समर्थासी । ऐसा मजपाशी कोण दोष ॥१॥
जो तू माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधी ॥२॥
तुजविण रत आणिकाचे ठायी । ऐसे कोण ग्वाही दावी मज ॥३॥
तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५५९
📿 काय करू आन दैवते । ए
559.
काय करू आन दैवते । एकाविण पंढरीनाथे ॥१॥
सरिता मिळाली सागरी । आणिका नावा कैची उरी ॥धृपद॥
अनेक दीपिका प्रकाश । सूर्य उगवता नाश ॥२॥
तुका म्हणे नेणे दुजे । एकाविण पंढरीराजे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५५९
📿 ऐका सावधान कथा शिवरा
559.
ऐका सावधान कथा शिवरात्र | पावन पवित्र तिही लोकी ॥१॥
भाव धरोनिया आचरती जरी| वास शिवपुरी घडे त्यासी ॥२॥
उपवास आणि शिवाचे पूजन| रात्री जागरण विधि त्याचा ॥३॥
एक पसा पाणी एक बिल्वदळ | पूजन केवळ सोपे बहु ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५६०
📿 काय करू कर्माकर्म ।
560.
काय करू कर्माकर्म । बरे सापडले वर्म ॥१॥
होसी नामाच सारिखा । समजाविली नाही लेखा ॥धृपद॥
नाही वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥
तुका म्हणे माझे । काय होईल तुम्हा ओझे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५६०
📿 शिव ऐसा शब्द कल्याणद
560.
शिव ऐसा शब्द कल्याणदायक | जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक है नाम भोळ्या भाविकांसी| नेणते जाणत्यासी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागो गेला | क्षीराब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्ट दुराचारी पतित तारिले | नाही अव्हेरिले दीनानाथे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५६१
📿 एकी केली हातोफळी । ठ
561.
एकी केली हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥
आम्ही देवा शिक्तहीने । भाकु तेणे करुणा ॥धृपद॥
पावटणी केला काळ । जया बळ होते ते ॥२॥
तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५६१
📿 भेदवादी जन वदतसे भिन
561.
भेदवादी जन वदतसे भिन्न | नव्हे ते लक्षण भजनाचे ॥१॥
विश्वी विश्वंभर कोंदलासे एक | भेदाचे कौतुक कैसे सांगा ॥२॥
ब्रह्मी नाही ठाव एकपणाचाही | तेथे दुजे काही सामावते ॥३॥
आदि मध्य अंत खेळूनिया खेळ | उरले ते निखळ अविनाश ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५६२
📿 पुढिलाचे इच्छी फळ ।
562.
पुढिलाचे इच्छी फळ । नाही बळ ते अंगी ॥१॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववी ॥धृपद॥
ज्येष्ठांची का आम्हा जोडी । परवडी न लभो ॥२॥
तुका म्हणे करी कोड । पुरवी लाड आमुचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५६२
📿 कांचीपुरी राजा नामे
562.
कांचीपुरी राजा नामे सोमदत्त | तयाचे संपत्ती पार नाही ॥१॥
पूर्वपुण्यबळे लाधले तयासी| देता उपमेसी उणा शुक्र ॥२॥
पांचशते तया कामिनी सुंदरा | करिता नाही पुरा जाला काम ॥३॥
ऋद्धि सिद्धि घरी कामारि हिडती | धैर्य शौर्य कीर्ति ज्याची जगी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६›
📿 अभंग क्र. ५६३
📿 शिणले ते वेद श्रुती
563.
शिणले ते वेद श्रुती पै भांडती पुराणांची मती कुंठीत जाहली ॥१॥
तो हा पांडुरंग उभा विटेवरी । पाउले साजिरी समचि दोन्ही ॥२॥
कर कटावरी तुळशीच्या माळा । निढळीं शोभला मुकुट तो ॥३॥
एका जनार्दनी गोजिरे ते ठाण । शोभले जघन करयुगुली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ५६४
📿 आपुलाल्या तुम्ही रूप
564.
आपुलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥
हे तो नव्हे देहबुद्धीचे कारण । होईल नारायणे दान केले ॥धृपद॥
अब्रूचिया बाणे वर्मासि स्पर्शावे । हे तो नाही ठावे मोकलित्या ॥२॥
तुका म्हणे बहु मुख या वचना । सत्याविण जाणा चाली नाही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शिवरात्रमाहात्म्य›
📿 अभंग क्र. ५६४
📿 पंचशतामाजी दोघी पतिव
564.
पंचशतामाजी दोघी पतिव्रता| जारिणी समस्त सर्व काळ ॥१॥
करूनिया ऐसी जाती नरकासी| नाडिले पतीसी त्यांच्या पापे ॥२॥
करिती ये वेळे झांकिती लोचन| शेवटी बंधन यमाहाती ॥३॥
नामा म्हणे बरे नव्हे हे कोणासी | घडेल तयासी जाच बहू ॥४॥