संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २१९९
📿 बाळकाच्या बोला राजा
2199.
बाळकाच्या बोला राजा भांबावला । म्हणे झाले याला ज्ञानगम्य ॥१॥
शांती याचे अंगी बाणलीसे नीट । तेणे नेटेपाटे पुढारला ॥२॥
मी तो झालो वांया कामाचा किंकर । केला म्या अव्हेर बाळकाचा ॥३॥
कीर्ति हे त्यागोनी दुर्दशा आणिली । ऐसी होऊ सरली बुद्धि फिकी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२००
📿 काळावरी घालू तरि तो
2200.
काळावरी घालू तरि तो सरिसा । न पुरता इच्छा दास कैसे ॥१॥
आता नाही काही उसिराचे काम । न खंडावे प्रेम नारायणा ॥धृपद॥
देणे लागे मग विलंब का आड । गोड तरि गोड आदि अंत ॥२॥
तुका म्हणे होईल दर्शने निश्चिंती । गाईन ते गीती ध्यान मग ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२००
📿 भक्तवत्सलता - अभंग २
2200.
भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४
जी जी भक्त बोलतीं वचनें । ती ती प्रमाण करणे देवा ॥१॥
याजसाठीं अवतार । धरी मत्स्य कांसव सुकर ॥२॥
भक्तवचना उणेंपण । येऊ नेदी जाण निर्धारे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २२०१
📿 येरु तो निवांत होउनी
2201.
येरु तो निवांत होउनी त्याठायी । राहोनिया कांही करिता झाला ॥१॥
न कळे भक्तिभाव घ्यावे कैसे त्यासी । देव कोण त्यासी ठावे नाही ॥२॥
भावार्थाने सर्व इंद्रिये खुंटली । प्रारब्धाने दिल्ही वाट तया ॥३॥
साध्यसाधनाचा उपाव कळेना । घ्यान तो धारणा कौंचि तेथे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २२०२
📿 वाचिता अध्यात्म जाणि
2202.
वाचिता अध्यात्म जाणितांही अर्थ । गुरुवीण व्यर्थ सर्व कांही ॥१॥
करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न । त्याचिये कृपेने सर्व साधे ॥२॥
योग याग तपे चित्त शुद्ध होय । गुरुवीण नये मोक्ष हाता ॥३॥
निर्मळ जीवन तीर्थावीण पावन । तैसा गुरु जाण साधकांसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२०३
📿 ना रडे तरि काय नुजेड
2203.
ना रडे तरि काय नुजेडे कोंबडे । करूनिया वेडे आग्रह दावी ॥१॥
आइत्याचे साहे फुकाचा विभाग । विक्षेपाने जग छी थू करी ॥धृपद॥
नेमून ठेविला करत्याने काळ । न लाहेसे बळ करू पुढे ॥२॥
तुका म्हणे देव साह्य जाल्यावरी । असंगाचे करी सर्व संग ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२०३
📿 भक्तपणा सान नव्हे रे
2203.
भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्तीचें पाय देवाचे हृदयी ॥१॥
भक्त तोचि देव भक्त तोचिक देव । जाणती हा भाव अनुभवी ॥२॥
दान सर्वस्वे उदार बळी । त्यांचे द्वार राखे सदा वनमाळी ॥३॥
एका जनार्दनी मिती नाही भावा । देवचि करितो भक्ताची सेवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२०४
📿 तरी सदा निर्भर दास ।
2204.
तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥
अवघाच एक ठाव । सर्व भाव विठ्ठली ॥धृपद॥
निरविले तेव्हा त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥
तुका म्हणे रूप ध्यावे । नाही ठावे गुणदोष ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २२०४
📿 धन्य धन्य साधु दर्तत
2204.
धन्य धन्य साधु दर्तति भूतळी । जे का भाळींभोळी तारावया ॥१॥
जयाच्या दर्शने पातकाई धुणी । होय तो सज्जनी मान्य सदा ॥२॥
विश्वी विश्वंभर दाखविती पूर्ण । भवाचे बंधन तोडोनिया ॥३॥
जाती विजाती व्हावया प्रज्ञानहो । एक मग मोहो सोडविती ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २२०५
📿 नारदे पाहिली बाळकाची
2205.
नारदे पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्ती शांती भरली दिसे ॥१॥
कल्पनेचा दाणा म्हणे तयालागी । बाळा कवणालागी आठविसी ॥२॥
वय तरी थोडे भावना उदंड । काय तुज चाड सांग आता ॥३॥
न बोलसी तरी साधेना हे काज । अंतरींचे नीज मज कळे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२०६
📿 मेघवृष्टीने करावा उप
2206.
मेघवृष्टीने करावा उपदेश परि गुरुने न करावा शिष्य । वाटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावे अन्नछत्री । भूती द्यावे सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र । उत्तमयाती पोसना ॥धृपद॥
बीज न पेरावे खडकी । ओल नाही ज्याचे बुडखी । थीता ठके सेखी । पाठी लागे दिवाण ॥२॥
गुज बोलावे संतांशी । पत्नी राखावी जैसी दासी । लाड देता तियेसी वाटा पावे कर्माचा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२०६
📿 देवासी तो आवडे भक्त
2206.
देवासी तो आवडे भक्त । नाही हेतु दूसरा ॥१॥
बळी सर्वस्व करी दान । त्याचे द्वारपाळपण केले त्वा ॥२॥
धर्म सदा होय उदास । त्याचे घरी तुझा वास ॥३॥
तुझा भक्त अंबऋषी । त्याचे गर्भवास सोशिसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२०७
📿 नावडावे जन नावडावा म
2207.
नावडावे जन नावडावा मान । करूनि प्रमाण तू चि होई ॥१॥
सोडवूनि देहसंबंध वेसने । ऐसी नारायणे कृपा कीजे ॥धृपद॥
नावडावे रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायापाशी ॥२॥
तुका म्हणे आता आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२०७
📿 शुद्ध करूनियां मन ।
2207.
शुद्ध करूनियां मन । नारायण चिंतावा ॥१॥
मग उणें नाही काही । प्रत्यक्ष पाही अनुभव ॥२॥
आठवितां उपमन्यु बाळ । दिला क्षीरसागर सुढाळ ॥३॥
ध्रुवें चिंतिलें चरणा । अधळपदीं स्थापिले जाणा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २२०८
📿 ऐसे कांही एक अपूर्व
2208.
ऐसे कांही एक अपूर्व देखिले । ह्रदयी कोंदाटले मूर्तिरूप ॥१॥
परी ते कांही तैसे न राहे निश्चळ । चित्त ते चंचळ मावारले ॥२॥
पुढती सायास करी नानापरी । न राहे अंतरी साचोकारे ॥३॥
आवडीने जीव झाला कासावीस । तंव त्या परेशास कृपा आली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२०९
📿 माहार मातेची पणी भरे
2209.
माहार मातेची पणी भरे । न कळे खरे पुढील ॥१॥
वोंगळ अधमाचे गुण । जाता घडी न लगे चि ॥धृपद॥
श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येता उत्तर ॥२॥
तुका म्हणे गुमान का । सांगो लोका अधमासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२०९
📿 देव धांवे मागे न करी
2209.
देव धांवे मागे न करी आळस । सांडितां भवपाश मायाजाळ ॥१॥
सर्वभावे जे का शरण रिघती । तयांचें वोझे श्रीपती अंगें वाहे ॥२॥
नको भुक्तिमुक्ति सदा नामी हेत । देव तो अंकित होय त्यांचा ॥३॥
एकाजनार्दनी ऐसा ज्यांचा भाव । तया घरी देव पाणी वाहे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २२१०
📿 आश्वासोनी देव बोलिले
2210.
आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसे करू ॥१॥
सहज सत्येने ऐसे कांही जहाले । अढळ दिधले बैसावया ॥२॥
चंद्र सूर्य तारा शशि ऋषी भोर । हे ज्या आधारे हिंडताती ॥३॥
ब्रम्हलोक साचे परी ते न नासे । ऐशा परी त्यास बैसविले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२१०
📿 देवासी आवडे भक्तसमाग
2210.
देवासी आवडे भक्तसमागम । त्यांचे सर्व काम करी अंगें ॥१॥
भक्ताकाजालागी अवतार धरी । नांदे भक्तांघरीं स्वये देव ॥२॥
भक्तांविण देवा कांहींचि नावडे । भक्त तो आवडे सर्वकाळ ॥३॥
एका जनार्दनी भक्तांचा अंकित । देव सदोदित स्वये होत ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 धृवचरित्र›
📿 अभंग क्र. २२११
📿 ऐसे झाले पूर्ण ध्रुव
2211.
ऐसे झाले पूर्ण ध्रुवाचे आख्यान । ऐकती जर जन एका भावे ॥१॥
तयावरी कृपा देवाची होईल । केले ते लाभेल सर्व काज ॥२॥
पुत्राभिष्ट पुत्र धनाभिष्ट श्वन । जैसे ज्याचे मन तैसे होय ॥३॥
नामा म्हणे तया कल्याण सर्वदा । चिंतिता गोविंदा काम पुरे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२११
📿 नातुडे जो योगी ध्यान
2211.
नातुडे जो योगी ध्याना । तो समचरण पंढरीये ॥१॥
भोळा सुलभ भाविकासी । दर्शने सर्वांसी सारखा ॥२॥
अभेदाच्या न धांवे मागे । भाविकां लागे पाठोपाठी ॥३॥
शुद्ध देखतांचि भाव । एका जनार्दनी उभा देव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२१३
📿 आता न म्हणे मी माझे
2213.
आता न म्हणे मी माझे । नेघे भार काही ओझे ॥१॥
तू चि तारिता मारिता । कळो आलासी निरुता ॥धृपद॥
अवघा तू चि जनार्दन । संत बोलती वचन ॥२॥
तुका म्हणे काही । माझे तिळभरी नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२१३
📿 दयाळु उदार पंढरीराव
2213.
दयाळु उदार पंढरीराव । भाकितां कवि पुरवी इच्छा ॥१॥
ऐसा याचा अनुभव । आहे ठाव मागोनियां ॥२॥
जे जे होती शरणागत । पुरवी आर्त तयाचे ॥३॥
उपमन्यु ध्रुव बाळ । दिधले अढळपद त्यांते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२१४
📿 समुद्रवळयांकित पृथ्व
2214.
समुद्रवळयांकित पृथ्वीचे दान । करिता समान न ये नामा ॥१॥
म्हणऊनि कोणी न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥धृपद॥
सकळ ही शास्त्रे पठण करता वेद । सरी नये गोविंदनाम एके ॥२॥
सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी । करिता नामाशी तुळेति ना ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२१५
📿 ऐसा तो ब्राह्मण दरिद
2215.
ऐसा तो ब्राह्मण दरिद्रे पीडिला । सदा स्वरूपी झाला अखंडीत ॥१॥
न करीच खंती कांही तो अंतरी । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥२॥
नाही धड घर केवळ जर्जर । चंद्र प्रभाकर उगवती ॥३॥
बाळे पांच सात बाहाती झोंबती । भुके तळमळिती सर्वकाळ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२१६
📿 आह्मी नामाचे धारक ने
2216.
आह्मी नामाचे धारक नेणो प्रकार आणीक । सर्व भावे एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥
न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे । प्रेमसुख घ्यावे वैष्णवांचे संगती ॥धृपद॥
भावबळे घालू कास लज्जा चिंता दवडू आस । पायी निजध्यास म्हणो दास विष्णूचे ॥२॥
भय नाही जन्म घेता मोक्षसुखा हाणो लाता । तुका म्हणे सत्ता धरू निकट सेवेची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२१६
📿 देखावया भक्तपण । रूप
2216.
देखावया भक्तपण । रूप धरिले सगुण ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । वेदा अनुमाना नये तो ॥२॥
भाविकांचें पाठीमागें । धावें लागे लवलाही ॥३॥
खाये तुळशीपत्र पान । न म्हणे सान थोडे ते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२१७
📿 आम्ही हरीचे सवंगडे ज
2217.
आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायीचे वेडे बागडे । हाती धरुनी कडे पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही । नाही जालो कही । एका एक वेगळे ॥धृपद॥
निद्रा करिता होतो पायी । सवे चि लंका घेतली तई । वान्नरे गोवळ गाई । सवे चारित फिरतसो ॥२॥
आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण । तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंबो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२१७
📿 एके दिनी भार्या भावे
2217.
एके दिनी भार्या भावे ते मानवी । भ्रतारा विनवी नम्रतेने ॥१॥
तुमचा सोइरा आहे नारायण । अखंडित ध्यान करिता त्याचे ॥२॥
तयाचिये भेटी जावे लवकरी । तो आहे कैबारी दीनालागी ॥३॥
भेटतांचि नासे अज्ञान दरिद्र । सुखाच समुद्र पांडुरंग ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२१७
📿 दहा अवतार घेत भक्ताच
2217.
दहा अवतार घेत भक्ताचियां काजा । तो हा विटेवरी राजा पंढरीचा ॥१॥
भक्तांचे उणें न पाहे आपण । उच्छिष्ट काढी धर्माघरीं न लाजे जाण ॥२॥
अर्जुनाची घोडीं रणांगणी धुतली । भक्ति नये उणें कृपेची माउली ॥३॥
एका जनार्दनी भक्तांचीया काजा । विटाएवरी उभा राहिला सहजा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२१८
📿 ऐकता वचन मानेले तयास
2218.
ऐकता वचन मानेले तयासी । पुढे कल्पनेसी ठाव नाही ॥१॥
तेथे म्या मागावे हे कांही न कळे । निवतील डोळे दर्शनाने ॥२॥
परी तया भेटी न्यावे कांहींबाही । परंतु ते नाही लेश घरी ॥३॥
नामा म्हणे द्विज वांच्छी दरुषण । रिकाम्या हाताने जाता लाजे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२१९
📿 अमर तू खरा । नव्हे क
2219.
अमर तू खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥
चाल जाऊ संतांपुढे । वाद सांगेन निवाडे ॥धृपद॥
तुज नांव जरी नाही । तरी माझे दाव काई ॥२॥
तुज रूप जरी नाही । तरी माझे दाव काई ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२१९
📿 जाणबला भाव तया सुंदर
2219.
जाणबला भाव तया सुंदरीसी । म्हणते पतीसी नम्रतेने ॥१॥
जावे आता तुम्ही देवाचे भेटीसी । उठली वेगेंसी सन्मानाने ॥२॥
आणिते मागुनी भक्तीचे भातुके । जेणे यदुनायक तोष पावे ॥३॥
नामा म्हणे घरी पदार्थ तो नाही । प्रेमच तो पाही उगवला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२१९
📿 एका घरी चोरी लोणी ।
2219.
एका घरी चोरी लोणी । एक घरी वाहे पाणी ॥१॥
एका घरी बांधिला राहे । एका घरी चिमणा होय ॥२॥
एका घरी ब्रह्माचारी । एका घरी भोगी नारी ॥३॥
एका घरी सुखें नाचे । एका घरी प्रेम त्याचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२२०
📿 मंत्र चळ पिसे लागते
2220.
मंत्र चळ पिसे लागते सत्वर । अबद्ध ते फार तरले नामे ॥१॥
आशौच तो बाधी आणिका अक्षरा । नाम निदसुरा घेता तरे ॥धृपद॥
रागज्ञानघात चुकता होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक ॥२॥
आणिका भजना बोलिला निषेध । नाम ते अभेद सकळा मुखी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२२०
📿 पाहे चहूंकडे धुंडोनि
2220.
पाहे चहूंकडे धुंडोनि सुंदरी । देखे मुष्टी चारी तंदुळिका ॥१॥
तोचि शुद्धभाव उगवला पुढे । सर्वही ते कोडे देवालागी ॥२॥
अह सोह वृत्ति तेथे एक झाली । द्दष्टीने देखिली पोह्यांकडे ॥३॥
नामा म्हणे सर्वरूपी नारायण । बोलाया कारण नाही तेथे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२२०
📿 एका घरी द्वारपाळ । ए
2220.
एका घरी द्वारपाळ । एक घरी होय बाळ ॥१॥
एका घरी करी चोरी । एका घरे होय भिकारी ॥२॥
एका घरी युद्ध करी । एका घरी पूजा बरी ॥३॥
एका घरी खाय फळे । एका घरी लोणी बळे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२२१
📿 नव्हती ते संत करिता
2221.
नव्हती ते संत करिता कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथे नाही वेश सरत आडनावे । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥धृपद॥
नव्हती ते संत धरिता भोंपळा । करिता वाकळा प्रवार्णाशी ॥२॥
नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२२१
📿 तेचि भक्तिभावे पतीपु
2221.
तेचि भक्तिभावे पतीपुढे ठेवी । पाहोनी गौरवी ब्रम्हनिष्ठा ॥१॥
तया योग्य नव्हेचि गे हा पदार्थ । आमुचिया आर्त तुळसीदळ ॥२॥
द्रौपदीच्यासाठी भाजीपान खाये । तेणे त्याची काय भूक गेली ॥३॥
नामा म्हणे हे तो कोड कौतुक । थोडेंहि अधिक देव करी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२२३
📿 भाग्यवंता हे परवडी ।
2223.
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥
आपुलाला लाहो भावे । जे ज्या व्हावे ते आहे ॥धृपद॥
इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥
तुका म्हणे आल्या थोऱ्या । वस्तु बऱ्या मोलाच्या ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२२३
📿 वाचे नाम गात चालिला
2223.
वाचे नाम गात चालिला तो द्विज । एकाचे ते चोज शुद्ध भावे ॥१॥
जीवशिव एकाकार झाली वृत्ति । नाही कांही चित्ती शमदम ॥२॥
हात पाय नळ्या वळती फेंगडया । भावार्थाच्या गुडया उभारीत ॥३॥
नामा म्हणे वाट चालता समाधि । सोह स्वरूपी बुद्धि ठसावली ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२२४
📿 शुभसूचचिन्हे होताती
2224.
शुभसूचचिन्हे होताती शकुन । तेणे तो ब्राह्मण आनंदला ॥१॥
म्हणे थोर लाभ आजिचा दिसतो । आनंद वाटतो मनामाजी ॥२॥
उडती उजवे काग ते जोडयाने । भरल्या कुंभाने नारी देखे ॥३॥
तास भारद्वाज वामभागी जाती । मयूर नाचती उत्साहाने ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२२५
📿 अधीरा माझ्या मना ऐक
2225.
अधीरा माझ्या मना ऐक एक मात । तू का रे दुश्चित निरंतर ॥१॥
हे चि चिंता काय खावे म्हणऊनि । भले तुजहूनि पक्षीराज ॥धृपद॥
पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥२॥
सकळयातींमध्ये ठक हा सोनार । त्याघरी व्यापार झारियाचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२२५
📿 द्विज म्हणे जाता मनी
2225.
द्विज म्हणे जाता मनी । कैसा भेटे चक्रपाणी ॥१॥
काय होईल न कळे । म्हणोनि ह्रदयी कळवळे ॥२॥
येवढा ज्याचा राज्यभार । मी तो केवळ फकीर ॥३॥
कोठे तयाला आठव । बाळपणींचे माझे नांव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२२५
📿 अवरोध विरोध करिता हर
2225.
अवरोध विरोध करिता हरिभक्ति । सायुज्यता मुक्ति देणे तया ॥१॥
ऐसा कृपाळू लक्ष्मीच्या पती । पुराणे वर्णिती महिमा ज्याचा ॥२॥
विष पाजु आली पुतना राक्षसी । अक्षयपदासी दिले तिसी ॥३॥
अगबग केशी असुर वधिले । सायुज्यता दिले पद त्यासी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२२६
📿 का रे नाठविसी कृपाळु
2226.
का रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥
बाळा दुधा कोण करिते उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवे दोन्ही ॥धृपद॥
फुटती तरुवर उष्णकाळमासी । जीवन तयांसी कोण घाली ॥२॥
तेणे तुझी काय नाही केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२२७
📿 उदारा कृपाळा पतितपाव
2227.
उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदे नारायणा साच तुझी ॥१॥
वर्णिलासी जैसा जाणता नेणता । तैसा तू अनंता साच होसी ॥धृपद॥
दैत्या काळ भक्त मेघश्याममूर्ती । चतुर्भुज हाती शंख चक्र ॥२॥
काम इच्छा तया तैसा होसी राणी । यशोदेच्या स्तनी पान करी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२२८
📿 करूनी चिंतन खेळो भोव
2228.
करूनी चिंतन खेळो भोवताले । चित्त येथे आले पायापाशी ॥१॥
येथे नाही खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥धृपद॥
सुखदुःखे तुज देऊनी सकळ । नाही ऐसा काळ केला आम्ही ॥२॥
तुका म्हणे जाला देहाचा विसर । नाही आता पर आप दोन्ही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२२९
📿 परिसाचे अंगे सोने जा
2229.
परिसाचे अंगे सोने जाला विळा । वाकणे या कळा हीन नेव्हे ॥१॥
अंतरी पालट घडला कारण । मग समाधान ते चि गोड ॥धृपद॥
पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग ॥२॥
तुका म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाके ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२२९
📿 नारायण नाम तारक सर्व
2229.
नारायण नाम तारक सर्वांसी । ते मुनी मानसी धरिले असे ॥१॥
कापुराची राशी अग्नीचाहो कण । तैसे नाम जाण पातकासी ॥२॥
अंतरी ते क्षुधा लागली द्विजासी । पाहीन नगरीसी सावचीत ॥३॥
नामा म्हणे द्विज उभा महाद्वारी । केवळ भिकारी राजयोगी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४›
📿 अभंग क्र. २२२९
📿 भक्तासी संकट पडता ।
2229.
भक्तासी संकट पडता । धांवे देव तत्त्वता लवलाहे ॥१॥
ऐसा अनुभव आहे । देव लवलाहे धांवत ॥२॥
द्रौपदी पडता संकटीं । धांवे उठाउठी देव तेव्हा ॥३॥
पडता संकट प्रल्हादासी । कोरडे काष्ठेंसी देव जाहला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२३०
📿 पाहे तिकडे दिशा ओस ।
2230.
पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायापे ॥१॥
मनिचे साच होईल कई । प्रमे देई भेटोनि ॥धृ॥
सर्वापरि पागुळ असे । न कळे कैसे ते तुम्हा ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । तू तो दाता दीनाचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 सुदामचरित्र›
📿 अभंग क्र. २२३०
📿 नाही देवाचिये द्वारी
2230.
नाही देवाचिये द्वारी आडकाठी । हे तो आहे गोष्टी सिद्धांताची ॥१॥
भावाविरहित मार्गची न फुटे । फुटल्या न सुटे मागुता तो ॥२॥
नामा म्हणे ऐसा लौकिक वेव्हार । तेथे तो निर्धार कांही नाही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२३१
📿 चाळवणे काय । ऐसे अगे
2231.
चाळवणे काय । ऐसे अगे माझे माय ॥१॥
धाव पाव लवलाहे । कंठी प्राण वाट पाहे ॥धृपद॥
पसरूनि कर । तुज चालिलो समोर ॥२॥
देसील विसावा । तुका म्हणे ऐशा हावा ॥३॥