🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १०७
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १०७
📿 रसज्ञ रसाचार रसामाजी
107.
रसज्ञ रसाचार रसामाजी वसे । जीवन हे सोसे असोस होय ॥१॥
ते रूप स्वरूपाचे रूपीच वोळले । कंदर्पे घोळिले नंदाघरी ॥२॥
नाही त्या आकार अवघाची वैकुंठ । अद्वैत घनदाट ब्रह्ममय ॥३॥
निवृत्ति नितंब कृष्ण तो स्वयंभ । श्रीमूर्तीचे बिंब दिसे सर्व ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १०८
📿 चोखामेळा अनामिक । भक
108.
चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥1॥
परब्रह्म त्याचे घरी । न सांगता काम करी ॥2॥
रोहिदास तो चांभार । पाहे मोमिन कबीर ॥3॥
नेमी जबी बीच दासी । रंगी वेढी नांगर पिशी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १०८
📿 कवणावरी आता देऊ हे द
108.
कवणावरी आता देऊ हे दूषण । माझे मज भूषण गोड लागे ॥१॥
गुंतलासे मीन विषयाचे गळी । तैसा तळमळी जीव माझा ॥२॥
गुंतला हरिण जळाचिया आशा । तो गळांपडे फांसा काळपाश ॥३॥
वारिता वारेना सारिता सारेना । किती सा उगाणा करू आता ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १०८
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 ब्रह्मदेव गर्व परिहार›
📿 अभंग क्र. १०८
📿 कृष्णभक्तीविण तरला आ
108.
कृष्णभक्तीविण तरला आहे कोण । द्यावा निवडून एक तरी ॥१॥
कार्य आणि कारण लटका हा शीण । वर्म न कळोन वांया गेले ॥२॥
नामा ह्मणे माझी खेचर माउली । कृपेने दाविली वाट मज ॥३॥
109.
घेई घेई माझे वाचे । गाडे नाम विठोबाचे ॥१॥
तुम्ही घ्यारे डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥३॥
मना तेथे धांव घेई । राहे विठोबाचे पायी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मदालसा अभंग›
📿 अभंग क्र. १०९
📿 उपदेश मदालसा देहो नि
109.
उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा । आलासी कवण्या वाटा मातेचिया गर्भवासा ।
जो पंथ वोखटा रे पचलासी कर्मकोठा । अविचार बुद्धि तुझी पुत्र राया अदटा ॥१॥
पये दे मदालसा सोहं जो जो रे बाळा । निजध्यानी निज पा रे लक्ष लागो दे डोळा ।
निज ते तू विसरलासी होसी वरपडा काळा ॥२॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १०९
📿 देव तारक तारक । देव
109.
देव तारक तारक । देव दुष्टांसी मारक ॥1॥
गीतेमध्ये आदि अंत । ऐसे बोले तो भगवंत ॥2॥
शत्रुलागी आधी मारी । भक्तसंकटी रक्षी हरी ॥3॥
जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन अंतरी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १०९
📿 क शासाठी तुम्हा शरण
109.
क शासाठी तुम्हा शरण रिघावे । आमुचे वारावे सुख दु:ख ॥१॥
आमुचे संचित भोग क्रियमाण । तुमचे कारण तुम्ही जाणा ॥२॥
आमुचा तो येथे खुंटलासे लाग । न दिसे मारग मोक ळाचि ॥३॥
चोखा म्हणे काय करू आता । तुमचि हे सत्ता अनावर ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १०९
📿 हे री मै तो प्रेम दि
109.
हे री मै तो प्रेम दिवानी, मेरो दरद न जाणै कोय ।
सूली ऊपर सेज हमारी सोवण किस विध होय ।
गगन मंडल पर सेज पिया की किस विध मिलणा होय ।
घायलकी गत घायल जाणै जो कोई घायल होय ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १०९
📿 ही तव निर्लज्ज निष्ठ
109.
ही तव निर्लज्ज निष्ठुर । यासी नाही आरपार ॥
याची संगती धरुन काये । आपण जैसे करीत आहे ॥
जैसा संगीताचा गुण । याने व्यापिले त्रिभुवन ॥
बोधला म्हणे न साहे दुजियाचा वारा । धरी संतांचा आसरा ॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १०९
📿 व्याप्तरूपे थोर व्या
109.
व्याप्तरूपे थोर व्यापक अरूप । दुसरे स्वरूप नाही जेथे ॥१॥
ते अव्यक्त साबडे कृष्णाचे रुपडे । गोपाळ बागडे तन्मयता ॥२॥
उन्मनि माजिटे भोगिती ते मुनी । मूर्तिची पर्वणी हृदयी वसे ॥३॥
निवृत्ति कारण कृष्ण हा परिपूर्ण । यशोदा पूर्णघन वोळलासे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मदालसा अभंग›
📿 अभंग क्र. ११०
📿 श्रीगुरु देवराया प्र
110.
श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा । अनादि मूळ तूंचि विश्वव्यापक बीजा ।
समाधि घेई पुत्रा स्वानंदाचिया भोजा । पालखी पहुडलिया नाशिंवत रे माया ॥१॥
जाग रे पुत्रराय जाई श्रीगुरुशरण । देह तू व्यापिलासी चुकवी जन्ममरण ।
गर्भवासु वोखटा रे तेथे दु:ख दारुण । सावध होई का रे गुरुपुत्र तू सुजाण ॥२॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ११०
📿 कळेल तैसे बोल तुजचि
110.
कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांही ॥१॥
काय करू देवा दाटलो जाचणी । न या चक्र पाणी सोडवण्या ॥२॥
कोठवरी धांवा पोकारू केशवा । माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥
चोखा म्हणे आतांपुरे चाळवण । आमुचे कारण जाणो आम्ही ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ११०
📿 आद्यरूपसार जेथुनि ऊँ
110.
आद्यरूपसार जेथुनि ऊँकार । तो प्रणव साचार हारपला ॥१॥
ते रूप समर्थ रामकृष्णनाथ । गोपिका कृतार्थ नाम घेता ॥२॥
ब्रम्हांड घडले अनंत घटमठ । आपोआप धीट मुनिजना ॥३॥
निवृत्तीचे सार सर्व हा परिकर । कृष्णचि साकार बिंबिलेसे ॥४॥
111
दहीहंडी असल्यास हा अभंग म्हणावा
शेवटच्या चरणामध्ये टोका नावाचा शब्द आहे,
जेव्हा शेवटचे चरण म्हटले जाईल, तेव्हा मृदंगाच्या हातोडीने दहीहंडी फोडावी.
दहीहंडी कोणी फोडावी?.
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १११
📿 भूत झाले ऋषि पोटी ।
111.
भूत झाले ऋषि पोटी । लावियेले मृगापाठी ॥1॥
विश्वामित्रा घाला घाली । पोटी शकुंतला आली ॥2॥
भगांकित केला । इंद्र भूताने झडपिला ॥3॥
तेचि झाले हे भारत । म्हणे जनी केली मात ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नाममाला > अभंग ११० ते १५५›
📿 अभंग क्र. १११
📿 सकळ मंगळनिधी । श्री
111.
सकळ मंगळनिधी । श्री विठ्ठलाचे नाम आधी ॥
म्हण का रे म्हण का रे जना । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥
पतीत पावन साचे । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥
बापरखुमादेविवरू साचे । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १११
📿 काम क्रोध लोभ सुने ल
111.
काम क्रोध लोभ सुने लागलेसे पाठी । पाडिलासे तुटी परमाथीर् ॥१॥
गोडाचे गोड ते झाले क डू । मुळींचे जे क डू ते झाले गोडु ।
ऐसा हा अनुभव आपुल्याच देही ॥३॥
पाहता पाहणे गेले ठायीच्या ठायी । चोखा म्हणे ऐसा नवलाव गोष्टी ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 ब्रह्मदेव गर्व परिहार›
📿 अभंग क्र. १११
📿 काय देशील यांजला । ब
111.
काय देशील यांजला । ब्रह्मा म्हणे न कळे मला ॥१॥
म्हणसी देईन मी मुक्ति । तरी ऐक रमापति ॥२॥
मारायासी आले । त्यांसी स्वरूपी मिळविले ॥३॥
येथोनिया नवजासी । मज कळले मानसी ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १११
📿 कारण परिसणा कामधाम न
111.
कारण परिसणा कामधाम नेम । सर्वआत्माराम नेमियेला ॥१॥
ते रूप सुंदर सर्वागोचर । कृष्ण परिकर गोपवेषे ॥२॥
वेदादिक कंद ऊँकार उद्बोध । साकार प्रसिद्ध सर्वाघटी ॥३॥
निवृत्ति म्हणे धाम कृष्ण हा परम । सौख्यरूपे सम वर्ततसे ॥४॥
112.
सदा नाम घोष करु हरिकथा । तेणे सदा चित्ता समाधान ॥१॥
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार । आनंदे निर्भर डुलतसो ॥२॥
असो ऐसा कोठे आठवचि नाही । देहींच विदेही भोगु दशा ॥३॥
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरुप । लागो नेदू पापपुण्य अंगा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत नामदेव महाराज गौळणी›
📿 अभंग क्र. ११२
📿 यशोदे घराकडे चाल मला
112.
यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल ॥धृ॥
साध्या गव्हांची पोळी लाटी । मला पुरण पोळी करून दे मोठी ।
नाही अडवीत गुळासाठी । मला जेवू घाल ॥१॥
तूप लावून भाकर करी । वांगे भाजून भरीत करी ।
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ११२
📿 .
112..
दोहीकडे दोही जाया । मध्ये गोरोबाची शय्या ॥1॥
गोरा निद्रिस्थ असता । कपट करिती त्याच्या कांता ॥2॥
गोरोबाचे दोन्ही हात । आपुल्या ह्रुदयावरी ठेवित ॥3॥
जागा झाला गोरा भक्त । जनी म्हणे त्या निद्रित ॥4॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ११२
📿 जेथे रूप रेखा नाही ग
112.
जेथे रूप रेखा नाही गुण देखा । चिदाकाश एका आपतत्व ॥१॥
ते रूप गोजिरे कृष्ण रूपे सांग । यशोदेचा पांग हरियेला ॥२॥
जेथे रजतम नाही ते निःसीम । अपशम दम पूर्णघन ॥३॥
निवृत्ति सार पा ब्रह्मसुख घन । सर्व जनार्दन गोपवेषे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 कालिया मर्दन›
📿 अभंग क्र. ११३
📿 कालिया मर्दना
113.
कालिया मर्दना
कालिंदीचे डोही काळियाची वस्ती । ऐक परीक्षिती चरित्र हे ॥१॥
पक्षीश्वापदांनी सोडियेले स्थळा । निघताती ज्वाळा तया डोही ॥२॥
विषाचियायोगे झाडे जळताती । जीवन न घेती कोणी त्याचे ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ११४
📿 काय मानू आता निश्चिं
114.
काय मानू आता निश्चिंति देहासी । हा तो काळामुखी जाईल की ॥१॥
वाउगा वाढलो वाउगा पोसलो । वाउगाचि झालो हाव भरी ॥२॥
न घडेचि कांही संतांचे पूजन । नोहे सेवा जाण करू त्यांची ॥३॥
याति हीन देह करी कळकळ । लागली तळमळ कैसे करू ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ३›
📿 अभंग क्र. ११४
📿 राग पहाड़ी
114.
राग पहाड़ी
सीसोद्यो रूठ्यो तो म्हांरो कांई कर लेसी ।
म्हे तो गुण गोविन्द का गास्या हो माई॥
राणोजी रूठ्यो वांरो देस रखासी,हरि रूठ्या किठे जास्या हो माई॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. ११४
📿 देखत राम हंसे सुदामा
114.
देखत राम हंसे सुदामाकू देखत राम हंसे॥
फाटी तो फूलडिया पांव उभाणे चरण घसे ।
बालपणेका मिंत सुदामा अब क्यू दूर बसे॥
कहा भावजने भेंट पठाई तांदुल तीन पसे ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 कालिया मर्दन›
📿 अभंग क्र. ११४
📿 जगजेठी तेव्हा क्रोधा
114.
जगजेठी तेव्हा क्रोधावला चित्ती । करीन मी शांति तुझी आता ॥१॥
माझिया लेंकरा दिधलासे त्रास । करीन मी नाश आता तुझा ॥२॥
त्रैलोक्यांत कोण ऐसा हो समर्थ । माझे शरणा-गत मारील जो ॥३॥
माझिया भक्ता कोण गांजी निर्दय । करीन प्रळय त्याजवरी ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ११४
📿 विश्वाचा चाळक सूत्रध
114.
विश्वाचा चाळक सूत्रधारी एक । विज्ञान व्यापक ज्ञानगम्य ॥१॥
ते रूप साजिरे कृष्ण घनःश्याम । योगिया परम रूप ज्याचे ॥२॥
शिवशिवोत्तम नाम आत्माराम । जनवनसम गोपवेषे ॥३॥
निवृत्ति चाळक सर्वत्र व्यापक । आपरूपे एक सर्वत्र असे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत नामदेव महाराज गौळणी›
📿 अभंग क्र. ११५
📿 रात्र काळी घागर काळी
115.
रात्र काळी घागर काळी । यमुनाजळे ही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवार काळी । गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी । कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥
एकली पाणीया नवजाय साजणी । सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ११५
📿 काय हे दु:ख किती ह्य
115.
काय हे दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनिया ॥१॥
जन्मावे मरावे हेचि भरोवरी । चोऱ्यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥
तुम्हांसी करूणा न ये माझी देवा । चुकवा हो गोवा संसाराचा ॥३॥
चोखा म्हणे माझा निवारावा शीण । म्हणोनी लोटांगण घाली जीवे ॥४॥