🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १२९०
📿 नामपाठ जागीं सोपे ते
1290.
नामपाठ जागीं सोपे ते साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥
आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावे ॥२॥
जनार्दनाचा एक भुलला नामपाठी । म्हणोनि वैकुंठी घर केले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२९१
📿 नव्हे मी स्वतंत्र अं
1291.
नव्हे मी स्वतंत्र अंगाचा पाईक । जे हे सकिळक सत्ता वारू ॥१॥
तुम्हा आळवावे पाउला पाउली । कृपेची साउली करी मज ॥धृपद॥
शक्तीहीन तरी जालो शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनिया ॥२॥
तुका म्हणे भवाभेणे धरिले पाय । आणीक उपाय नेणे काही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२९२
📿 पाहो ग्रंथ तरी आयुष्
1292.
पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती । नाही ऐशी मतिअर्थ : कळे ॥१॥
होईल ते हो या विठोबाच्या नावे । अर्जिले भावे जीवी धरू ॥धृपद॥
एखादा अंगासी येईल प्रकार । विचारिता फार युक्ती वाढे ॥२॥
तुका म्हणे आळी करिता गोमटी । मायबापा पोटी येते दया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२९२
📿 ज्याचे देव त्या सांग
1292.
ज्याचे देव त्या सांगाते मला नवल वाटते ॥१॥
एक बैसती अश्वावरी| एक चालती चरणचाली ॥२॥
एक जेविती मिष्टान्न एका न मिळे कोरान्न ॥३॥
गोणाई म्हणे धन्य देवा | नामयाचा संचित ठेवा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १२९२
📿 नामपाठ करिता काळ वेळ
1292.
नामपाठ करिता काळ वेळ नाही । उच्चारुनी पाही सर्वकाळ ॥१॥
सर्वभावे नामपाठ तू गाये । आणिक न करी काय साधन ते ॥२॥
जनार्दनाचा एक भुलता नामपाठीं । आणिक न करी गोष्टी नामविण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२९३
📿 पाहाता रूप डोळा भरे
1293.
पाहाता रूप डोळा भरे । अंतर नुरे वेगळे । इच्छावशे खेळ मांडी । अवघे सांडी बाहेरी ॥१॥
तो हा नंदनंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥धृपद॥
दिसतो हा नोहे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खेळासाठी । होता भेटी परतेना ॥२॥
म्हणोनि उभी ठाकलीये । परतलीये या वाटा । आड करोनिया तुका । जो या लोका दाखवितो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२९३
📿 सोये सांडिली सर्वांच
1293.
सोये सांडिली सर्वांची | जोडी केली विठोबाची ॥१॥
मायबापासी टाकिले | ध्यान देवाचे लागले ॥२॥
स्त्री पुत्र बंधु बहिणी | केली सर्वांची सांडणी ॥३॥
गणगोत इष्टमित्र | सर्व जोडिले विठ्ठलपात्र ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १२९३
📿 नामपाठ सोपा भोळ्या भ
1293.
नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मत वादीयांसी न रुचे नाम ॥१॥
नवज्वरिता दुग्ध प्राण जाय तत्त्वता । अभाविकांसी सर्वथा गति तेंची ॥२॥
जनार्दनाचा एक सांगे प्रेमभावे । आदरे ते गावें नामपाठ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२९४
📿 इंद्रियांची दिने । आ
1294.
इंद्रियांची दिने । आम्ही केलो नारायणे ॥१॥
म्हणऊनि ऐसे सोसी । काय सांगो कोणांपाशी ॥धृपद॥
नाही अंगी बळ । त्याग करीजेसा सकळ ॥२॥
तुका म्हणे मोटे । प्रारब्ध हे होते खोटे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १२९४
📿 गाय नामपाठ न करी आळस
1294.
गाय नामपाठ न करी आळस । हाता येईल सौरस इच्छिले ते ॥१॥
न करी आळस आलिया संसारी । नामपाठ निरंतरी गाय सदा ॥२॥
जनार्दनाचा एक प्रेमे विनटला । नामपाठे झाला कृतकृत्य ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२९५
📿 हाती धरू जावे । तेणे
1295.
हाती धरू जावे । तेणे परते चि व्हावे ॥१॥
ऐसा का हो आला वाटा । हीन भाग्याचा करंटा ॥धृपद॥
देव ना संसार । दोही ठायी नाही थार ॥२॥
तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री विठ्ठल आणि मातृदेवता विषयी नामदेवास केलेला बोध›
📿 अभंग क्र. १२९६
📿 मग पंढरीनाथ म्हणे ना
1296.
मग पंढरीनाथ म्हणे नामयासी | तू जाई गोणाईसी घेऊनिया ॥१॥
अतिशय को इणे मांडिलासे फार | मातेसि निष्ठुर होऊ नये ॥२॥
स्तनपान देऊनि मोहे पाळिलासी अंतर तियेसी देऊ नये ॥३॥
नामा म्हणे शरण आलो जिच्या भेणे | तिचे हाती देणे उचित नव्हे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १२९६
📿 नामपाठे होय शुद्ध ते
1296.
नामपाठे होय शुद्ध ते शरीर । आणिक विचार न करी कांही ॥१॥
नामपाठ भोळे नामपाठ भोळे । शंकर तो लोळे स्मशानी तो ॥२॥
जनार्दनाचा एका प्रचीत घेउनी । नामपाठ वचनी जपतसे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री विठ्ठल आणि मातृदेवता विषयी नामदेवास केलेला बोध›
📿 अभंग क्र. १२९७
📿 देव जाला नामा नामा ज
1297.
देव जाला नामा नामा जाला देव | गोणाईचा भाव पाहावया ॥१॥
हा घे तुझा नामा काय चाड आम्हा | आनंदाचा प्रेमा गोणाईसी ॥२॥
हाती धरोनिया घेऊनी चालिली फिरूनी पाहती जाली तंव तो देव ॥३॥
अगा माझ्या बापा तू कोणा हवासी मज दुर्बळासी काय होय ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १२९७
📿 नामपाठ जपे भोळा महाद
1297.
नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥
विष ते अमृत नामपाठे झाले । दैन्य दुःख गेले नाम जपतां ॥२॥
जनार्दनाचा एका उभारुनि बाह्या । नामपाठ गाय सर्वकाळ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२९८
📿 द्या जी माझा विचारोन
1298.
द्या जी माझा विचारोनिया विभाग । न खंडे हा लाग आहाचपणे ॥१॥
किती नेणो तुम्हा साहाते कटकट । आम्ही च वाईट निवडलो ते ॥धृपद॥
करविता कलह जिवाचिये साठी । हे तुम्हा वोखटी ढाळ देवा ॥२॥
तुका म्हणे धीर कारण आपुला । तुह्मी तो विठ्ठला मायातीत ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री विठ्ठल आणि मातृदेवता विषयी नामदेवास केलेला बोध›
📿 अभंग क्र. १२९८
📿 माझा नामा मज देई | ज
1298.
माझा नामा मज देई | जीव देईन तुझे पायी ॥१॥
पुंडलिका भुलविले | तैसे माझे बाळ केले ॥२॥
ते गा न चले मजपासी दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुज संगती जे लागले | ते त्वा जितेंचि मारिले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १२९८
📿 शास्त्रवेत्ते ज्ञानी
1298.
शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणे तया विश्रांती सर्वकाळ ॥१॥
पुराणे वदती नाम पाठ कीर्ती । व्यासादिकीं निश्चिती नेम केला ॥२॥
जनार्दनाचा एका सांगतसे गुज । नामपाठ निज जपे जना ॥३॥
नामापाठफल प्राप्त झालेले भक्त
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 बाजारहाट›
📿 अभंग क्र. १३००
📿 शिवणे टिपणे करोनि आप
1300.
शिवणे टिपणे करोनि आपुले | नित्य चालवणे संसारिक ॥१॥
गणगोतांमाजी बरे केले नांव माझे सत्त्व सर्व बुडविले ॥२॥
कवणे गुणे तुज पडिली वा भुली | सुख या विठ्ठली देखिले काय ॥३॥
तू भक्त निघडा हा देव धडफुडा | मेळविला जोडा येरवेरा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १३००
📿 नामपाठे भक्ति हनुमंत
1300.
नामपाठे भक्ति हनुमंते केली । सेवा रुजू झाली देवा तेणे ॥१॥
नामपाठे शक्ति अद्भुत ये अंगी । धन्य झाला जगी कपीनाथ ॥२॥
जनार्दनाचा एका सेवोनि आदरे । नामपाठ स्मरे सर्व काळ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३०१
📿 नसतो किविलवाणे । काह
1301.
नसतो किविलवाणे । काही तुमच्या कृपादाने ॥१॥
हेचि तयाची ओळखी । धाले टवटवित मुखी ॥धृपद॥
वाया जात नाही । वचन प्रीतीचे ते काही ॥२॥
तुका म्हणे देवा । सत्य येते अनुभवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३०३
📿 देवाच्या उद्देशे जेथ
1303.
देवाच्या उद्देशे जेथे जेथे भाव । तो तो वसे ठाव विश्वंभर ॥१॥
लोभाचे संकल्प पळालियावरी । कैची तेथे उरी पापपुण्या ॥धृपद॥
शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥
तुका म्हणे ज्याचे तयासी च कळे । प्रांत येतो फळे कळो मग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३०४
📿 कडसणी धरिता अडचणीचा
1304.
कडसणी धरिता अडचणीचा ठाव । म्हणऊनि जीव त्रासलासे ॥१॥
लौकिकाबाहेरि राहिलो निराळा । तुजविण वेगळा नाही तुजा ॥धृपद॥
संकोचाने नाही होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥२॥
तुका म्हणे केले इच्छे चि सारिखे । नाहीसे पारिखे येथे कोणी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 बाजारहाट›
📿 अभंग क्र. १३०४
📿 जावोनिया नामदेव | बो
1304.
जावोनिया नामदेव | बोले गणोवासी भाव ॥१॥
द्रव्य द्यावे हो सत्वरी | आम्ही जातो आपुल्या घरी ॥२॥
मग म्हणे धोंडोबासी | तुम्ही जामीन ऐवजासी ॥३॥
द्रव्य द्यावे हो लवकरी नाही तरी चलावे घरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३०५
📿 हेचि जतन करा दान । ध
1305.
हेचि जतन करा दान । धरुनी चरण राहिलो तो ॥१॥
घ्यावी माझ्या हाते सेवा । हेची देवा विनवणी ॥धृपद॥
आणीक काही न घाली भार । बहुत फार साकडे ॥२॥
तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस पुरवावी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 बाजारहाट›
📿 अभंग क्र. १३०५
📿 कुलुप अगंळा घालोनि क
1305.
कुलुप अगंळा घालोनि कोठडिसी | घातले धोंड्याशी बंदीखानी ॥१॥
गोणाई दामासेठी नव्हती तेव्हा घरी गेली भीमातीरी स्नानालागी ॥२॥
नामदेव गेले राउळा त्वरित | सांगतसे मात केशवासी ॥३॥
दामासेठी आले स्नान करूनिया | राजाई त्या पाया लागुनि बोले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३०९
📿 माझी मज जाती आवरली द
1309.
माझी मज जाती आवरली देवा । न व्हावा या गोवा इंद्रियांचा ॥१॥
कासया मी तुझा म्हणवितो दास । असतो उदास सर्व भावे ॥धृपद॥
भयाचिया भेणे धरियेली कास । न पुरता आस काय थोरी ॥२॥
तुका म्हणे आप आपली जतन । कैचे थोरपण मग तुम्हा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 बाजारहाट›
📿 अभंग क्र. १३०९
📿 ऐसे ऐकोनिया राजाई ते
1309.
ऐसे ऐकोनिया राजाई ते आली| रोषे येऊनि बोली बोलतसे ॥१॥
देवाने है दिले तुम्ही का पाठवा | काशाचा गणोबा बोलतसा ॥२॥
ऐसे बोलोनिया हाते लोटी धोंडा तुमचिया वितंडा कोण पुसे ॥३॥
देवे मज दिले तुम्ही का मागता | अलंकार आता घडीन मी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३१०
📿 विनवितो तरी आणितोसि
1310.
विनवितो तरी आणितोसि परी । याचकाने थोरी दातयाची ॥१॥
आमुचे ही काही असो द्या उपकार । एकल्याने थोर कैचे तुम्ही ॥धृपद॥
न घ्यावी जी काही बहु साल सेवा । गौरव तो देवा यत्न कीजे ॥२॥
तुका म्हणे नाही आमुची मिरासी । असावेसी ऐसी दुर्बळेची ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 बाजारहाट›
📿 अभंग क्र. १३१०
📿 क्षेत्री हा वृत्तांत
1310.
क्षेत्री हा वृत्तांत कळला सर्वांशी आले पंचक्रोशी सभोंवते ॥१॥
धोंडोबा गणोबा होते ज्याचे रानी ते आले धांवोनि मागावया ॥२॥
आपुले द्रव्य घ्यावे धोंडोबाशी द्यावे | नाही तरी चलावे पंचाइती ॥३॥
नामदेव म्हणे द्रव्य तुम्ही द्यावे | आपुले घेवोनि जावे धोंडोबासी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३११
📿 एका ऐसे एक होते कोण्
1311.
एका ऐसे एक होते कोण्याकाळे । समर्थाच्या बळे काय नव्हे ॥१॥
घालूनि बैसलो मिरासीस पाया । जिंको देवराया संदेह नाही ॥धृपद॥
केला तो न संडी आता कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥२॥
तुका म्हणे जाली अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळो साच ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३१२
📿 झाले समाधान । तुमचे
1312.
झाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥
आता उठावेसे मना । येत नाही नारायणा ॥धृपद॥
सुरवाडिकपणे । जेथे सापडले केणे ॥२॥
तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १३१२
📿 आई जे शिकवी तीते तुम
1312.
आई जे शिकवी तीते तुम्ही नाईका | नाही भय शंका लौकिकाची ॥१॥
लावोनि लंगोटी जालेती गोसावी | आमुची उठाठेवी कोण करी ॥२॥
ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवनी काय करू ॥३॥
धडचि कांटीये घातले हो कैसे बळेंचि आपणा पिसे लावियेले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १३१२
📿 नामपाठे जनाबाई बरोबर
1312.
नामपाठे जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची ॥१॥
भक्तांचे सकळ कार्य ते करणे । नये ऐसे उणें करी काम ॥२॥
जनार्दनाचा एक आवड पाहुनी । नाचतो कीर्तनी नाम गाय ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३१३
📿 मुखाकडे वास । पाहे क
1313.
मुखाकडे वास । पाहे करूनिया आस ॥१॥
आता होईल ते शिरी । मनोगत आज्ञा धरी ॥धृपद॥
तुह्मी अंगीकार । केला पाहिजे हे सार ॥२॥
तुका म्हणे दारी । उभे याचक मी हरी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 राजाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १३१३
📿 घरधनि याणी केला गुरु
1313.
घरधनि याणी केला गुरु |बाई मी आता काय करूं|असोनि नाहींसा संसारू | चमत्कार कृपेचा ॥१॥
धांवे पावे गे मेसाई येथे कोणाचे न चाले कांही |सत्यपण तुझे ठायी | तरी है नाहिसे करी गे ॥२॥
मंत्र घेतला जैसा | घरी संताचा बोळसा |बोस पडो हरिदासा | गेले नमत मागुते ॥३॥
काय सांगो याची रीती सोसे सोसे पाये चरणाप्रती |अवघे भांबडभूत होती | नाचताती आनंद ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १३१३
📿 नामपाठे आपण होय अनाम
1313.
नामपाठे आपण होय अनामिक । नामपाठे देख न म्हणे कांही ॥१॥
उंच नीच ज्ञाती न करी विचार । नामपाठे निर्धार ऐसा ज्याचा ॥२॥
जनार्दनाचा एका सर्वभावे देखा । नामपाठ निका गात असे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३१४
📿 नाही माथा भार । तुम्
1314.
नाही माथा भार । तुम्ही घेत हा विचार ॥१॥
जाणोनिया केले । दुरिल अंगेसी लाविले ॥धृपद॥
आता बोलावे आवडी । नाम घ्यावे घडी घडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १३१४
📿 नामपाठे ज्ञानियाची भ
1314.
नामपाठे ज्ञानियाची भिंत ओढी । भाविका तांतडी देव धांवे ॥१॥
बोलविला रेडा केलेंस कवित्व । नामपाठे मुक्त केले जन ॥२॥
जनार्दनाचा एका लागतो चरणी । जावे ओवाळीनी जन्मोजन्मी ॥३॥