संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाईक ३८३७ ते ३८४८›
📿 अभंग क्र. ३८४७
📿 धन मान राज्य न धरिता
3847.
धन मान राज्य न धरिता आशा । तरीच स्वामीदशा पावती ते ॥१॥ पाईकपण गेलेंस्वामी होऊनी ठेले । परी नाही विसरलेंसेवेलागीं ॥२॥ एका जनार्दनी पाईका ठाव । देहींचतो देव हाती लागें ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८४८
📿 (बाळक्रीडा अभंग)
3848.
(बाळक्रीडा अभंग)
भावनेच्या मुळे अंतरला देव । शिरला संदेह भय पोटी ॥१॥
पोटी होते मागे जीव द्यावा ऐसे । बोलिल्या सरिसे न करवे ॥धृपद॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पाईक ३८३७ ते ३८४८›
📿 अभंग क्र. ३८४८
📿 एकपणे एक एकपणे एक ।
3848.
एकपणे एक एकपणे एक । एकाचेंअनेक मिरविती ॥१॥ तया नाही ठाव दिसेना तीगती । पाईकपणे वस्ती कोठे नाही ॥२॥ एकाजनार्दनी गेले दोन्ही ठाव । स्वामी ना देव नाहींतया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८४९
📿 (बाळक्रीडा अभंग)
3849.
(बाळक्रीडा अभंग)
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणांसाठी होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधी ॥२॥
आधी पाठीमोरी झाली ती सकळे । मग या गोपाळे बुडी दिली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८५१
📿 (बाळक्रीडा अभंग)
3851.
(बाळक्रीडा अभंग)
म्हणे चेंडू कोणे आणिला या ठाया । आलो पुरवावया कोड त्याचे ॥१॥
त्याचे आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन जाले तीचे ॥२॥
तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधी ते माघारी फिरली वेगी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अर्ज ३८५२›
📿 अभंग क्र. ३८५२
📿 अर्ज ३८५२
3852.
अर्ज ३८५२
अर्जदस्त अर्जदार । बंदगी बंदेनवाज । आलेकम् सलाम । साहेबाचे सेवेशी । बंदेशरीराकार । जिवाजी शेकदार । बुधाजी कारकून । परगणे शरीराबाद । किल्ले कायापुरी सरकारसाहेबांची आज्ञा घेऊन स्वार जाहलों । तो परगणेमजकुरी येऊन सरकार काम सुरू करावयासलागलो । तो परगणे मजकूरचे जमादार दंभाजीशेटे । कामाजी महाजन । मनीराम देशमुख । ममताई देशपांडीन । क्रोधाजी नाईकवाडी । ऐसेखोटे जण फार आहेत । ते सरकार कामाचाकयासा चालू देत नाहीत । तमाम परगण्याचीफितुरी करितात । दंभाजी शेट्या कचेरीत येऊनजोम धरून बसतो । मनीराम देशमुख आपलेपरभारें काम करून घेतो । ममताई देशपांडी इनेंतमाम परगणा जेरदस्ता केला । क्रोधाजी नाईकयाने तमाम तफरका केला । तो साहेबांपासूनजरासंध चोपदार आला । त्याने खबर केलीं की । पागन यमाजी पंताची तलव होणार । त्यास त्याभास्तीनें तमाम परगणा ओस जाहला । बीतपशीलकलम डोळसवाडीस मात्र कांही रुई झई वस्तीराहिली । कानगांव तो बंद जाहले । दोनी वेशींचीकवाडं लागलीं । नाकापुरास वाहव सुटलें । तोंडापूरतो तफरका झाले । दंताळवाडी ओस पडली । दिवे लावणी देखील राहिली नाही । केंसगांवचीपांढर जाहली । शीरापुरचे लोक दरोबस्त थरथराकांपूं लागले । हातगाव कसल्याने जर्जर जाहले । त्यांच्याने आता काही लावणी होत नाही । पायगांवाची मेटे बसलीं । ढोरापुरची राहटी राहिली । चरणगांवची चाली सरली । गांडापूर वाहूं लागले । लिंगस्थान भ्रष्ट जाहलें । उठू पळू लागले । धीरधरवेना । ऐशी परगण्याची कीर्ति बुडाली । यावरसरकार काम सुरू करीत होतो । तो यमाजीपंताचीपरवानगी आली की । हुजूर येणे आपणाससाहेबाच्या कलमांना आश्रय आहे । एका जनार्दनकाबंदा । बंदगी रोशन होय हे अर्जदस्त ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८५३
📿 (बाळक्रीडा अभंग)
3853.
(बाळक्रीडा अभंग)
अवचिता त्यांनी देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥
आला घेऊनिया यमुनेबाहेरी । पालवितो हरी गडियांसि ॥२॥
गडियांसि म्हणे वैकुंठनायक । या रे सकळिक मजपाशी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अर्जदास्त ३८५३›
📿 अभंग क्र. ३८५३
📿 अर्जदास्त ३८५३
3853.
अर्जदास्त ३८५३
अर्जदस्त अर्जदार बंदगी । बंदेनवाजसाहेब आलेकम् सलाम । कायापुरीकर जिवाजीपंतसभेदार । बुधाजीपंत फडणीस । परगणे शरीराबाद । हकीकत । सरकारची रजा घेऊन निघाले । तोंस्वार होऊन किल्ले कायापूर येथे दाखल जाहले । दरोबस्त अंमलदार सर्व सरकारकामास वाकबनव्हते । ऐशियास परगणे मजकूरचें कायापुरांतीलउखडे रुजू झाले । सदरहु परगणा व जमातदार । सरकारचे पुढारी लोक यांची नांवे । पाटीलकुळकर्णी । शेटे महाजन । देशमुख देशपांडे । यांची खाली लिहिल्याप्रमाणे नांवे । दंभाजी शेटे । कामाजीराव महाजन । मनाजीराव देशमुख । ममताईदेशमुखीण । रसनाईक पाटलीण । केसाजीपंतकुळकर्णी । जराजीराव देशपांडे । हे फार खोटेआहेत । कचेरीत जोम धरून बसतात । सरकारचेकाम सुरू होऊ देत नाहीत । दंभाजी शेटे यानीसंत बाजारांतील भावाचा बिघाड केला । आयुष्यधान्याचे माप शुद्ध भरीत नाहीत । बाळपणांतक्रीडा । तारुण्यांत स्त्रीसंग । वृद्धपणी चिंता । याप्रमाणे माया चालू केली । भस्म रुद्राक्षमाळा । पादुका जटा वल्कले कंथा दंडकमंडलु । यांचामात्र सुकाळ केला । या योगाने खरा परमार्थबुडाला । देह अभिमान वाढविला । कामाजीरावमहाजन । याने आपले पांच बंधु आपण सरकारचेरिसाल्यावर ठेविले । त्यांतील भ्रम । हट्ट । द्वेष । - अधैर्य । साहस । अविवेक । असत्य । कौटिल्य । परोत्कर्ष । सहनत्व । हे दहा बारगीर । हाताखालीघेऊन । तपस्वी व्रतें नागविले । विवेकाचे ठाणेउठविलें । योग याग जप तप ध्यान आष्टी समाधीचतुर्विध पुरुषार्थ हे कायापुरीतून बाहेर घालविले । व्यभिचाराचा गोंधळ फार केला । मनाजीरावदेशमूख आपले मतें परस्पर कारभार करितात । स्त्रीसुनांमध्ये द्यूत धन याचा अंगिकार केला । त्या योगाने प्रजा आपआपला धर्म विसरल्या । ममताई सरदेशमुखीण इनें आपल्या स्वपराक्रमानेसंपूर्ण परगणा जर्जर केला । सर्व लोक मायाजाळांतगुंतविलें । परमार्थाविषयी एकासही फडकू देतनाहीं । रसनाई पाटलीण इणे खाण्यावर दृष्टीदिली आहे । केसोपंत काळे कुळकर्णी । जराजीराव । देशपांडे । यांनी आपल्या जातींत फितूर केला । काळ्याचे पांढरे झाले । आणि पांढरीचा वसूलकरविला । ऐसे आम्ही थोड्या दिवसांत वाकब । होऊन । सरकारची कामगिरी करीत होतो । तोंतुमचा नवज्वर चोपदार आला । त्याने अशीकरणी केली की । यमाजी भास्कर सरसुभेदार । यांची मागून तल्लब येणार आहे । त्यांनी त्रिदोषाचीरवानगी केली । त्या धास्तीनें तमाम परगणा ओसपडला । सदरहू तपशील । शिरपूर थरथरां कांपूंलागले । डोळसवाडी उजाड जाहली । नाकपूरवाहू लागले । कानपूर ओस पडले । दिवेलावणीमोडली । मुख नगरांतील व्यापार बंद जाहले । रसनाई पाटलीण वांकडी पडली । तगादा करावातर कांहींच बोलत नाही । दंताळवाडीची कचेरीबरखास्त जाहली । मानपुरानी पड घेतली । उरगांवधडधड करितें । हातगांव उदरवाडीचे खसाल्यानेजेर जेर झाले । याच्याने लावणी होत नाही । पायगांवाचे मेटे बसलें । कंबरवाडी बसून राहिली । दोन गांवें तर पार उजाड झाली । त्याचा तपशीलवार । गांडापूर कर्जदार झाले । ते अखंड शंखनादकरी । त्याच्याने अर्ध क्षण धीर धरवत नाही । लिंगपूर स्थानभ्रष्ट झाले । ऐशी परगण्याची कीर्दबुडाली । पुराण रानें वोस पडली । त्यांत नवज्वरचोपदार हुजूर न्यावयाची उतावीळ करिती । हुजूरयावे तर परगणे मजकूरचा कांही वसूल झालानाहीं । यमाजीपंत कूरसीस करितील त्या धास्तीनेउगीच बसलों । आम्हांस तर सरकाच्या पायावेगळाआश्रय नाही । हजार अन्यायी । याजवर बुधजीपंताचाअर्ज की । रयत बिघडल्यामुळे या त्रासाने जिवाजीपंताचासुभेदार निघून जाण्याचे बेतांत आहेत । त्याससरकाने । त्याजवर कृपा करून । तत्त्वज्ञान पेनशनदेऊन । ब्रह्मपुरीत रहावयास जागा द्यावी । बंदगीरोशन होय । एका जनार्दनी अर्जदस्त ॥१॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अर्जाचा जाब ३८५४›
📿 अभंग क्र. ३८५४
📿 अर्जाचा जाब ३८५४
3854.
अर्जाचा जाब ३८५४
क्षत्रीय कुळवंत । श्री अयोध्याधीश । राजाराम छत्रपती अनंत ब्रह्मांड निवासी राजे । श्रीजीवाजीपंत शेकदार । मौजे देहगांव । तालुकेअष्टपुरी । मामले पांचाळेश्वर । यासी आज्ञापत्र । मौजेमजकूराचा वाका लिहून कळविला । तेथे लिहिलेकी मनाजीराव देशमुख । हे असुरी सेनापुंडपाळेगारमिळुन गाव मारीतात । वसाहत होऊ देत नाहीत । ब्रह्मपुरीचा मार्ग चालु देत नाहीत । असेअसल्याकारणाने तुम्हावर साहेबांची मेहेरबानीहोऊन । मनाजी देशमुख याजला तबीबपोहोचावयास । सरकारातून सुभे रवाना झाले । बितपशील कलम । आत्मा विवेक । प्रधानस्वानुभव । सैन्याधिपति प्रबोध । सरलष्कर इतरावैर सनदा देऊन । ताबडतोब रवाना केले आहेत । तर हे मौजे मजकुरी पावतांच । अवघे पुंडपाळेगारठार मारतील । ब्रह्मपुरीचा मार्ग चालू लागेल । याजकरितां तुम्ही आपली खातरजमा राखुन । साहेब कामास रुजु राहणें । केलेली सेवा तुम्हांसमजुरा आहे । तर आपण हुजुर झाल्यास । 'बंधमोक्षांतीक इनाम दिला जाईल । आपणासह पूर्णनिजानंदी रंगुन साहेब कामास तत्पर असणे । एकाजनार्दनी शरण । बहुत काय लिहिणे
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८५५
📿 (बाळक्रीडा अभंग)
3855.
(बाळक्रीडा अभंग)
जननी हे म्हणे आहा काय झाले । शरीर रक्षिले काय काजे ॥१॥
काय काज आता हरीविण जिणे । नित्य दुःख कोणे सोसावे हे ॥२॥
हे दुःख न सरे हरी न भेटे तो । त्यामागेचि जातो एका वेळे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 ताकीदपत्र ३८५६›
📿 अभंग क्र. ३८५६
📿 ताकीदपत्र ३८५६
3856.
ताकीदपत्र ३८५६
समस्त राजकर्ते धुरंधर । परगणेशरीराबाद सुभा । सुमातैन लोली प्रवाहे । ताकीदपत्रदिधलें की । कायापुरास जिवाजी नामे गृहस्थ । त्यास कौल देऊन देहगांवची वस्ती । आबादरक्षावया निमित्त । पाठविले आहेत । तर कोण्याहीगोष्टीचा ताप न लागेल । हरएकविषयीं साहित्यकरावें । मनाजीराव सुभेदार । बुधाजीपंत फडणीस । चित्ताजीपंत चिटणीस । हे थोर मनुष्य असतात । अहंकाराजीपंत सबनीस । यांचे हवाली सर्वदेहगांवाचा कारभार दिधला । त्याच्या पट्ट्याच्याघरचे मुत्सद्दी घरी नसून नवीन मुत्सद्दी कामगारउभे केले तेही चांगले नव्हेत । विकल्पाजी महाजन । मोहाजी शेटे । कामाजी कोतवाल । क्रोधाजीनाईकवाडी । द्वेषाजी जमेदार । विकारपंत जकातदार । लोभाजी पोतनीस मत्सरजी मेहेत्रे । कुतर्काजीगस्तदार । उन्मत्तजी पाटील कुबुद्धी कुळकर्णी । भ्रमाजी शिपाई । मदाजी देशपांडे । दंभाजी देशमुख । प्रपंचपंत मजरदार । मुर्खाजी हुजुरे । स्वार्थाजीखिजमतदार । अविवेक पुराणीक । अज्ञानमशालजी । हे नवीन कामगार उभे केले । तेहीचांगले नव्हे । पहिल्या दासी । त्या नवविधा त्यागून । सऱ्या दासी उभ्या केल्या । आशा मनीषा तृष्णाकल्पना ममता माया प्रीति भुक्ति भ्रांति इच्छावासना भ्रमणा कुबुद्धी निंदा अहंता चिंता निद्रामोहनी । ह्या कामका वादी । अहंकारपंत सबनीसयांनी उभ्या केल्या । त्याने दारोबस्त परगणाबुडविला । आणि यमाजीपंत कमाविसदार । याचेघरी एकान्त स्थळ स्थापन केले । त्यावरून हेताकीदपत्र सादर केले की । नवीन मसुदे वकामगार आहेत ते त्यागावे । सरकार हुजूरचेमुत्सद्दी कामगार आहेत । तर त्यांचे हातें कामघ्यावें । मुत्सद्दी तपशील । शुद्ध सत्त्व भाव विवेकवैराग्य बोध परमार्थ आनंद समाधान निर्वैरस्वानुभव धैर्य सत्त्व भजन पूजन हे कारभारी । कार्यकर्त्या सुशीला सुबुद्धी उन्मनी प्रतिष्ठा । नवविधानयादा । दया शांति क्षमा नम्रता समाधी । ह्याकार्यकर्त्या व ते मुत्सद्दी त्याचे हाती काम घ्यावें । ह्या विषयी सरकारांतून । ताकीद झाली आहे । तरलिहिल्याप्रमाणे वहिवाट करावी । सबनीज मजकूरयांचे मुत्सद्दी कामगार दरम्यान ह्या कामांत आल्यास । पारिपत्य केले जाईल । स्पष्ट समजावें । सरकारकामगार उभे करावे । त्यांचे हातें काम घ्यावे । एका जनार्दनी शरण । बहुत काय लिहिणेताकदीपत्र ॥१॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जाबचिठ्ठी ३८५७›
📿 अभंग क्र. ३८५७
📿 जाबचिठ्ठी ३८५७
3857.
जाबचिठ्ठी ३८५७
सकलयुक्त प्रवीण जीवाजीपंतशेखदार । तुम्हांवर बाकी निघालिम्हणोन तुम्हांसदेहेगांवास पाठविले तर देहेगांवी राहुन । विषयशेठवलोभाजी नाईक । यांचे बुद्धीस लागोन । भवसमुद्रतरावयाची भूल पडली । यामुळे कामाजी महाजनवमनीराम देशमुख तुम्हांस साह्य होऊन तुमच्यानिजस्वार्थाची खराबी केली । बुधाजी पाटीलमोकदम । मुफसलकीर्द होऊन म्हणो लागले की । कानडखिंड व तोंडापूर हे दोन्ही मातबर असतात । श्रवण खरीप व कीर्तन रबी पिकावयाची होती । तीममताईआवाने हाती लागू दिली नाही । यासी उपायकेला पाहिजे । खावंदापाशी भागवतराव दिवाण । तो गीताबाईचा पुत्र राजयोगी । याची भेटावयाचीतजवीज । वैराग्यस्वामी यांचे हातें व्हावी । प्रथमपश्चातापपंत । आपुले स्वाधीनच आहेत । त्यांजपाशी येणे । ते तुझ्या वाणीचा हवाला घेतील । मग भागवतराव दिवाण यांचेकडे जाणे । ते तुम्हांसमोकळे करतील । पुन्हा देहेगांवास व गर्भपुरासपाठविणार नाहीत । त्वा लिहिले जे तूर्तचयमाजीपंतांची तलफ होणार । त्याची काही तलफमाघारी फिरत नाही । त्याजबरोबर हुजुरच्या सनदाआहेता म्हणून सांगितल्यावर हुकुम करणे । गैरनकरणे । एका जनार्दनी शरण । हा आशिर्वादजाबचिठ्ठी ॥१॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कौलपत्र ३८५८›
📿 अभंग क्र. ३८५८
📿 कौलपत्र ३८५८
3858.
कौलपत्र ३८५८
चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार । यासीआत्मारामपंत कमाविसदार । कसबे ब्रह्मपुरी । आशीर्वाद उपरी । तुम्हांस देहगांवचे ठाणे दिल्हेंआहे । तर ठाण्यांत सावधपणे वर्तणूक करणे । तेथे ममताई पाटलीण । तिने लटिकेंच दंभ उभेकेलें आहे । कामक्रोधादि षड्वैरी चाकर ठेवून । लोभमोहाचे फांसे सिद्ध करून ठेविले आहेत । म्हणून तुम्हांस सूचना मात्र लिहिली । विषयाचालोभ न धरणे । निजहितासी अंतर न करणे । सत्य मिथ्या जाणोन । विचाराची वाट धरणे । अविचारपणा सोडून देणे । विवेक सद्भाव यांसीमित्रत्व विशेष असूं देणे । त्याचे बुद्धीने गांवचीलावणी करणे । उत्तम चार वर्णास कौल देऊन । धैर्याचा नांगर धरून । शेतांमधील खडे काढून । वासनेच्या पालव्या तोडून । संशयाच्या काशागोळा करून । भूमिका शुद्ध करून । मग भक्तिज्ञान वैराग्य तिफनी करून । सद्गुरु मुखी निजबीजपेरणें । तेथे शुद्धसत्त्वाचा मेघ वर्षेल । तेथे सत्याचामाळा घालून । कुतर्क पाखरूं उडवून देणे । जागोजागी विश्वास रक्षण ठेवून । शेतांतील मालअवघाच गोळा करून । समस्त षड्गुणऐश्वर्य बैलजुंपून । अवघा माल खळ्यांत आणून । पुष्कळकाढून । स्वानंदाची रास करणे । तेथे सिद्ध साधकेंमागुते येतील । त्याला भक्तीच्या पायलीनें । अवघाचमाल मोजून देऊन । सहहुजूर ब्रह्मपुरास येणे । सांगितल्या गोष्टींत बाकी ठेवाल तर । चौऱ्यांशीलक्ष योनी फिरणे लागेल । मग पुनरपी तुम्हांवरकोणाचा दस्त लादेल । खरे चालावें जन्ममरणाचीवाट खुंटेल । म्हणून जनार्दन सद्गुरुकृपेचा सागर । तेणे एका जनार्दनी आनंदमय समाधान झाले । द्वैताचा लेश उरला नाही । सच्चिदानंदरूप । प्रत्ययासयेऊन समाधान पावले । हे कौलपत्र ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८५९
📿 (बाळक्रीडा अभंग)
3859.
(बाळक्रीडा अभंग)
झाला कवतुक करिता रोकडे । आणीक ही पुढे नारायण ॥१॥
येउनिया पुढे धरिला मारग । हरावया भाग इंद्रायाजी ॥२॥
इंद्रा दही दुध तूप नेता लोणी । घेतले हिरोनि वाटे त्यांचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८६०
📿 (बाळक्रीडा अभंग)
3860.
(बाळक्रीडा अभंग)
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तया भेऊ नका ॥१॥
नका धरू भय धाक काही मनी । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥
गौळियांसि धीर नाही या वचने । आशंकितमने वेडावली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पत्र ३८६०›
📿 अभंग क्र. ३८६०
📿 पत्र ३८६०
3860.
पत्र ३८६०
माझे पत्र धन्याला वैकुंठवासी नांदतोत्याला । असा धनी माझा भला । माझ्या पूर्वजांचाउध्दार केला ॥१॥ भक्त संकटा रक्षिला । मजवरफार उपकार केला । तडीतापडी धाऊन आला । पत्राचा मजकुर त्याने पाहिला ॥२॥ संकट पाहूनिभला बोध केला । चार खाणी नऊ दरवाजे । दशइंद्रिये हाच बोध केला ॥३॥ भुक्ति मुक्ति शक्तिमजपाशी ठेविल्या । ऐसे चार वेद वर्णी । एकाजर्नादनी वाणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८६१
📿 (बाळक्रीडा अभंग)
3861.
(बाळक्रीडा अभंग)
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असता अंगसंगे ॥१॥
अंगसंगे तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोही । जयाची हे नाही बुद्धी स्थिर ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८६२
📿 (बाळक्रीडा अभंग)
3862.
(बाळक्रीडा अभंग)
दुःखी होती लोभे करावे ते काई । उडतील गाई म्हैसी आता ॥१॥
आणीकही काही होईल अरिष्ट । नायिके हा धीट सांगितले ॥२॥
सांगो चला याच्या मायबापापाशी । निघाले घरासि देवा रागे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८६४
📿 जोहार मायबाप जोहार ।
3864.
जोहार मायबाप जोहार । सकळसंतांशी माझा जोहार । मी अयोध्या नगरीचा महाररामजी बावाचें दराबारचा की जी मायबाप ॥१॥ रामजी बावाचा कारभार । राज्य करी अयोध्यापूर । मी तेथील नफर सारासार । कारभार करीतोकि ॥२॥ सकाळी समयी उठतो । सिताबाईसजेवाया मागतो । झाडूनि दरबार काढतों । केरबाहेर टाकितों की ॥३॥ सभेसी रामाजी बाबा येतां॥मी पुढे जाऊनी सांगे वार्ता । एका जनार्दनीतत्वतां । जोहार करतो की जी मायबाप ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८६५
📿 देहपूरचे दिले ठाणे ।
3865.
देहपूरचे दिले ठाणे । जीवाजीसबोलावणे । मग पळू लागले रानोरानें । कोणसोडवीं त्याकारणें । की जी मायबाप जोहार ॥१॥ येईल यमाजीची पाळी । कोण तेथे कोणा - सांभाळी । जीवाजी पळतील गांवचे बळी । होईलफजीती सारी की ॥२॥ अवघे रहातील घरचेघरीं । तुम्ही पडाल चौऱ्याऐंशीच्या फेरी । कितीजन्म किती वेरझारी । करा विचार याचा की ॥३॥ थरण एका जनार्दनी । मायबाप संत धनी । तेचिचुकवितील यातनीं । धरा विश्वास की जी मायबापजोहार ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८६६
📿 घ्या जोहार घ्या जोहा
3866.
घ्या जोहार घ्या जोहार । मीनिराकारीचा महार । संतसभेचा कारभार । मीचकरितों की जी मायबाप ॥१॥ मी धन्याचाआवडता फार । धन्याचा विश्वास मजवर । धन्याचे चाकरीवर । रूजू की मी ॥२॥ चार वेदांझाडीतों । सहा शास्त्रांचा केर भरितो । पुराणे सर्वजमा करितो । संत पेठे आणितो की ॥३॥ ऐशीकरितां खटपट । संतसभेची सांपडेल वाट । तेणेंमार्ग नीट । सांपडेल की ॥४॥ मार्ग धरापंढरीचा । एका विनवी जनार्दनाचा । रामनामबोला वाचा । सावध होऊन की जी मायबाप ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८६७
📿 (बाळक्रीडा अभंग)
3867.
(बाळक्रीडा अभंग)
वेडावली काय करावे या काळी । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥
गोवर्धन धरू शिरी उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊ नका ॥२॥
नका सांडू कोणी आपला आवांका । मारिता या हाका आरोळिया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८६७
📿 जोहार मायबाप जोहार ।
3867.
जोहार मायबाप जोहार । मी सकळसंतांचा महार । सांगतो दृढ विचार । तो ऐका कीजी मायबाप ॥१॥ माझा विचार नारदे ऐकीला । तो पूनरूपी नाही आला । भीष्म ध्रुव प्रल्हादआगळा । या विचारे बोधिले की ॥२॥ उपमन्युबिभीषण । सर्वामाजी अर्जून । आणिकहि ऋषीसांगेन । सावध ऐका की ॥३॥ पराशरविश्वामित्रादि जाण । या विचारे पावले समाधान । हरिश्चंद्र शिबी सुखसंपन्नं । जाले की ॥४॥ ऐशाविचारें चालले । ते पुनरपि नाही आले । एकाजर्नादनी भले । ऐक्यपणे की जी मायबाप ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८६८
📿 (बाळक्रीडा अभंग)
3868.
(बाळक्रीडा अभंग)
नेदी दुःख देखो दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधी ॥१॥
आधी पुढे शुद्ध करावा मारग । दासांमागे मग सुखरूप ॥२॥
पर्वतासि हात लाविला अनंते । तो जाय वरते आपेआप ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८६८
📿 महार बोलतो बोला । तु
3868.
महार बोलतो बोला । तुम्ही सांडागलबला । शत वर्षाचा नेम भरला । आता हुशारराहा की जी मायबाप ॥१॥ येईल यमाजीची चिठी । बोलू नेदी जाल उठाउठी । ओंगळवाणी करालदिठी । कोण सोडविणार की ॥२॥ कांहीतरी हितकरा । कामक्रोध परतें सारा । नामस्मरणी लक्षधरा । हाची विचार करा की ॥३॥ मागील बाकीअवधी झाडा । नाही तरी पायी पडेल खोडा । बसायाचा तुमचा घोडा । राहील घरचे घरी की॥४॥शरण एका जनार्दनी । मायबाप संत धनी । लक्ष लावा त्याचे चरणी । हाचि विचार करा कीजी मायबाप ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८७०
📿 (बाळक्रीडा अभंग)
3870.
(बाळक्रीडा अभंग)
म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे ॥१॥
त्यांसि राखे बळे आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहो नेदी ॥ध्रृ. ॥
पाउस न येता केली यांची थार । लागला तुषार येऊ मग ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८७१
📿 (बाळक्रीडा अभंग)
3871.
(बाळक्रीडा अभंग)
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुले ते बळ वाखानावे ॥१॥
बळे हुंबरती सत्य त्या न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥
आसुडिल्या माना हात पाय नेटे । तव भार बोटे उचलिला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८७१
📿 ऐका ऐका पाटीलबोवाजी
3871.
ऐका ऐका पाटीलबोवाजी । गांव बराराखा राजी । उद्यां येतील यमाजी बाजी । फटफजीती होईल की जी मायबाप ॥१॥ जोहारमायबाप धनी । उठा उठा झोंप सोडूनि । काळभरला उरेना कोण्ही । पुढे पडाल काळाचे वदनीकी जी मायबाप॥२॥गांवातील रयत स्वाधीनकरा । कुळकर्णी आधी हाती धरा । तरीच तुमचाबरा थारा । मोडेल कोपट होईल चुरा की जीमायबाप ॥३॥ कामाजी देशमुख मोठा मस्त । क्रोधाजी नाईक मिळाले त्यांत । मदाजीबोवा त्यासीशिकवित । मत्सर वान पुढे भुकंत की जीमायबाप ॥४॥ दंभाजीची भारी हांव । अहंकारपंतांने वोस केला गांव । जीवाजी तुम्हीविसरला धन्यांचे नांव । या सहा जणांची हावधरून की जी मायबाप ॥५॥ आता तुम्ही विचारकरा । मुळचा मार्ग हळुहळु धरा । तेणेंचुकेल तुमचाफेरा । एका जनार्दनी तुटेल सारा । दोरा की जीमायबाप ॥६॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८७२
📿 जोहार मायबाप जोहार ।
3872.
जोहार मायबाप जोहार । मीनिर्गुणपुरीचा महार । सांगतो सारासार विचार । तो ऐका की जी मायबाप ॥१॥ कौल वर्ष शंभर । जीवाजीस दिले घर । शिवाजी तेथे मामलेदार । अवघा कारभार जीवाजींचा की ॥२॥ कौलांतलिहीली बोली । परंतु जीवाजी विसरले चाली । धन्याचे दरबारची शुध्दी नाही के लीं । मगपस्तावले की ॥३॥ कौल भरला परिपूर्णे । यमाजीचे बैसले धरणे । जीवाजीचे उडालें ठाणे । मग दीनवदने राहीले की ॥४॥ यमाजीने धरूनीनेले । जीवाजी आपआपणा विसरले । धन्याचीबाकी विसरले । मागूती जन्मासी आले की ॥५॥ ऐसे जन्म लक्ष चौऱ्याऐंशी । फेरे जाहलें जीवाजीसीशरण एका जनार्दनाशीं । तरीच फेरे चुकती कीजीमायबाप ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८७३
📿 (बाळक्रीडा अभंग)
3873.
(बाळक्रीडा अभंग)
लोका कळो आला देव आम्हामधी । टाकिली उपाधि तिही शंका ॥१॥
शंका नाही थोर लाहाना जीवांसि । कळला हा हृषीकेशी तेंव्हा मग ॥धृपद॥
मग झाले निर्भर सकळ । संगे लोकपाळ कृष्णाचिया ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८७३
📿 जोहार मायबाप जोहार ।
3873.
जोहार मायबाप जोहार । मी तोएकनाथ महार । लहानसा महाराचा पोर । माझेबोलण्याचा विचार । दुसरा नाही की जीमायबाप ॥१॥ माझ्या बोला ऐकीजे । मोठ मोठेउमराव राजे । तुम्हीच का जीवाजी न जाणिजे । वेळेस संदेह धरिता की ॥२॥ चैतन्य चावडीचामहार । की जी मिराशी महार । जेंव्हां नव्हतागांवचा आवार । मज ओळख नाही की ॥३॥ कायापूरचा अचाट पाया । यमाजी झाले बेहया । त्यापुढे पाहती पळाया । मनाजी संगे मिळालेखाया । परी नाही वाट की ॥४॥ दहा गुरे बाहेरदिसती । पांच गुरे अंतर असती । इतुकीं आवरीअवचिती । नाही तरी खोडा पडसी की ॥५॥ बाराजणे फुगवितील गाल । शेवटी तुम्हीच बांधिलेजाल । तुमचे होतील बेताल । तेंव्हा तुम्हांस कोणसोडवील की ॥६॥ सारे कडेचे पोहणार । दहाआणि पांच पोर । एकनाथ करितो जोहार । अक्कल धरा की जी मायबाप ॥७॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८७४
📿 (बाळक्रीडा अभंग)
3874.
(बाळक्रीडा अभंग)
समाधान त्यांची इंद्रिये सकळ । जया तो गोपाळ समागमे ॥१॥
गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी । मग त्या बाहेरी काय काम ॥२॥
काम काज त्यांचे सरले व्यापार । नाही आप पर माझे तुझे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८७५
📿 (बाळक्रीडा अभंग)
3875.
(बाळक्रीडा अभंग)
कृष्णाचिया सुखे भुक नाही तहान । सदा समाधान सकळांचे ॥१॥
कळलेंचि नाही झाले किती दिस । बाहेरिल वास विसरली ॥२॥
विसरु कामाचा तुका म्हणे झाला । उद्वेग राहिला जावे यावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८७६
📿 (बाळक्रीडा अभंग)
3876.
(बाळक्रीडा अभंग)
जावे बाहेरी हा नाठवे विचार । नाही समाचार ठावा काही ॥१॥
काही न कळे ते कळो आले देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठी भक्त देहावरी । आणिताहे हरी बोलावया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८७६
📿 जोहार मायबापजोहार ।
3876.
जोहार मायबापजोहार । मी अविद्यानगरीचा महार साचार माझ्याने हे नगर । आकारासी आले की जी मायबाप ॥१॥ नगर तेंरचिवेंलें ब्रह्मीयान । आंत घर दिधले बांधून । कामसांगितले त्याने । तेंच करित आहे की ॥२॥ म्यांसहा चाकर ठेविले । ते माझ्या बळा वर्तती वहीलें । मला गांजीती बळे । अन्याय नसता की ॥३॥ तुम्ही अवघे एकत्र झाला । माझे घर मोडावयाचामनसोबा के ला । जरी माझे अगत्य असेलधन्याला । तरीच मजला ठेवील की ॥४॥ आतांकलियुगाचे ठायी । मी माझे वसे सर्वांचे हृदयी । माझे कामक्रोधाचे ठायी । माझे मजपाशीचकी ॥५॥ त्यामाजी संत सज्जन । रूपी मिळालेपरिपूर्ण । ते मानस मनरंजन । भक्त म्हणोनीकी ॥६॥ एका जनार्दनी म्हणे देवा । अविद्येचासंग मज नसावा । जन्ममरणाचा ठेवा । तोडूनटाकावा की जी मायबाप ॥७॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८७७
📿 (बाळक्रीडा अभंग)
3877.
(बाळक्रीडा अभंग)
नाही नाश हरी आठविता मुखे । जोडतील सुखे सकळ ही ॥१॥
सकळी ही सुखे वोळली अंतरी । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥
येऊ विसरली बाहेरी गोपाळे । तल्लीन सकळे कृष्णसुखे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८७७
📿 जोहार मायबाप जोहार ।
3877.
जोहार मायबाप जोहार । मी तोसूर्यवंशी रामाजी बाजीचा महार । माझे नांवआत्मनाक महार । सारा कारभार धन्याचे रजेनेंकरितो की जी मायबाप ॥१॥ खोपटामाजी कायकाय राहाय । हाडाचे खोड्यांत पडतील पाय । तोंड चुकविता विज्जत जाय । मग वाचुन करावेंकाय की जी मायबाप ॥२॥ तल्लफ वाढवी फार । लक्ष चौयाऐंशी वरातदार । यमाजी हुजुरचामहालदार । त्याचा मार पुरे पुरे की जीमायबाप ॥३॥ जोहार पाटील बाजी । तुम्हीदरबारासी काय राजी । बाकी शेकली आजी । सांगू आले की जी मायबाप ॥४॥ मूदत जवळीआली । ताकीद पाहीजे केली । कित्येक मारीतझोडीत नेली । माझी साच बोले नोहे की जीमायबाप ॥५॥ टाकून देहेगांव । डोई बोलूनपालटा नांव । घर सोडून देवळी राहाव । हातीकाठी असू द्यावी की जी मायबाप ॥६॥ एकाजनार्दनीं महार । संतसभेसी केला जोहार । तेणेंमरणाची वेरझार । चुकेल की जीमायबाप ॥७॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८७९
📿 (बाळक्रीडा अभंग)
3879.
(बाळक्रीडा अभंग)
काकुळती एके पाहाती बाहेरी । तया म्हणे हरी वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक जाले ते काळी आनंद । कळला गोविंद साच भावे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८७९
📿 जोहार जी मायबाप जोहा
3879.
जोहार जी मायबाप जोहार । मीएकनाथ महार । सांगतो सारासार विचार । तोऐका की जी मायबाप॥१॥गांवामधीं कुळे पांचसाचार । पंचवीस तयांचा विस्तार । जीवाजीचेंठाणे खबरदार । बैसले की जी मायबाप ॥२॥ गांवास असती चवदा वेशी । खिडक्या शोभतीबावीस त्यासी । बुरूज तेरा चौपासी । राखी द्वारीबैसले की ॥३॥ पाचांचा हा विस्तार । पंचवीसप्रजेचा बडीवार । तेथे जीवाजी हुद्देदार । साराकारभार करिती की ॥४॥ जीवाजीने करूनिविचार । घेतले हाती सहा कामगार । दासीसहपरिकर । काम करू लागले की ॥५॥ सहा जेठेवीले कामगार । त्यांनी गांवाचा केला नाहींविचार । जीवाजीस अष्टाधिकार देऊनि स्वाधीनकेला की ॥६॥ ऐसे जाहले सर्व एकाकार । पडलागांयांत अंध:कार । शेटे महाजन सरदार । जातीनिघून की॥७॥एका जनार्दनी म्हणे । जीवाजीचे वोस पडले ठाणे । आले यमाजीचेंधावणें । नेले धरून की जी मायबाप ॥८॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८८०
📿 (बाळक्रीडा अभंग)
3880.
(बाळक्रीडा अभंग)
गोकुळींची गती कोण झाली परि । पाहो आला वरी इंद्रराव ॥१॥
इंद्रापाशी मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलो ॥२॥
आता जीव नाही सांगावया रानी । पुरिले पाषाणी शिळाधारी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८८१
📿 (बाळक्रीडा अभंग)
3881.
(बाळक्रीडा अभंग)
नाचता देखिली गाई वत्से जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥
लागला पाऊस शिळांचिये धारी । वांचली ही परी कैसी येथे ॥२॥
येथे आहे नारायण संदेह नाही । विघ्न केले ठायी निर्विघ्न ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८८१
📿 जोहार मायबाप जोहार ।
3881.
जोहार मायबाप जोहार । कायापूरशहर तेथील मी महार । पाहू जालो दरबार । धन्याचा की जी मायबाप ॥१॥ पाटील जीवाजीअवधारी । जो का ग्रामींचा सत्ताधारीं । परीदिवसाच करितो चोरी की जी मायबाप ॥२॥ आशा पाटलीण तोंडाळू फार । उगीच फीरतीदारोदार । सांगे अक्षयासी व्यवहार । फजितखोरकी जी मायबाप ॥३॥ मनाजीपंत कुलकर्णी । त्याचे हाती खतलेखणीं । त्याची जैशी जैशीकरणी । तिकडे तिकडे कुळे जाती की जी मायबाप ॥४॥ यमाजी बाबा हुजुरचा महालदार । त्याचेजीवावरील महार । त्यासींनाही पडला व्यवहार । दरबार शुध्द करावा की जी मायबाप ॥५॥ मगजीवाजी राहविलें । मुळच्या शिवाजीसआणविलें । पाटीलकीचें वस्त्रदान दिधले । ग्रामत्याजकडें लाविला की जी मायबाप ॥६॥ तेथीलसांडबुध्दी वाटली भली । गांवामध्ये अक्षयनांदविली । नित्य नेहमी बोलती जाहली । खरीकेली हाक देऊनी की जी मायबाप ॥७॥ मजमहाराची महारकी । फिरती असे अनेकीं । एकाजनार्दनीं लौकीकी । दिला पोषाख यदुविरे की जीमायबाप ॥८॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८८२
📿 जोहार मायबाप जोहार ।
3882.
जोहार मायबाप जोहार । याच गांवचामी महार । सांगेन साऱ्या गांवचा विचार । सविस्तर परिसा की जी मायबाप ॥१॥ गांवचेधनी मिरासदार । पाटलीण आवा खबरदार । तेथेंपांच पोरांचे घर । बांधोनि रहाती की० ॥२॥ जोहार जी पाटीलबोवाजी । पाटलीण आवा करूनीराजी । सारे गांवची केली भाजी । परी धनी नाहीठेवीलें राजी । गुंतला पाहुन आवाजीसकी० ॥३॥ तुमची वागणूक पाहून बरी । धन्यानेगांवचें केले अधिकारी । गांवातील जमिन वर्तवालसारी । ती तुम्ही केली पडीक भारी की. ॥४॥ शेत अवघे साडेतीन चाहूर । तुम्ही तेथीलवतनदार । पीक पीकवावें सार असार । मुद्दलधन्याचा विचार करा की०॥५॥मुळीचे केले नाहींपीक । पुढे बाकीसाठी कराल काय एक । धन्याचीबाकी टक्का एक । रहाणार नाही की० ॥६॥ बाकीची मूदत सरलियावरी । यमाजीची येईलस्वारी । ते पुढे घालुनियां निर्धारी । नेतील की. ॥७॥ धन्याची तुमची नाही भेट । यमाजीबोवामारून करती कुट । मग तुम्ही तेथे बोभाट । कोणाचा कराल की० ॥८॥ शेत तुमचे हाती आहे । तंव चोखट करूनी ठेवा भोय । एका जनार्दनाचेंपाय । उगेच धरा की जी मायबाप ॥९॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८८३
📿 जोहार मायबाप जोहार ।
3883.
जोहार मायबाप जोहार । माझे नांवविठनाक महार । सांगतो ऐका एक विचार । तोबळकट धरा की जी मायबाप ॥१॥ गांव पांचापाटलांचा । पंचवीस प्रजेचा । तेथे कारभार सहाजणांचा । तो ऐका की जी मायबाप॥२॥ज्याधन्याचे पदारी शेर । त्यासी नाही कधी जोहार । अवघा आईजींचा कारभार । काम करितो की जीमायबाप॥३॥अबाजीनी हवाली केला गांव । धन्यांचे विसरला नांव । तलफ आल्यावरी ठाव । पळावयां कैंचा की जी ॥४॥ जेव्हा तलफ लागेबाकीची । तेंव्हा तुम्हा आम्हा सबुध्द कैंची । म्हणवूनियां सहा जणांची । भीड धरू नका कीजी मायबाप ॥५॥ सहा जणे रहातील एकीकडे । गांठ तुम्हा आम्हासीच पडे । मग कोणीकडेतिकडे । हालों न देती की जी मायबाप ॥६॥ कराभक्तीची कळवाडी । धरा हरिनामाची गोडी । नाहींतरी चौऱ्याऐंशीची बेडी । पायी पडेल की जीमायबाप ॥७॥ तेथील मार्ग सपाट । विष्णुलोकीवाजवा घांट । मग धुडधुडा वाट । धांवाल की जीमायबाप ॥८॥ एका जनार्दनी कुळवाडी मोठा । तेणे बाकीस मारला फांटा । उघडा केला दारवंटा । कैलासाचा की जी मायबाप ॥९॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८८४
📿 जोहार मायबाप जोहार ।
3884.
जोहार मायबाप जोहार । मीजनार्दनाचा एका महार । सांगतो तुमचे नगरींचासमाचार । तो ऐका की जी मायबाप ॥१॥ नगररचना केली । बारा वेशी तया ठेविली । नवखिडक्यांची चाली । तेथे ठेविली की ॥२॥ गांवचीरचना जाहली पूर्ण । कळस आणि पाया एकचिजाण । जागोजाग वेशिला राखण । मज ठेविलेंकी ॥३॥ जीवशिव अधिकारी । नगराचे मुख्यकारभारी । जीवाजी तेथे वहिवाट करी । शिवाजीउगेच पहाती की ॥४॥ जीवाजीचे कारभारी । कामक्रोधादि अधिकारी । मना वाटेल तैशा परी । गांवात नाचती की ॥५॥ जीवाजीचे न चले कांहींमनाजी देती ग्वाही । दंभाजीची भल भलाई । सहज जाहली की ॥६॥ मिळाले एकमेंकाचेमिळणी । गेले माझ्या धन्यास विसरूनी । शेवटीपरिणाम बरवेपणीं । न दिसे की ॥७॥ येतीयमाजीची चिठी । जीवाजीसी धरूनी उठाउठी । नेतील जेव्हा शेवटी । मग दु:ख वाटेल की ॥८॥ __ हे अवघे रहाती एकीकडे । जीवाजीसी पडेलकोडें । पायी ठोकतील खोडे । मग रडो लागतीलकी ॥९॥ एका जनार्दनी म्हणे । सावधपणे तुम्हीरहाणें । जन्ममरणाचें पेणे । चुकवावें की जीमायबाप ॥१०॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८८५
📿 (बाळक्रीडा अभंग)
3885.
(बाळक्रीडा अभंग)
ये दशे चरित्र केले नारायणे । रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रूपे अनंते । पुढेहि बहुत करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे । केला नारायणे अवतार ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८८५
📿 जोहार मायबाप जोहार ।
3885.
जोहार मायबाप जोहार । देशमुखदेसाई ठाणेदार । जीवाजीपंत हुद्देदार । करितीकारभार गांवचा की जी मायबाप ॥१॥ गांववसविला धन्यानें । दहा रस्ते पंचविस ठाणे । सात -खिडक्या गांव कोश पेणे । तेथे आहेत की ॥२॥ गांवची पांढर परिपूर्ण । नांदती शेटेआणि महाजन । जीवाजीस अभय देऊन । पाठविले धन्यानेकी ॥३॥ जीवाजी आले गांवांत । गांव पाहिलादरोबस्त । कारभारी घेऊनी आपुले हातात । वागवू लागले की ॥४॥ जोंवरी नव्हतीआवाजीची भेट । तोंवरी जीवाजीने भरली पेठ । जाहला सर्व गांवचा बोभाट । आवाजीचें नांवेंकी ॥५॥ आवाजीने नाशिला गांव । मोडलाधन्याचा बाकीचा ठाव । शेवटी जीवाजीचे वैभव । जाईल की ॥६॥ जीवाजी तुमचे नाही धड । यमाजी बावाची होईल होड । तुम्हावर हे सांकड । येईल की ॥७॥ आवाजीचें करा काळे तोंड । इचेपायीं तुम्हावर येईल बंड । शेवटी यमाजीचा दंड । न चुके की ॥८॥ आता सांगतो ते करा । धन्याचा हिशोब चुकवा सारा । पडिकाचा सारा दोरा । ठेवू नका की ॥९॥ कांही ठेवाल धन्याची बाकीतर सोडाल जागा होईल पारखीं । एका जनार्दनींओळखी । धन्याची तुमची नोहे की जीमायबाप ॥१०॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८८६
📿 (बाळक्रीडा अभंग)
3886.
(बाळक्रीडा अभंग)
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती ते नष्ट परपीडा ॥१॥
परपीडा करी दैत्य कंसराव । पुढे तो ही भाव आरंभिला ॥२॥
लाविले लाघव पाहोनिया संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८८७
📿 (बाळक्रीडा अभंग)
3887.
(बाळक्रीडा अभंग)
सैन्य जन हासे राया जाले काई । वासपे तो ठायी आपणासि ॥१॥
आपणा आपण जाय सती जैसी । वैरभाव ज्यांसि भक्ति नाही ॥२॥
नाही याचा त्याचा भाव एकविध । म्हणउनि छंद वेगळाले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८८९
📿 (बाळक्रीडा अभंग)
3889.
(बाळक्रीडा अभंग)
जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हासे कंसा ॥१॥
सावध करिता नये देहावरी । देखोनिया दुरि पळे जन ॥२॥
जन वन हरी झालासे आपण । मग हे लोचन झांकियेले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८८९
📿 जोहार मायबाप जोहार ।
3889.
जोहार मायबाप जोहार । मी विठोबापाटलाचा महार । सांगतो सारासार विचार । ऐकाकी जी मायबाप ॥१॥ गांव तो पांचा पाटलांचा । पंचवीस प्रजांचा । येथे सहाजणांचा कारभारकी ॥२॥ ज्या धन्याचे हे शहर । त्या धन्यासीनाहीं जोहार । अवघा ओढीत कारभार । ऐजीकडेकी ॥३॥ ऐजीची चाली फार । सारा ओढीतातीकारभार । परी सहाजणांसी आधार । ऐजीचाचकी ॥४॥ बाप तुम्ही धन्यासी राजी राखा । नाहींतरी शेवटी होईल वाखा । मग कोणी नाही सखा । सोडविता की जी मायबाप ॥५॥ कामाजी बाजीहद्देदार । क्रोधाजी हा सरदार । यांचे वेगळालेविचार । ऐका की जी मायबाप ॥६॥ मदाजीबाजीचे वेगळे बंड । त्यासी मिळाला लोभ भावंड । अवघ्यानी मिळोनी थोतांड । रचिलें की जीमायबाप ॥७॥ गांव तो होता चांगला । परी यासहाजणांनीच नाश केला । तुम्हीही त्यासीचमिळाला । हे बरें काय की जी मायबाप ॥८॥ परीते रहातील एकीकडे । शेवटी गांठ तुम्हांसीचपडे । मग इकडे ना तिकडे । हो ना की जीमायबाप ॥९॥ ऐजीने यांस कारभार दिला । यांनीच गांवचा नाश केला । शेवटी खाईलतुम्हांला । हे बरें की जी मायबाप ॥१०॥ गांवांतील तीन पांचथोर । पंचवीस त्यांचा विस्तार । घडी घडी त्यांचा समाचार । घेत जावा की जीमायबाप ॥११॥ रयतेचे फार हित करावे । धन्याचे कामासी रूजू असावे । धनी सेवेसी तत्परव्हावें । लागते की जी मायबाप ॥१२॥ तुम्हांसधन्याने दिला गांव । तुम्ही विसरला त्याचे नांव । तलब आलिया लपवाया ठाव । मग कैंचा की जीमायबाप ॥१३॥ तुम्ही धन्यासी करिता चोरी । ऐजीकडे करिता येरझारी । परी या सहाजणांसीसारी दोरी । तुमचीच की जी मायबाप ॥१४॥ परीजेव्हां होईल ठावें । तेव्हा कळो येईल स्वभावे । घडी घडी आपुले हित करावे । लागते की जीमायबाप॥१५॥ जेव्हा तलब होईल धन्याची । तेव्हा तुम्हा मुदत कैंची । म्हणोनी सहा जणांची । भीड धरूं नका की जी मायबाप ॥१६॥ आता । ऐजीची आस्था सोडा । धन्याची बाकी हळुहळुझाडा । नाहींतरी पायी पडेल खोडा । प्रपंचाचाकी जी मायबाप ॥१७॥ आता असो अधीउपाधी । धन्याची भेट घ्यावी आधी । ते मी सांगतोंसुबुध्दी । ऐका की जी मायबाप ॥१८॥ परि मीलहानसा दिसतो महार । मजवरी धन्याचिअखत्यार । बहूत धन्याचा प्यार । मज नफरावरकी जी मायबाप ॥१९॥ सद्भाव शांतीसी घ्यावें । मज पाठीसी तुम्ही असावे । जेथे धणी धर ठावें । मज नफरास की जी मायबाप ॥२०॥ श्रवणाचीधरावी वाट । कीर्तनाचा चढावा घाट । विष्णुस्मरणाचा संघाट । आहे की ॥२१॥ पुढेआहे विश्रांतीचे स्थान । सज्जनांचे पाद सेवन । दास्यत्व अर्चन वंदन । ध्यान मार्ग की ॥२२॥ तेथे जाता न लगे उशीर । समीप जनार्दन दातार । सख्य भक्तीचे मंदीर । आहे की॥२३॥पुढे आहेधन्याचें घर । तेथे जाऊन करावा जोहार । मुखीजपावा परात्पर । जवळींचा की ॥२४॥ जेव्हाभेटी होईल धन्याची । तंव नित्य दिवाळी सुखाची । मग सर्वसत्ता तुमची । होईल की ॥२५॥ जेथेंआहेत धनीं । तेथे जावे लोटांगणी । मग स्वतांचहोईल मिळणी । आत्मसुखाची की ॥२६॥ यामागे गेले थोर थोर । नारदादि शुकेश्वर । धन्याचेदरबारी निरंतर । राहताती की ॥२७॥ जे जे यामार्गे गेले । ते धन्यासी रूजू झाले । जीवन्मुक्तिपावले । ऐका की ॥२८॥ जोहार मायबाप जोहार । गव्हाची रोटी तुपाची धार । धन्यांनी पूरवावी । अपार । मज नफरास की ।॥२९॥ महार बोलतोम्हणोनि नका जाऊंगर्वे । नाही तरी शरीर राहीलहिरवें । आपुले स्वहित होईल बरवे । ते करावे की ॥३०॥ बाकी साठी आपली मुळभुई सोडाल । परमुलखा जरी जाल । तरी बाकीचा निकाल । नाही की॥३१॥धरा भावभक्तिची कुळवाडी । कांढा शेतांतील पेंढी । नाही तरी पायी पडेल बेडी । अविद्येची॥३२॥हे कायापूर नगरी । ब्रह्मयानेरचिली खरी । म्या विवे के जाणूनि बरी । आत्मरूपी आर्पिली की॥३३॥एका जनार्दनींकुळवाडी मोठा । त्याने बाकीस मारिला फांटा । अखंड कैलासींचा दारवंटा । मोकळा केला की॥३४॥अखंड कैलासींचे रहाणे । गुरूजनांचे हेचदेणें । सुखसमाधी असणें । ऐका की जी मायबाप॥३५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८९०
📿 (बाळक्रीडा अभंग)
3890.
(बाळक्रीडा अभंग)
झालो स्वये कृष्ण आठव हा चित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥
उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
तोवरी हा देव नाही तयापासी । आला दिसे त्यासि तोचि देव ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८९१
📿 (बाळक्रीडा अभंग)
3891.
(बाळक्रीडा अभंग)
वाया तैसे बोले हरीसी अंतर । केले होती चार भयभेदे ॥१॥
भेदभय गेले नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥२॥
झाली भेटी कंसा हरीशी निकट । सन्मुखचि नीट येरयेरा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८९३
📿 जोहार पाटील बाजी । च
3893.
जोहार पाटील बाजी । चावडीवरचला ना का जी । ऐसे सांगू आला आजी । बाकीबहुत सेकली की जी मायबाप ॥१॥ कोपटामध्येलपतां काई । हाडाचा खोडा पडेल पायी । दांतविचकून इज्जत जाई । संसारावांचून काई की जीमायबाप ॥२॥ पाप दुराई बांधितीं पदरी । तुमचाप्राण वांचेल जरी तोंड दाखवाना दरबारी । सभेमाजी संतांच्या की जी मायबाप ॥३॥ वरचेवरखातां पीक । धनी लावील तुम्हा सीक । मगमागवील भीक । तेव्हा साचे लटकें कळेल की जीमायबाप ॥४॥ शेत अवघे पांच कोस । तेंही तुम्हींपाडिलें ओस । ही पुंडाई किती दिवस । तुमचेतुम्हांस बरे वाटे की जी मायबाप ॥५॥ यंदाआली देवाची पाळी । का जी तोंडे करिता काळी । चावडी चला एक वेळीं । शिव्यागाळी देऊ नकाकी जी मायबाप ॥६॥ आज कुळकर्णी स्वाधीनकरा । आड खर्चाचा ताळा धरा । गायाळ मायाळमाप करा । तेणे निवांत व्हातु की जी मायबाप ॥७॥ आजी शेकदारी बरी करा।केल्या कमाईसनेऊं नका घरा । येईल हुजुर दरसाल करा । अव्वल साधण्या की जी मायबाप ॥८॥ उगीच कांकोंडीतां गुरे । गांवीचें का बुजवितांद्वारे । झाडाफाडा बरें जोरें । उणे पुरे चुकेना की जी मायबाप ॥९॥ बाप शुध्दी बाळी आली । फिकीर पाहीजेलौकर केली । कितीक मारीत झोडीत नेली । माझीबोली साच माना की जी मायबाप ॥१०॥ यमगचांडी धरी । तेव्हा तुमची फिर्याद कोण करी । डोळे फिरती वरच्या वरी । व्हा लवकरी सावध कीजी मायबाप ॥११॥ बाकी शेकली फार । घरोघरीआडवितां दार । घडिघडीतूंन बोला उत्तर । धन्याचे की जी मायबाप॥१२॥हे माझे ऐकानाकांहीं । धुन्याची तुम्हा देता दुराई । वरते पायखालती डोई होईल की जी मायबाप ॥१३॥ लिहितच होती रोखे । गुरूवचनीं करविलें शिक्के । गांड गुडघे खाल धक्के प्रपंच धाके की जीमायबाप ॥१४॥ यम जमाखर्च किती । ऐसे विचारा । जी चित्ती । कबुलायात करूनि नुस्ती । तीही रितीबरी नव्हे की जी मायबाप ॥१५॥ वार्ता जायाआली फार । कोण कोणाचा सोसला मार । टाकुनद्यावा अंहकार भार । चला हुजुर एकाएकी की जीमायबाप ॥१६॥ लांच घेता कानकोंडें । तेव्हांबोलाल कोण्या तोंडे । चहूंकडून पडतील धोंडे । श्वास कोंडे बोलता की जी मायबाप ॥१७॥ बाबशिल्लक वाढली फार । चौऱ्याऐंशी लक्ष वरातदार । यमाजी बाजी हुजुरचा महालदार । त्याचा मार पुरेपुरे की जी मायबाप ॥१८॥ हा टाकुन द्यावा गांव । पैसे वाटुंना पालटा नांव । घर सोडून देवळाचाठाव । हांती काठी असो द्यावीं की जीमायबाप ॥१९॥ धरणे येईल एकाएकी । तेव्हाअवघे परके लोकी । माझे तेचि निजे मुखी । पाटीलकी सोडून भोगाना की जी मायबाप ॥२०॥ ब्रह्मानंद करितो जोहार । जनार्दन बावाचाविचार । लाभ तुरूत काय बोलू की जीमायबाप ॥२१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३८९४
📿 (बाळक्रीडा अभंग)
3894.
(बाळक्रीडा अभंग)
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हासे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये प्राकृत म्हणो यासि ॥२॥
यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाही ठाव धांडोळिता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जोहार ३८६२ ते ३८९८›
📿 अभंग क्र. ३८९४
📿 जोहार मायबाप जोहार ।
3894.
जोहार मायबाप जोहार । तू कोण्यागांवीचा महार।पुसाल जरी साचार । तरी सादरपरिसा की जी मायबाप ॥१॥ निराकार माझामुळचा ठिकाणा । भक्तांसाठी सोडीला जाणा । वस्ती करू कायापुरीच्या खुणा । सांगेन की जीमायबाप ॥२॥ जोहार मायबाप जोहार । मीपार्वतीच्या गळ्याचा हार । ईश्वराचा कारभार । मज नफराचे शिरी की जी मायबाप ॥३॥ अखंडदारी पडला असतो । प्रेमाचा तुकडा मागुन खातो । सारी रात्र गोंवरापाशी जागतों । धन्याला दुवा देतोंकी जी मायबाप॥३॥ ४तुम्हीं मुळींचा ठाव सोडुनका । धन्याला तुम्ही विसरूं नका । विसरल्यासपावाल धक्का । अंतकाळीं की जी मायबाप ॥५॥ वस्तीकरू आम्हीसाचें । समस्त कुळवाडीनगरीचें । पैके टाका धन्याचे । बाकी शेकू नका कीजी मायबाप ॥६॥ शेवटी पट्टी झाली । आसामीवर द्वाही दिधली । मज नफरास आज्ञाकेली । धांडोरा पिटीन की ॥७॥ पैल तो मनासीफितवेखोर । येणे थोर लाविला घोर । और बुधाजीबाबा आपुला पोर । नाही तरी धनी कोपतील कीजी ॥८॥ कामाजी बाजीनें काय बरवे केले । आपआपणासी नाडिले । नाही यासी विचारलें । मागे पुढे की जी मायबाप ॥९॥ मदाजी बाजीचेंतरी वेगळंच थोंब । सारा देता उगीच बोंब । धन्यासी कधी सोम । जन्म नाही की जीमायबाप॥१०॥अंताजी महाजन तो आपुलेठायी । नगर नागविले याचे पायी । पहाता कवडीयाचे पदरी । नाही की जी मायबाप ॥११॥ पहादंभाजी चौधरी । याची वेगळीच भरोवरी । आतांकिती याचे घरी । वेरझारी शिणावे की जीमायबाप ॥१२॥ विकल्प शेट्या तरी सदाच घाण । अखंड पहाती आपुला मान । तोंडावरी बैसेलजेंव्हा वहाण।मग डोळे पुसतील की जीमायबाप॥१३॥ जीवाजी बाबा म्हणे । आम्हीत्यांत रहाणे । आता कोणकोणाची दुखवू मने । शेवटी त्यासींच पुसणे होईल की जीमायबाप॥१४॥जीवाजीबाबा म्हणे कशांतकाय । तरी सर्वही कारभार त्याचाचि हाय । त्यांवांचुन हालेल पान काय । तेहि विचारा की जीमायबाप ॥१५॥ तरी हे रज तम सात्विक बाजी । हा सकळ उभारा याचाच की जी । तरी हे दिलेंराखावी राजी । सत्वाजी बाजी की जीमायबाप ॥१६॥ निवृत्तीपासून प्रवृत्ती जहाली । हीअनुभवाची खुण बाणली । साधुसंतांस की ॥१७॥ पैल ते वांसना आवजीने फितूर केला । घरचा भेदबाहेर दिला । हा विचार माझ्या धन्यास कळला । धनी कोपेल की ॥१८॥ आशाई आवाजीचा मोठाचाळा । ज्यासी त्यासी घालीती डोळा । मागतसेनित्य नवा गोळा । परी सर्व जड जाईल की जीमायबाप ॥१९॥ निंदाई आवाचे तोंड मोठे । मागेमागे मोडती बोटे । म्या सांगितले हट्ट टाकूनबोलतीस नेटे । तू कोण गे बुरसे की ॥२०॥ चिताईची तरी खालतीच मान । जेव्हा तेव्हांघालीती धोन । म्या सांगितले तुज पुसतें कोण । वोंगळ येथे का बैसलीस की ॥२१॥ आता हे घरमाझ्याने हिंडवेना । या बायकोचे कर्तव्य कळेना । जोयासी आवरी तो शहाणा । असे की ॥२२॥ तुम्ही खाल्लेरानी सांगता गोष्टी । येईल धन्याचीचिट्ठी । पैसे टके उठाउठी । बाकी ठेवू नकाकी॥२३॥तुम्ही मागे मागे फार बोलता । हेकळेल माझ्या धन्यास वार्ता । तरी दरबारासीजांता । मग मोठे कठीण की ॥२४॥ तरी हा दहापाटलांचा गांव । पंचवीस प्रजांची हाव । पन्नासाचेंनांव । म्या किती घ्यावें की ॥२५॥ जंववरीचालती भर वस्ती आहे । तंववरी कराल तितुकेहोय । यांत डावाडोल झालिया कराल काय । सांगा की ॥२६॥ मग चालता पायाचे वेगडेवळती । जळत्या खांबासी बांधिती । तेथे मगआपुला सारथी । कोणी नाही की ॥२७॥ तरीपांच मिळून विचार करा । प्यादा जपादा हातीधरा । नाही तरी पडेल फेरा । लक्ष चौऱ्याऐंशीचाकी ॥२८॥ आता आम्ही सांगतो ते ऐंका । तुम्हींडोळे झाकू नका । तुम्हांला जोडेल निजसखा । वैकुंठनाथ की ॥२९॥ मी नफर आहे गाढा । तोडीन यमाच्या दाढा । उघडीन वैकुंठीच्या पेठा । नाम कडाडा गर्जेन की ॥३०॥ मी नफर नोहेखोटा । विघ्न लावीन बारा वाटा । नित्य मुक्तीच्याचोहोटा । रहातो की॥३१॥आजि होय होयहोय । आधी होते एक । एकापासून जहालेंअनेक । शेवटी कांही नाही देख । शून्याशून्यमिळाले की॥३२॥एका जनार्दनी जोहार । येणेकेला सारासार विचार । मोडिला अविद्येचा थार । परब्रह्मीं वास करणे की जी मायबाप॥३३॥