🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५४४
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3544.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
आता पंथ पाहे माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखे ॥१॥
काय करू आता न गमेसे झाले । बहुत सोसिले बहु दिस ॥धृपद॥
घर लागे पाठी चित्ता उभे वारे । आपुले ते झुरे पाहावया ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीमुक्ताईची स्तुति - अभंग ३५४० ते ३५४५›
📿 अभंग क्र. ३५४४
📿 अजानवृक्षांची पाने ज
3544.
अजानवृक्षांची पाने जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथे संशय नाही ॥१॥
ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेके । तो होय ज्ञानी अधिकें । येथे संशय नाही ॥२॥
मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करिती । ते मोक्षपदासी जाती । येथे संशय नाही ॥३॥
अश्वत्थ सिध्देश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पै सार । येथे संशय नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५४५
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3545.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
विनवीजे ऐसे भाग्य नाही देवा । पायाशी केशवा सलगी केली ॥१॥
धीटपणे पत्र लिहिले आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥धृपद॥
जेथे देवा तुझा न कळेचि पार । तेथे मी पामर काय वाणू ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५४७
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3547.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काय झाले नेणो माझिया कपाळा । न देखीजे डोळा मूळ येता ॥१॥
बहु दिस पाहे वचनासी वास । धरिले उदास पांडुरंगा ॥धृपद॥
नाही निरोपाचे पावले उत्तर । ऐसे तो निष्ठूर न पाहिजे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५४९
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3549.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
देई डोळे भेटी न धरी संकोच । न घली काही वेच तुजवरी ॥१॥
तुज बुडवावे ऐसा कोण धर्म । अहर्नीशी नाम घेता थोडे ॥धृपद॥
फार थोडे काही करूनि पातळ । त्याजमध्ये काळ कडे लावू ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गीतामाहात्म्य - अभंग ३५४६ ते ३५५०›
📿 अभंग क्र. ३५५०
📿 गीता गीता वाचे जे म्
3550.
गीता गीता वाचे जे म्हणती । नाही पुनरावृत्ति तया नरा ॥१॥
नित्य वाचे वदता अक्षरे । भवसिंधु तरे अर्धक्षणी ॥२॥
एका जनार्दनी जयाचा हा नेम । तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५५१
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3551.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
धरितो वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाही आला ॥१॥
तळमळी चित्त घातले खापरी । फुटतसे परी लाहीचिया ॥धृपद॥
प्रकार ते काही नावडती जीवा । नाही पुढे ठावा काळ हाती ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५५२
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3552.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
का माझे पंढरी न देखती डोळे । काय हे न कळे पाप यांचे ॥१॥
पाय पंथे का हे न चलती वाट । कोण हे अदृष्ट कर्म बळी ॥धृपद॥
का हे पायावरी न पडे मस्तक । क्षेम का हस्तक न पवती ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५५३
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3553.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काय पोरे जाली फार । किंवा न साहे करकर ॥१॥
म्हणऊनि केली सांडी । घास घेऊ न लाहे तोंडी ॥धृपद॥
करू कलागती । तुज भांडणे भोवती ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५५३
📿 तिसरे अवतारीं नामा उ
3553.
तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पै जाहला ॥१॥
ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे तयासी । तेणे चुकविले शापबंधासी ॥२॥
भागवत मथितार्थ स्वये सांगे आपण । कृष्णावेगळा न जाय अर्धक्षण ॥३॥
यापरी दास्यत्व तेथे निकट केले । एका जनार्दनी म्हणे वंदूं त्यांचीं पाउले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५५४
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3554.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काही चिंतेविण । नाही उपजत सीण ॥१॥
तरी हा पडिला विसर । माझा तुम्हा झाला भार ॥धृपद॥
आली काही तुटी । गेली सुटोनिया गाठी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५५५
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3555.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
निरोपासी वेचे । काय बोलता फुकाचे ॥१॥
परी हे न घेवेचि यश । भिऊ नको सुखी आस ॥धृपद॥
सुख समाधाने । कोण पाहे देणे घेणे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५५६
📿 ऐसे बहु दिन लोटले ।
3556.
ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोले ॥१॥
जाउनी बैसशी राउळीं । सुखें सदा सर्वकाळी ॥२॥
नाही प्रपंचाचा घोर । पुढे कैसा रे विचार ॥३॥
नको धरु छंद मनी । विनवी एका जनार्दनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५५७
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3557.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
मविले मविती । नेणो रासी पडिल्या किती ॥१॥
परि तू धालाचि न धासी । आले उभाउभी घेसी ॥धृपद॥
अवघ्या अवघा काळ । वाटा वाहाती सकळ ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५५७
📿 विठुच्या छंदासी । पड
3557.
विठुच्या छंदासी । पडता आहे रे विवसी ॥१॥
संसाराची वाताहात । नामया होसी तू निवांत ॥२॥
वडिलाची गोष्टी । नामा सांगे जगजेठी ॥३॥
एका जनार्दनी वेधले मन । ध्यानीं मनी विठ्ठल पूर्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५५८
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3558.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
न बैससी खाली । सम उभाच पाउली ॥१॥
ऐसे जाले बहुत दिस । जाली युगे अठ्ठाविस ॥धृपद॥
नाही भाग सीण । अराणूक एक क्षण ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५६०
📿 उभयतां काकुलती येती
3560.
उभयतां काकुलती येती । नाम्या नको करु फजिती ॥१॥
आम्हा आले वृध्दपण । कोण चालवी दुकान ॥२॥
व्यापाराचा नाही धाक । सुखे बैसशी तू देख ॥३॥
अन्नवस्त्र नाही घरी । एका जनार्दनी निर्धारी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५६१
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3561.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
समर्थाचे पोटी । आह्मी जन्मलो करंटी ॥१॥
ऐसी झाली जगी कीर्ती । तुझ्या नामाची फजिती ॥धृपद॥
येथे नाही खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५६२
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3562.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
पुढे तरी चित्ता । काय येईल ते आता ॥१॥
मज सांगोनिया धाडी । वाट पाहातो बराडी ॥धृपद॥
कंठी धरिला प्राण । पायापाशी आले मन ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५६३
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3563.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
कैचा मज धीर । कोठे बुद्धि माझी स्थिर ॥१॥
जे या मनासी आवरू । आत पोटी वाव धरू ॥धृपद॥
कैची शुद्ध मति । भांडवल ऐसे हाती ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५६३
📿 येणे आमुच्या पोरा ला
3563.
येणे आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी ॥१॥
प्रपंचाचा धाक नाही याचे मागे । फ़िरतसे अंगे घरोघरी ॥२॥
घरी कोंडोनिया ठेवितां नामयासी । A आपण त्यापाशी बैसतसे ॥३॥
जातो येतो कैसा न पडेचि दृष्टी । एका जनार्दनी नाही विठु ऐसा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५६४
📿 याचिया छंदा जे पै ला
3564.
याचिया छंदा जे पै लागले । निर्मूलन केले त्यांचे येणे ॥१॥
बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥
हरिश्चंद्र शिबी कोण यांची गती । आपण निवांत चित्ती पाहतसे ॥३॥
एका जनार्दनी याचा छंद नाही बरा । मैंद खरा वाळुवंटीं ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५६५
📿 घालूनिया फ़ांसा वोढी
3565.
घालूनिया फ़ांसा वोढी आपणाकडे । न येता सांकडें घाली बहु ॥१॥
भजातियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वये ॥२॥
ऐशी याची सवे मागाहुनी आली । एका जनार्दनी बोली काय बोलो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५६६
📿 याचिये संगतीं दु:खाच
3566.
याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥
आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥
येणे आमुच्या पोरा लावियेला चाळा । आपण निराळा राहुतसे ॥३॥
एका जनार्दनी ऐशियाची माव । न येता नामदेव कींव भाकी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५६८
📿 शिव्या देता यासी हां
3568.
शिव्या देता यासी हांसतसे सुखें । न मानी कांही दु:खें नाम्यासाठी ॥१॥
ऐसे येणे मोहिलें आमुचिया बाळा । हा कोठोनि काळा आला येथे ॥२॥
एका जनार्दनी पुरविली पाठी । काय याची गोठी सांगावी ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५६९
📿 आम्ही यासी नवस केला
3569.
आम्ही यासी नवस केला । शेखी कामा बराच आला ॥१॥
आम्ही पाहुं पुत्रसुख । हा तो दावितसे दु:ख ॥२॥
आमुचे जाईल दारिद्र्य जन्मांचें । ऐसे मनी होते साचे ॥३॥
एका जनार्दनी कष्टी । येणे पुरविली पाठी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५७०
📿 आमुचिया पोरा । नाही
3570.
आमुचिया पोरा । नाही बैसावया थारा ॥१॥
ऐसा याचा पायगुण । न मिळे खावयासी अन्न ॥२॥
हाटा बाजारासी जाता । जाऊ नेदी पै सर्वथा ॥३॥
माझा नामा कोठे आहे । नामा नामा म्हणोनी वाहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७१
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3571.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
किती करू शोक । पुढे वाढे दुःखे दुःख ॥१॥
आता जाणसी ते करी । माझे कोण मनी धरी ॥धृपद॥
पुण्य होते गाठी । तरि का लागती हे आटी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७२
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3572.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥
जासी एखादा मरोन । पाठी लागेल हे जन ॥धृपद॥
घरी लागे कळ । नाही जात तो शीतळ ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५७२
📿 येणे आमुचे पोरा लावि
3572.
येणे आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची ॥१॥
याचे तो बिढार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे बैसावया ॥२॥
एका जनार्दनी किती यासी बोलू । नायके विठ्ठलु आमुचे तो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७३
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3573.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
आता आशीर्वाद । माझा असो सुखे नांद ॥१॥
म्हणसी कोणा तरी काळे । आहेतसी माझी बाळे ॥धृपद॥
दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५७३
📿 नाम्यासी सांगता नायक
3573.
नाम्यासी सांगता नायके विचार । येणे फ़जितखोर केला नामा ॥१॥
घेउनी जवळी बैसे एकान्तासी । सुचुं नेदी त्यासी कामधाम ॥२॥
शिकविले नायके व्यापारा न जाये । धरले मनी पाय विठोबाचे ॥३॥
एका जनार्दनी यासी युक्ति काय । पुढे कार्य आहे नामयाचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७४
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3574.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
आता हे सेवटी । माझी आइकावी गोष्टी ॥१॥
आता द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥धृ॥
आता करकर । पुढेन करी उत्तर ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५७४
📿 मी तो दरिद्री नाही ज
3574.
मी तो दरिद्री नाही जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आता ॥१॥
या नामयाचें कैसे होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥
आमुचा घराचार येणे बुडविला । पोर फ़ितविला काय करु ॥३॥
या विठोबाचा येणे धरिलासे छंद । आमुचे जाहलें धिंद जगामाजीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७५
📿 (पंढरीस जाणाऱ्या वार
3575.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
बोलिलो ते आता । काही जाणता नेणता ॥१॥
क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥धृपद॥
स्तुती निंदा केली । लागे पाहिजे साहिली ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५७५
📿 कान्ता ही अबला नाही
3575.
कान्ता ही अबला नाही तिसी ज्ञान । माझे वृध्दपण जाहलें आता ॥१॥
नवस करुनी हा मागितला नामा । संसार विश्राम होईल आम्हा ॥२॥
येणे तो मनी धरिला विठ्ठल । याजकडे नाही बोल प्रारब्धेंचि ॥३॥
एका जनार्दनी ऐसा होय कष्टी । तो दामशेटी आपुले मनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७६
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3576.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
माहेरिंचा काय येईल निरोप । म्हणऊनि झोंप नाही डोळा ॥१॥
वाट पाहे आस धरूनिया जीवी । निढळा हे ठेवी वरी बाहे ॥धृपद॥
बोटावरी माप लेखितो दिवस । होतो कासावीस धीर नाही ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५७६
📿 रात्रंदिवस मनी करीतस
3576.
रात्रंदिवस मनी करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझे ॥१॥
माझीया अदृष्टीं नाही पुत्रसुख । नित्त्यानित्य दु:ख आम्हालागीं ॥२॥
चालेना व्यापार मज न चले युक्ति । कैशी आता गति नामयाची ॥३॥
येणे धरिला छंद विठ्ठलाचा मनी । एका जनार्दनी काय करु ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७७
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3577.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
परि तो आहे कृपेचा सागर । तोवरी अंतर पडो नेदी ॥१॥
बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनिया जना उरलासे ॥धृपद॥
सांगितल्याविणे जाणे अंतरिचे । पुरवावे ज्याचे तैसे कोड ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५७७
📿 लोकांचे हे पुत्र संस
3577.
लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगी ॥१॥
सांगता नायके नाही कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनी ॥२॥
एका जनार्दनी ऐसे ऐकोनि दु:ख । मग तो नामा देख काय करी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७८
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3578.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
यावरी न कळे संचित आपुले । कैसे वोढवले होईल पुढे ॥१॥
करील विक्षेप धाडिता मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥धृपद॥
जोवरी हे डोळा देखे वारकरी । तो हे भरोवरी करी चित्त ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५७८
📿 येऊनी राउळा सांगे वि
3578.
येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥
उदईक कापड घेऊनि बाजारासी जातो । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥
व्यापार करावा तो कैसा मी नेणे । जन्मोनि पोसणे तुमचे देवा ॥३॥
आले जे भोगांसी ते करणे लागे । एका जनार्दनी सांगे गुज देवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५७९
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3579.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरी जाऊनिया ॥१॥
करूनिया दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्ते ॥धृपद॥
होतील दाटले सद्गदित कंठी । भरते त्या पोटी वियोगाचे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८०
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3580.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
ऐसी ते सांडिली होईल पंढरी । येत वारकरी होत वाटे ॥१॥
देखिले सोहंळे होती आठवण । चालती ते मात करूनिया ॥धृपद॥
केली आइकिली होईल जे कथा । राहिले ते चित्ता होईल प्रेम ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८१
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3581.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
क्षेम मायबाप पुसेन हे आधी । न घली हे मधी सुख दुःख ॥१॥
न करी तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानी सांगती ते ॥धृपद॥
अंतरीचे संत जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५८१
📿 प्रात:काळ झाला । स्न
3581.
प्रात:काळ झाला । स्नान करुनि नामा आला ॥१॥
जाऊनिया राउळासी । घाली लोटांगण देवासी ॥२॥
जेवूनियां जातो बाजारा । त्वरित येईन माघारा ॥३॥
ऐसे बोलोनि नामा आला । एका जनार्दनी जेवला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८२
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3582.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
होईल माझी संती भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनी बैसे ॥१॥
शृंगारूनि माझी बोबडी उत्तरे । होतील विस्तारे सांगितली ॥धृपद॥
क्षेम आहे ऐसे होईल सांगितले । पाहिजे धाडिले शीघ्र मूळ ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५८२
📿 घेऊनि कापड निघे बाजा
3582.
घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥
व्यापार तो कैंचा मज नाही ठावा । काय वो केशवा करु आता ॥२॥
माझी हे फ़जितीं होईल पांडुरंगा । काय या प्रसंगा करु जाता ॥३॥
एका जनार्दनी ऐसा नामा कष्टी । होऊनी हिंपुटी चालिलासे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८३
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3583.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
दोहींमध्ये एक घडेल विश्वासे । भातुके सरिसे मूळ तरी ॥१॥
करिती निरास निःशेष न घडे । काही तरी ओढे चित्त माये ॥धृपद॥
लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५८३
📿 जाऊनिया माळीं नामा त
3583.
जाऊनिया माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥
देऊनि कापड सुखे आला घरां । सर्व समाचारा विदित केले ॥२॥
धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी । तयांचे पदरी कापड दिले ॥३॥
आठ दिवसां ऐवज घेऊनियां जावा । एका जनार्दनी पहावा हस्त त्याचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८४
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3584.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
बैसता कोणापे नाही समाधान । विवरे हे मन तेचि सोई ॥१॥
घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥धृपद॥
नो बोलावे ऐसा करितो विचार । प्रसंगी तो फार आठवते ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८५
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3585.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
नाही हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करू ॥१॥
पुसाविसी वाटे मात कापडिया । पाठविती न्याया मूळ मज ॥धृपद॥
आणीक या मना नावडे सोहंळा । करिते टकळा माहेरींचा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५८५
📿 देव म्हणे नाम्या व्य
3585.
देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥
जाहले आठ दिवस जाई तू लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावे मागे ॥२॥
वंदूनि श्रीविठ्ठला घरी आला नामा । त्याला बोले दामा जाई आधी ॥३॥
एका जनार्दनी आठ दिन जाहले । नाम्या जाय वहिले ऐवज आणीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८६
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3586.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
तोवरी म्या त्यास कैसे निषेधावे । जो नाही बरवे कळो आले ॥१॥
कोणाचिया मुखे तंट नाही मागे । वचन वाउगे बोलो नये ॥धृपद॥
दिसे हानि परी निरास न घडे । हे तव रोकडे अनुभव ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५८६
📿 येऊनी नामदेव बोले धो
3586.
येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आता ॥१॥
तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हा द्यावा ॥२॥
परि तो प्रत्यक्ष धोंडोबा दगड । अचेतन मूढ जीव नाही ॥३॥
धोंडोबा गणोबा एके ठायी केले । कांही तुम्ही वहिले बोलानाची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८७
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3587.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
माहेरींचे आले ते मज माहेर । सुखाचे उत्तर करिन त्यासी ॥१॥
पायावरी माथा आळीगीन बाही । घेईन लवलाही पायवणी ॥धृपद॥
सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५८७
📿 आणुनी धोंडोबा कोंडिय
3587.
आणुनी धोंडोबा कोंडियेला घरी । मात सांगे हरिजवळी नामा ॥१॥
दामशेटी गेला आपुले कारणा । मागे आणिले जाणा धोंडोबासी ॥२॥
देव म्हणे नाम्या बरें नाही केले । एका जनार्दनी बोले काय तेव्हा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८८
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3588.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
वियोग न घडे सन्निध वसले । अखंड राहिले होय चित्ती ॥१॥
विसरु न पडे विकल्प न घडे । आले ते आवडे तया पंथे ॥धृपद॥
कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिके ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५८८
📿 धोंड्यासी व्यापार को
3588.
धोंड्यासी व्यापार कोणी नाही केला । आज म्या ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥
उभयतां ऐसी बोलती पै गोष्टी । तंव दामशेटी घरी आला ॥२॥
गोणाईनें सर्व सांगितले त्यासी । पुत्र व्यापारासी उत्तम जाहला ॥३॥
एका जनार्दनी ऐका त्याचा व्यापार । बुडविलें घर सर्व आपुलें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५८९
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3589.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
आता माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागलीसे ॥१॥
सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥धृ॥
काय लाभ झाला काय होते केणे । काय काय कोणे साठविले ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५९०
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3590.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
काय करावे म्या केले ते विचार । घडेल साचार काय पाहो ॥१॥
काय मन नाही धरीत आवडी । प्रारब्धी जोडी तेचि खरी ॥धृपद॥
काय म्या तेथींचे रांधिले चाखोनि । ते हे करी मनी विवंचना ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५९०
📿 येवोनियां रागे नाम्य
3590.
येवोनियां रागे नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला ॥१॥
चतुर व्यापारी जाहलासी सुजाण । आता आम्हांकारण काय कमी ॥२॥
तुझिये व्यापारें भोपळा हा घ्यावा । भिकेसी बरवा उपाय असे ॥३॥
एका जनार्दनी दामा बोले क्रोधे । नामा तो सद्वदे उत्तर देत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५९१
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3591.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
आम्हा अराणूक संवसार हाती । पडिली नव्हती आजीवरी ॥१॥
पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलो सदा होतो कामे ॥धृपद॥
वोढवले ऐसे दिसते कपाळ । राहिलो सकळ आवरोनि ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५९१
📿 मालधनी घेउनी आलो असे
3591.
मालधनी घेउनी आलो असे घरा । तुम्ही का दातार शिव्या देता ॥१॥
द्रव्याचा मालक आणूनिया घरी । ठेविला निर्धारी काय भय ॥२॥
चलावें घरासी घ्यावी द्रव्यरासी । न देता गणोबासी घेउन येतो ॥३॥
एका जनार्दनी दामा पुढे आला । नामा विठोबाला कींव भाकी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५९२
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3592.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
बहु दिस नाही माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसाये ॥१॥
आपुल्याला होतो गुंतलो व्यासंगे । नाही त्या प्रसंगे आठवले ॥धृपद॥
तोडिले तुटते जडती जडले । आहे ते आपुले आपणापे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२›
📿 अभंग क्र. ३५९२
📿 जन्मांचा पोसणा तुझा
3592.
जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आता विचार केशिराजा ॥१॥
घरासी पै जाता ताडतील मज । आता तुझी लाज तुज देवा ॥२॥
म्हणे नाम्या न करी काही चिंता । एका जनार्दनी सर्वथा नुपेक्षी देव ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३५९३
📿 (वारकऱ्या बरोबर पत्र
3593.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
होती नेणो झाली कठिणे कठीण । जवळीच मन मने ग्वाही ॥१॥
आह्मी होतो सोई सांडिला मारग । घडले ते मग तिकूनही ॥धृपद॥
निश्चिंतीने होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥२॥