संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८९३
📿 अस्त नाही आता एकचि म
893.
अस्त नाही आता एकचि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालो ॥१॥
साक्षत्वे या जालो गुणाचा देखणा । करी नारायणा तरी खरे ॥धृपद॥
आठवू विसरु पडियेला मागे । आले तेचि भागे यत्न केले ॥२॥
तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हा ऐसी दोन्ही नव्हो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८९४
📿 क्षर अक्षर हे तुमचे
894.
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयाने जग दुरी धरा ॥१॥
तैसे आम्ही नेणो पालटोचि काही । त्यागिल्याची नाही मागे चाड ॥धृपद॥
प्रतिपादिता तू समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥
तुका म्हणे तुम्हा नाना अवगुणी । लागे संपादणी लटिक्याची ॥३
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८९६
📿 मी हे ऐसे काय जाती ।
896.
मी हे ऐसे काय जाती । अवघड किती पाहाता ॥१॥
नाही होत उल्लंघन । नसता भिन्न दुसरे ॥धृपद॥
अंधाराने तेज नेले । दृष्टीखाले अंतर ॥२॥
तुका म्हणे सवे देव । घेता ठाव दावील ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८९७
📿 कवीश्वरांचा तो आम्हा
897.
कवीश्वरांचा तो आम्हासी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥
दंभाचे आवडी बहिरट अंधळे । सेवटासि काळे होईल तोंड ॥धृपद॥
सोन्यासेजारी तो लाखेची जतन । सतत ते गुण जैसे तैसे ॥२॥
सेव्य सेवकता न पडता ठावी । तुका म्हणे गोवी पावती ही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ८९७
📿 येऊनि आळंकावती केला
897.
येऊनि आळंकावती केला क्षेत्रवास | देऊनी चित्तास समाधान ॥१॥
नित्य हरिकथा नामसंकीर्तन | संतांचे दरुशन सर्वकाळ ॥२॥
पंढरीची वारी आषाढी कार्तिकी | विठ्ठल येकाकी सुखरूप ॥३॥
ऐसा बहुत काळ क्रमिलीयावरी | पुत्र अपत्य उदरी होता न दिसे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ८९८
📿 रखुमाई म्हणे ऐकता जी
898.
रखुमाई म्हणे ऐकता जी ताता | संन्यास घ्यावा आता म्हणताती ॥१॥
संतती वाचूनि न घ्यावा संन्यास | ऐसे सांगावे त्यास म्हणितले ॥२॥
निरोपाची वाट पाहे भलत्या मिसे | रखुमाई असे सावधान ॥३॥
असता दुश्चितपणे निरोप पुसिला | जा जा म्हणे दिधला अवसरु ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८९८
📿 न करी आळस रामनाम घेत
898.
न करी आळस रामनाम घेता । वाचे उच्चारिता काय वेंचे ॥१॥
न लगे द्रव्य धन वेचणेंचि कांही । रामनाम गाई सदा मुखी ॥२॥
सोहळे आचार न लगे विचार । पवित्र परिकर नाम मुखी ॥३॥
शुद्ध याति कुळ अथवा चांडाळ । स्त्री अथवा बाळ हो का नीच ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८९९
📿 माया साक्षी आम्ही ने
899.
माया साक्षी आम्ही नेणो भीड भार । आप आणि पर नाही दोन्ही ॥१॥
सत्याचिये साठी अवघाचि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥धृपद॥
पोंभाळिता चरे अंतरीचे दुःख । लांसे फांसे मुख उघडावे ॥२॥
तुका म्हणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९००
📿 संता आवडे तो काळाचा
900.
संता आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचे बाळ जेवी समर्थ ॥१॥
परिसत्ता तेथे नाही एकविणे । मोहे न पवे सीण ऐसे राखे ॥धृपद॥
केले अन्याय ते सांडवी उपचारे । न देखे दुसरे नाशा मूळ ॥२॥
तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाही दया तये ठायी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ९००
📿 मातापिता घरी आहेती स
900.
मातापिता घरी आहेती समस्ते |वर्तमान तयाते श्रुत करू ॥१॥
कृपा करुनी यावे तुम्ही आश्रमासी | सनाथ करावयासी कृपादृष्टि ॥२॥
नेऊनी आश्रमा दिधले आसन | केले श्रुत वर्तमान सिदोपंती ॥३॥
अर्घ्य पाद्यपूजा भोजन सारिले | मग वर्तमान पुसिले सिदोपंती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ९००
📿 जन्म कर्म अवघे व्यर्
900.
जन्म कर्म अवघे व्यर्थ । ज्ञाते विवेकीं घेती अर्थ ॥१॥
हरि हाचिधर्मा मुख्य । रामकृष्ण उच्चारी मुखें ॥२॥
दिन जाऊ नेदी वाउगा जाण । काळाचे जनन रामकृष्ण ॥३॥
एका जनार्दनी जन्म कर्म धर्म । ब्रह्मार्पण वर्म हेंचि खरें ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ९०१
📿 श्रीपाद म्हणती याच्य
901.
श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव | माझे पुण्य सर्व लया जाते ॥१॥
सिदोपंत म्हणत तुम्ही दयावंत | सीघ्र गमनार्थ कीजे स्वामी ॥२॥
जाउनी वाराणसी मठी प्रवेशले | मग पाचारिले चैतन्यासी ॥३॥
तुझे कोणी होते सत्य सांग आता | अन्यथा बोलता उरी नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९०२
📿 ओले मूळ भेदी खडकाचे
902.
ओले मूळ भेदी खडकाचे अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥
नव्हे ऐसे काही नाही अवघड । नाही कईवाड तोच वरि ॥धृपद॥
दोरे चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासे सेवनी विष पडे ॥२॥
तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव । जठरी बाळा वाव एकाएकी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ९०२
📿 पुरुष अथवा नारी आलिय
902.
पुरुष अथवा नारी आलिया संसारी । वाचे हरी हरी भलत्या भावे ॥१॥
सुफळ संसार एका रामनामे । वाउग्या त्या भ्रमे पतन घडे ॥२॥
जन्ममरणाचा तोडॊनियां फांसा । वेगी हृषिकेशा भजा आधी ॥३॥
एका जनार्दनी किती हे सांगावे । गुंतलेती हावे वाउगें ते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९०३
📿 अमर आहा अमर आहा । खर
903.
अमर आहा अमर आहा । खरे की पाहा खोटे हे ॥१॥
न म्हणा देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥धृपद॥
कैचा धाक कैचा धाक । सकिळक हे आपुले ॥२॥
देवचि बरे देवचि बरे । तुका म्हणे खरे तुम्ही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ९०३
📿 भवरोगासी वोखद । रामन
903.
भवरोगासी वोखद । रामनाम हेंचि शुद्ध ॥१॥
येणे तुटे रोग व्यथा । भुक्ति मुक्ति वंदिती माथा ॥२॥
न लगे आणिकाचे काम । वाचे वंदें रामनाम ॥३॥
पथ्य एक शुद्ध क्रिया । एका जनार्दनी लागे पाया ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ९०४
📿 म्हणती सकळ द्विज जाव
904.
म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना | तेथुनी पत्र आणा ते वंद्य करू ॥१॥
नाही जाती कुळ वर्ण अधिकार | क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नोहे ॥२॥
नव्हो देवगण यक्ष ना किन्नर | ऋषि निशाचर तेही नव्हो ॥३॥
ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट | निजबोधे इष्ट स्वरूप माझे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ९०४
📿 योग याग तप नलगे साधन
904.
योग याग तप नलगे साधन । वाचे रामकृष्ण जपे आधी ॥१॥
कायिक वाचिक मानसिक भाव । तेणे सर्व ठाव एकरुप ॥२॥
संसार सांकडें भ्रमिष्टासी पडे । उच्चारिता नाम तया न पडे सांकडे ॥३॥
एका जनार्दनी नेम हाचि राम । सोपे ते वर्म गूढ नको ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९०५
📿 हाती घेऊनिया काठी ।
905.
हाती घेऊनिया काठी । तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥
नेऊनि निजविले स्मशानी । माणसे जाळी ते ठाकणी ॥धृपद॥
काढिले ते ओढे । मागील उपचाराचे पुढे ॥२॥
नाही वाटो आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ९०५
📿 विधी वेद विरुद्ध संप
905.
विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध | नाही भेदाभेद स्वस्वरूपी ॥१॥
अविधी आचरण परम दूषण | वेदोनारायण बोलियेला ॥२॥
स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद | उचित ते शुद्ध ज्याचे तया ॥३॥
म्हणोनिया संती अवश्य आचरावे | जना दाखवावे वर्तोनिया ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ९०५
📿 रामकृष्ण ऐसे नाम । स
905.
रामकृष्ण ऐसे नाम । सुलभ सोपे ते सप्रेम । उच्चारिता नित्य नेम । तया पेणे वैकुंठ ॥१॥
नका करु आळस कोणी । लहान थोर धरा मनी । तुटेल आयणी । जन्म आणि मृत्यूची ॥२॥
आहे मज भरंवसा । एका जनार्दनी ठसा । आळस नका करु सहसा । लहान थोर सकळ ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ९०६
📿 हेचि आम्हा श्रेष्ठ ब
906.
हेचि आम्हा श्रेष्ठ बोलिले परनिष्ठ | असता दुर्घट परी सेव्य ॥१॥
पांडवांचे कुळ शोधिता निर्मळ | कुंद जार गोळ बुद्धिकांसी ॥२॥
भक्ति हे सरती जाति न सरती | ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य ॥३॥
दुर्वास वसिष्ठ अगस्ति गौतम | हे ऋषि उत्तम कुळीचे कैसे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ९०७
📿 नामधारक हो का भलता ।
907.
नामधारक हो का भलता । त्याचे चरणी ठेवीन माथा ॥१॥
न म्हणे उत्तम अधम । मुखी जपता रामनाम ॥२॥
यातीकुळाचें कारण । नाही नामविण ॥३॥
नाम जपे तोचि श्रेष्ठ । एका जनार्दनी वरिष्ठ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९०८
📿 प्रारब्धा हाती जन ।
908.
प्रारब्धा हाती जन । सुख सीण पावसे ॥१॥
करिता घायाळांचा संग । अंगे अंग माखावे ॥धृपद॥
आविसा अंगे पीडा वसे । त्यागे असे बहु सुख ॥२॥
तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९०९
📿 आशा ते करविते बुद्धी
909.
आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह ते पाप कैसे नव्हे ॥१॥
आपुला आपण करावा विचार । प्रसन्न ते सार मन ग्वाही ॥धृपद॥
नावे रूपे अंगी लाविला विटाळ । होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध ॥२॥
अंधळ्यासी नये देखण्याची चाली । चाले ऐसी बोली तुका बोले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ९०९
📿 अवघे जन्म उत्तम । वा
909.
अवघे जन्म उत्तम । वाचे स्मरा रामनाम ॥१॥
अवघे वदती नाम साचे । धन्य धन्य ते दैवाचे ॥२॥
संतसंग सदा । अवघा तया हाचि धंदा ॥३॥
अवघे वर्ण उत्तम । भेदाभेद नाही काम ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ९१०
📿 घेऊनिया पत्र केली प्
910.
घेऊनिया पत्र केली प्रदक्षिणा | साष्टांगी ब्राह्मणा नमन केले ॥१॥
मागोनिया म्हैसा नेवाशासी आले | प्राकृत पै केली गीतादेवी ॥२॥
निवृत्ती म्हणती ऐके ज्ञानदेवा | अनुभव करावा अमृता ऐसा ॥३॥
आदिशक्तिमाता वंदुनिया म्हाळसा | मग तेथुनी सरिसा चालियेले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ९१०
📿 तुज सगुण जरी ध्याऊं
910.
तुज सगुण जरी ध्याऊं तरी तुं परिमित होशी । तुज निर्गुण जरी ध्याऊं तरी तू लक्षा न येसी ।
साचचि वेद पुरुषा न कळे श्रुति अभ्यासेंसी । तो तु नाभाचा जो साक्षी शब्दे केवी आतुडसी ॥१॥
राम राम रामा सच्चिदानंद रामा । भवसिंधु तारक जयतुं मेघःश्यामा ।
अनंत कोटी ब्रह्मांडधीशा अनुपम्य महिमा । अहं सोहं ग्रासुनी हे तो मागतसे तुम्हा ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि›
📿 अभंग क्र. ९११
📿 तिन्ही देव जैसे परब्
911.
तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे | जगी सूर्य जैसे प्रकाशले ॥१॥
धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान | धन्य तो निधान ज्ञानदेव ॥२॥
उपजताचि ज्ञानी हे वर्म जाणोनि | आले लोटांगणी चांगदेव ॥३॥
प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद | बोलविला वेद म्हैसीपुत्रा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५›
📿 अभंग क्र. ९१२
📿 एकपणेंविण प्रसवला ।
912.
एकपणेंविण प्रसवला । विदेही जन्मला श्रीराम ॥१॥
पूर्वी पितामहाचा पिता । तया प्रसन्न सुभानु होता ॥२॥
यालागी सुर्यवंशीं तंव पिता । जन्म जाला श्रीराम ॥३॥
एका जनार्दनी श्रीराम । सर्वहरतील श्रमा ॥४॥