कथा देवाचे ध्यान । क
2245.
कथा देवाचे ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसे पुण्य आणीक नाही सर्वथा ॥१॥
ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥धृपद॥
मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे मना । म्हणता नारायणा क्षणे जळती महा दोष ॥२॥
भावे करिता कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका ॥३॥
अर्थ :
हरिकथा करणे म्हणजेच देवाचे ध्यान केल्यासारखे आहे आणि हरी कथेसारखे इतर कोणतेही श्रेष्ठ साधन नाही. कारण हरीकथेसारखे पुण्य इतर कोणत्याही साधनांमध्ये नाही. कथेमध्ये साक्षात देवच उभा आहे असा खरा शुद्ध भक्तिभाव मनात असावा. हरी कथेमध्ये मनात हरीचे ध्यान करून वाचेने नाम मंत्राचा उच्चार करणे हे सर्वांसाठीच अगदी सोपे आहे. मुखाने केवळ नारायणाचे नामस्मरण जरी केले तरी क्षणात महादोषा सारखे पातके जळून जातात. तुकाराम महाराज म्हणतात जो श्रद्धेने हरिकीर्तन करतो तो स्वतःही तरतो आणि इतर लोकांनाही तारत असतो. मग त्याला नारायणाची भेट होते यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही.
