🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १७९९
📿 सज्जन तो शब्द सत्य ज
1799.
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकासी ॥१॥
एक गुण तो केला दो ठायी । ज्याचा त्यास पाही जैसा तैसा ॥धृपद॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥
परउपकार घडे तोचि भला । नाठ्याळ तयाला दया नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १७९९
📿 धन्य धन्य श्रीगुरुभक
1799.
धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत ॥१॥
गुरुचरणी श्रद्धा गाढी । गुरुभजनाची आवडी ॥२॥
गुरुचेंनाम घेता वाचे । कैवल्य मुक्ति तेथे नाचे ॥३॥
गुरुचें घेता चरणातीर्थ । भुक्ति मुक्ति पवित्र होत ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८००
📿 तुझे नाम मुखी न घेता
1800.
तुझे नाम मुखी न घेता आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥
हे मज देई हे मज देई । आणिक दुजे काही न मगे तुज ॥धृपद॥
बहिरे कान तुझी कीर्ती नाइकता । पाय न देखता जावोत डोळे ॥३॥
मना तुझे ध्यान नाही नित्य काळ । धिग ते चांडाळ जळो जळो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८०१
📿 वेदान्त सिद्धांत पाह
1801.
वेदान्त सिद्धांत पाहणे ते आटी । जनार्दन भेटी निरसली ॥१॥
आगम निगम कासया दुर्गम । जनार्दन सुवर्म सांगितले ॥२॥
न्यायमीमांसा पांतजली शास्त्रें । पाहता सर्वत्र निवारले ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपा केली । भ्रांती निरसली मनाची ते ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १८०२
📿 जन्मोजन्मी आम्ही बहु
1802.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । म्हणोनि विठ्ठले कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारी जाहलो त्यांचा दास । माझा तो विश्वाचा पांडुरंगी ॥२॥
आणिका दैवता नेघे माझे चित्त । गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥
भ्रमर मकरंदा मधासी ती माशी । तैसे या देवासी मन माझे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८०२
📿 गुरुच्या उपकारा । उत
1802.
गुरुच्या उपकारा । उत्तीर्ण नव्हे गा दातारा ॥१॥
माझे रुप मज दाविले । दुःख सर्व हारविलें ॥२॥
तन मन धन । केले गुरुसी अर्पण ॥३॥
एका जनार्दनी आदर । ब्रह्मारुप चराचर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८०३
📿 कवणाचे कारण न लगेचि
1803.
कवणाचे कारण न लगेचि काही । सर्वी सर्वाठायी तू मज एक ।
कायावाचामन ठेविले तुझ्या पायी । आता उरले काई न दिसे देवा ॥१॥
कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवू आता ।
म्हणऊनि निश्चिंत राहिलो मनी । तू चि सर्वा खाणी देखोनिया ॥धृपद॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १८०३
📿 मीच माझा देव मीच माझ
1803.
मीच माझा देव मीच माझा भक्त | मी माझा कृतार्थ सहज असे ॥१॥
बंध आणि मोक्ष मायेची कल्पना | पडली होती मना भ्रांति कैसी ॥२॥
विठ्ठले विचारे दाखविले सुख | होते जे असंख्य हरपले ॥३॥
नामा म्हणे सोय सांपडली निकी | जालो येकायेकी हरिचा दास ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८०४
📿 देवाचरणीं ठाव । तैसा
1804.
देवाचरणीं ठाव । तैसा गुरचरणीं भाव ॥१॥
गुरु देव दोन्ही समान । ऐसे वेदांचे वचन ॥२॥
गुरु देवमाजीं पाही । भिन्न भेद नाही नाही ॥३॥
देवा पुजिता गुरुसी आनंद । गुरुसी पुजिता देवा परमानंद ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८०५
📿 देवाचा भक्त तो देवास
1805.
देवाचा भक्त तो देवासी गोड । आणिकासी चाड नाही त्याची ।
कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघिया हाती अंतरला ॥१॥
निष्काम वेडे म्हणतील बापुडे । अवघिया साकडे जाला कैसा ।
माझे ऐसे तया न म्हणत कोणी । असे रानी वनी भलते ठायी ॥धृपद॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८०७
📿 अनुहात ध्वनि वाहे सक
1807.
अनुहात ध्वनि वाहे सकळा पिंडी । राम नाही तोंडी कैसा तरे ॥१॥
सकळा जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥धृपद॥
ज्ञान सकळांमाजी आहे हे साच । भक्तीविण तेच ब्रम्ह नव्हे ॥२॥
काय मुद्रा कळल्या कराव्या सांगता । दीप न लगता उन्मनीचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १८०७
📿 निद्रीस्ताचे शेजे सर
1807. निद्रीस्ताचे शेजे सर्प का उर्वशी ।पाहो विषयासी तैसे आम्ही ॥ १ ॥
ऐसी कृपा केली माझ्या केशीराजे ।प्रतितीचे भोजे एकसरा ॥ २ ॥
मृण आणि सोने भासते समान ।रत्न का पाषाण एकरूप ॥ ३ ॥
पाया लागो स्वर्ग वरी पडो वाघ ।चित्त स्थिती भंग नोहे नोहे ॥ ४ ॥
नामा म्हणे कोणी निंदा आणि वंदा ।झालो ब्रम्हानंदाकार आम्ही ॥ ५ ॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८०८
📿 नेणे अर्थ काही नव्हत
1808.
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगे व्यापूनिया ॥धृपद॥
मज मूढा शक्ती कैचा हा विचार । निगमादिका पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबड्या उत्तरी हेचि ध्यान ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १८०८
📿 मूर्खाहाती दिले रत्न
1808.
मूर्खाहाती दिले रत्न पारखीसी | तयाच्या मोलासी घेऊ नका ॥१॥
आम्ही तसे जालो आम्ही तैसे जालो | आम्ही तैसे जालो जाणतेची ॥२॥
अंगी नाही बळ होड घाली राया | आम्ही गेलो वाया तेणे न्याये ॥३॥
नामा म्हणे ऐसे केले तयापरी | आम्ही निरंतर तुम्हांसवे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८०९
📿 देवासी लागावे सकळांस
1809.
देवासी लागावे सकळांसी पोसावे । आम्हा न लगे खावे काय चिंता ॥१॥
देवा विचारावे लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघे भले ॥धृपद॥
देवासी उत्पत्ती लागला संहार । आम्हा नाही फार थोडे काही ॥२॥
देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८१०
📿 गुरु माता गुरु पिता
1810.
गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥
थोर पडता सांकडें । गुरु रक्षी मागे पुढे ॥२॥
काया वाचा आणि मन । गुरुचरणींच अर्पण ॥३॥
एका जनार्दनी शरण । गुरु एक जनार्दनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८११
📿 देवा तुज मज पण । पाह
1811.
देवा तुज मज पण । पाहो आगळा तो कोण ॥१॥
तरी साच मी पतित । तूच खोटा दिनानाथ ।
ग्वाही साधुसंत जन । करूनि अंगी लावीन ॥धृपद॥
आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छंद ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८१२
📿 लापणिक शब्दे नातुडे
1812.
लापणिक शब्दे नातुडे हा देव । मनिचा गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥
अंतरिचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणे लागे ॥धृपद॥
तुका म्हणे जरी आपुले स्वहित । तरी करी चित्त शुद्ध भावे ॥२॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८१२
📿 म्या गुरु केला म्या
1812.
म्या गुरु केला म्या गुरु केला । सर्व बोध तेणे मज दिधला ॥१॥
घालुनिया भक्ति अंजन । दावियेले विठ्ठलनिधान ॥२॥
कान फुकुनि निगुती । दिधले संताचिये हाती ॥३॥
एका जनार्दनी गुरु बरा । तेणे दाविले परात्परा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८१३
📿 नव्हे ब्रम्हज्ञान बो
1813.
नव्हे ब्रम्हज्ञान बोलता सिद्ध । जव हा आत्मबोध नाही चित्ती ॥१॥
काय करिसी वाया लटिकाचि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥धृपद॥
मीच देव ऐसे सांगसी या लोका । विषयांच्या सुखा टोंकोनिया ॥२॥
अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनिया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८१३
📿 गेलों गुरुलागीं शरण
1813.
गेलों गुरुलागीं शरण । माझे हारपले मीतुपण ॥१॥
द्वैतभाव गेला देशोधडी । बोध दिठा मज संवगडी ॥२॥
मंत्र सांगे त्रिअक्षर । परात्पर निजघर ॥३॥
जपतां मंत्र लागले ध्यान । सहज खुटलें मीतूंपण ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १८१४
📿 धन्य माझा जन्म धन्य
1814.
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश । धन्य विष्णुदास स्वामी माझा॥१॥
कामधाम माझे केशवाचे पायी । दिननिशी पाहे हारपली॥२॥
शुक सनकादिक जेणे सुखे धाले। ते सुख राहिले माझ्या मनीं॥३॥
जनी म्हणे जगी अलभ्य लाभ झाला । हरी सापडला विटेवरी॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८१५
📿 परिस काय धातु सोने न
1815.
परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपागु ॥१॥
काय तयाहूनि जालासी बापुडे । फेडिता साकडे माझे एक ॥धृपद॥
कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिले ते ॥२॥
चंदनांच्या वासे वसता चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८१६
📿 धन्य गुरुकृपा जाहली
1816.
धन्य गुरुकृपा जाहली । अहंता ममता दुर गेली ॥१॥
घालुनि अंजन डोळा । दाविला स्वयं प्रकाश गोळा ॥२॥
बोधी बोधविलें मन । नाही संकल्पासी भिन्न ॥३॥
देह विदेह निरसले । एका जनार्दनी धन्य केले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८१७
📿 संसाराच्या भेणे । पळ
1817.
संसाराच्या भेणे । पळो न लाहेसे केले ॥१॥
जेथे तेथे आपण आहे । आह्मी करावे ते काये ॥धृपद॥
एकातींसी ठाव । तिही लोकी नाही वाव ॥२॥
गावा जातो ऐसे । न लगे म्हणावे ते कैसे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८१८
📿 आपण काय सादर । विशी
1818.
आपण काय सादर । विशी आम्हा का निष्ठुर ॥१॥
केले भक्त तैसे देई । तुझे प्रेम माझ्याठायी ॥धृपद॥
काय पंगतीस कोंडा । एकातासी साकर मांडा ॥२॥
काय एकपण । पोता घालूनि गाठी खूण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८१८
📿 अनुभवें पंथे निरखिता
1818.
अनुभवें पंथे निरखिता देहभाव । देह नाही विदेही म्हणो वाव ।
लटिका नसतां साचार कैसा ठाव । गेला गेला समूळ भवाभाव ॥१॥
सदगुरुकृपे कल्याण ऐसे जाहलें । द्वैताद्वैत निरसुनी मन ठेलें॥ध्रु॥
कैंचा भाव अभाव उरला आता । देव म्हणे तोटा नाही भक्ता ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८१९
📿 चित्त तुझ्या पायी ।
1819.
चित्त तुझ्या पायी । ठेवुनि जालो उतराई ॥१॥
परि तू खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥धृपद॥
आम्ही सर्वस्वे उदार । तुज देऊनिया व्यवहार ॥२॥
इंद्रियांची होळी । संवसार दिला बळी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८२०
📿 आम्ही पतित म्हणोनि त
1820.
आम्ही पतित म्हणोनि तुज आलो शरण । करितो चिंतन दिवस रात्री ।
नाही तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्ती ॥१॥
आम्हा न तारावे तुम्ही काय करावे । सांगीजोजी भावे नारायणा ॥धृपद॥
अन्याय कोणाचा अंगीकार करणे । तया हाती देणे लाज तेचि ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १८२०
📿 तरावया संसार जडजीव प
1820.
तरावया संसार जडजीव प्राणी | नाव नवखणी नवही मुखे ॥१॥
बैसा नावेवरी नाही भेदाभेद | श्रवणाचे छंदे नाव गेली ॥२॥
अठराहि आवले नावेसी लागले | साहि रंग भरले मिरवताती ॥३॥
चहू मुखे जयाचा न कळे विचार | तेवी अगोचर सहस्रमुखा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८२०
📿 माझे मज कळलें माझे म
1820.
माझे मज कळलें माझे मज कळलें । नाही परतें केले आपणातुनीं ॥१॥
उदकी लवण पडता न निघे बाहेरीं । तैशी केली परी जनार्दने ॥२॥
एका जनार्दनी एकपणे भाव । सर्वाभूतीं देव दाखविला ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १८२१
📿 माझा भाव तुझे चरणी |
1821.
माझा भाव तुझे चरणी | तुझे रूप माझे नयनी ॥१॥
सांपडलो एकमेका | जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥
त्वा तोडिली माझी माया | मी जडलो तुझ्या पाया ॥३॥
त्वा मज केलेंरे विदेही | म्या तुज धरिले हृदयी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८२३
📿 आम्हा सर्वभावे हे चि
1823.
आम्हा सर्वभावे हे चि काम । न विसंभावे तुझे नाम ॥१॥
न लगे करावी हे चिंता । तरणे करणे काय आता ॥धृपद॥
आसनी भोजनी शयनी । दुजे नाही ध्यानी मनी ॥२॥
तुका म्हणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८२३
📿 रात्रीची प्रौढी नोहे
1823.
रात्रीची प्रौढी नोहे सुर्याचा प्रकाश । तोवंरींचे भास आंधाराचा ॥१॥
सुर्याचे उदयीं अंधार हा नासे । तैसे अज्ञानें नासे ज्ञान सर्व ॥२॥
एका जनार्दनी सदगुरुवांचुनी । प्रकाश तो मनी नोहे कांही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८२४
📿 नव्हे काही कवणाचा ।
1824.
नव्हे काही कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥
म्हणोनि तुझ्या पायी । जीव ठेविला निश्चयी ॥धृपद॥
शरीर जायाचे कोंपट । याची काय खटपट ॥२॥
तुका म्हणे वायाविण । देवा कळो आला सीण ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 आत्मनिवेदन कृपादान›
📿 अभंग क्र. १८२४
📿 अठ्ठावीस युगे उभा चं
1824.
अठ्ठावीस युगे उभा चंद्रभागे | परी पालटची नेघे पांडुरंग ॥१॥
उभा उगेपणे पुंडलिकाचेनी सुखे | आहे तेथे लक्ष जैसा तैसा ॥२॥
प्रेम रसरंगे प्रीतीचेनी पांगे | सदा संतसंगे खेळ करी ॥३॥
जो नलभे योगे यागे आणि देहत्यागे | तो सांपडला सर्वांगे हृदयी धरा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८२५
📿 नेघे तुझे नाम । न कर
1825.
नेघे तुझे नाम । न करी सांगितले काम ॥१॥
वाढे वचने वचन । दोष उच्चारिता गुण ॥धृपद॥
आता तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥२॥
तुका म्हणे ठायी । मजपाशी काय नाही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८२७
📿 व्यवहार तो खोटा । आत
1827.
व्यवहार तो खोटा । आता न वजो तुझ्या वाटा ॥१॥
एका नामा नाही ताळा । केली सहस्रांची माळा ॥धृपद॥
पाहो जाता ठायी । खेळसील लपंडायी ॥२॥
तुका म्हणे चार । बहु करितोसी फार ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८२७
📿 जन्मोजन्मींचे संचित
1827.
जन्मोजन्मींचे संचित । गुरुपायीं जडले चित्त ॥१॥
तेंतो सोडिल्या न सुटे । प्रेमतंतु तो न तुटे ॥२॥
दुःखे आदळलीं वरपडा । पाय न सोडी हा धडा ॥३॥
देह गेला तरी जावो । गुरुचरणी दृढ भावो ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८३०
📿 कोण पार नेई भवनदींतु
1830.
कोण पार नेई भवनदींतुनीं । सदगुरुवांचुनी तुम्हालांगीं ॥१॥
अनंत उपाय जरी तुम्ही केले । पार पावविलें नव जाय ॥२॥
नाना तीर्थयात्रा घडल्या तुम्हांसी । परी संतोषासी न पावल ॥३॥
व्रतें तपें यज्ञें दानें चित्तशुद्धि । परी निजपदीं स्थिर नोहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८३१
📿 लाज ना विचार । बाजार
1831.
लाज ना विचार । बाजारी तू भांडखोर ॥१॥
ऐसे ज्याणे व्हावे । त्याची गाठी तुजसवे ॥धृपद॥
फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥२॥
तुका म्हणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥३॥