🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ८
📿 डवरला गिरी कैलास ढवळ
8.
डवरला गिरी कैलास ढवळा । सिंहासन ज्याला ढव-ळेची ॥१॥
पाहता पाहता निवाले लोचन । भव्य ज्याचे ध्यान एक-रूप ॥२॥
ढवळा सर्वांगी देव तो आपण । लेइला भूषण तेंहि तैसे ॥३॥
पर्वताची बाळ पार्वती ढवळी । अर्धांगी शोभली एकरूप ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्री राम जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ८
📿 विरंचीचा बाप क्षीरसा
8.
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥
पुरेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येंचे उदरी तोचि असे ॥२॥
बोलियेंले जे जे नव्हे असत्य वाणी । न येऊ दे मनी शंका काही ॥३॥
माझे हे संचित धन्य धन्य आता । पाहीन मी कांता लक्षुमीचा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. ८
📿 अतंकाळी मी परदेशी ।
8.
अतंकाळी मी परदेशी । ऐसे जाणोनि मानसी ।
म्हणोनिया हृषीकेशी । शरण मी तुज आलो ॥१॥
नवमास गर्भवासी । कष्ट झाले तया मातेसी ।
ते निष्ठुर झाली कैसी । अंती दूर राहिली ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. ८
📿 सुखसागर आपण व्हावे ।
8.
सुखसागर आपण व्हावे । जग बोधे निववावे ॥१॥
बोधा करु नये अंतर । साधू नाहि आपपर ॥२॥
जीव जीवासी पै दयावा । मग करु नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्ती धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 घोंगडी भारुड›
📿 अभंग क्र. ८
📿 (घोंगडीची रूपके)
8.
(घोंगडीची रूपके)
मुळींचा तुम्हा लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥
घ्यावे त्याचे देणेंचि नाही । येचि वाहि देखतसो ॥धृपद॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ८
📿 विठ्ठल हा चित्ती । ग
8.
विठ्ठल हा चित्ती । गोड लागे गाता गिती ॥१॥
आम्हा विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजिवनी ॥३॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ८
📿 आपुलची नटले रूप । भक
8.
आपुलची नटले रूप । भक्तासमीप राहिले ॥१॥
ऐसे ध्यान गोजिरे विटे । उभेंचि नेहटे देखिले ॥२॥
कर मिरविले कटावरी । तो हा वैकुंठींचा हरी ॥३॥
चोखा म्हणे श्रीमुख । पाहता हरे ताहान भूक ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ८
📿 अरज करे छे मिरा रोकड
8.
अरज करे छे मिरा रोकडी । उभी उभी अरज॥धृ०॥
माणिगर स्वामी मारे मंदिर पाधारो सेवा करू दिनरातडी॥१॥
फूलनारे तुरा ने फूलनारे गजरे फूलना ते हार फूल पांखडी॥२॥
फूलनी ते गादी रे फूलना तकीया फूलनी ते पाथरी पीछोडी॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ८
📿 पुढे गेले त्यांचा शो
8.
पुढे गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊ माग घेत आम्ही ॥१॥
वंदू चरणरज सेवू उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडू ॥धृपद॥
अमुप हे गाठी बांधू भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ॥२॥
अवघे होती लाभ एका या चिंतने । नामसंकीर्तने गोविंदाच्या ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ८
📿 अनंत जन्माचे फेडिले
8.
अनंत जन्माचे फेडिले सांकडे । चुकविले कोडे चौऱ्याशिचे ॥
चौऱ्याशिचा फेरा सोशी येरझारा । चुकवी दातारा पांडुरंगा ॥
बोधला म्हणे एक बरे केले । खत हे फाडिले जन्मांतरीचे ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 पोथीबाबत काही नियम›
📿 अभंग क्र. ८
📿 पोथीबाबत काही नियम
8.
8. पोथीबाबत काही नियम
असो. आता 'श्रीनवनाथ भक्तिसार' ह्या पोथीचे पारायण करू इच्छिणार्या पाठकांना या पोथीच्या संदर्भात काही सूचना अवश्य या द्याव्याशा वाटतात. त्या अशा-
१) ही पोथी एक अत्यंत पवित्र वस्तू समजून ती शक्यतो रेशमी कापडात बांधून पवित्र जागी ठेवावी.
२) पोथीचे पारायण करताना पाने उलटण्यासाठी बोटाला थुंकी लावून पाने कधीही उलटू नयेत. (हा नियम अन्य ग्रंथांची पाने उलटतानाही खरे तर अवश्य पाळावा. )
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय ८ वा›
📿 अभंग क्र. ८
📿 🕉अध्याय ८ नवनाथ भक्त
8.
🕉अध्याय ८ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय आठवा - फलश्रुति 👉 परदेशी गेलेला मित्र (प्रियकर) परत येऊन भेटेल व चिंता व व्यथा दूर होईल.
श्रीगणेशाय नमः
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ८
📿 सब चतुरता बरते अपना
८.
सब चतुरता बरते अपना ऐसा न कोई । नीरपखव्है खेले ताथे मिठे अंतर पद्मी ॥१॥
अंतर कुटील रहत खचरमती । उपरी मज नकरी दिन खपती ॥२॥
ऐसा न कोई नीरपखव्हे खेले । प्रभुवैना ऐर रेनी दिन सुपनी ॥३॥
सोई साध सोई सुनी ग्यानी । ज्याकी मिलागी रहिल्यो रसनी ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ८
📿 विठ्ठल श्रीहरी उभा भ
8.
विठ्ठल श्रीहरी उभा भीमातीरी । तिष्टती कामारी मुक्तिचारी ॥१॥
मुनिजना सुख निरंतर लक्ष । भक्ता निजसुख देत असे ॥२॥
पुंडलिक पुण्य मेदिनी कारुण्य । उध्दरिले जन अनंत कोटी ॥३॥
निरानिरंतर भीमारथी तीर । ब्रह्म हे साकार इटे नीट ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 संस्कृत आरती संग्रह›
📿 अभंग क्र. ८
📿 ॥ श्रीरामस्य आरतिः ॥
8.
॥ श्रीरामस्य आरतिः ॥
निजबोध श्रीराम त्वम् जय जय देव । जय जय जय देव ।
परमार्थेनाऽर्तिक्यम् सद्भावेनाऽर्तिक्यम् । पूरितकाम तव ।
जय देव जय देव । जय जय हे देव ॥धृ॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत एकनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ९
📿 कृपाळू उदार माझा ज्ञ
9.
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकार ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावे शरण जाता भेटी । पाडितसे तुटी जन्माव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनी पाय वंदितसे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत मीराबाई निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ९
📿 पायोजी मैंने राम रतन
9.
पायोजी मैंने राम रतन धन पयो ॥टेक ॥
बस्तु अमोलिक दीनी मेरे सद्गुरू । किरपा कर अन पायो ॥१॥
जनम जनमकी पुंजी जगमे । वोहि सभी खोवायो ॥२॥
खरचै नही कोई चोर न लेघे । दिन दिन बढत सवायो ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्री राम जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ९
📿 उत्तम हा चैत्रमास ।
9.
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥१॥
शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमी ॥२॥
मध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥
धन्य मीच त्रिभुवनी । माझे वंशी चक्रपाणि ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत ज्ञानेश्वर महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. ९
📿 आजिवरी होते मी मोकाट
9.
आजिवरी होते मी मोकाट । तंव डोळे फुकट मोडा तुम्ही ॥१॥
समर्थाचे अंगी पडले अवचिती । तुम्हा ऐसी किती चाळविली ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलाची घरवात झाले । जन्मवरी एकांत करुनी ठेले ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. ९
📿 आम्हा आम्ही आता वडील
9.
आम्हा आम्ही आता वडील धाकुटी । नाही पाठी पोटी कोणी दुजे ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवे सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायी । असो जेथे नाही दुजे कोणी ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. ९
📿 मोलाचे आयुष्य वेचूनि
9.
मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय । पूर्वपुण्य होय लाभ याचा ॥१॥
अनंत जन्माचा शेवट पाहता । नरदेह हाता आला तुझ्या ॥२॥
कराल ते जोडी येईल कार्यासी । ध्यावे विठ्ठलासी सुखालागी ॥३॥
सांचलिया धन होईल ठेवणे । तैसी नारायण जोडी करा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. ९
📿 सांडी कल्पना उपाधी ।
9.
सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥१॥
वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥२॥
पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥३॥
एक मन चेष्टा करी । भूते बापुंडी शेजारी ॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 घोंगडी भारुड›
📿 अभंग क्र. ९
📿 (घोंगडीची रूपके)
9.
(घोंगडीची रूपके)
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवे ॥१॥
हा गे चोर धरा धावा कोणी । घरांत राहाटे चहू कोणी ॥धृपद॥
नोळखवे म्या धरिला हाती । देह्यादिप माया लाविली वाती ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 सोमवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ९
📿 भजन करी महादेव । राम
9.
भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघ देव एक पाही । तया ऐक्य दुजे नाही ॥२॥
शिवारामा नाही भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणी आत्मा एक । सर्व घटी तो व्यापक ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 शनिवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ९
📿 मन हे राम झाले मन हे
9.
मन हे राम झाले मन हे राम झाले ।
प्रवृत्ति ग्रासूनि कैसे निवृत्तीसी आले ॥१॥
श्रवण कीर्तन पादसेवन कैसे विष्णुस्मरण केले ।
अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 गुरुवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ९
📿 सदाशिवाचा अवतार । स्
9.
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥
ब्रम्हा सोपान तो झाला । भक्ता आनंद वर्तला ॥३॥
आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायी ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ ज्ञानेश्वरी›📖 सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण १८ अध्याय›📂 सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९. राजविद्याराजगुह्ययोग:›
📿 अभंग क्र. ९
📿 🕉सार्थ श्रीज्ञानेश्व
9.
🕉सार्थ श्रीज्ञानेश्वरी: अध्याय ९. :- राजविद्याराजगुह्ययोग
॥ अथ नवमोऽध्यायःअध्याय नववा ॥ ॥
1-9
तरि अवधान एकवेळे दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥1॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ९
📿 आपुलिया सुखा आपणचि आ
9.
आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥
ते हे सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हाती गदा पद्म ॥२॥
किरीट कुंडले वैजयंती माळा । कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचे आगर । रूप मनोहर गोजिरे ते ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ९
📿 तुळशी वृंदावनी उभा त
9.
तुळशी वृंदावनी उभा तो ब्राह्मण । पुसे घरी कोण आहे बाई ॥१॥
कोणाचे हे घर दिसते साजिरे । मुले आणि लेकुरे काय आहे ॥२॥
ऐकोनि उत्तर चोखयाची कांता । प्रेमजल नेत्रा भरियेले ॥३॥
म्हणे घरधण्यासी विठोबाचा छंद । आठविती गोविंद रात्र दिवस ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ९
📿 का बा पंढरिराया मोकल
9.
का बा पंढरिराया मोकलिले मज । नाठवेचि मज दुजे कांही ॥१॥
मज तंव असे पायांसवे चाड । आणिक कैवाड कांही नेणे ॥२॥
चोखियासी सुख विश्रांति दिधली । माझी सांड केली दिसतसे ॥३॥
निर्मळा म्हणे तुम्ही तो सुजाण । माझा भाग शीण कोण वारी ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १›
📿 अभंग क्र. ९
📿 तोसो लाग्यो नेह रे प
9.
तोसो लाग्यो नेह रे प्यारे, नागर नंद कुमार ।
मुरली तेरी मन हर्यो, बिसर्यो घर-व्यौहार॥
जब ते सवननि धुनि परि, घर आँगण न सुहाइ ।
पारधि ज्यूँ चूकै नहीं, मृगी बेधी दइ आइ॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ९
📿 जेविले ते संत मागे उ
9.
जेविले ते संत मागे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥
सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा । पासूनि सकळा अवघ्या दुरी ॥धृपद॥
परे परते मज न लागे सांगावे । हे तो देवे बरे शिकविले ॥२॥
दुसर्याते आम्ही नाही आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९
📿 अबदुलखानाची भोवली ता
9.
अबदुलखानाची भोवली ताहार । महापाषाण फोडिले खेचर ।
भक्त डळमळिल थोर । रामकृष्ण बाहारी । तुझी वासना तुजचि वरी ।
अभक्तासी कस्टि करी । भक्त रक्षुनी नानापरी गा ॥
भक्तीभाव जयाचा निर्धार । जिवे प्राणासी जे उदार । तेच उरती पैल पार गा ॥