संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८६४
📿 तुम्ही कृपाळुजी देवा
1864.
तुम्ही कृपाळुजी देवा । केलीं सेवा आवडी ॥१॥
करुनी सडा समार्जन । पाळिले वचन प्रमाण ॥२॥
उगाळुनि गंध पुरविलें । सोहोअळे केले दासाचे ॥३॥
ऐसा अपराधी पतीत । एका जनार्दनी म्हणत ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८६५
📿 तुम्ही पुर्ण कृपा के
1865.
तुम्ही पुर्ण कृपा केली । मज दाविली निजमूर्ति ॥१॥
तेणे निवरला शीण । गेले जन्ममरण भान ॥२॥
जे जे मधी होते आड । त्याचे कोडे फेडिलें ॥३॥
जाचलों होतो पषऊर्मीं । पावलों दरुशनों सुख जेणे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८६६
📿 फळ पिके देठी । निमित
1866.
फळ पिके देठी । निमित्य वारियाची भेटी ॥१॥
हा तो अनुभव रोकडा । कळो येतो खरा कुडा ॥धृपद॥
तोडिलिया बळे । वाया जाती काची फळे ॥२॥
तुका म्हणे मन । तेथे सकळ कारण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८६७
📿 हालवूनि खुंट । आधी क
1867.
हालवूनि खुंट । आधी करावा बळकट ॥१॥
मग तयाच्या आधारे । करणे ते अवघेचि बरे ॥धृपद॥
सुखदुःख साहे । हर्षोमर्षी भंगा नये ॥२॥
तुका म्हणे जीवे । आधी मरोनि राहावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८६७
📿 चंद्र सूर्यादि बिंब
1867.
चंद्र सूर्यादि बिंब लिहिताती सांग | परि प्रकाशाचे अंग लिहिता न ये ॥१॥
संन्यासाची सोंगे आणिताती सांग | परि वैराग्याचे अंग आणिता न ये ॥२॥
नामा म्हणे कीर्तन करिताती सांग | परि प्रेमाचे ते अंग आणिता न ये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८६८
📿 धावे माते सोई । बाळ
1868.
धावे माते सोई । बाळ न विचारिता काही ॥१॥
मग त्याचे जाणे निके । अंग वोडवी कौतुके ॥धृपद॥
नेणे सर्प दोरी । अगी भलते हाती धरी ॥२॥
ताविणे ते नेणे । आणीक काही तुका म्हणे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८६८
📿 हरिभक्त आथिले ऐसे ते
1868.
हरिभक्त आथिले ऐसे ते उत्तम | येर ते अधम अधमांनी ॥१॥
हरिभक्त सप्रेम तेंचि तैसे नाम | येर ते निनामे अनामिक ॥२॥
नामा म्हणे जया नाही हरिसेवा | ते जितचि केशवा प्रेतवाणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८६८
📿 मुळीच निर्विकार ब्रह
1868.
मुळीच निर्विकार ब्रह्मा ते निश्चळ । त्यामाजीं चंचळ अहंस्फूर्ति ॥१॥
तेचि ज्ञप्तीकळा चिन्मात्र स्वरुप । तो हरी संकल्प पुरातन ॥२॥
संकल्पी कल्पेन तेचि मूळ प्रकृती । जन्म अव्यक्त ती माया पोटी ॥३॥
तेथोनी हिरण्यगर्भ ते जन्मले । तया पोटा आले विराट पै ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८६९
📿 भुजंग विखार करी पवना
1869.
भुजंग विखार करी पवनाहार | परि तो योगेश्वर म्हणू नये ॥१॥
पवनाच्या अभ्यासे कायाचि पालटी | परि तो वैकुंठी सरता नव्हे ॥२॥
शुद्ध करी मन समता धरी ध्यान | तरिच भवबंधन तुटेल रे ॥३॥
पवित्र गंगाजळ मीन सेवी निर्मळ | परि दुष्ट ते केवळ कर्म त्याचे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८७०
📿 अहंकारे आथिले ऐसे जे
1870.
अहंकारे आथिले ऐसे जे शरीर | ते जाणा मंदिर चांडाळाचे ॥१॥
आपुलिया मुखे सांगे पंढरीनाथ | नव्हे हो तो भक्त सत्य जाणा ॥२॥
नाम विटंबिती संतासि हांसती | ते मूर्ख म्हणिजेती सर्पपिली ॥३॥
तयांसि लक्ष्मीवल्लभ सांगे उपदेश | नामा विष्णुदास विनवितसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८७१
📿 जयांचे अंगले लेता ना
1871.
जयांचे अंगले लेता नाही मान । शोभा नेदी जन हांसविले ॥१॥
घुसिळता ताक कांडिता भूस । साध्य नाही क्लेश जाती वाया ॥२॥
तुका म्हणे नाही स्व:ता भांडवल । भिकेचे ते फोल बीज नव्हे ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८७२
📿 न बोलावे परी पडिला प
1872.
न बोलावे परी पडिला प्रसंग । हाकलिते जग तुझ्या नामे ॥१॥
लटिकेंचि सोंग मांडिला पसारा । भिकारी तू खरा कळो आले ॥धृपद॥
निलाजिरी आह्मी करोनिया धीर । राहिलो आधार धरूनिया ॥२॥
कैसा नेणो आता करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८७२
📿 पृथ्वी आप तेज वायु ग
1872.
पृथ्वी आप तेज वायु गगन । ही पंचभुते भिन्नभिन्न ॥१॥
येथे न करी ठाव । धरी गुरुचरणी भाव ॥२॥
पंचभूतें पंचप्राण । अवघा एक परिपूर्ण ॥३॥
देही आसोनी विदेही । एका जनार्दनी पाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८७३
📿 नाही जाले मोल कळे दे
1873.
नाही जाले मोल कळे देता काळी । कोण पाहो बळी दोघामध्ये ॥१॥
आह्मी तरी जालो जीवासी उदार । कैचा हा धीर तुजपाशी ॥धृपद॥
बहु चाळविले मागे आजिवरी । आता पुढे हरी जाऊ नेदी ॥२॥
नव्हती जो भेटी नामाची ओळखी । म्हणऊनि दुःखी बहु जालो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८७३
📿 शिकला ते गाणे राग आळ
1873.
शिकला ते गाणे राग आळवण | लोका रंजतण करावया ॥१॥
भक्ताचे ते गाणे बोबडिया बोली| तेंहि श्रीविठ्ठली अपियेले ॥२॥
बोबडिया बोली जाणते हांसती | तेहि पचिजेति रौरवी ॥३॥
नामा म्हणे बहुत बोलो आता काय | विठोबाचे पाय अंतरती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८७४
📿 कैसा कृपाळु हे न कळस
1874.
कैसा कृपाळु हे न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥
काय ऐसे बळ आहे तुजपाशी । पाहो हरी घेसी कोण आड ॥धृपद॥
पाडियेला ठायी तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥२॥
आता तुम्हा आम्हा उरी तोचि बरे । काय हे उत्तरे वाढवूनि ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८७४
📿 राजसी तामसी जे गान |
1874.
राजसी तामसी जे गान | तोडी ताल मोडी मान ॥१॥
ख्याल गाये कंपस्वर | रिझवी दात्याचे अंतर ॥२॥
है तो प्रीति धनावरी | अर्था अनर्थ तो करी ॥३॥
नामा म्हणे हा शास्त्रार्थ | अर्थ तोचि होय स्वार्थ ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८७४
📿 एक शुद्ध ब्रह्मा ज्ञ
1874.
एक शुद्ध ब्रह्मा ज्ञानाचें भांडार । एक ते अंतर मळीन सदा ॥१॥
दोघांमांजी वसे परमात्मा एक । परि बुद्धिचा तो देख पालटची ॥२॥
एका जानर्दनी गुरुसी शरण । काया वाचा मन ठेवा पायी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८७५
📿 चुकलिया आम्हा करितसा
1875.
चुकलिया आम्हा करितसा दंड । हाकासी का खंड पांडुरंगा ॥१॥
चाळविली एके रिद्धीसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हे देवा ॥धृपद॥
का मी येथे गुंतो मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाठी ॥२॥
केले म्या जतन आपुले वचन । ठायीचे धरून होतो पोटी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८७५
📿 सुवर्ण आणि परिमळ | ह
1875.
सुवर्ण आणि परिमळ | हिरा आणि कोमळ |योगी आणि निर्मळ | हे दुर्लभ जी दातारा ॥१॥
देव जरी बोलता | तरी कल्पतरु चालता |गज जरी दुभता | हे दुर्लभ जी दातारा ॥२॥
धनवंत आणि दयाळु | व्याघ्र आणि कृपाळु |अग्नि आणि सीतळु | हे दुर्लभ जी दातारा ॥३॥
सुंदर आणि पतिव्रता | सावधान होय श्रोता |पुराणिक तरी ज्ञाता | हे दुर्लभ जी दातारा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८७६
📿 कृपावंत कोप न धरावा
1876.
कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू ॥१॥
आम्ही तुझा पार काय जाणो देवा । नेणो कैसी सेवा करावी ते ॥धृपद॥
अनंत अरुपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सर्वोत्तमा ॥२॥
चांगली हि नामे घेतली ठेवुन । जालासी लहान भक्तीकाजा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८७६
📿 शब्दात मांडे येती भो
1876.
शब्दात मांडे येती भोजना | अभ्यास अज्ञाना तरी फळे ॥१॥
मुंगीचे थडके फुटे जो आकाश | ब्रह्मत्व सायास न ये हाती ॥२॥
मशकाचे ओढी मेरू हाले बुडी | जीवाचे ते जोडी ब्रह्म मिळे ॥३॥
उदकींची मासोळी सूर्यासी ते भेटे | तरी वारियाचे कोर्डे दृष्टी पडे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८७८
📿 जन पूजी याचा मज का आ
1878.
जन पूजी याचा मज का आभार । हा तुह्मी विचार जाणा देवा ॥१॥
पत्र कोण मानी वंदितील शिक्का । गौरव सेवका याचि मुळे ॥धृपद॥
मी मीपणे होतो जनामधी आधी । कोणे दिले कधी काय तेव्हा ॥२॥
आता तू भोगिता सर्व नारायणा । नको आम्हा दीना पीडा करू ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८७८
📿 नामाची लेखनी श्वानाच
1878.
नामाची लेखनी श्वानाचिये कानी | धांवतसे घाणी चर्माचिये ॥१॥
विंचू म्हणतसे उदार मी दाता | उचित है देता नलगे वेळ ॥२॥
सूकर म्हणे गृहस्थ मी भला | शेखी तयाचा डोळा विष्टेवरी ॥३॥
नापिक म्हणे माझी नांदणूक मोठी | धोकटी माझारी जन्म गेला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८७८
📿 निरालंब देशींचा गुरु
1878.
निरालंब देशींचा गुरुराया । धरें का रे भाव चरणकमळीं ॥१॥
धरितांचि भाव नासतसे माया । त्यांचे स्वरुप ठाया वोळखावें ॥२॥
भाव अभावा विरहित साचे । ते रुप जयाचे हृदयी ध्यावें ॥३॥
एका जनार्दनी ऐसे जे रुपडें । हृदयी चोखडे ध्याई जना ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८७९
📿 गुरुमुखें घेता तो नि
1879.
गुरुमुखें घेता तो निर्दोष । येर्हर्वीं आयास पडे कष्ट ॥१॥
राम कृष्न हरिमंत्र हा सोपा । उच्चारिता खेपा खंडे कर्म ॥२॥
तुटती भावना द्वैताची ते बुद्धि । निरसे उपाधि कामक्रोध ॥३॥
एका जनार्दनी सत्य सत्य साचा । रामनाम मंत्रांचा जप करी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८८०
📿 तुम्हा आम्हा तुटी हो
1880.
तुम्हा आम्हा तुटी होईल यावरी । ऐसे मज हरी दिसतसे ॥१॥
वचनाचा काही न देखो आधार । करावा हा धीर कोठवरी ॥धृपद॥
सारिले संचित होते गाठी काही । पुढे ॠण ते ही नेदी कोणी ॥२॥
जावेचि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८८०
📿 कांडितांचि कोंडा न न
1880.
कांडितांचि कोंडा न निघे तांदूळ | शेरा कैसे फळ अमृताचे ॥१॥
कण्हेरीच्या मुळा सुगंध तो नाही | कसाबाची गाई जिणे कैचे ॥२॥
रुईदूध जरी येईल भोजना | लोभियाच्या धना बेंच नाही ॥३॥
निर्फळ हे जिणे भक्तिविण मन | नामा म्हणे जाण नये कामा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८८०
📿 मोह ममता ही समुळ नाश
1880.
मोह ममता ही समुळ नाशावी । तेव्हाचि पावावी आत्मशुद्धि ॥१॥
चित्तशुद्धि झालिया गुरुचरणसेवा । तेणे ज्ञानठेवा प्राप्त होय ॥२॥
एका जनार्दनी प्राप्त झाल्या ज्ञान । ब्रह्मा परिपुर्ण अनुभवेल ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८८१
📿 देव मजुर देव मजुर ।
1881.
देव मजुर देव मजुर । नाही उजुर सेवेपुढे ॥१॥
देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनिया बळ लपतसे ॥२॥
देव वर काई देवतर काई । तुका म्हणे राई तरी मोठी ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८८१
📿 बुजगावणे शेती माणसे
1881.
बुजगावणे शेती माणसे म्हणती | काय त्याचे हाती शस्त्र शोभे ॥१॥
हंसासी विरोध करीत कावळा | नेणे त्याची कळा उंचपणे ॥२॥
अनामिकासंगे पाठविता पंडिता | तो तयाते तत्त्वता काय जाणे ॥३॥
नामा म्हणे बापा करू नको तैसे | विचार कायसे पाहसील ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८८२
📿 बेडुक म्हणिजे चिखलाच
1882.
बेडुक म्हणिजे चिखलाचा भोक्ता | क्षीर सांडूनि रक्ता गोचीड झोंबे ॥१॥
जयाची वासना तयासिच गोड | प्रेमसुख चाड नाही त्याला ॥२॥
वांझ म्हणे मी वाढविते जोंजार | उघडावया कवाड नाही कोणी ॥३॥
अस्वलाशी तेल माखियले कानी | ते म्हणे रानी थोर सुख ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८८२
📿 बुद्धि आणि मन सावध क
1882.
बुद्धि आणि मन सावध करुन । मन उघडी लोचन मुल तत्त्वीं ॥१॥
सदगुरुचे दास्य करी एकभावे । काया वाचा जीवे शरण रिघा ॥२॥
पंचभूतापर प्रकृतीचा वर । नामरुप विस्तार नाही जेथे ॥३॥
एका जनार्दनी धारणा ही बळी । चतुर्थ शुण्यावरी चित्त यावे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८८३
📿 देव बासर देव बासर ।
1883.
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथे तेथे ॥१॥
देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥धृपद॥
देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवी जडे ॥२॥
देव बावळा देव बावळा । भावे जवळा लुडबुडी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८८४
📿 देव निढळ देव निढळ ।
1884.
देव निढळ देव निढळ । मूळ नाही डाळ परदेशी ॥१॥
देव अकुळी देव अकुळी । भलते स्थळी सोयरीक ॥२॥
देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभे ठकी ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८८४
📿 बहुत दाविती खुणा । आ
1884.
बहुत दाविती खुणा । आमुच्या नये त्या मना । आजी आला पाहुणा । गुरुराव ॥१॥
सांगे बोधाचिया गोष्टी । म्हणे का रे होता कष्टी । या संसाराची तुटी । करा करा लवलाहे ॥२॥
का रे होता उगेच उदास । आशा मोह तोडा पाश । का रे कासावीस । होता वाउगे परदेशी ॥३॥
धरा धरा मंत्र मुखी । जेणे शिवादिक जाहलें सुखी । तुमचे तुम्हा न कळे शेखी । वाउगें का शिणतां ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८८५
📿 देव बराडी देव बराडी
1885.
देव बराडी देव बराडी । घाली देंठासाठी उडी ॥१॥
देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचे कवाड ॥धृपद॥
देव भाविक देव भाविक । होय दासाचे सेवक ॥२॥
देव होया देव होया । जैसा म्हणे तैसा तया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८८५
📿 ऐसे जे धाले पुर्ण नि
1885.
ऐसे जे धाले पुर्ण निमाले । ते नाही आले परतोनियां ॥१॥
घडीनें घडी चढतसे गोडी । अखंड आवडी संतापायीं ॥२॥
सांडोनिया काम स्मरे रामनाम । अंतरी ते प्रेम धरुनिया ॥३॥
एका जानर्दनी रंगले नामी । तया वंदुं आम्ही सर्वभावे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८८६
📿 देव भला देव भला । मि
1886.
देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला ॥१॥
देव उदार देव उदार । देता नाही थोडे फार ॥धृपद॥
देव बळी देव बळी । जोडा नाही भूमंडळी ॥२॥
देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वा जीवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८८७
📿 देव पाहो देव पाहो ।
1887.
देव पाहो देव पाहो । उंचे ठायी उभे राहो ॥१॥
देव देखिला देव देखिला । तो नाही कोणा भ्याला ॥धृपद॥
देवासी काही मागो मागो । जीव भाव त्यासी सांगो ॥२॥
देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८८७
📿 उपाय असता अपाय मानित
1887.
उपाय असता अपाय मानिती | तया अधोगति न चुकती ॥१॥
मनुष्यामाझारी तो एक गाढव | तया अनुभव काय करी ॥२॥
नामा म्हणे देव ऐसियासी कैचा | काया मने वाचा भेदवादी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८८७
📿 गोडी वेगळा ऊंस वाढे
1887.
गोडी वेगळा ऊंस वाढे । हे तो न जोडे कल्पांती ॥१॥
जों जों वाढे तो तो गोड । ऐशी चाड भावाची ॥२॥
जों जों धरिशील भाव । तो तो देव दिसे पुढे ॥३॥
ही तो प्रचीति घ्या अंगी । नाचा रंगी संतांच्या ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८८८
📿 देव आमचा देव आमचा ।
1888.
देव आमचा देव आमचा । जीव सकळ जीवाचा ॥१॥
देव आहे देव आहे । जवळी आम्हा अंतरबाहे ॥धृपद॥
देव गोड देव गोड । पुरवी कोडाचे ही कोड ॥२॥
देव आम्हा राखे राखे । घाली कळिकाळासी काखे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८›
📿 अभंग क्र. १८८८
📿 श्रीगुरुपायीं ठेवींत
1888.
श्रीगुरुपायीं ठेवींतुं विश्वास । दासाचा तुं दास होय त्यांच्या ॥१॥
परब्रह्मा राम वसिष्ठा शरण । कृष्णें संदीपन गुरु केला ॥२॥
वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी । वंद्य त्रिभूवनीं झाला वाल्हा ॥३॥
एका जनार्दनी गुरु मज भेटला । मोकळा दाविला मार्ग तेंणे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८८९
📿 हरिदासपणे उभविला ध्व
1889.
हरिदासपणे उभविला ध्वज | परि तो वर्म बीज न कळेची ॥१॥
काय करू देवा जळो याची बुद्धि | जोंवरी नाही शुद्धि परलोकाची ॥२॥
मुद्रा धारण अंगी गळा तुळसिमाळा | परी नाही जिन्हाळा स्वहिताचा ॥३॥
धरी बहु वेष वृथा करी दोष | नाम ब्रह्मरस अंगी नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८९०
📿 प्रेम तेथे वास करी ।
1890.
प्रेम तेथे वास करी । मुखी उच्चारिता हरी ॥१॥
प्रेमे यावे तया गावा । चोजवी तया वैष्णवा ॥धृपद॥
प्रेमे पाठी लागे बळे । भक्त देखोनिया भोळे ॥२॥
प्रेम न वजे दवडिता । शिरे बळे जेथे कथा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८९०
📿 देवीचिये चाडे भोप्या
1890.
देवीचिये चाडे भोप्याचे आर्जव | येरवी त्याचे नांव कोण घेन ॥१॥
मीतज्वरामुळे खावी नंदपुडी | येर कडु कुडी कोण सेवी ॥२॥
सद्बुद्धिकारणे संतांचे गौरव | येरवी त्यांचे नांव कोण पुसे ॥३॥
रोगामुळे पाहे वैद्याचे कारण | येरवी कधी कोण पुसे तया ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८९१
📿 काय चाड आम्हा बाहेरल
1891.
काय चाड आम्हा बाहेरल्या वेषे | सुखाचे कारण असे अंतरी ते ॥१॥
भीतरी पालट जब नाही जाला | तोंवरी न बोला जाणपणे ॥२॥
चंदनाचे संगे है कळी टाकळी | नांवे परि उरली पालट देही ॥३॥
नामा म्हणे ऐसे सांगा मज कोणी | जेणे केशव येऊनि हृदयी राहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८९२
📿 नाही तुह्मी केला । अ
1892.
नाही तुह्मी केला । अंगीकार तो विठ्ठला ॥१॥
सोंगे न पावीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥धृपद॥
प्रेम नाही अंगी । भले म्हणविले जगी ॥२॥
तुका म्हणे देवा । मज वाया का चाळवा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 वैष्णव संबंधी उद्गार›
📿 अभंग क्र. १८९३
📿 एकचि है तत्त्व एकाका
1893.
एकचि है तत्त्व एकाकार देशी | एक तो नेमेसी सर्व जनी ॥१॥
ऐसे ब्रह्म पाहा आहे सर्व एक | नलगे तो विवेक करणे कांही ॥२॥
मिथ्या है डंबर माया मथितार्थ | हरि हाची स्वार्थ वेगी करी ॥३॥
नामा म्हणे समर्थ बोलिला तो वेद | नाही भेदाभेद ब्रह्मपणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८९४
📿 मज ऐसे कोण उद्धरिले
1894.
मज ऐसे कोण उद्धरिले सांगा । ब्रीदे पांडुरंगा बोलतसा ॥१॥
हातींच्या कांकणा कासया आरिसा । उरलो मी जैसा तैसा आहे ॥धृपद॥
धनवंतरी हरी रोग्याचिये व्यथे । ते तो काही येथे न देखिजे ॥२॥
तुका म्हणे नाही अनुभव अंगे । वचन वाउगे कोण मानी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८९५
📿 काय ते सामर्थ्य न चल
1895.
काय ते सामर्थ्य न चले या काळे । काय जाली बळ शक्तीहीण ॥१॥
माझिया संचिते आणिलासी हरी । जाले तुजवरी वरीष्ठ ते ॥धृपद॥
काय गमाविली सुदर्शन गदा । त्या भेणे गोविंदा लाजतसा ॥२॥
तुका म्हणे काय ब्रिदाचे ते काम । सांडा परते नाम दिनानाथ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८९७
📿 न म्हणे साना थोर । द
1897.
न म्हणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥१॥
सकळा द्यावी एकी चवी । तहान हरूनि निववी ॥धृपद॥
न म्हणे दिवस राती । सर्व काल सर्वा भूती ॥२॥
तुका म्हणे झारी । घेता तांब्याने खापरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १८९८
📿 इच्छा चाड नाही । न ध
1898.
इच्छा चाड नाही । न धरी संकोच ही काही ॥१॥
उदका नेले तिकडे जावे । केले तैसै सहज व्हावे ॥धृपद॥
मोहरी कांदा ऊस । एक वाफा भिन्न रस ॥२॥
तुका म्हणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥