238.
रामकृष्ण ऐसी उच्चारिता नामे । नामी नाचेन मी प्रेमे संतांपुढे ॥१॥
काय घडेल ते घडो ये शेवटी । लाभ आणि तुटी देव जाणे ॥२॥
चिंता मोह आशा ठेवीन निराळी । देईन हा बळी जीब पायी ॥३॥
तुका म्हणे काही उरो नेदी उरी । सांडीन हे थोरी ओंवाळोनी ॥४॥
239.
वाचेच्या चापल्ये बहु झालो कुशल । नाही बीज मूळ हाता आले ॥१॥
पंढरिराया दुःखी होते मन । अंतरीचे कोण जाणे माझे ॥२॥
पूज्य झालो अंगा आला अभिमान । पुढील कारण खोंळबळे ॥३॥
तुका म्हणे खून न कळेचि निरुती । सांपडलो हाती अहंकाराचे ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २३९
📿 जन्मला देह पोशिला सु
239.
जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥
येक लेंचि यावे येक लेंचि जावे । हेचि अनुभवावे आपणाची ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरी भरंवसा । शरण जा सवेर्शा विठोबासी ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५›
📿 अभंग क्र. २३९
📿 हमरे चीर दे बनवारी॥ध
239.
हमरे चीर दे बनवारी॥धृ०॥
लेकर चीर कदंब पर बैठे । हम जलमा नंगी उघारी॥१॥
तुमारो चीर तो तब नही । देउंगा हो जा जलजे न्यारी॥२॥
ऐसी प्रभुजी क्यौ करनी । तुम पुरुख हम नारी॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २३९
📿 स्त्रियांचा तो संग न
239.
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरे ना ॥धृपद॥
दृष्टिमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे । लावण्य ते खरे दुःखमूळ ॥२॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधू संघष्टणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २३९
📿 बैसविती हरी अस्त्र घ
239.
बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥
धाउनी गळा पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढे येक ॥२॥
टिरीया माडिया वाजविती पाय । हरुषे नाचताहे देवराया ॥३॥
ऐसे नित्यानित्य क्रीडा ते करिती । देव ते पाहाती विमानी ते ॥४॥
240.
स्वामीचे हे देणे । येथे पावलो दर्शने ॥१॥
करू आवडीने वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥२॥
कळावया वर्म । हा तो पायाचाचि धर्म ॥३॥
तुका म्हणे सिद्धी । हेचि पावविली बुद्धी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४०
📿 जन्मांचे साकडे नाही
240.
जन्मांचे साकडे नाही माझे कोडे । जेंणे तुम्हा पडे वोझे देवा ॥१॥
कोणत्याही कुळी उंच नीच वर्ण । हे मज कारण नाही त्यांचे ॥२॥
वैष्णवाचे घरी लोळेन परवरी । करी अधिकारी उच्छिष्टाच्या ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरी पुशयाती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २४०
📿 पराविया नारी रखुमाईस
240.
पराविया नारी रखुमाईसमान । हे गेले नेमून ठायीचेचि ॥१॥
जाई वो तू माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हो ॥धृपद॥
न साहावे मज तुझे हे पतन । नको हे वचन दुष्ट वदो ॥२॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे झाले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रीकृष्णलीला›
📿 अभंग क्र. २४०
📿 कृष्णाते चैतन्य गौळि
240.
कृष्णाते चैतन्य गौळिया गोपाळा । जिवींचा जि-व्हाळा कृष्ण एक ॥१॥
न गमेचि तया कृष्ण संगाविणे । कृष्णी चरणी मन सर्वकाळ ॥२॥
कृष्ण सुख जिवी कोंदले सर्वांसी । उभे कृष्णपाशी मागेंपुढे ॥३॥
नामा ह्मणे कृष्ण भक्ताचे जीवन । कृष्णी समाधान भक्तालागी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४१
📿 जया जे वासना तया ती
241.
जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंती ॥१॥
कामाचे विलग आवरावे चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥
ममताही माया दंभ अहंकार । आवरावे साचार शांति सुखे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरावा संग । तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २४१
📿 भक्तिप्रतिपाळे दीन व
241.
भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥
पडिला विसर माझा काय गुणे । कपाळ हे उणे काय करू ॥२॥
तुका म्हणे माझे जाळूनि संचित । करी वो उचित भेट देई ॥३॥
अर्थ :
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४२
📿 आपणची सारा । पाहावे
242.
आपणची सारा । पाहावे की नारीनरा ॥1॥
पटाकारणे हे जनी । पांडुरंग तंतु मनी ॥2॥
भावेवीण भजले । भिउनिया झांकी डोळे ॥3॥
म्हणे काय पाहू येते । भिन्न नव्हे वस्तु जेथे ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २४२
📿 सुंदर राजसु सकुमारु
242.
सुंदर राजसु सकुमारु । बिदुले न साहे ज्यासी ।
स्वबुद्धी अळंकारला पराग्रासूनी । ठेला मौन्य पडले या शब्दासी ॥
पाहो जाय तव पाहणे ग्रासी । नवलावो काय या सुखासी ।
न अवलोकवे मना अवधारुनी । ध्यानी आता न विसंबे तझिया पायासी रया ॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २४२
📿 तुजविण मज कोण वो सोय
242.
तुजविण मज कोण वो सोयरे । आणीक दुसरे पांडुरंगे ॥१॥
लागलीसे आस पाहातसे वास । रात्री वो दिवस लेखी बोटी ॥२॥
काम गोड मज न लगे हो धंदा । तुका म्हणे सदा हेचि ध्यान ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २४२
📿 नित्य तो सोहळा करिता
242.
नित्य तो सोहळा करिताती सुरवर विचार पहावयाला देव येतो ॥१॥
अंतरी सुरवर विचार करिती । काला श्रीपती करित स्वये ॥२॥
उच्छिष्ट प्रसाद सेवुमधणीवरी । मत्स्यरुप निर्धारी घेती सर्व ॥३॥
एका जनार्दनी जाणतसे खुण । म्हणोनि विंदान आरंभिले ॥४॥
243.
कासया गुणदोष पाहो आणिकांचे । मज काय त्यांचे उणे असे ॥१॥
काय पाप पुण्य पाहो आणिकांचे । मज काय त्यांचे उणे असे ॥२॥
नष्ट दृष्टपण कवणांचे वाणू । तयाहून अणु अधिक माझे ॥३॥
कुचर खोट मज कोण असे आगळा । तो मी पाहो आपुलिया ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५›
📿 अभंग क्र. २४३
📿 हाती घोडा महाल खजीना
243.
हाती घोडा महाल खजीना दे दवलतपर लातरे ।
करीयो प्रभुजीकी बात सबदीन करीयो प्रभूजीकी बात॥धृ०॥
मा बाप और बेहेन भाई कोई नही आयो सातरे॥१॥
मिराके प्रभु गिरिधर नागर भजन करो दिन रातरे॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २४३
📿 गौळणी
243.
गौळणी
परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
म्हणती गौळणी हरीची पाउले धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपत छपत येतो हरी हा राजभुवनी । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २४३
📿 गोविंयेंलें देवे आम्
243.
गोविंयेंलें देवे आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणे अंतरलों ॥१॥
करिती विचार इंद्रादी देव । हे सुखवैभव न मिळे आम्हा ॥२॥
शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी । पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥
ऐसा विचार करुनिया देव । मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४४
📿 आम्ही आणि संत संत आण
244.
आम्ही आणि संत संत आणि आह्मी । सूर्य आणि रश्मि काय दोन ॥1॥
दीप आणि सारंग सारंग आणि दीप । ध्यान आणि जप काय दोन ॥2॥
शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांती । समाधान तृप्ति काय दोन ॥3॥
रोग आणि व्याधी व्याधी आणि रोग । देह आणि अंग काय दोन ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २४४
📿 सकुमार साखर कापुरे घ
244.
सकुमार साखर कापुरे घोळिली । गोडी परिमळ दोन्ही उरली ॥
मित्रत्व करा जीवाहून वेगळे । पढियंते आगळ प्रेमजाण ॥
तरूमाजी जैसा एक चंदनु । राहिल वेधुनी वनस्पती ॥
बापरखुमादेविवरू जीवींचा जिव्हाळा । काही केलिया वेगळा नव्हे गे माये ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४४
📿 तुम्ही तो साकडे बहुत
244.
तुम्ही तो साकडे बहुत वारिले । आता का उगले बोलू देवा ॥१॥
आजीवरी पडिलो लिगाडाचे गुंती । तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥
झाला दिसे मज मोकळा मारग । धिक्कारिती जग मागे पुढे ॥३॥
चोखा म्हणे ऐसे विरीत देखिले । ते साचचि संचले मनी माझ्या ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५›
📿 अभंग क्र. २४४
📿 बासुरी सुनूंगी । मै
244.
बासुरी सुनूंगी । मै तो बासुरी सुनूंगी । बनसीवालेकू जान न देऊंगी॥धृ०॥
बनसीवाला एक कहेगा । एकेक लाख सुनाऊंगी॥१॥
ब्रिंदाबनके कुजगलनमो । भर भर फूल छिनाऊंगी॥२॥
ईत गोकुल उत मथुरा नगरी । बीचमे जाय अडाऊंगी॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २४४
📿 यशोदे घराकडे चाल मला
244.
यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल ॥धु०॥
साध्या गव्हांची पोळी लाटी । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाही अडवीत गुळासाठी । मला जेवू घाल ॥१॥
तूप लावून भाकर करी । वांगे भाजून भरीत करी । वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवू घाल ॥२॥
आईग खडे साखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे । बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवू घाल ॥३॥
245.
मोक्षपद तुच्छ केले या कारणे । आम्हा जन्म घेणे युगायुगी ॥१॥
विटे ऐसे सुख नव्हे भक्तीरस । पुढता पुढती अस सेवावे हे ॥२॥
देवा हाती रूप धरवू आकार । नेंदू निराकार होऊ त्यासी ॥३॥
तुका म्हणे चित्त निवांत राहिले । घ्याई ती पाउले विटेवरी ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४५
📿 संत आणि देव मानी जो
245.
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणे येथे आगळे केले दोष ॥1॥
माता ते वेगळी कुच ते उरीचे । म्हणोनिया त्याचे मर्दन करी ॥2॥
पाप ते वेगळे पुण्य ते आगळे । म्हणोनी गरळे पितो मद ॥3॥
दिवस उगवता पाहो नये त्याते । जेणे हो संताते व्देषीयेले ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २४५
📿 स्वप्नीचा घाई विवळे
245.
स्वप्नीचा घाई विवळे साचे । चेईलिया वरी म्हणे मी न वाचे ॥
जन कैसे माया भुलले । आपले हित चुकले ॥
आपीआप देखिले । परतोन पाहे तो येकले ॥
आपींआप असे । मी काय जालोंसे लोका पुसे ॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २४५
📿 का हो देवा काही न बो
245.
का हो देवा काही न बोलाचि गोष्टी । का मज हिंपुटी करीतसा ॥१॥
कंठी प्राण पाहे वचनाची वास । तो दिसे उदास धरिले ऐसे ॥धृपद॥
येणे काळे बुंथी घेतलीसे खोळ । का नये विटाळ होऊ माझा ॥२॥
लाज वाटे मज म्हणविता देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥
246.
न मिळो खाव्या न वाढो संतान । परी हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणिक लोकांसी हेचि सांगे ॥२॥
विटेंबो शरीर होत का विपत्ती । परी राहो चित्ती नारायण ॥३॥
तुका म्हणे नाशिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेंची हीत ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४६
📿 पाणी तेचि मेघ मेघ ते
246.
पाणी तेचि मेघ मेघ तेचि पाणी । काय या दोन्हीपणी वेगळीक ॥1॥
माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन ॥2॥
साखरी गोडी गोडी साखरेसी । थिजले तुपासी काय दोन्ही ॥3॥
डोळा ते बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २४६
📿 वहिलिया येई रे । सौर
246.
वहिलिया येई रे । सौरभ्य घेऊनि जाई रे ।
तिया इया जिवित्वाच्या लाह्या रे भ्रमरा ॥
सुमनाचे जीवन विरुळे विपाये । वियोग जालिया केही न साहे रे भ्रमरा ॥
सकळिक पाल्हाळ रे । बापरखुमादेविवरू सुखाचे निधान रे भ्रमरा ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४६
📿 देह बुध्दीवेगळे जे आ
246.
देह बुध्दीवेगळे जे आकारले । निगुर्ण ते सगुणपणे उभे केले ॥१॥
देव पहा तुम्ही देव पहा । तुम्ही देव पहा तुम्ही आपुले देही ॥२॥
उघडाचि देवो जगी प्रकाशला । नागव्या्ताने देव ग्रासीला ॥३॥
चोखा म्हणे नागवे उघडे झाले एक । सहज मीपण देख मावळले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २४६
📿 उचित ते काय जाणावे द
246.
उचित ते काय जाणावे दुर्बळे । थोरिवेचे काळे तोंड देवा ॥१॥
देतो हाका कोणी नाइकती द्वारी । ओस कोणी घरी नाही ऐसे ॥धृपद॥
आलिया अतीता शब्दे समाधान । करिता वचन काय वेचे ॥२॥
तुका म्हणे तुम्हा साजे हे श्रीहरी । आम्ही निलाजिरी नाही ऐसी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २४६
📿 गेलिया वृंदावना तेथे
246.
गेलिया वृंदावना तेथे देखिला कान्हा । संवगडिया माजी उभा ध्यान लागले मना ॥१॥
हरिनाम गोड झाले काय सांगो गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठे न राहे ॥२॥
त्याचे मुख साजिरे वो कुंडले चित्त चोरे । सांडुनी अमृत धनी लुब्धली चकोरे ॥३॥
सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा । कौस्तुभा तळवटी वैजयंती शोभे गळा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २४६
📿 नव लक्ष गोपाळ यमुनेत
246.
नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥
खल्लाळाचा शब्द कानी तो ऐकिला । पेंदा पुढे झाला सरसाउनी ॥२॥
पेंदा म्हणे गडिया आपणा पाहुनी यमुना । हुंबरी घेती जाणा पहा पहा ॥३॥
एका जनार्दनी पाहुनिया देव । करिता उपाव नवलाचा ॥४॥
247.
अवीट हे क्षीर हरी कथा माऊली । सेविता सेविली वैष्णवजनी ॥१॥
अमृत राहिले लाजोनि माघारे । येणे रसे थोरे ब्रम्हानंदे ॥२॥
पतित पातकी पावन पंगती । चतुर्भुज होती देव ऐसे ॥३॥
सर्व सुखे तया मोहोरती ठाया । जेथे दाटणी या वैष्णवांची ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५›
📿 अभंग क्र. २४७
📿 कागळ कोण लेई जायरे म
247.
कागळ कोण लेई जायरे मथुरामा वसे रेवासी मेरा प्राण पियाजी॥धृ०॥
ए कागळमा झांझु शू लखिये । थोडे थोडे हेत जणायरे॥१॥
मित्र तमारा मळवाने इच्छे । जशोमती अन्न न खाय रे॥२॥
सेजलडी तो मुने सुनी रे लागे । रडता तो रजनी न जायरे॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २४७
📿 आम्ही मागो ऐसे नाही
247.
आम्ही मागो ऐसे नाही तुजपाशी । जरी तू भितोसि पांडुरंगा ॥१॥
पाहे विचारूनि आहे तुज ठावे । आम्ही धालो नावे तुझ्या एका ॥धृपद॥
ॠद्धिसिद्धि तुझे मुख्य भांडवल । हे तो आम्हा फोल भक्तीपुढे ॥२॥
तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत । बैसोनि निवांत सुख भोगू ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २४७
📿 हरिनाम गोड झाले ॥ का
247.
हरिनाम गोड झाले ॥ काय सांगू गे माये ॥
गोपाळ बहरताती ॥ वेणु आरती पावे ॥धृ॥
गेले होते वृंदावना ॥ तेथे भेटला कान्हा ॥
गोपाळांसी वेध माझा ॥ छंद लागला मना ॥१॥